You are hereFeed aggregator / Sources / Sports News

Sports News


Syndicate content visit www.eSakal.com
KreedaeSakal.com © CopyRight Sakaal Media Group.20092010
Updated: 1 hour 36 min ago

सॉडर्लिंग आणि नदाल विजेतेपदासाठी झुंजणार

Fri, 2010-06-04 19:55

पॅरिस&nbsp -&nbsp स्वीडनच्या रॉबिन सॉडर्लिंगने फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेतील घोडदौड कायम राखत सलग दुसऱ्या वर्षी अंतिम फेरी गाठली. आता त्याच्यासमोर "क्‍ले किंग' रॅफेल नदाल याचे आव्हान असेल. सॉडर्लिंगने चेक प्रजासत्ताकाच्या थॉमस बर्डीचचे कडवे आव्हान पाच सेटमध्ये मोडून काढले. नदालला मात्र ऑस्ट्रीयाच्या जुर्गन मेल्झरविरुद्ध फारसे प्रयास पडले नाहीत. त्याने सरळ सेटमध्ये विजय नोंदविला. आधीच्या फेरीत सॉडर्लिंगने गतविजेत्या रॉजर फेडररची यशोमालिका संपुष्टात आणली होती. त्या तुलनेत या वेळी बर्डीचविरुद्ध त्याला झगडावे लागले. तब्बल तीन तास 27 मिनिटांच्या संघर्षानंतर त्याने विजय नोंदविला. सॉडर्लिंगने गेल्या वर्षी नदालला चौथ्या फेरीत गारद केले होते. नंतर त्याने अंतिम फेरी गाठली होती. फेडररकडून तो पराभूत झाला होता. तो म्हणाला, ""या वेळी मी येथे आलो तेव्हा फक्त पहिल्या फेरीचा विचार करीत होतो. आता मी पुन्हा अंतिम फेरी गाठली आहे. सर्वोत्तम स्वप्नापेक्षासुद्धा ही कामगिरी चांगलपी आहे.'' बर्डीचने अँडी मरे याला गारद केले होते. सॉडर्लिंगविरुद्ध आधीच्या दहा सामन्यांत त्याने सहा विजय मिळविले होते.

अनुभवातील कमतरतेचा भारतीय संघास फटका

Fri, 2010-06-04 19:55

स्ट्रेट टॉक &nbsp - सुनील गावसकर भारताने तिरंगी स्पर्धेची अंतिम फेरी गाठण्याचा आपला मार्ग आता खूपच अवघड केला आहे. भारताने पुन्हा एकदा केवळ झिंबाब्वेविरुद्धची लढत गमावली नाही, तर प्रतिस्पर्ध्यांना बोनस गुणही दिला. आता भारतास श्रीलंकेविरुद्ध दणदणीत विजय आवश्‍यक आहे व तोही बोनस गुणांसह. त्याचबरोबर यजमान श्रीलंकेचाही धुव्वा उडवतील अशी आशा राखावी लागणार आहे. क्षमतेनुसार फलंदाजी न केल्याबद्दल भारतीय संघावर टीका करणे नक्कीच सोपे असेल पण झिंबाब्वेतील खेळपट्ट्या वेगवान गोलंदाजीसाठी पोषक आहेत, हेही लक्षात घ्यायला हवे. त्याचबरोबर थंड हवामान ही महत्त्वाची गोष्ट आहे. आता अगदी उत्तर भारतातील बोचऱ्या थंडीत एखाद्याने क्रिकेट शिकले असले, तरी थंडीमुळे स्नायू आखडतात, त्या वेळी खेळणे सोपे नसते, हेही लक्षात घ्यायला हवे. त्यातच दडपणामुळे हे स्नायू जास्तच आखडले आहेत, असे वाटू लागते. झिंबाब्वेचे क्षेत्ररक्षण जागतिक दर्जाचे आहे. प्रतिकूल परिस्थितीतून एखादी जोडी सावरणार असे वाटत असतानाच त्यांचे चपळ क्षेत्ररक्षण "विकेट' घेत असते.

