Feed aggregator
पहिल्या कसोटीवर इंग्लंडचे वर्चस्व
Sports News - Fri, 2010-07-30 20:19
नॉटींगहॅम  -  इंग्लंडने जेम्स अँडरसन याच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात पाकिस्तानरील दडपण कायम ठेवले. दुसऱ्या दिवशी इंग्लंडचा पहिला डाव 354 धावांत रोखण्यात पाकने यश मिळविले होते. मात्र त्यानंतर अँडरसन याने पाच बळी टिपले. त्यामुळे दिवसअखेर पाकची 9 बाद 147 अशी घसरगुंडी उडाली होती. पाकच्या सर्व प्रमुख फलंदाजांनी निराशा केली. स्टीव्हन फीन याने तीन बळी घेत अँडरसनला चांगली साथ दिली. पाकच्या आशा 30 वर खेळत असलेल्या गुलवर आहेत.   धावफलक इंग्लंड  - पहिला डाव - अँड्य्रू स्ट्रॉस झे. कामरान गो. आमीर 45 ऍलिस्टर कुक झे. फरहात गो. आमीर 8 जोनाथन ट्रॉट पायचीत गो. आमीर 38 केव्हिन पीटरसन त्रि. गो. आसिफ 9 पॉल कॉलिंगवूड पायचीत गो. आसिफ 82 (180 चेंडू, 11 चौकार) इऑन मॉर्गन पायचीत गो. आसिफ 130  (216 चेंडू, 19 चौकार, 1 षटकार) मॅट प्रायर धावचीत 6 ग्रॅमी स्वान पायचीत गो. आसिफ 2 स्टुअर्ट ब्रॉड त्रि. गो. गुल 3 जेम्स अँडरसन पायचीत गो. आसिफ 0 स्टीव्हन फीन नाबाद 0 अवांतर 31 (बाईज 5, लेगबाइज 14, वाइड 5, नोबॉल 7) एकूण 104.
'एसटी'चालकाच्या मुलास दीड लाखाचा पगार...!
Latest News - Fri, 2010-07-30 20:10
धुळे -  एका सामान्य कुटुंबातील मुलगाही इंजिनिअर, विविध क्षेत्रातील तज्ञांप्रमाणे दीड लाख रुपये वेतनाची नोकरी मिळवू शकतो. जिद्दीच्या जोरावर येथील प्रफुल्ल बडगुजर या विद्यार्थ्यांने हे यश साध्य करून दाखविले आहे. तो "एसटी' चालक राजेंद्र बडगुजर यांचा मुलगा. "बीए'चे शिक्षण घेत असतानाच एका मल्टीनॅशनल कंपनीत ग्राफिक डिझायनर म्हणून त्याची निवड झाली आहे. उत्तर महाराष्ट्रांतर्गत येथील संगणक क्षेत्रातील अग्रेसर एक्सप्लोरा स्कूलच्या विद्यार्थ्यांमध्ये सर्वाधिक वेतनाची नोकरी मिळविणारा प्रफुल्ल पहिला विद्यार्थी ठरला आहे. एक्सप्लोरा स्कूलतर्फे प्रफुल्लला आज शिवसेनेचे महानगरप्रमुख भूपेंद्र लहामगे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले. एक्सप्लोरा स्कूलचे संचालक विष्णुकांत फाफट, राजेंद्र बडगुजर, चंद्रकला बडगुजर, रवी भदाणे, राजेंद्र सजवान उपस्थित होते. श्री. लहामगे म्हणाले, की विद्यार्थ्यांनी पारंपरिक क्षेत्राबरोबरच वेगळ्या वाटा निवडून "करिअर' घडविले पाहिजे. मल्टिमीडिया क्षेत्रात अनेक संधी उपलब्ध होत आहेत. "एसटी' चालकाचा मुलगा दीड लाखाच्या वेतनाची नोकरी मिळवू शकतो, हे प्रेरणादायी उदाहरण आहे. श्री.
