You are hereFeed aggregator / Sources / Sports News

Sports News


Syndicate content visit www.eSakal.com
KreedaeSakal.com © CopyRight Sakaal Media Group.20092010
Updated: 5 hours 47 min ago

पहिल्या कसोटीवर इंग्लंडचे वर्चस्व

Fri, 2010-07-30 20:19

नॉटींगहॅम&nbsp -&nbsp इंग्लंडने जेम्स अँडरसन याच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात पाकिस्तानरील दडपण कायम ठेवले. दुसऱ्या दिवशी इंग्लंडचा पहिला डाव 354 धावांत रोखण्यात पाकने यश मिळविले होते. मात्र त्यानंतर अँडरसन याने पाच बळी टिपले. त्यामुळे दिवसअखेर पाकची 9 बाद 147 अशी घसरगुंडी उडाली होती. पाकच्या सर्व प्रमुख फलंदाजांनी निराशा केली. स्टीव्हन फीन याने तीन बळी घेत अँडरसनला चांगली साथ दिली. पाकच्या आशा 30 वर खेळत असलेल्या गुलवर आहेत. &nbsp धावफलक इंग्लंड&nbsp - पहिला डाव - अँड्य्रू स्ट्रॉस झे. कामरान गो. आमीर 45 ऍलिस्टर कुक झे. फरहात गो. आमीर 8 जोनाथन ट्रॉट पायचीत गो. आमीर 38 केव्हिन पीटरसन त्रि. गो. आसिफ 9 पॉल कॉलिंगवूड पायचीत गो. आसिफ 82 (180 चेंडू, 11 चौकार) इऑन मॉर्गन पायचीत गो. आसिफ 130&nbsp (216 चेंडू, 19 चौकार, 1 षटकार) मॅट प्रायर धावचीत 6 ग्रॅमी स्वान पायचीत गो. आसिफ 2 स्टुअर्ट ब्रॉड त्रि. गो. गुल 3 जेम्स अँडरसन पायचीत गो. आसिफ 0 स्टीव्हन फीन नाबाद 0 अवांतर 31 (बाईज 5, लेगबाइज 14, वाइड 5, नोबॉल 7) एकूण 104.

मग काय मी तुरुंगात जाऊ? - शीला दीक्षित

Fri, 2010-07-30 20:05

नवी दिल्ली - "केंद्रीय दक्षता आयोगाच्या अहवालाची मला कल्पना आहे पण म्हणून काय मी तुरुंगात जावे, असे तुमचे म्हणणे आहे का,'' अशी संतप्त विचारणा दिल्लीच्या मुख्यमंत्री शीला दीक्षित यांनी केली. "स्पर्धेच्या कामांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा अहवाल आला आहे. तुम्ही याची नैतिक जबाबदारी स्वीकारता का,'' असा प्रश्‍न त्यांना विचारण्यात आला होता. त्यावर भडकलेल्या शीला दीक्षित पुढे म्हणाल्या, ""मी आताच काही बोलणार नाही. आम्हाला अद्याप अहवाल मिळालेला नाही. तो मिळाल्यानंतर गरज पडल्यास आम्ही कारवाई करू. सध्या काम सुरू आहे. वेळ पडल्यास स्पर्धा संपल्यानंतरच कारवाई केली जाईल.''

गैरव्यवहाराचे आरोप भानोत यांनी फेटाळले

Fri, 2010-07-30 20:03

नवी दिल्ली&nbsp -&nbsp लंडनमध्ये गेल्या वर्षी "क्वीन्स बॅटन रिले'दरम्यान झालेल्या कथित गैरव्यवहाराचे आरोप राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा संयोजन समितीने फेटाळून लावले. समितीचे प्रवक्ते ललित भानोत म्हणाले, ""आम्ही सर्व आर्थिक व्यवहार कार्यकारिणीच्या परवानगीनेच केले. रिझर्व्ह बॅंकेची परवानगी घेऊनच परकीय चलनात रक्कम दिली. या मंजुरीनंतरच सर्व व्यवहार झाले. या संदर्भात आमच्याकडे कोणतीही अधिकृत तक्रार करण्यात आलेली नाही. आम्ही लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालयाशी संपर्क साधला. त्यांनीच मोटारींचे अधिकृत पुरवठादार म्हणून "एएम कार अँड व्हॅन लिमिटेड' कंपनीच्या नावाची शिफारस केली. &nbsp उच्चायुक्तालयाने आखून दिलेल्या दरानुसार रक्कम देण्यात आली. एकूण रक्कम 238093.56 पौंड इतकी होती. फिरते व्हिडिओ स्क्रीन भाड्याने घेतल्याबद्दल "एएम फिल्म्स यूके लिमिटेड'यांना 24 ऑक्‍टोबर रोजी 146868.80 पौंड रक्कम देण्यात आली. कार्यक्रमाच्या ठिकाणी ही सुविधा आम्ही उपलब्ध करावी, असा आग्रह लंडन महानगर पोलिसांनी धरला. त्यामुळे हा व्यवहार करण्यात आला. संयोजन समितीने सर्व व्यवहार लंडनहून दिल्लीला परत येण्यापूर्वी केले.