घवघवीत बक्षिसांच्या घोषणेने वादळ

Fri, 2010-06-04 19:55

माद्रिद&nbsp -&nbsp स्पेन फुटबॉल महासंघाने विश्‍वकरंडक जिंकलात तर संघातील प्रत्येक खेळाडूस सहा लाख युरो देण्यात येतील, अशी घोषणा केली. क्रीडा जगतातील कोणीही या बक्षीस रकमेचे स्वागतच केले असते, पण स्पेनमध्ये त्यावरून वादळ निर्माण झाले आहे. दोन वर्षांपूर्वीच्या युरो स्पर्धेच्या विजेतेपदाच्या बक्षीस रकमेपेक्षा ही रक्कम दुप्पट आहे व त्यावरूनच वाद सुरू झाला आहे. ही बक्षीस रक्कम केवळ अंतिम फेरीसाठीच नाही, तर उपांत्यपूर्व फेरीसाठी 60 हजार, उपांत्य फेरीसाठी 90 हजार आणि अंतिम फेरीतील प्रवेशासाठी 1 लाख 20 हजार युरो देणार असल्याचे जाहीर केले. स्पेनसाठी जाहीर झालेली बक्षीस रक्कम ही विश्‍वकरंडकातील सर्वाधिक मोठे बक्षीस आहे. वीस टक्के बेकारी असलेल्या या देशात या बक्षीस रक्कमेवरून टीका सुरू झाली आहे. मंदीमुळे अनेकांची पगारकपात होत असताना फुटबॉलपटूंना जाहीर करण्यात आलेल्या या बक्षिसांमुळे देशात संतापाची लाट उसळली आहे. स्पेन फुटबॉल महासंघाच्या या "सुपर बोनस'वर अनेकांनी टीका सुरू केली आहे. जर्मनी महासंघाने जाहीर केलेल्या बक्षीस रकमेपेक्षा स्पेनने जाहीर केलेली रक्कम दुप्पट आहे.

इन्स्पायर कम्युनिकेशन उपांत्य फेरीत

Fri, 2010-06-04 19:40

पुणे&nbsp -&nbsp मीडिया क्‍लब आयोजित आंतरमीडिया ट्‌वेंटी-20 साखळी क्रिकेट स्पर्धेत इन्स्पायर कम्युनिकेशनने डी. पी. इलेव्हनचा सात गडी राखून पराभव करीत उपांत्य फेरी गाठली. गुलटेकडी येथील सेठ दगडूराम कटारिया प्रशालेच्या मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत प्रकाश कडू व सचिन कापडेने केलेल्या अचूक गोलंदाजीपुढे डी. पी. इलेव्हनचा डाव 121 धावांत संपुष्टात आला. त्यांच्या कवित पोद्दारने अर्धशतक (55) झळकावीत संघाचा डाव सावरला. त्यानंतर इन्स्पायर कम्युनिकेशनने 14.4 षटकांत 3 बाद 122 धावा करून विजय मिळविला. त्यात महत्त्वाचा वाटा विक्रम देशमुखने केलेल्या नाबाद 48 धावांचा होता. "सामन्याचा मानकरी' हा मान प्रकाश कडूने मिंळविला. या स्पर्धेत नऊ जून रोजी शिंदे प्रशालेच्या मैदानावर एल ऍण्ड टी विरुद्ध इन्स्पायर कम्युनिकेशन (सकाळी साडेनऊ वाजता) तर न्यूज मेकर्स विरुद्ध दैनिक सकाळ (दुपारी एक वाजता) हे उपांत्य फेरीचे सामने होणार असून अंतिम सामना अकरा जून रोजी होईल. संक्षिप्त धावफलक&nbsp - डी. पी. इलेव्हन (19.