कारागृहातील सालेमची वागणूक समाधानकारक
Latest News - Fri, 2010-07-30 20:10
मुंबई -  ऑर्थर रोड कारागृहात गॅंगस्टर अबू सालेमची वागणूक समाधानकारक असून त्याच्याविरोधात कोणत्याही बंद्याने तक्रार केलेली नाही, असा खुलासा माहितीच्या अधिकारात मिळालेल्या तपशिलात उघड झाला आहे. सालेम बराक क्रमांक 10 मध्ये होता. त्याच्या वर्तणुकीबाबत त्याने माहितीच्या अधिकाराचा अर्ज दाखल केला होता. या अर्जाला मुंबई मध्यवर्ती कारागृहाचे माहिती अधिकारी ए. एस. कारकर यांनी ही माहिती दिली आहे. सालेमची कारागृहातील वागणूक समाधानकारक असून तो शिस्तीचे पालन करतो. कारागृहातील नियमांप्रमाणे तो मोबाईल वापरत नाही आणि तशा प्रकारची अन्य कैद्यांची तक्रारही नाही तसेच कारागृहात खंडणी, गटबाजी किंवा टोळीहल्ला अशा प्रकारच्या तक्रारीही त्याच्याविरोधात कोणी केलेल्या नाहीत, असे या तपशिलात म्हटले आहे. कारागृहात कोणत्याही प्रकारची टोळी त्याने बनविली नसून तुरुंगाधिकाऱ्यांनी त्याच्याविरोधात आतापर्यंत कोणताही गुन्हा दाखल केलेला नाही, असे यामध्ये म्हटले आहे. चालू वर्षी मार्चमध्ये सालेमने ही माहिती मिळविण्यासाठी अर्ज केला होता.
संसदेचा पहिला आठवडा गेला वाया
Latest News - Fri, 2010-07-30 20:10
नवी दिल्ली  -  आक्रमक विरोधी पक्ष आणि आडमुठे सरकार यामुळे संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा पहिला आठवडा अक्षरशः वाया गेला आहे. कोंडी फोडण्यासाठी आता संसदेबाहेर प्रयत्न सुरू असून, त्यासाठी शनिवार आणि रविवार हे दोन दिवस महत्त्वाचे ठरणार आहेत. आधीच गोंधळामुळे भाजपची साथ सोडणाऱ्या डाव्यांपाठोपाठ लालू, मुलायमसिंह यांनी सरकारला अनुकूल भूमिका घेतल्याने भाजप आघाडी एकाकी पडत आहे. "यूपीए' सरकारचे घटकपक्ष आणि समाजवादी पक्ष व राष्ट्रीय जनता दल या मित्रपक्षांनी सरकारवर "मतविभागणी नकोच नको', असा दबाव वाढविण्यास सुरवात केल्याने कॉंग्रेसच्या गोटात निवांतपणा आहे. लोकसभेत आधी स्थगन प्रस्ताव आणि तो फेटाळला गेल्यानंतर नियम 184 अन्वयेच चर्चा व्हावी, या विरोधकांच्या मागणीला सरकारने ठेंगा दाखविला आहे. मतविभागणी नको, या सरकारच्या ठाम भूमिकेला आता घटकपक्षांकडूनही जोरदार साथ मिळत आहे. महागाईच्या मुद्द्यावर तृणमूल कॉंग्रेस आणि द्रमुकने सरकारच्या विरोधात भूमिका घेतल्यामुळे सभागृहात मतविभागणी झाल्यास हे दोन्ही पक्ष मदतीला धावून येतील, असा विरोधकांचा होरा होता.