लैंगिक अत्याचाराविरुद्ध "ठोसा' हाच उत्तम उपाय

Fri, 2010-07-30 19:40

नवी दिल्ली&nbsp -&nbsp "देशातील महिलांना लैंगिक अत्याचाराच्या कटू वस्तुस्थितीला नेहमीच सामोरे जावे लागते. यामुळे स्वसंरक्षणासाठी मुलींनी मुष्टियुद्ध शिकावे,'' असे आवाहन मणिपूरची जागतिक विजेती एम. सी. मेरी कोम हिने केले. "दैनंदिन जीवनात रस्त्यावर किंवा नोकरीच्या ठिकाणी अशा गैरप्रकारांना सामोरे जावे लागल्यास मुली मुष्टियुद्ध शिकू शकतील. त्यांनी मूकपणे अत्याचार सहन करू नयेत. त्याऐवजी त्यांनी पुढाकार घेऊन चोख प्रत्युत्तर द्यावे, मी मुष्टियुद्ध खेळते. माझ्याशी कुणी गैरवर्तन केल्यास मी त्याला ठोसा लगावेन,'' असे 27 वर्षांच्या मेरीने पुढे सांगितले. मेरीने इंफाळमध्ये ऍकॅडमी काढली आहे. त्याविषयी माहिती देताना मेरी म्हणाली, ""सध्या माझ्याकडे 17 मुली शिकत आहेत. मी 2007 मध्ये ऍकॅडमी सुरू केली, पण अलीकडेच ती जोरात चालायला लागली आहे. लष्कराने मला पाच लाख रुपयांचे साहित्य दिले, तर केंद्रीय सीमा सुरक्षा दलाने चार लाख रुपयांची मदत केली. मुलींना ऍकॅडमीत असताना सर्व प्रकारच्या सुविधा मिळायला हव्यात आणि निवासाची व्यवस्था असावी, यावर आमचा कटाक्ष असतो. या मुली 14 ते 18 वयोगटातल्या आहेत.'' मेरी दोन जुळ्या मुलांची आई आहे.

माझ्या वयाबाबत आता कोणी बोलू नये

Fri, 2010-07-30 19:40

कोलंबो -&nbsp वयाच्या 37 व्या वर्षी पाचवे कसोटी द्विशतक झळकावण्याची क्षमता सिद्ध करणाऱ्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने आता कोणीही आपल्या वयाबाबत बोलू नये, असे सांगताना वय आणि कामगिरी यांचा संबंध नसतो हे आपण दाखवून दिले आहे, असे स्पष्ट मत व्यक्त केले आहे. "जोपर्यंत तुम्ही मानसिकदृष्ट्या सक्षम राहून कोणतेही आव्हान स्वीकारण्याची क्षमता बाळगून असता, तोपर्यंत वयाचा काहीही संबंध येत नसतो. त्यामुळे आता प्रत्येकाने वाढत्या वयाबाबत बोलणे टाळावे. जर मी 37 व्या वर्षीही एकदिवसीय सामन्यात द्विशतक करू शकतो, तर वाढत्या वयाचा मुद्दाच उपस्थित होऊ शकत नाही,'' असे सचिनने श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या क्रिकेट कसोटीनंतर झालेल्या पारितोषिक वितरणाच्या वेळी सांगितले. श्रीलंकेविरुद्धच्या या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघ अडचणीत आलेला असताना सचिनने झळकवलेले द्विशतक आणि त्याने शतकवीर सुरेश रैनासह केलेली द्विशतकी भागीदारी भारताला सामना अनिर्णित ठेवण्यास बहुमोल ठरली. &nbsp

अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा

Fri, 2010-07-30 19:40

केंद्रीय दक्षता आयोगाचा "सीबीआय'ला आदेश नवी दिल्ली&nbsp -&nbsp राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा हाकेच्या अंतरावर आली असताना वेगवेगळ्या वादांमुळे तीव्र खळबळ माजत आहे. स्पर्धेच्या प्रकल्पांसाठी जारी करण्यात आलेल्या कोट्यवधी रुपयांच्या निविदांमधील गैरव्यवहारप्रकरणी दिल्ली महानगरपालिकेच्या काही अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचे गुन्हे दाखल करावेत, असा आदेश केंद्रीय दक्षता आयोगाने केंद्रीय अन्वेषण विभागाला (सीबीआय) दिला. राजधानीतील रस्त्यांवरील दिव्यांच्या नूतनीकरणाची कामे मंजूर करताना काही अधिकाऱ्यांनी गुन्हेगारी स्वरूपाचा कट केला. त्याची चौकशी करावी, असे पत्र "सीबीआय'ला पाठविण्यात आले आहे. या अधिकाऱ्यांची नावे अद्याप उघड व्हायची आहेत. हे काम ज्या कंत्राटदाराला मिळाले, त्याने सर्वांत कमी किमतीची निविदा भरली होती. नंतर मात्र त्याला रक्कम बदलण्याची आणि जास्त फायदा कमावण्याची परवानगी देण्यात आल्याचे उघड झाले आहे. त्याने नेमका किती "फायदा' कमावला, हे उघड झाले नसले तरी ही रक्कम 20 कोटी रुपयांच्या घरात असल्याची चौकशी अधिकाऱ्यांना खात्री वाटते.

अनिर्णित कसोटीत धावांचा पाऊस

Fri, 2010-07-30 19:40

पाच दिवसांत 1478 धावा आणि केवळ सतरा फलंदाज बाद कोलंबो - धावांचा वर्षाव झालेला भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसरा क्रिकेट कसोटी सामना अखेर अनिर्णित अवस्थेत संपला. काल चौथ्या दिवशीच ही कसोटी अनिर्णित राहणार असल्याचे स्पष्ट झाले होते. या कसोटीत गोलंदाजांची चांगलीच दमछाक होऊन पाच दिवसांत तब्बल 1478 धावा निघाल्या, तर गडी बाद झाले, ते फक्त सतरा. इशांत शर्मा आणि प्रग्यान ओझा या शेवटच्या जोडीने श्रीलंकेच्या गोलंदाजांना चांगलेच जेरीस आणून भारताला पहिल्या डावात 707 धावांपर्यंत मजल मारून देताना 65 धावांची आघाडी मिळवून दिली. आज शेवटच्या पाचव्या दिवशी दोन्ही कर्णधारांनी खेळ थांबविण्यास सहमती दिली, तेव्हा श्रीलंकेच्या दुसऱ्या डावात 3 बाद 129 धावा झाल्या होत्या. ही कसोटी अनिर्णित राहिल्याने सध्या भारताचे क्रमवारीतील अव्वल स्थान कायम राहिले आहे. तीन कसोटींच्या मालिकेत श्रीलंकेने 1-0 अशी आघाडी घेतली असून, तिसरी कसोटी तीन ऑगस्टपासून सुरू होत आहे. गोलंदाजांना क्वचितच साथ देणाऱ्या सिंहलीज स्पोर्टस क्‍लबच्या खेळपट्टीवर पाच दिवसांत दोन द्विशतके आणि तीन शतके झळकावली गेली.

राज्य संघटनेला मतदानाचा अधिकार नको

Fri, 2010-07-30 19:40

आंतरराष्ट्रीय संघटनेचा ऑलिंपिक संघटनेला आदेश नवी दिल्ली -&nbsp राज्य ऑलिंपिक संघटनांना असलेला मतदानाचा अधिकार काढून घ्यावा. त्यासाठी घटनेत बदल करावा आणि ही कार्यवाही करून ऑगस्टच्या मध्यास संपर्क साधावा, असा आदेश आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीने (आयओसी) भारतीय ऑलिंपिक संघटनेला दिला आहे. भारतीय क्रीडा क्षेत्रावर या आदेशाचे दूरगामी परिणाम होऊ शकतात. निवडणुकीत गैरव्यवहार होऊ नये, हा यामागील उद्देश आहे. मतदानाचा अधिकार राष्ट्रीय संघटनांना द्यावा, असाही आदेश देण्यात आला आहे. निवडणूक खुल्या आणि वैध पद्धतीने व्हावी म्हणून गुप्त पद्धतीने मतदान घ्यावे, अशी सूचना देण्यात आली. या बदलांची अंमलबजावणी करण्यासाठी वार्षिक सर्वसाधारण सभा बोलवावी आणि शिफारशींचा अवलंब करावा, असे कळविण्यात आले आहे. क्रीडा संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना वयोमर्यादा असावी, अशी मार्गदर्शक तत्त्वे क्रीडा मंत्रालयाने तयार केली आहेत. या संदर्भात मात्र "आयओसी'च्या पत्रात कोणताही उल्लेख नाही. मात्र या पत्राने भारतीय ऑलिंपिक संघटेनेचे अध्यक्ष सुरेश कलमाडी यांची झोप उडाली आहे. त्यांनी शुक्रवारीच क्रीडा संघटनांच्या अध्यक्षांची तातडीने बैठक घेतली.