एलिट पॅनेलमध्ये भारताचा यंदाही एकही पंच नाही

Fri, 2010-06-04 19:40

दुबई&nbsp -&nbsp दक्षिण आफ्रिकेचे अनुभवी पंच रुडी कोएत्झर्न जुलै महिन्यात निवृत्त होत असल्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) आपल्या पंचांची "एलिट पॅनेल'ची फेररचना केली आहे पण या यादीत एकाही भारतीय पंचाला स्थान मिळालेले नाही. एस. वेंकटराघवन 2002 मध्ये निवृत्त झाल्यानंतर भारताचा एकही पंच "एलिट पॅनेल'मध्ये आलेला नाही. इंग्लंडचे मार्क बेन्सन फेब्रुवारीत निवृत्त झालेले आहेत. दोन रिक्त जागांवर इंग्लंडच्या मारईस इरासमस आणि ऑस्ट्रेलियाच्या रॉडनी टुकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 46 वर्षीय इरासमस यांनी दोन कसोटी, 16 एकदिवसीय सामने, 11 ट्‌वेन्टी-20 सामन्यांत पंचांची भूमिका बजावलेली आहे तर 45 वर्षीय टुकर यांनी तीन कसोटी, 14 एकदिवसीय व आठ ट्‌वेन्टी-20 सामन्यांत पंच म्हणून काम पाहिलेले आहे. इरासमस हे त्यांच्या जमान्यातील अष्टपैलू खेळाडू होते तर टुकर प्रथम श्रेणी क्रिकेटपटू होते. एलिट पॅनेलमधील पंच&nbsp - बिली बॉडेन, अलीम दार, स्टीव डेव्ही, अशोक डिसिल्वा, बिली डॉक्‍ट्रोव, मारईस इरासमस, इयन गौड, डॅरेल हार्पर, टोनी हिल, हर्षद रौफ, सायमन टॉफेल व रॉडनी टुकर.

दहा वर्षांखालील गटात तेजस-शार्दूल अंतिम झुंज

Fri, 2010-06-04 19:40

पुणे -&nbsp पीवायसी हिंदू जिमखाना क्‍लब आणि हवेली तालुका बॅडमिंटन संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तिसऱ्या जिल्हास्तरीय खुल्या अमानोरा करंडक पीवायसी-एचटीबीए बॅडमिंटन स्पर्धेत दहा वर्षांखालील मुलांच्या गटातून तेजस चितळे व शार्दूल फडके, तर मुलींच्या गटातून सारा नवरे व शिवानी देशपांडेने अंतिम फेरी गाठली आहे. पीवायसी क्‍लबच्या बॅडमिंटन संकुलात सुरू असलेल्या या स्पर्धेत उपांत्य फेरीत दहा वर्षांखालील मुलांमध्ये तेजस चितळेने चुरशीच्या लढतीत मिहिर आपटेचा 21-8, 16-21, 21-16 असा तर शार्दूल फडकेने आनिष राणेचा 21-18, 21-14 असा पराभव केला. मुलींमध्ये सारा नवरेने सानश्री ढमढेरेचा 21-14, 13-21, 23-21 असा, तर शिवानी देशपांडेने नेहा श्रीखंडेचा 21-17, 19-21, 21-10 असा पराभव केला. या स्पर्धेत राधिका जोशीला तीन गटांतून तर साहिल लोखंडे, अथर्व गोसावी, सुधांशू मेडशीकर, रेवती देवस्थळी, संयोगिता घोरपडेला दुहेरी मुकुटाची संधी आहे.

वर्ल्डकप फुटबॉल: इंग्लंडचे लक्ष्य अंतिम फेरीचे

Thu, 2010-06-03 21:10

प्रशिक्षक फॅबिओ कॅपेल्लोंचा संघ दाखल जोहान्सबर्ग - ''इंग्लंडने अंतिम फेरी गाठली नाही तर ते अपयशच असेल,'' असे मत प्रशिक्षक फॅबिओ कॅपेल्लो यांनी व्यक्त केले आहे. कॅपेल्लो यांच्याबरोबरील करार २०१२ च्या युरोपीय स्पर्धेपर्यंत वाढविण्यात आला आहे. विश्‍वकरंडक स्पर्धेतील कामगिरीमुळे त्यात कोणताही फरक पडणार नाही. असे असले तरी स्वतः कॅपेल्लो यांनी उच्च कामगिरीचे ध्येय आखले आहे. या स्पर्धेपूर्वी कॅपेल्लो यांच्या करारावरून बरीच चर्चा सुरू होती. इटलीच्या ६३ वर्षांच्या कॅपेल्लो यांनी इंग्लंड संघावरील निष्ठा आणखी दोन वर्षांसाठी कायम ठेवण्याचे ठरविले. त्यांनी सांगितले, ''काही तरी खास करून दाखवायचे म्हणूनच मी दक्षिण आफ्रिकेत दाखल झालो आहे. माझ्यासमोरील आव्हान मोठे आहे, पण त्यास सामोरे जाण्याची जिद्दच तुम्हाला जगण्यासाठी प्रेरित करीत असते.'' अंतिम फेरीचे लक्ष्य साध्य करण्यासाठी सहकाऱ्यांच्या साथीत कसून प्रयत्न करण्याचा निर्धार कॅपेल्लो यांनी बोलून दाखविला. ''आमचे खेळाडू स्पर्धेसाठी उत्सुक आहेत. प्रत्येक जण आपली जबाबदारी समर्थपणे पेलण्याच्या निर्धाराने खेळेल.