साखर नियंत्रणमुक्त करू नका
Latest News - Fri, 2010-07-30 20:10
मुंबई -  केंद्र सरकारने साखर नियंत्रणमुक्त करू नये, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसने केली आहे. साखर नियंत्रणमुक्त केल्यास सट्टेबाज आणि साठेबाज व्यापाऱ्यांच्या हाती सर्व सूत्रे जाऊन ग्राहक व ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होईल, अशी भीती प्रदेश कॉंग्रेसने व्यक्त केली आहे. केंद्र सरकारने गव्हाच्या धोरणातही सुधारणा करावी, अशी मागणीही महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसतर्फे करण्यात आली आहे. वर्षानुवर्षे गव्हाचा निव्वळ साठा न करता बाराशे रुपये क्विंटल या समान दराने सबंध देशभर खुल्या बाजारात गव्हाची विक्री करावी, असेही प्रदेश कॉंग्रेसने सुचविले आहे. प्रदेश कॉंग्रेसचे प्रवक्ते कन्हैयालाल गिडवानी यांनी आज येथे पत्रकार परिषदेत बोलताना, रास्त दराने गव्हाची विक्री करण्याचे धोरण राबविल्यास गहू गोदामात न सडता नागरिकांच्या घरी जाईल, असा विश्वास व्यक्त केला. अन्न व नागरी पुरवठा विभागाचे गहूविषयक धोरण चुकल्याची टीका त्यांनी केली. श्री. गिडवानी यांच्या निवेदनाची प्रत महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी पंतप्रधान मनमोहनसिंग यांना पाठविली आहे.
देशात मॉन्सून सरासरी गाठणार
Latest News - Fri, 2010-07-30 20:10
बंगाल, उत्तर प्रदेश, बिहार मात्र सरासरीच्या मागे राहण्याची शक्यता नवी दिल्ली -  गेल्या काही दिवसांत देशभरात झालेल्या पावसामुळे मॉन्सूनने बहुतांश ठिकाणी सरासरीमधील तूट भरून काढली आहे. आगामी दोन महिन्यांतही चांगला पाऊस होईल आणि सरासरी भरून निघेल, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने व्यक्त केला आहे. बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, पूर्व उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशाच्या काही भागांत पावसाचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने मॉन्सूनचा मध्यावधी आढावा असून, त्याविषयीची माहिती हवामान खात्याचे महासंचालक डॉ. अजित त्यागी यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. जून महिन्याच्या अखेरीस देशात सरासरीपेक्षा 16 टक्के कमी पाऊस झाला होता. गेले दहा दिवस झालेल्या पावसामुळे ही तूट भरून निघाली असून, आता ती पाच टक्क्यांवर आली आहे. ईशान्य भारत आणि दक्षिण द्वीपकल्पाच्या टोकाला पावसाचे प्रमाण कमी राहिले आहे. पावसाचा एकूण विस्तारही समाधानकारक आहे. देशातील 76 टक्के भागात सरासरीएवढा किंवा जास्त पाऊस झाला आहे. केवळ ईशान्य भारतात हे प्रमाण कमी आहे, अशी माहिती डॉ. त्यागी यांनी दिली.
2124 ग्रामपंचायतींच्या निवडणुका 5 सप्टेंबरला
Latest News - Fri, 2010-07-30 20:10
मुंबई -  राज्यातील 22 जिल्ह्यांमधील 2124 ग्रामपंचायतींच्या निवडणुका पाच सप्टेंबरला होणार आहेत. राज्य निवडणूक आयोगाने आज या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला. अर्ज 16 ते 21 ऑगस्ट या कालावधीत सादर करता येतील. मतमोजणी सोमवारी, 6 सप्टेंबरला होईल. निवडणूक होणाऱ्या 2124 ग्रामपंचायतींपैकी सर्वाधिक 763 जळगाव जिल्ह्यातील आहेत. त्या खालोखाल उस्मानाबाद 430, चंद्रपूर - 321, औरंगाबाद-258 असा संख्याक्रम आहे. दरम्यान, 18 जिल्ह्यांतील 1701 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचे मतदान आज सर्वसाधारण शांततेने पार पडले, अशी माहिती आयोगाच्या सूत्रांनी दिली. Follow Us on Twitter
पाऊस थांबेपर्यंत कोकण रेल्वे "बंद'
Latest News - Fri, 2010-07-30 20:10
रत्नागिरी  -    कोकण रेल्वे मार्गावरील असोडे येथे आज पावसामुळे 80 मीटरची संरक्षक भिंत कोसळून मातीखाली गाडली गेली आहे. त्यामुळे सायंकाळी कोकण रेल्वे वाहतूक सुरू करण्याच्या कालावधीत वाढ करण्यात आली आहे. हा मार्ग सुरळीत होण्यासाठी किती काळ लागेल? हे सध्या सांगणे अशक्य असल्याचे कोकण रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक आर. नागदत्त यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. श्री. नागदत्त यांनी काल (ता. 29) दुपारी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये शुक्रवारी (ता. 30) सायंकाळपर्यंत वाहतूक सुरळीत होईल, असा दावा केला होता. त्याला चोवीस तास होतात तोच त्यांनी असोडे येथे संरक्षक भिंत खाली आल्याने वाहतूक सुरू होणार नसल्याचे सांगितले. त्यामुळे पाऊस थांबेपर्यंत कोकण रेल्वेची परिस्थिती "जैसे थे'च राहणार आहे. ते म्हणाले, ""रत्नागिरी ते विलवडे मार्गावरील पोमेंडी, निवसर आणि असोडे येथील काम सुरू आहे. पावसामुळे अडथळा निर्माण होत आहे. आज सायंकाळपर्यंत रेल्वे सुरू होईल, असा आमचा अंदाज होता. पोमेंडीत 6 पोकलॅन, 4 डंपरद्वारे काम सुरू आहे, तर असोडे येथे 12 पोकलॅनद्वारे युद्धपातळीवर माती काढण्याचे काम सुरू होते.