धोनीची खेळपट्टीवर खरमरीत टीका

Fri, 2010-07-30 19:40

कोलबो - &nbsp भारतीय कर्णधार महेंद्रसिंह धोनीने दुसऱ्या क्रिकेट कसोटीसाठी तयार करण्यात आलेल्या खेळपट्टीवर खरमरीत टीका केली आहे. ही कसोटी चौथ्या दिवशीच सोडून देणे आपण पसंद केले असते, या शब्दांत त्याने खेळपट्टीबद्दलची नाराजी व्यक्त केली. टीका करताना त्याने कोणतेही शब्द बाकी ठेवले नाहीत. पत्रकार परिषदेत बोलताना धोनी म्हणाला, ""अशा प्रकारच्या खेळपट्टीवर 99.9 टक्के वेळा सामन्याचा निकाल लागू शकणार नाही. खेळपट्टी स्पोर्टिंग असावी, असे बोलले जात आहे. कुणा तरी एकाला अनुकूल असणे याला स्पोर्टिंग खेळपट्टी म्हणत नाही.'' सामना एक दिवस आधी संपायला पाहिजे होता का, असे विचारता धोनीने, अशी कुणी सूचना केली असती तर त्याला मी आक्षेप घेतला नसता, अशा उपरोधिक शब्दांत उत्तर दिले. ""सामन्याचा निकाल लागण्याची शक्‍यता नसल्याने तो आधी संपविला असता तर एक दिवसाची जादा विश्रांती घेणे आपल्याला आवडले असते,'' असे तो म्हणाला. "शेवटच्या दिवशी काहीही घडण्याची शक्‍यता नव्हती. अशा वेळी सामना संपविला असता तर छानपैकी मेजवानीचा आस्वाद घेता आला असता आणि विश्रांतीही मिळाली असती,'' असेही धोनी म्हणाला.

"हॉकी इंडिया' निवडणुकीला सर्वोच्च न्यायालयाची परवानगी

Fri, 2010-07-30 19:40

नवी दिल्ली - "हॉकी इंडिया'च्या बहुचर्चित निवडणुकीच्या वादाला शुक्रवारी नाट्यमय कलाटणी मिळाली. सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक घेण्यास परवानगी दिली आहे पण निकालाची अंमलबजावणी करू नये, अशी अट घातली आहे. अर्थात निवडणुकीचा मार्ग मोकळा झाल्यामुळे "हॉकी इंडिया'च्या पदाधिकाऱ्यांनी सुटकेचा निःश्‍वास टाकला आहे. निवडणूक चार-पाच दिवसांत होण्याची शक्‍यता आहे. एका पदाधिकाऱ्याने सांगितले, की आमच्याविरुद्ध सारखी कारस्थाने करणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर मिळाले आहे. ही निवडणूक बुधवारी होणार होती, पण ती चौथ्यांदा पुढे ढकलण्यात आली. मुंबई आणि दिल्ली या उच्च न्यायालयांनी निवडणुकीला स्थगिती दिली. त्यांचे स्थगिती आदेश सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले. हॉकी पदाधिकाऱ्याने सांगितले, की थोड्याच दिवसांत स्थगिती उठविली जाईल, याची आम्हाला खात्री होती. निवडणूक होऊ नये, अशी इच्छा असलेल्यांना यामुळे चोख उत्तर मिळाले आहे. निवडणूक शक्‍य तितक्‍या लवकर पार पाडणे ही आमची जबाबदारी आहे अन्यथा आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघ भारताला निलंबित करू शकतो. आता आणखी अडथळे येऊ नयेत म्हणून आम्ही शक्‍य तितक्‍या लवकर निवडणूक घेऊ.