आशियाई क्रीडास्पर्धेसाठी श्रीलंकेचाही संघ

Thu, 2010-06-03 19:40

नवी दिल्ली - आशियाई क्रीडा स्पर्धेतील क्रिकेटसंदर्भात भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) एकाकी पडत आहे. पाकिस्तानपाठोपाठ श्रीलंकेनेसुद्धा या स्पर्धेसाठी संघ पाठविण्याचा निर्णय जाहीर केला. चीनमध्ये होणाऱ्या स्पर्धेसाठी "बीसीसीआय'ने संघ पाठविण्यास नकार दिला आहे. न्यूझीलंडविरुद्धची मालिका आणि स्थानिक मोसमाचे कारण "बीसीसीआय'ने पुढे केले आहे. या स्पर्धेत क्रिकेटचे पदार्पण होत असून, ट्‌वेंटी-२० स्पर्धा होणार आहे. श्रीलंका क्रिकेट मंडळाच्या हंगामी समितीचे चिटणीस निशांत रणतुंगा यांनी संघ खरोखरच पाठविला जाईल, असे एका वृत्तवाहिनीला सांगितले. संघाचे स्वरूप आणि ताकद याविषयी निवड समिती निर्णय घेईल. स्पर्धेचा दर्जा आणि सहभागी संघांच्या स्वरूपानुसार खेळाडूंची निवड होईल, असेही त्यांनी नमूद केले. पाकिस्तानी क्रिकेट मंडळाने सुद्धा संघ पाठविणार असल्याचे जाहीर केले आहे. ""ही स्पर्धा जगातील महत्त्वाची विभागीय स्पर्धा आहे. त्यात क्रिकेटचा प्रथमच समावेश झाला असून, चीनमध्ये क्रिकेट खेळासाठी चांगली व्यावसायिक बाजारपेठ आहे,'' असे मत पाक मंडळाचे महासंचालक आणि माजी कर्णधार जावेद मियॉंदाद यांनी व्यक्त केले.

भारताच्या स्थानाला ऑस्ट्रेलियाचे आव्हान

Thu, 2010-06-03 19:40

सिडनी - श्रीलंकेला हरवून कसोटी क्रिकेटमध्ये मिळविलेले अव्वल स्थान कायम ठेवण्यासाठी भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत बदल करून दोन कसोटी सामन्यांचा समावेश केला होता आणि ही मालिकाही जिंकून कसोटीतील आपले पहिले स्थान पक्के केले होते. आता अशाच प्रकारे कसोटीतील हे वर्चस्व ऑस्ट्रेलियाविरुद्धही सिद्ध करण्याची संधी त्यांना मिळणार आहे. भारतातील पावसाळा संपत असताना सप्टेंबर आणि नोव्हेंबर महिन्यात रिकी पॉंटिंगचा ऑस्ट्रेलिया संघ भारतात येणार आहे. विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धा तोंडावर आलेली असल्यामुळे हा दौरा त्या तयारीसाठी सात एकदिवसीय सामन्यांचा आहे परंतु यामध्ये बदल होण्याची शक्‍यता असून, दोन कसोटी सामन्यांचा समावेश होण्याची शक्‍यता आहे. भारतीय क्रिकेट मंडळ आणि क्रिकेट ऑस्ट्रेलिया यांनी याबाबत अजून अंतिम निर्णय घेतलेला नसला, तरी दोन कसोटी सामन्यांचा समावेश निश्‍चित समजला जात आहे.&nbsp ऑस्ट्रेलियाचा कर्णधार रिकी पॉंटिंगने त्यादृष्टीने मानसिक तयारी सुरू केलेली आहे. भारताच्या या दौऱ्यानंतर ऑस्ट्रेलिया मायदेशात ऍशेस मालिका खेळणार आहे.