सरकारला जनतेच्या आरोग्याची काळजी नाही
Latest News - Fri, 2010-07-30 20:10
मुंबई -  मुंबई ही सोन्याचे अंडे देणारी कोंबडी समजून राज्य सरकारने कापून खायचे ठरविले आहे. सरकार 'एफएसआय' वाढवून कोट्यवधी रुपये कमवीत आहे. मात्र, सरकारला जनतेच्या आरोग्याची काळजी नाही, अशी खरमरीत टीका शिवसेनेचे कार्यकारी अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी केली आहे. मलेरिया निर्मूलनविषयक आवश्यक उपाययोजना न करणाऱ्या बिल्डरांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे आदेश त्यांनी शाखाप्रमुखांना दिले आहेत. मलेरिया प्रतिबंधात्मक उपाययोजनेसंदर्भात आज महापौरांच्या निवासस्थानी उद्धव ठाकरे यांनी आढावा बैठक घेतली. महापौर श्रद्धा जाधव, आमदार दीपक सावंत, सभागृहनेते सुनील प्रभू, स्थायी समिती अध्यक्ष राहुल शेवाळे, आरोग्य समितीच्या अध्यक्ष अश्विनी मते, पालिकेचे अतिरिक्त आयुक्त आशीषकुमार सिंह, मनीषा म्हैसकर, असीम गुप्ता, संचालक (प्रमुख रुग्णालये) डॉ. संजय ओक आदी या बैठकीला उपस्थित होते. मुंबईत मलेरियाचे प्रमाण वाढत असून, या रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राजकीय पक्षांनी मतभेद विसरून मलेरियाच्या निर्मूलन मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले आहे.
मुंबई हल्ल्यावर राणेंचे विधान धादांत खोटे
Latest News - Fri, 2010-07-30 20:10
मुंबई -  मुंबईवरील अतिरेकी हल्ल्यास येथील काही राजकीय नेत्यांची मदत होती, या महसूलमंत्री नारायण राणे यांच्या विधानात काहीही तथ्य नाही, असे मुंबई पोलिसांतर्फे उच्च न्यायालयास सांगण्यात आले. या संदर्भात पोलिसांनी सखोल चौकशी केली. मात्र राणे यांच्या म्हणण्याप्रमाणे या हल्ल्यास राजकीय नेत्यांचे साह्य असल्याचे आढळून आले नाही, असे मुख्य सरकारी वकील पांडुरंग पोळ यांनी सांगितले. त्यामुळे खंडपीठाने या प्रकरणीचा निकाल राखीव ठेवला. मुंबईवर 26 नोव्हेंबर 2008 रोजी झालेल्या अतिरेकी हल्ल्यास येथील काही राजकारण्यांनी मदत केली होती, असे राणे यांचे म्हणणे होते. त्यामुळे या संदर्भात राणे यांची पोलिसांनी चौकशी करावी आणि या राजकारण्यांना शोधून त्यांनाही शिक्षा करावी, अशी मागणी करणारी याचिका सोलापूरचे शिवसेना नेते पुरुषोत्तम बर्डे यांनी उच्च न्यायालयात सादर केली होती. तिच्यावर न्या. श्रीमती रंजना देसाई व न्या. श्रीमती विजया कापसे ताहिलरामानी यांच्यासमोर नुकतीच सुनावणी झाली. Follow Us on Twitter
राज्यात 74 व्यावसायिक महाविद्यालयांना परवानगी
Latest News - Fri, 2010-07-30 20:10