"राष्ट्रकुल'प्रकरणी ब्रिटिश अधिकाऱ्यांकडून चौकशी

Fri, 2010-07-30 19:40

नवी दिल्ली - राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेशी संबंधित कथित आर्थिक गैरव्यवहाराचे आणखी एक प्रकरण एका दूरचित्रवाणी वाहिनीने उघडकीस आणले आहे. संयोजन समितीने ब्रिटनमधील एका कंपनीला हस्तांतरित केलेल्या रकमेसंदर्भात ब्रिटिश अधिकाऱ्यांनी चौकशी सुरू केली आहे. ब्रिटनमधील भारतीय उच्चायुक्तालयाने केंद्र सरकारला याविषयी कल्पना दिली आहे. ही रक्कम तब्बल 2,47,469 पौंड आहे. या वाहिनीने दिलेल्या माहितीनुसार "एएम फिल्म्स यूके लिमिटेड' असे कंपनीचे नाव आहे. गेल्या वर्षी ऑक्‍टोबर महिन्यात "क्वीन्स बॅटन रिले'चा कार्यक्रम लंडनमध्ये झाला. त्या वेळी घेतलेल्या सेवेचा मोबदला म्हणून ही रक्कम हस्तांतरित करण्यात आली. ही रक्कम चुकती करण्याच्या प्रक्रियेत ब्रिटिश सरकारच्या महसूल आणि सीमाशुल्क विभागाला गैरव्यवहार आढळून आला. ही सुमारे अडीच लाख पौंड रक्कम हस्तांतरित करण्यात आली आहेच, याशिवाय दरमहा 25 हजार पौंड रक्कम "एएम फिल्म्स'च्या खात्यात जमा करण्यात येत आहे. ढोबळ अंदाजानुसार एकूण रक्कम साडेचार लाख पौंड असल्याचे समजते. विशेष म्हणजे संयोजन समितीने मूल्यवर्धित कराची 14 हजार पौंड रक्कम परत मिळावी, अशी मागणी मार्च महिन्याच्या प्रारंभी केली.

साईना नेहवालला 'राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार'

Fri, 2010-07-30 11:52

नवी दिल्ली - &nbsp देशातील सर्वोच्च क्रीडा सन्मान असलेला राजीव गांधी खेल रत्न पुरस्कार या वेळी अव्वल बॅडमिंटनपटू साईना नेहवाल हिला जाहीर झाला आहे. पी. टी. उषा यांच्या अध्यक्षतेखालील राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार (राजीव गांधी खेल रत्न, अर्जुन आणि ध्यानचंद) समितीची आज येथे बैठक होऊन त्यामध्ये साईनाची निवड करण्यात आली. गेल्या वर्षभरात साईनाने बॅडमिंटन कोर्टवर अद्वितीय कामगिरी केली आहे. प्रत्येक स्पर्धेगणिक चमकदार कामगिरी करणारी साईना जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावरील खेळाडू असून, तिने जून महिन्यात सलग तीन सुपर सिरीज विजेतीपदे पटकावली होती. त्याआधी मार्चमध्ये तिने ऑल इंग्लंड सुपर सिरीज स्पर्धेत उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली होती. पुरस्कार वितरण समारंभ राष्ट्रीय क्रीडा दिनी 29 ऑगस्ट रोजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या हस्ते होणार असून, साडेसात लाख रुपये, सन्मानपत्र आणि पदक असे पुरस्काराचे स्वरूप आहे. या पुरस्कारामुळे अतिशय आनंदित झालेल्या साईनाने "अविश्‍वसनीय' या शब्दातच आनंद व्यक्त केला. ती म्हणाली, ""एक वर्षभरात दुसरा सर्वोच्च पुरस्कार मिळाल्याने माझी स्वप्नपूर्ती झाली आहे.

साईना नेहवालला 'राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार'

Fri, 2010-07-30 11:52

नवी दिल्ली - भारताची स्टार बॅडमिंटनपटू साईना नेहवाल हिची शुक्रवारी क्रीडा क्षेत्रातील प्रतिष्ठेच्या "राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारा'साठी निवड करण्यात आली. गेल्या वर्षभरात बॅडमिंटनच्या क्षेत्रात साईनाने केलेल्या कामगिरीचा विचार करून तिची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. &nbsp राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार निवड समितीतील सदस्यांनी पी. टी. उषा यांच्या नेतृत्त्वाखाली शुक्रवारी साईनाची भेट घेतली आणि तिचे अभिनंदन केले. "पुरस्कारामुळे मला खूप आनंद झाला. खरंतर माझा यावर विश्‍वासच बसत नाही. माझे स्वप्नच साकार झाले आहे. राष्ट्रीय पुरस्कारामुळे मोठी प्रेरणा मिळते. या पुरस्कारामुळे मला देशासाठी आणखी उत्तुंग कामगिरी करण्याची स्फूर्ती मिळाली आहे.'', अशी प्रतिक्रिया&nbsp साईनाने पुरस्कार जाहीर झाल्यानंतर&nbsp व्यक्त केली. &nbsp Follow Us on Twitter &nbsp &nbsp

रैनाची "टेस्ट कॅप' सार्थकी!