वर्ल्डकप फुटबॉल: मनोधैर्य इटलीसाठी जमेची बाजू

Thu, 2010-06-03 19:40

अनुभवी खेळाडू डी रोस्सी याला विश्‍वास केपटाऊन - 'भक्कम मनोधैर्य ही आमची ताकद आहे. फुटबॉलचा विश्‍वकरंडक आमच्याकडेच राखण्यासाठी ही बाब महत्त्वाची असेल,' असा विश्‍वास इटलीचा अनुभवी खेळाडू डॅनिअल डी रोस्सी याने व्यक्त केला आहे. मार्सेलो लिप्पी प्रशिक्षक असलेल्या इटलीकडून या वेळी गतविजेते म्हणून बऱ्याच आशा आहेत. इटलीच्या वाटचालीविषयी डी रोस्सी म्हणाला, की "पात्रता फेरीत आमची कामगिरी चांगली झाली. एक सामना बाकी असताना आम्ही स्पर्धेतील स्थान निश्‍चित केले. तुरीनमध्ये बल्गेरियाविरुद्ध तसेच मॉंटेनेग्रोविरुद्ध आम्हाला थोडा संघर्ष करावा लागला. आयर्लंडविरुद्धचा सामना सर्वाधिक आव्हानात्मक ठरला. एक खेळाडू कमी असूनही आम्ही सुरवातीलाच गोल करून मग आघाडी कायम राखली.' डी रोस्सी याच्या मते इटलीच्या संघाचा गाभा कायम आहे. आधीच्या स्पर्धेत विश्‍वकरंडक जिंकलेल्या तसेच युरो स्पर्धेत स्पेनविरुद्ध पेनल्टीवर हरलेल्या संघातील बहुतांश खेळाडू कायम आहेत. त्यांच्यात चांगली एकी निर्माण झाली आहे. पात्रता फेरीतून त्यांना काही तरुण व प्रतिभाशाली खेळाडू गवसले.

झिंम्बाब्वेत भारताचे पुन्हा 'हरारे' !

Thu, 2010-06-03 19:40

हरारे - बेजबाबदार फलंदाजी आणि निष्प्रभ गोलंदाजीमुळे भारताने पुन्हा एकदा आपल्या पायावर धोंडा मारून घेतला. सहा प्रमुख खेळाडू नसले तरीही झिम्बाब्वेच्या तुलनेत ताकदवर असलेल्या भारताला भारताला बुलावायोनंतर हरारेतही हार स्वीकारावी लागली. या पराभवामुळे तिरंगी एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीतील प्रवेश अवघड केला आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सध्या दुसऱ्या स्थानी असलेल्या भारताने झिम्बाब्वेविरुद्ध सलग दुसरा सामना गमावला आहे तो स्वतःच्याच सूमार खेळामुळे. या पराभवामुळे भारताच्या क्रमवारीतही मोठी घसरण होऊ शकते. बुलावायोमध्येही भारताची फलंदाजी ढेपाळली होती तरीही रोहित शर्माच्या शतकाच्या जोरावर केलेल्या २८५ धावांचे संरक्षण गोलंदाजांना करता आले नव्हते आज रोहित शर्मा धावचीत झाला आणि भारतीय फलंदाजीचे १९४ धावांत पानिपत झाले. हे अव्हान झिम्बाब्वेने ३८.२ षटकांत षटकांत सात फलंदाजांच्या मोबदल्यात पार करून फलंदाजी कशी करायची याचे धडेच जणू काही हॅमिल्टन मस्कात्झा आणि ब्रॅंडन टेलर यांनी दिले.

अख्तरचे पुनरागमन; बट्ट उपकर्णधार

Thu, 2010-06-03 19:40

लाहोर - वादग्रस्त वेगवान गोलंदाज शोएब अख्तर याची आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. पाकिस्तानच्या संघात शोएब मलिक यानेही पुनरागमन केले आहे. ही स्पर्धा १५ ते २४ जून दरम्यान श्रीलंकेतील डंबुलामध्ये होईल. अख्तर यापूर्वी मे २००९ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध अबुधाबीत खेळला होता. मलिकवरील एका वर्षाची बंदी उठविण्यात आली आहे. उपकर्णधारपदी सलमान बट्ट याची नियुक्ती करण्यात आली आहे. कर्णधारपदी शाहीद आफ्रिदीची नियुक्ती यापूर्वीच झाली आहे. संघ- शाहीद आफ्रिदी (कर्णधार), सलमान बट्ट (उपकर्णधार), इम्रान फरहात, शाहझैब हसन, उमर अक्‌मल, शोएब मलिक, असाद शफीक, उमर आमीन, कामरान अक्‌मल, अब्दूल रझाक, महंमद असिफ, महंमद आमीर, शोएब अख्तर, सईद अज्‌मल, अब्दुर रेहमान.