मुंबई -  राज्यात नवीन 74 व्यावसायिक पदवी महाविद्यालयांना सरकारने चालू शैक्षणिक परवानगी दिली आहे. नवी व्यावसायिक महाविद्यालये, नवीन तुकड्या, अभ्यासक्रम, शाखा या माध्यमातून आणि अभियांत्रिकी, फार्मसी, मॅनेजमेंटची नवी महाविद्यालये आदींच्या माध्यमातून राज्यात पदवीच्या सुमारे 60 हजारांहून अधिक जागा यंदाच्या वर्षी अतिरिक्त उपलब्ध झाल्या आहेत. त्यामुळे पदवी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना कोणतीही अडचण येणार नाही, असे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री राजेश टोपे यांनी "सकाळ'ला सांगितले. नवीन व्यावसायिक महाविद्यालयांपैकी मुंबई विद्यापीठ क्षेत्रात 26 महाविद्यालये, पुणे विद्यापीठ क्षेत्रात सहा, एसएनडीटी विद्यापीठ क्षेत्रात 4 महाविद्यालये आहेत. बीएस्सी कॉम्प्युटर, आयटी, फायनान्शियल मॅनेजमेंट आदी विविध अभ्यासक्रमांची ही पदवी महाविद्यालये आहेत. सध्या अस्तित्वात असलेल्या महाविद्यालयांमध्ये अतिरिक्त तुकड्या, विद्याशाखा, अभ्यासक्रम यांना 15 जुलै रोजी मान्यता देण्यात आली. यातून सुमारे 25 हजारांहून अधिक जागा पदवी अभ्यासक्रमासाठी वाढल्या.
मग काय मी तुरुंगात जाऊ? - शीला दीक्षित
Sports News - Fri, 2010-07-30 20:05
नवी दिल्ली - "केंद्रीय दक्षता आयोगाच्या अहवालाची मला कल्पना आहे पण म्हणून काय मी तुरुंगात जावे, असे तुमचे म्हणणे आहे का,'' अशी संतप्त विचारणा दिल्लीच्या मुख्यमंत्री शीला दीक्षित यांनी केली. "स्पर्धेच्या कामांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा अहवाल आला आहे. तुम्ही याची नैतिक जबाबदारी स्वीकारता का,'' असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. त्यावर भडकलेल्या शीला दीक्षित पुढे म्हणाल्या, ""मी आताच काही बोलणार नाही. आम्हाला अद्याप अहवाल मिळालेला नाही. तो मिळाल्यानंतर गरज पडल्यास आम्ही कारवाई करू. सध्या काम सुरू आहे. वेळ पडल्यास स्पर्धा संपल्यानंतरच कारवाई केली जाईल.''
गैरव्यवहाराचे आरोप भानोत यांनी फेटाळले
Sports News - Fri, 2010-07-30 20:03
नवी दिल्ली  -  लंडनमध्ये गेल्या वर्षी "क्वीन्स बॅटन रिले'दरम्यान झालेल्या कथित गैरव्यवहाराचे आरोप राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा संयोजन समितीने फेटाळून लावले. समितीचे प्रवक्ते ललित भानोत म्हणाले, ""आम्ही सर्व आर्थिक व्यवहार कार्यकारिणीच्या परवानगीनेच केले. रिझर्व्ह बॅंकेची परवानगी घेऊनच परकीय चलनात रक्कम दिली. या मंजुरीनंतरच सर्व व्यवहार झाले. या संदर्भात आमच्याकडे कोणतीही अधिकृत तक्रार करण्यात आलेली नाही. आम्ही लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालयाशी संपर्क साधला. त्यांनीच मोटारींचे अधिकृत पुरवठादार म्हणून "एएम कार अँड व्हॅन लिमिटेड' कंपनीच्या नावाची शिफारस केली.   उच्चायुक्तालयाने आखून दिलेल्या दरानुसार रक्कम देण्यात आली. एकूण रक्कम 238093.56 पौंड इतकी होती. फिरते व्हिडिओ स्क्रीन भाड्याने घेतल्याबद्दल "एएम फिल्म्स यूके लिमिटेड'यांना 24 ऑक्टोबर रोजी 146868.80 पौंड रक्कम देण्यात आली. कार्यक्रमाच्या ठिकाणी ही सुविधा आम्ही उपलब्ध करावी, असा आग्रह लंडन महानगर पोलिसांनी धरला. त्यामुळे हा व्यवहार करण्यात आला. संयोजन समितीने सर्व व्यवहार लंडनहून दिल्लीला परत येण्यापूर्वी केले.
