You are hereFeed aggregator / Sources / Latest News

Latest News


Syndicate content visit www.eSakal.com
LatestNewseSakal.com © CopyRight Sakaal Media Group.20092010
Updated: 4 hours 2 min ago

कोल्हापूर... संपूर्ण वार्तांकन एका क्लिकवर

0 sec ago

कोल्हापूर - कोल्हापुरात बुधवारी दिवसभरात घडलेल्या घडामोडींच्या बातम्या एकत्रितपणे इथे देत आहोत. &nbsp किर्लोस्करचे योगदान मोठे - पवार &nbsp कोल्हापुरात हृदयातील गाठीची शस्त्रक्रिया &nbsp पीएचडीधारकांना अधिव्याख्यातासाठी मान्यता द्यावी &nbsp गुढीपाडव्याच्या पहाटे स्वरांजली कार्यक्रमाचे आयोजन &nbsp कोल्हापूरवासीयांची पाण्यासाठी यातायात &nbsp वैद्यकीय क्षेत्राने सामजिक बांधिलकी जपावी &nbsp वारणा डावा कालव्याची कामे बंद पाडू &nbsp शिवाजी

विदर्भात तीन विद्यार्थिनींच्या आत्महत्या

0 sec ago

तरोडा/ खरांगणा (जि. वर्धा) यवतमाळ -&nbsp बारावीच्या विद्यार्थिनीची कॉपी पकडल्याने वर्धा जिल्ह्यात तर यवतमाळ जिल्ह्यात डी.टी.एड. व नवव्या वर्गातील विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची घटना आज (ता. 10) उघडकीस आली. बारावीच्या परीक्षेत कॉपी पकडल्याने निलंबित झालेल्या दाणापूर (ता. आर्वी, जि. वर्धा) येथील प्रज्ञा बाबाराव कांबळे (वय 18) या विद्यार्थिनीने मंगळवारी (ता. नऊ) सायंकाळी सातच्या सुमारात गावाबाहेरील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. प्रज्ञा कांबळे हिला पिंपळखुटा येथील बारावीच्या परीक्षाकेंद्रा

शहर कॉंग्रेस सहसचिव कोकसेंची निर्घृण हत्या

9 min 31 sec ago

नागपूर -&nbsp शहर कॉंग्रेस कमिटीचे सहसचिव दिनेश सीताराम कोकसे यांची आज हुडकेश्‍वर येथील इंद्रनगरात सकाळी साडेनऊच्या सुमारास दोन आरोपींनी निर्घृण हत्या केली. आरोपी कुणाल उज्जैनकर घटनेनंतर हुडकेश्‍वर पोलिस ठाण्यात शरण गेला. दरम्यान, भरदिवसा झालेल्या या हत्याकांडाने हुडकेश्‍वर परिसरात खळबळ उडाली. बुधवारी सकाळी दिनेश आपल्या दुचाकी वाहनाने घराकडे परत येत होते. घरापासून काही अंतरावर असतानाच अचानक कुणाल उज्जैनकर आणि त्याच्या साथीदारांनी दिनेशची गाडी अडविली. गाडी का थांबविली म्हणून दिनेश त्यांच्यावर ओर

पुतळ्यांचे बादशहा रवी मूर्ती कालवश

9 min 31 sec ago

नागपूर -&nbsp नागपूर शहर 'पुतळ्यांचे शहर' म्हणून ओळखले जाते. शहराच्या या ओळखीत मोलाची भर घालणारे प्रख्यात शिल्पकार, मूर्तिकार रवी बी. मूर्ती यांचे आज बुधवारी सकाळी निधन झाले. ते 68 वर्षांचे होते. येथील मोक्षधाम स्मशानभूमीत हजारो चाहत्यांच्या उपस्थितीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पुतळ्यांनी नागपूर शहराचीच नव्हे तर देशातील अनेक मोठ्या शहरांची शान वाढविली. रामबाग येथील निवासस्थानी सदैव पुतळ्यांच्या सहवासात रमणारे रवी मूर्ती एक मनस्वी कलावंत होते. मूळचे चंद्रपूर जिल्ह्यातील भिश

साधू यादव यांना केले कॉंग्रेसने निलंबित

24 min 31 sec ago

पाटणा - &nbsp महिला आरक्षण विधेयकाला विरोध केल्याबद्दल लालूप्रसाद यादव यांचे मेहुणे व माजी खासदार अनिरुद्ध प्रसाद ऊर्फ साधू यादव यांना कॉंग्रेसने निलंबित केले. लोकसभा निवडणुकीच्या वेळी यादव कॉंग्रेसमध्ये आले होते. यादव प्रदेशाध्यक्ष अनिलकुमार शर्मा यांच्या विरोधी गटाचे मानले जातात. निलंबनाच्या कारवाईनंतर ते म्हणाले, की महिला आरक्षणाला आपण केलेला विरोध साधार आहे. त्यात मागासवर्गीयांचा विचार करण्यात आलेला नाही. त्यात दुरुस्ती करून ते मंजूर करायला पाहिजे. दरम्यान, या कारवाईमागील मुख्य कारण यादव य