Thu, 2010-07-29 19:55

भारताचा डावखुरा फलंदाज सुरेश रैनाने श्रीलंकेविरुद्ध कोलंबो येथील दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात गुरुवारी शतक पूर्ण केले. पदार्पणात शतक काढणारा तो भारताचा 12 वा आणि जगातील फलंदाज ठरला. त्याने 120 धावांची खेळी केली. युवराजसिंग आजारी पडल्यामुळे रैनाला संधी मिळाली आणि त्याने संधीचे सोने केले. रैनाला 98 वन-डे खेळल्यानंतर कसोटी पदार्पणाची संधी मिळाली असून, हा एक विक्रमच आहे. रैनाला "टेस्ट कॅप' राहुल द्रविड याच्या हस्ते प्रदान करण्यात आली. विशेष म्हणजे द्रविड हाच त्याचा "हीरो' आहे. भारताचे पदार्पणात "शतकवीर' फलंदाज धावा प्रतिस्पर्धी मैदान कालावधी कसोटी धावा सरासरी 100-50 लाला अमरनाथ 118 इंग्लंड मुंबई डिसें. 1933 24 878 24.38 1-4 दीपक शोधन 110 पाकिस्तान कोलकता डिसें. 1952 3 181 60.33 1-0 ए. जी. कृपालसिंग 100* न्यूझीलंड हैदराबाद नोव्हे. 1955 14 422 28.13 1-2 अब्बास अली बेग 112 इंग्लंड मॅंचेस्टर जुलै 1959 10 428 23.77 1-2 हनुमंतसिंह 105 इंग्लंड दिल्ली फेब्रु. 1964 14 686 31.18 1-5 गुंडाप्पा विश्‍वनाथ 137 ऑस्ट्रेलिया कानपूर नोव्हे. 1969 91 6080 41.93 14-35 सुरिंदर अमरनाथ 124 न्यूझीलंड ऑकलंड जाने.

सचिनचे पाचवे द्विशतक, पदार्पणातच रैना चमकला

Thu, 2010-07-29 19:55

भारत 9 बाद 669, दुसरी कसोटी अनिर्णित अवस्थेकडे कोलंबो&nbsp -&nbsp सचिन तेंडुलकरचे द्विशतक आणि सुरेश रैनाने पदार्पणाच्या कसोटीत झळकविलेल्या शतकाच्या जोरावर भारतीय संघाला दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यात श्रीलंकेची पहिल्या डावातील धावसंख्या मागे टाकता आली. अनिर्णित अवस्थेकडे झुकलेल्या या कसोटीत गुरुवारी चौथ्या दिवशी भारताने 9 बाद 669 असा धावांचा डोंगर उभारून पहिल्या डावात 27 धावांची आघाडी मिळविली. आजच्या दिवसाचे हीरो होते, ते मास्टर ब्लास्टर तेंडुलकर आणि नवोदित रैना. या दोघांनी महत्त्वाच्या क्षणी मोठी भागीदारी करून टीम इंडियाला फॉलोऑनच्या नामुष्कीपासून सहजपणे वाचविले. त्यांच्या खेळामुळे श्रीलंकेची 4 बाद 642 घोषित, ही धावसंख्याही भारताला मागे टाकता आली. सचिनने कसोटी कारकिर्दीतील पाचवे द्विशतक झळकविताना 37व्या वर्षीही दीर्घवेळ खेळण्याची आपली क्षमता आणि दर्जा किती जबरदस्त आहे, हे दाखवून दिले, रैनाने युवराजसिंगच्या जागी मिळालेल्या संधीचे सोने केले. या कसोटीचा आता एकच दिवस बाकी आहे आणि सिंहलीज स्पोर्टस मैदानाची खेळपट्टी अजूनही फलंदाजीसाठीच अनुकूल आहे.