राज्यात 'रोहयो'ची तीन हजार कामे अपूर्ण
Latest News - Fri, 2010-07-30 19:55
संपत देवगिरे  - सकाळ वृत्तसेवा नाशिक -  टंचाईग्रस्त भागात ठोस उपाययोजनांऐवजी सरसकट रस्ते व तलावांची कामे हाती घेतल्याने यातील बहुतांश कामे अपूर्ण राहिली आहेत, त्यामुळे ही सर्व कामे आता आश्वासित रोजगार हमी योजनेकडे वर्ग करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यामुळे व्यावसायिक तसेच कर्मचाऱ्यांच्या वेतनातून कपात होणाऱ्या सेवाकराच्या विनियोगाबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, ग्रामीण भागाच्या विकासाविषयी प्रशासकीय स्तरावरील साचेबद्धपणा केव्हा दूर होणार, अशी विचारणा होत आहे. शासनाने नुकत्याच घेतलेल्या आढाव्यात नाशिक, नंदुरबार, गोंदिया, चंद्रपूर, सोलापूर, औरंगाबाद, बीड, वाशीम या जिल्ह्यातील रोजगार हमी योजनेच्या आढाव्यात रस्ते व तलावांची 172 कोटी प्रस्तावित खर्चाची तीन हजार 629 कामे अपूर्ण राहिल्याचे आढळले. त्याची निश्चित कारणमिमांसा करताना टंचाईग्रस्त व कमी पैसेवारी असलेल्या या गावांत कामे सुरू केल्यावर मोठ्या प्रमाणात स्थलांतर होऊन स्थानिक स्तरावर पुरेसे मजूर मिळाले नाहीत. सध्या शेती तसेच बांधकाम क्षेत्रात मजुरीचे दर वाढले आहेत.
"समझोता'प्रकरणी एनआयएद्वारे तपास - चिदंबरम
Latest News - Fri, 2010-07-30 19:55
नवी दिल्ली -  राष्ट्रीय तपास संस्थेतर्फे (एनआयए) समझोता एक्स्प्रेसमधील स्फोटाबरोबरच त्यासंबंधीचा संपूर्ण कट आणि त्याचे मालेगाव, राजस्थान (अजमेर) येथील स्फोटांशी जुळलेले धागेदोरे याचा तपास केला जाईल, असे गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी आज येथे पत्रकार परिषदेत सांगितले. या तिन्ही घटना आणि हैदराबाद येथील मक्का मशिदीतील स्फोटामागे कोणाचा हात आहे आणि त्यामागे एकच संघटना आहे का, याबाबत तपास अपेक्षित आहे, असेही ते म्हणाले. अजमेर, हैदराबाद व समझोता एक्स्प्रेसमधील स्फोटात एकाच प्रकारची मंडळी गुंतली आहेत काय, याबाबतही तपास केला जाणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. चिदंबरम यांनी काश्मीरमधील परिस्थितीबाबतही चिंता व्यक्त केली आणि परिस्थिती सुरळीत झालेली नाही, अशी कबुलीही दिली. सरकार काश्मीरमधील सर्व संबंधितांशी चर्चा करीत आहे आणि फलनिष्पत्तीच्या संदर्भात तिचे स्वरूप गुप्त राखण्यात येत आहे, असे त्यांनी सांगितले. 2011 ची जनगणना आणि राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणीपुस्तकासंदर्भात ते म्हणाले, की जुलैअखेर 31 राज्ये व केंद्रशासित प्रदेशातील घरे तसेच कुटुंबांची नोंदणी पूर्ण झाली आहे.