राज्यात लातूरमध्ये सर्वाधिक बुवाबाजी

24 min 31 sec ago

नाशिक - &nbsp प्रागतिक विचारांचा वारसा सांगणाऱ्या महाराष्ट्राला बसलेला अंधश्रद्धेचा विळखा दिवसेंदिवस घट्ट होत आहे. राज्यामध्ये लातूर जिल्ह्यात सर्वाधिक 37 बाबा असून, पाठोपाठ सांगलीत 31, तर भंडारा-गोंदियात 10 बुवांनी आपले बस्तान बसविले आहे. विभागवार आकडेवारी पाहिली, तर विकासात आघाडीवर असलेल्या पश्‍चिम महाराष्ट्रात सर्वाधिक 66 बुवा आहेत. त्यानंतर मराठवाड्याचा क्रमांक (57) लागतो. पोलिस ठाण्यात बाबा-बुवांविरुद्ध मोजक्‍याच तक्रारी जात असल्याने आणि त्यांचाही योग्य पाठपुरावा होत नसल्याने कारवाईचे प्र

भाजपमध्ये होतोय अंतर्विरोध तीव्र

24 min 31 sec ago

नवी दिल्ली - &nbsp ऐतिहासिक महिला आरक्षण विधेयक राज्यसभेत मंजूर करताना भाजपने सरकारशी हातमिळवणी केली, तरी अनेक ओबीसी खासदार असलेल्या भाजपला असंतोषाचे वारे चटके देऊ लागले आहेत. त्यामुळे लोकसभेतील गोंधळ थांबणारच नाही, हे सूर्यप्रकाशाइतके स्वच्छ असताना भाजपने जे घडणे शक्‍यच नाही, अशा विचित्र अटी पुढे करण्यास सुरवात केली आहे. महिला विधेयकाला लोकसभेत पाठिंबा देऊ पण सभागृहात बंदोबस्तासाठी मार्शल यायला नकोत, अशी विचित्र अट घालणाऱ्या भाजपने विधेयक लांबणीवर पाडण्याच्या दृष्टीने आता नवनव्या अडथळ्यांची म

ममता संतापल्या; कॉंग्रेस धास्तावली

24 min 31 sec ago

नवी दिल्ली - महिला आरक्षण विधेयकाचा राज्यसभेत ऐतिहासिक विजय झाल्यानंतर दिल्लीतील राजकारणाने बुधवारी वेगळेच वळण घेतले. आरक्षण विधेयकात मुस्लिम कोटा नसल्याबद्दल रेल्वेमंत्री ममता बॅनर्जींनी संतापून राजीनाम्याची धमकी दिली, तर यादवांच्या त्रिकुटाने आपली भूमिका अधिक आक्रमक करीत हे विधेयक लोकसभेत चर्चेसाठी येऊच नये, यासाठी राजकीय व्युहरचना सुरू केली आहे. यात ते भारतीय जनता पक्षातील ओबीसी खासदारांच्या गटाची मदत घेण्याच्या बेतात आहेत. त्यामुळे विधेयकाच्या ऐतिहासिक विजयाचा आनंद साजरा करणाऱ्या कॉंग्रेसच्

देशी संशोधकांसाठी राष्ट्रपती भवनात लाल गालिचा

24 min 31 sec ago

नवी दिल्ली - विपरीत परिस्थितीत आपल्या असामान्य प्रतिभेने असे नवे संशोधन करणाऱ्यांच्या शोधांचे "एक्‍झिबिशन ऑफ इनोव्हेशन' हे प्रदर्शन प्रथमच राष्ट्रपती भवनाच्या आवारात आयोजित करण्यात आले आहे. राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी या संशोधकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे आश्‍वासन दिले. संशोधन करण्यासाठी काचेच्या बंद वातानुकूलित प्रयोगशाळांचीच गरज असते असे नाही. दुर्गम भागात राहणारा खेडूत किंवा शेतकरी असो किंवा छोट्या शहरातील वेल्डर अथवा पेंटर, जीवनातील अडचणी सोडवताना त्यांच्याकडून झालेल्या प्रयत्नात