राष्ट्रकुल स्टेडियम बांधकामात भ्रष्टाचाराचा आरोप

Thu, 2010-07-29 19:55

नवी दिल्ली -&nbsp केंद्रीय दक्षता आयोगाने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी उभारलेल्या स्टेडियमच्या कामावर टीकास्त्र सोडले आहे. आयोगाने तयार केलेल्या अहवालात कामासाठी जास्त रक्कम देण्यात आली, कामाचा खराब दर्जा, तसेच सक्षम नसलेल्या संस्थांना देण्यात आलेले काम अशी टीका केली आहे. एकंदर केंद्रीय दक्षता आयोगाच्या तांत्रिक विभागाने सर्व 14 प्रकल्पांच्या बांधकामांत भ्रष्टाचार झाला असल्याचा गंभीर आरोप केला आहे. यात एकंदर वीस कोटींचा भ्रष्टाचार झाला असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. राष्ट्रकुल स्पर्धेच्या निमित्ताने दिल्लीत एकंदर 14 प्रकल्प राबविण्यात आले. त्यापैकी पाच सार्वजनिक विकास खाते, दिल्ली महापालिका, केंद्रीय सार्वजनिक विकास विभाग, दिल्ली विकास प्राधिकरण, नवी दिल्ली महापालिका यांनी प्रत्येकी दोन, तर आरआयटीईएस या संस्थेने एक काम केले आहे. या सर्व संस्थांनी केलेल्या बांधकामांत त्रुटी असल्याच्या तक्रारी आयोगाकडे आल्या. त्यानुसार ही पाहणी करण्यात आली. राष्ट्रकुल स्पर्धेच्या प्रकल्पाबाबत आम्हाला भ्रष्टाचार झाला असल्याचे आढळले.

"फुटबॉल संघटनेने मला फसविले'

Thu, 2010-07-29 19:40

ब्युनॉस आयर्स&nbsp -&nbsp अर्जेंटिनाचे माजी कर्णधार आणि प्रशिक्षक दिएगो मॅराडोना यांनी फुटबॉल संघटनेवर टीका केली आहे. संघटनेने आपली खोटेपणाने फसवणूक केली आणि यामागे राष्ट्रीय संघव्यवस्थापक कार्लोस बिलार्डो यांचा हात आहे, असा आरोप त्यांनी केला. मॅराडोना यांची प्रशिक्षकपदावरून बुधवारी हकालपट्टी करण्यात आली. त्यामुळे संतापलेल्या मॅराडोना यांनी फुटबॉल संघटनेचे अध्यक्ष ज्युलिओ ग्रोंडोना यांनाही धारेवर धरले. "प्रशिक्षक म्हणून माझ्या भवितव्याबद्दल ग्रोंडोना खोटे बोलले. जर्मनीविरुद्ध हरल्यानंतर संघ निराश झाला होता. तेव्हा ग्रोंडोना "ड्रेसिंग रूम'मध्ये आले आणि त्यांनी इतर अनेक जण तसेच खेळाडूंच्या उपस्थितीत माझ्या कामगिरीविषयी समाधान व्यक्त केले. मी प्रशिक्षकपदावर कायम राहावे, अशी इच्छा असल्याचेही त्यांनी जाहीरपणे सांगितले. संघ मायदेशी परतल्यानंतर मात्र विचित्र गोष्टी घडू लागल्या. सोमवारी मी ग्रोंडोना यांची भेट घेतली. पाच मिनिटांत त्यांनी सांगितले की, मी कायम राहावे पण माझे सात सहकारी बदलावे लागतील. प्रत्यक्षात मी जावे, असेच त्यांना म्हणायचे होते. कारण, माझ्या सहकाऱ्यांशिवाय मी काम करू शकणार नाही, हे उघड आहे.

सचिनच्या मार्गदर्शनानेच शतकी खेळी - रैना

Thu, 2010-07-29 19:40

कोलंबो - &nbsp कसोटी पदार्पणात शतक करण्याची संधी केवळ सचिन तेंडुलकरच्या सल्ल्यानेच साकार करू शकलो, अशी प्रतिक्रिया भारताच्या सुरेश रैना याने व्यक्त केली. दुसऱ्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवसाच्या खेळानंतर रैना म्हणाला, ""फलंदाजीसाठी खेळपट्टीवर उतरलो तेव्हा खरे तर निराश होतो. पण, त्या वेळी सचिनने तू पहिला कसोटी सामना खेळत आहेस, अशी संधी सारखी मिळत नसते, तेव्हा निर्धास्तपणे खेळ आणि क्रिकेटचा आनंद लूट, असे मार्गदर्शन केले आणि माझ्यावरील सारे दडपण दूर झाले.'' रैना आणि सचिन यांनी पाचव्या विकेटसाठी 256 धावांची भागीदारी केली. तो म्हणाला, ""सचिनसारख्या महान फलंदाजाबरोबर मोठी खेळी करण्याचे स्वप्न होते. या सामन्याने तेदेखील साकार झाले.'' शतकी खेळीत वेळोवेळी सचिनने माझा आत्मविश्‍वास वाढविला. हा सामना मी कधीच विसरणार नाही. ""एकदिवसीय सामन्यात तू भारतीय संघासाठी सामना जिंकून देणारा फलंदाज ठरला आहेस. कसोटीतही अशीच कामगिरी कर,'' असा सल्लाही सचिनने दिल्याचे रैनाने सांगितले.