पेस-डीलुई जोडी अंतिम फेरीत

Thu, 2010-06-03 19:40

पॅरिस - भारताचा दुहेरीतील अव्वल टेनिसपटू लिअँडर पेस याने फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेच्या दुहेरीत अंतिम फेरी गाठली आहे. चेक प्रजासत्ताकाचा ल्यूकास डीलुई त्याचा जोडीदार आहे. त्यांनी ऑस्ट्रियाचा ज्यूलियन नॉव्‌ल आणि इस्राईलचा अँडी रॅम यांच्यावर 6-4, 6-2 अशी मात केली. त्यांची आता कॅनडाचा डॅनिअल नेस्टर आणि सर्बियाचा नेनाद झिमॉंजीच यांच्याशी लढत होईल. नेस्टर-झिमॉंजीच यांनी वेस्ली मुडी-डिक नॉर्मन यांना 6-0, 6-3 असे हरविले. पेस-डीलुई यांना विजयासाठी फारसे झगडावे लागले नाही. त्यांनी सव्वा तासात सामना जिंकला. पहिल्या सेटमध्ये त्यांनी 5-2 अशा स्थितीस ब्रेक मिळविला. दुसरा सेट त्यांना 6-0 असा जिंकण्याची संधी होती, मात्र न्‌ॉवल-रॅम यांनी सहाव्या गेममध्ये चार मॅचपॉइंट वाचविले. त्यामुळे डीलुईची सर्व्हिस खंडित झाली.

शोएब अख्तरचे पाक संघात पुनरागमन

Thu, 2010-06-03 14:50

लाहोर - वादग्रस्त वेगवान गोलंदाज शोएब अख्तर याची आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. पाकिस्तानच्या संघात शोएब मलिक यानेही पुनरागमन केले आहे. ही स्पर्धा १५ ते २४ जून दरम्यान श्रीलंकेतील डंबुलामध्ये होईल. संघ- शाहीद आफ्रिदी (कर्णधार), सलमान बट्ट (उपकर्णधार), इम्रान फरहात, शाहझैब हसन, उमर अक्‌मल, शोएब मलिक, असाद शफीक, उमर आमीन, कामरान अक्‌मल, अब्दूल रझाक, महंमद असिफ, महंमद आमीर, शोएब अख्तर, सईद अज्‌मल, अब्दुर रेहमान.

आशियायी स्पर्धेत 'बीसीसीआय' एकाकी

Thu, 2010-06-03 14:46

नवी दिल्ली - आशियाई क्रीडा स्पर्धेतील क्रिकेटसंदर्भात भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) एकाकी पडत आहे. पाकिस्तानपाठोपाठ श्रीलंकेनेसुद्धा या स्पर्धेसाठी संघ पाठविण्याचा निर्णय जाहीर केला. चीनमध्ये होणाऱ्या स्पर्धेसाठी "बीसीसीआय'ने संघ पाठविण्यास नकार दिला आहे. न्यूझीलंडविरुद्धची मालिका आणि स्थानिक मोसमाचे कारण "बीसीसीआय'ने पुढे केले आहे. या स्पर्धेत क्रिकेटचे पदार्पण होत असून, ट्‌वेंटी-२० स्पर्धा होणार आहे. श्रीलंका क्रिकेट मंडळाच्या हंगामी समितीचे चिटणीस निशांत रणतुंगा यांनी संघ खरोखरच पाठविला जाईल, असे एका वृत्तवाहिनीला सांगितले. संघाचे स्वरूप आणि ताकद याविषयी निवड समिती निर्णय घेईल. स्पर्धेचा दर्जा आणि सहभागी संघांच्या स्वरूपानुसार खेळाडूंची निवड होईल, असेही त्यांनी नमूद केले.