तेलंगणावर पुन्हा "टीआरएस'चा झेंडा
Latest News - Fri, 2010-07-30 19:55
हैदराबाद  -  आंध्र प्रदेशातील तेलंगणात विधानसभेच्या बारा जागांसाठी झालेल्या निवडणुकीत पुन्हा तेलंगणा राष्ट्र समितीचा (टीआरएस) झेंडा फडकला. जाहीर झालेल्या सातपैकी सहा जागांवर "टीआरएस'ने वर्चस्व राखले. उर्वरित एक जागा भारतीय जनता पक्षाने राखली. वेगळ्या तेलंगणा राज्याच्या मागणीचे प्रतिबिंब या मतदानातून उमटल्याचे मानले जात आहे. सिद्धपेट, रिसपूर, चेन्नूर, मंचेरियाल, धर्मपुरी, वेमुलवाडा हे मतदारसंघ "टीडीएस'ने आपल्याकडेच राखले, तर निजामाबाद ग्रामीणमध्ये भाजपने विजय मिळविला. येल्लारेड्डी, कोरतला, सिरकिल्ला, हुजुराबाद आणि पश्चिम वारंगळ या पाच मतदारसंघांत इलेक्ट्रॉनिक्स मतदानयंत्रांऐवजी मतपत्रिका वापरण्यात आल्या होत्या. त्यामुळे या पाचही मतदारसंघांचा निकाल रात्री उशिरापर्यंत लागण्याची शक्यता आहे. मात्र, या सर्व मतदारसंघांमध्ये पाचव्या फेरीतील मतमोजणीपर्यंत "टीआरएस' आघाडीवर असल्याचे समजते. सिद्धपेट मतदारसंघात "टीआरएस'चे टी. हरीश राव यांनी 95 हजार 858 मतांचे आधिक्य घेत विजय मिळविला. त्यांनी राज्याचे दिवंगत मुख्यमंत्री वाय. एस.
चव्हाण-रोसय्या यांची सोमवारी दिल्लीत बैठक
Latest News - Fri, 2010-07-30 19:55
हैदराबाद  -    महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांची बैठक 2 ऑगस्टला नवी दिल्लीत पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्या निवासस्थानी आयोजित करण्यात आली आहे. गेल्या आठवड्यात आंध्राचे मुख्यमंत्री के. रोसय्या यांनी सर्वपक्षीय शिष्टमंडळासह पंतप्रधानांची भेट घेतली होती. आंध्राच्या सीमेजवळ असलेल्या नांदेड जिल्ह्यातील बाभळी प्रकल्पामुळे दोन्ही राज्यांमधील संबंधात तणाव निर्माण झाला आहे. आंध्रचे माजी मुख्यमंत्री आणि तेलगू देसम पक्षाचे नेते चंद्राबाबू नायडू यांनी धर्माबाद येथे केलेल्या आंदोलनामुळे दोन्ही राज्यांमध्ये परस्परविरोधी तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. या प्रश्नी पंतप्रधानांनी लक्ष घातले असून, त्यांनी दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना नवी दिल्लीतील रेस कोर्सवरील आपल्या शासकीय निवासस्थानी सोमवारी बोलावले आहे. दरम्यान, आंध्रचे मुख्यमंत्र्यांनी रविवारी (ता. 1) येथे सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. Follow Us on Twitter
"व्होट फॉर इंडिया'च्या माहितीवर आधारित वृत्त
Latest News - Fri, 2010-07-30 19:55
नवी दिल्ली  -  "महाराष्ट्रातील खासदारच प्रश्न विचारण्यात पुढे' हे (ता. 