इभ्रत वाचविण्यासाठी हॉकी इंडियाचे प्रयत्न

Thu, 2010-07-29 19:40

विश्‍वकरंडक स्पर्धेबरोबरच राष्ट्रकुल, आशियाई सहभाग होण्यासाठी न्यायालयास साकडे? मुंबई&nbsp &nbsp - हॉकी इंडिया आणि भारतीय हॉकी महासंघ यांच्यातील संघर्षाचा फटका भारतीय हॉकीपटूंना बसणार आहे. हॉकी इंडियाची स्थापना झाल्यापासून जागतिक हॉकी महासंघाने सातत्याने भारतास मुदत वाढवून दिली आहे. आता मुदत वाढवून देणे कठीण आहे, असे जागतिक हॉकी महासंघाचे पदाधिकारी सांगत आहेत. आता 31 जुलै रोजी म्हणजेच शनिवारी मुदत संपल्यानंतर जागतिक महासंघ कोणता निर्णय घेणार, यावरच भारतीय हॉकीचे भवितव्य अवलंबून आहे. किमान आठ दिवसांची मुदत वाढवून द्या, न्यायालयास साकडे घालून प्रक्रिया पार पाडतो, अशी विनंती "हॉकी इंडिया'ने जागतिक हॉकी महासंघास केली असल्याचे समजते. जागतिक हॉकी महासंघ आपल्या भूमिकेवर ठाम राहिला तर मात्र कोणताही दोष नसताना भारतीय हॉकीपटूंना फटका बसणार आहे. अर्थातच, आता हॉकीपटूंवर ही वेळ येणार आहे ती पदाधिकाऱ्यांच्या चुकीमुळे. अर्जेंटिनात होणाऱ्या विश्‍वकरंडक महिला हॉकी स्पर्धेसाठी भारतीय संघ पात्र ठरला आहे पण आता पदाधिकाऱ्यांच्या सदोष निर्णयामुळे भारतीय हॉकी संघ स्पर्धेसाठी अपात्र ठरेल, अशी चिन्हे दिसत आहेत.

मुरली आणि कुंबळेची ऍकॅडमीसाठी "युती'

Thu, 2010-07-29 19:40

नवी दिल्ली -&nbsp श्रीलंकेचा मुथय्या मुरलीधरन आणि भारताचा अनिल कुंबळे हे कसोटी क्रिकेटमधील विक्रमी फिरकी गोलंदाज नवोदितांसाठी ऍकॅडमी काढण्याच्या विचारात आहेत. मुरलीधरन गेल्याच आठवड्यात निवृत्त झाला. दोन वर्षांपूर्वीच त्याने कुंबळेशी या संदर्भात चर्चा केली होती. मुरलीने एका दैनिकाला सांगितले, ""आमची संकल्पना आता मूर्त स्वरूपात येण्याची शक्‍यता आहे. मला प्रशिक्षणात कारकीर्द करायची नाही, पण कुंबळे ऍकॅडमी काढणार असेल तर मी आनंदाने त्यात सहभागी होईन. सध्या चर्चा सुरू आहे, पण निर्णय कुंबळेचा असेल. बंगळूरमध्ये ऍकॅडमी काढण्यासाठी तो प्रयत्नशील आहे.'' या संदर्भात कुंबळेने सांगितले, ""मी मुरलीधरनच्या संपर्कात असतो. तो कसोटीतून निवृत्त झाल्यापासून मात्र मी त्याच्याशी अद्याप संपर्क साधलेला नाही. सध्या तो सत्कार समारंभांमध्ये व्यस्त असेल आणि ते स्वाभाविकच आहे. यातून तो मोकळा झाल्यावर मी बोलेन. माझ्याकडे वेळ आहे. त्यामुळे आम्ही एकत्र बसून सविस्तर योजना तयार करू.''