समंथा स्टोसूरची सेरेनावर मात

Wed, 2010-06-02 20:20

फ्रेंच टेनिस पॅरिस&nbsp -&nbsp ऑस्ट्रेलियाच्या समंथा स्टोसूरने फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेच्या महिला एकेरीत आणखी एक खळबळजनक निकाल नोंदविला. तिने अग्रमानांकित अमेरिकेच्या सेरेना विल्यम्सला गारद केले. आधीच्या फेरीत समंथाने जस्टीन हेनीनला धक्का दिला होता. समंथाने उपांत्यपूर्व फेरीत मुसंडी मारली आहे. समंथाला सातवे मानांकन आहे. इतके वरचे मानांकन असले तरी तिची एवढी वाटचाल अनपेक्षित मानली जात आहे. आता तिची एलेना यांकोविचशी लढत होईल. यांकोविचने यारोस्लावा श्‍वेडोवावर दोन सेटमध्ये मात केली. समंथाने गेल्या वर्षी उपांत्य फेरी गाठली होती. बुधवारी उबदार हवामान आणि स्वच्छ सूर्यप्रकाशात खेळ सुरू झाला. सेरेनाच्या खेळात मात्र शैथिल्य होते. दुसरीकडे समंथाने कमालीची एकाग्रता साधली होती. कोर्टलगत तिचे फटके सुरेख बसत होते. ती "स्लाईस्ड बॅकहॅंड'च्या जोरावर सेरेनाला चुका करण्यास भाग पाडत होती. दुसऱ्याच गेममध्ये सेरेनाने दोन ब्रेकपॉइंट सर्व्हिसच्या जोरावर वाचविले. पाचव्या गेममध्ये तिने संधी दवडली मग समंथाने सलग पाच गेम जिंकताना जोरदार खेळ केला. सेरेनाची सर्व्हिस आणि बॅकहॅंडचे फटके चुकत होते.

आशियाई स्पर्धेत क्रिकेट नकोच

Wed, 2010-06-02 20:16

नवी दिल्ली&nbsp -&nbsp भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने आपला क्रिकेट संघ आशियाई क्रीडा स्पर्धेत न पाठविण्याचा निर्णय घेतल्यावर त्यांच्यावर टीका होत असली, तरी केंद्रीय क्रीडामंत्री एम. एस. गिल यांनी मात्र वेगळीच भूमिका घेतली. ते म्हणाले, ""आशियाई स्पर्धेत सहभागी व्हायचे की नाही हा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा वैयक्तिक प्रश्‍न आहे. वैयक्तिक मत विचाराल तर आशियाई स्पर्धेत क्रिकेटचा समावेश करण्यास माझा विरोध आहे.'' ऑलिंपिक क्रीडा प्रकारात क्रिकेटचा समावेश होण्यासाठी सर्वच पातळ्यांवरून कठोर मेहनत घेण्यात आली होती. चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्यानंतर क्रिकेटचा आशियाई स्पर्धेपासून ऑलिंपिक क्रीडा प्रकारात समावेश करण्यास मान्यता मिळाली होती. त्यामुळे या वर्षी चीनमध्ये गुआंझू येथे होणाऱ्या स्पर्धेतून क्रिकेटचे पदार्पण होईल. मात्र, आशियात बलवान असणारा भारतीय संघ या स्पर्धेत दिसणार नाही. भारतीय क्रिकेट मंडळाच्या या स्पर्धेत सहभागी न होण्याच्या निर्णयावर चांगलीच टीका झाली.

क्रिकेट मंडळावर "नाडा'कडून टीका

Wed, 2010-06-02 20:13

नवी दिल्ली -&nbsp उत्तेजक द्रव्यविरोधी अटींची पूर्तता करण्याबाबत भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) सहकार्य करीत नसल्याबद्दल राष्ट्रीय उत्तेजक द्रव्य विरोधी संस्थेने (नॅशनल अँटी-डोपिंग एजन्सी-"नाडा') टीका केली आहे. जागतिक उत्तेजक द्रव्यविरोधी संस्थेच्या (वाडा) आचारसंहितेचे "बीसीसीआय'ने पालन केले पाहिजे, असे "नाडा'ने बजावले आहे. "नाडा'चे महासंचालक राहुल भटनागर यांनी सांगितले, की "बीसीसीआय'ने क्रिकेटपटूंच्या उत्तेजक द्रव्य चाचण्या घेण्यासाठी स्वीडनमधील एका कंपनीची (इंटरनॅशनल डोपिंग अँड टेस्ट मॅनेजमेंट) मदत घेतली आहे. यामुळे आम्ही गोंधळून गेलो आहोत. त्यांनी आमच्याकडे कधीही मदत मागितली नाही. "बीसीसीआय'च्या अशा दृष्टिकोनाचे आम्हाला आश्‍चर्य वाटते. वास्तविक हे काम "नाडा' करू शकले असते. याच कामासाठी आम्ही कमी पैसे आकारले असते किंवा चाचण्या कदाचित मोफतसुद्धा घेतल्या असत्या, पण स्वीडनची कंपनी भरपूर पैसे आकारणार आहे. "नाडा' ही उत्तेजक चाचण्या घेणे, मुत्राचे नमुने गोळा करणे आणि चाचण्यांच्या निकालाचे काम पाहणे यासाठी राष्ट्रीय संस्था आहे. "बीसीसीआय'ने नाडाच्या ठावठिकाणा अटीसह सर्व नियमांची पूर्तता करायला हवी.