30) प्रसिद्ध झालेले वृत्त "व्होट फॉर इंडिया' या स्वयंसेवी संस्थेने प्रकाशित केलेल्या अहवालाच्या आधारे आहे. माहितीच्या अधिकाराखाली व लोकसभेतील कार्यवृत्तांताच्या अहवालावरून या संस्थेने खासदारांचा निधी, प्रश्न, वादविवाद याविषयी माहिती प्रसिद्ध केली आहे. या अहवालाच्या प्रकाशनासंबंधातील हे वृत्त असून, "सकाळ'चा या माहितीशी काही संबंध नाही. या वृत्तात खासदारांच्या निधीबाबत प्रसिद्ध झालेल्या माहितीबाबत केंद्रीय मंत्री मुकुल वासनिक आणि खासदार समीर भुजबळ यांनी खुलासा केला आहे. हा खुलासा संबंधित जिल्हाधिकाऱ्यांमार्फत "सकाळ'ला पाठविण्यात आला आहे. वासनिक यांच्या खासदार निधीतून दोन कोटी 12 लाख रकमेची 40 कामे प्रस्तावित असून, त्यापैकी एक कोटी 49 लाख इतक्या रकमेच्या 28 कामांना प्रशासकीय मंजुरी मिळाल्याचा खुलासा नागपूर जिल्हाधिकाऱ्यांनी केला आहे. तर, समीर भुजबळ यांनी त्यांच्या खासदार निधीतून 62 लाख 12 हजार रुपये खर्च करून 21 विविध प्रकारची कामे केली आहेत.
बिहारवर दुष्काळाचे संकट
Latest News - Fri, 2010-07-30 19:55
पाटणा -    सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने बिहारमधील 38 पैकी दोन डझनपेक्षा अधिक जिल्ह्यांमध्ये दुष्काळ पडण्याची भीती निर्माण झाली आहे. पावसाअभावी अनेक शेतांमध्ये भाताची रोपेही अद्याप लावता आलेली नाहीत. या संकटातून बाहेर पडण्यासाठी केंद्र सरकारकडून मदत मागूनही अद्याप काहीही मिळाले नसल्याचा तक्रारीचा सूर नितीशकुमार सरकारने लावला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, राज्यात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाल्याने राज्याने केंद्राकडे तीस हजार कोटी रुपयांच्या निधीची मागणी केली आहे. गेल्या खरीप हंगामात राज्य सरकारने 26 जिल्ह्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला होता परंतु या जिल्ह्यांमध्ये कोणतीही कल्याणकारी आणि लाभदायक योजना राबविली नव्हती. तेव्हाही राज्य सरकारने केंद्राकडे 26 हजार कोटींची मागणी केली होती. मात्र, केंद्राकडून केवळ 269 कोटी देण्यात आले होते. यंदा दुष्काळजन्य जिल्ह्यांच्या संख्येत वाढ होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पावसाने पाठ फिरविल्याने राज्यातील केवळ 11 लाख हेक्टरवर पिकांची लागवड करणे शक्य झाले आहे. प्रत्यक्षात तीस लाख हेक्टरवर लागवड करण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले होते.
ओरिसात "पॉस्को'साठी भूसंपादनाला सुरवात
Latest News - Fri, 2010-07-30 19:55
भुवनेश्वर  -  ओरिसा राज्य सरकारतर्फे बहुचर्चित पॉस्को पोलाद प्रकल्पासाठीच्या जमीनसंपादनाला पॅरादीप या सागरी भागात आज प्रत्यक्ष सुरवात करण्यात आली. या प्रकल्पाला स्थानिक शेतकऱ्यांचा अजूनही मोठ्या प्रमाणात विरोध आहे. जमीनसंपादन अधिकारी नृसिंह स्वाई यांनी सांगितले, की पॉस्को प्रकल्पासाठी आम्ही आज विड्याच्या पानांची शेती करणाऱ्या सहा शेतकऱ्यांना निवेदन दिले. त्यांनी आम्हाला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. या भागात आठ शेतकऱ्यांची प्रकल्पासाठी जमीन संपादित करावी लागणार आहे. या शेतकऱ्यांना "पॉस्को'कडून प्रतिएकर 11 लाख रुपये देण्याचे निश्चित करण्यात आले आहे. आज त्यापैकी प्रतिएकराला सहा लाख 70 हजार रुपये देण्यात आले. Follow Us on Twitter      