भारत परतफेड करणार का?

Wed, 2010-06-02 20:11

हरारे -&nbsp तिरंगी एकदिवसीय मालिकेच्या पहिल्याच सामन्यात झिंबाब्वेकडून पराभव पत्करावा लागल्यानंतर दुसऱ्या सामन्यात भारताने श्रीलंकेवर विजय मिळवून आपले आव्हान कायम राखले. आता साखळीत भारतीय संघ उद्या गुरुवारी पुन्हा एकदा झिंबाब्वेशी दोन हात करण्यास उतरेल, तेव्हा त्यांच्यासमोर पहिल्या पराभवाची परतफेड करण्याची चांगली संधी असेल. मालिकेतील पहिल्या लढतीत जवळपास तीनशेच्या जवळ मजल मारूनही गोलंदाजीतील अपयशाने भारताला झिंबाब्वेविरुद्ध पराभव पत्करावा लागला होता. सुरेश रैनाच्या नेतृत्वाखाली हा पहिलाच सामना असल्याने नव्या भारतीय संघास जम बसवणे कठीण गेले असावे. कारण नंतर लगेच दुसऱ्या सामन्यात त्यांनी श्रीलंकेविरुद्ध आपला खेळ उंचावून आव्हान कायम राखले होते. साखळीत प्रत्येक संघ एकमेकांविरुद्ध दोनवेळा खेळणार आहे. पहिला टप्पा पार पडल्यानंतर तीनही संघांनी एकेक सामना जिंकल्याने दुसऱ्या टप्प्यात चांगली चुरस असेल. अर्थात, दुसरा टप्पा सुरू होईल तेव्हा प्रत्येक संघ विजय मिळवून अंतिम फेरीच्या दृष्टीने एक पाऊल पुढे टाकण्याचा विचार करेल.

सुवर्णपदकामुळे कृष्णाला भरारीचा विश्‍वास

Wed, 2010-06-02 20:08

मुकुंद पोतदार - काळ वृत्तसेवा पुणे -&nbsp अमेरिकेत ऑलिंपिक विजेत्याचे प्रशिक्षण, पतीचे मार्गदर्शन आणि मेहनतीच्या जोरावर राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक मिळविण्याचा विश्‍वास थाळीफेकीतील खेळाडू कृष्णा पुनियाने व्यक्त केला. आशियायी ग्रांप्री मैदानी स्पर्धेत तिने मंगळवारी प्रथमच सुवर्णपदक मिळविले. या संदर्भात तिने सांगितले, की मी अमेरिकेतील सॅन दिएगो येथे मॅक विल्कीन्स यांच्या मार्गदर्शनाखाली सराव केला. या वर्षी तीन महिने मी तेथे होते. मॅकने 1976 च्या मॉंट्रिएल ऑलिंपिकमध्ये थाळीफेकीत सुवर्णपदक मिळविले होते. तेथील एका स्पर्धेत मी 63.69 मीटर अशी कामगिरी केली होती. आशियाई पातळीवर मला आतापर्यंत रौप्य किंवा ब्रॉंझ मिळाले आहे. या स्पर्धेतील हे पहिलेच सुवर्णपदक आहे. त्यामुळे आत्मविश्‍वास उंचावला आहे. पूर्वाश्रमीची कृष्णा शूरा वीरेंद्र पूनियाशी विवाहबद्ध झाली. वीरेंद्र हातोडाफेकीतील खेळाडू आहे. 67.78 मीटरचा राष्ट्रीय विक्रम काही काळ त्याच्या नावावर होता. अमेरिकेतील आणि भारतातील प्रशिक्षणात फरक प्रामुख्याने आहार आणि प्रदूषणाच्या बाबतीत आहे, असे मत त्याने व्यक्त केले. ""तेथे प्रदूषण अजिबात नाही.