दोन केंद्रीय मंत्र्यांकडून चटवाल यांची शिफारस

35 min 57 sec ago

नवी दिल्ली - &nbsp केंद्र सरकारमधील दोन मंत्री आणि अमेरिकी कॉंग्रेस सदस्याने वादग्रस्त अनिवासी भारतीय हॉटेल उद्योजक संतसिंग चटवाल यांची पद्म पुरस्कारासाठी शिफारस केली होती, अशी माहिती आज सरकारतर्फे राज्यसभेत देण्यात आली. केंद्रीय अनिवासी भारतीय खात्याचे मंत्री वायलर रवी, नागरी विमान वाहतूक मंत्री प्रफुल्ल पटेल, तसेच अमेरिकी कॉंग्रेसचे सदस्य जोसेफ क्राउले आणि डॅलिस ऍडलर यांच्याकडून चटवाल यांच्यासाठी चार शिफारशी आल्या होत्या. गृहराज्यमंत्री एम. रामचंद्रन यांनी राज्यसभेत ही माहिती दिली. ते म्हणाल

पडक्‍या वाड्यात सापडलेले धन 38 हजारांचे

2 hours 46 min ago

पुणतांबे -&nbsp गेल्या आठवड्यात पडक्‍या वाड्यात सापडलेले दागिने व नाणी धातू तज्ज्ञाकडून तपासण्यात आली आहेत. या वस्तू चांदी व रुप्याच्या असून, त्याची सरकारी किंमत 38 हजार रुपये आहे. पुरातत्त्व विभागाच्या कायद्यान्वये हे सापडलेले दागिने व नाणी जिल्हाधिकारी यांच्याकडे जमा करण्याची कार्यवाही पूर्ण झालेली आहे, अशी माहिती राहाता तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक सुरेश वऱ्हाडे यांनी "सकाळ'शी बोलताना दिली. चार मार्च रोजी क्रिकेट खेळताना बालकांचा चेंडू श्री. सांबारे यांच्या पडक्‍या वाड्यात गेला होता. चेंड

मामाला लाथ घाल, तरच पोलिस भरतीत ठेवतो

3 hours 20 min ago

सोलापूर - पोलिस भरतीसाठी उपाशीपोटी सकाळी लवकर घर सोडलेल्या भाच्याला त्याच्या मामाने डबा आणला. तो त्याने घेतल्याने राग अनावर झालेल्या जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. सुरेशकुमार मेखला यांनी त्या उमेदवाराच्या कानाखाली लगावली. इतक्‍यावर त्यांचे समाधान न झाल्याने त्यांनी त्या मुलाला भरती प्रक्रियेबाहेर काढण्याची धमकी देत त्याच्या मामाला लाथ मारायला लावली. ही संतापजनक घटना आज दुपारी दीडच्या सुमारास ग्रामीण पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर घडली. भरतीच्या वार्तांकनासाठी आलेल्या काही पत्रकारांसमोरच पोलिस अधीक्षक

अभिनेत्री दीपिका पदुकोणकडून सौरदिवे मिळालेच नाहीत

4 hours 18 min ago

सावंतवाडी -&nbsp बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण यांनी आंबेगाव (ता. सावंतवाडी) ग्रामपंचायतीला 280 सौरदिवे दिल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले मात्र आंबेगाव ग्रामपंचायतीला संबंधित सौरदिवे मिळालेलेच नाहीत वा याची काहीही कल्पना नाही. त्यामुळे यासंबंधी चौकशी व्हावी आणि नेमके सौरदिवे कुणी नेले, वा कुणाला मंजूर झाले, याची चौकशी व्हावी, असे आवाहन आंबेगावचे सरपंच वासुदेव परब यांनी केले. ग्रामीण भागातील अंधार दूर करण्यासाठी अभिनेत्री पदुकोण यांनी सौरदिवे भेट देणार असल्याचे जाहीर केले. जागतिक तापमानवाढीच्या प

खून प्रकरणी कोल्हापुरात केळी विक्रेत्यास जन्मठेप

8 hours 5 min ago

कोल्हापूर - केळीची गाडी लावण्याच्या वादातून तरुणाचा खून केल्याप्रकरणी रचून रफिक आयाचॉंद रोले (वय ३०, रा. विक्रमनगर, गुरव गल्ली, कोल्हापूर मूळ रा. इचलकरंजी) या केळी विक्रेत्याला बुधवारी जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. बी. शुक्रे यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. सरकार पक्षातर्फे ऍड. दिलीप मंगसुळे यांनी काम पाहिले. या खटल्याची हकीकत अशी - रफीक व अमर लक्ष्मण मनगुत्ते (वय २८, रा. शितोली अंकली, ता. चिक्कोडी, जि. बेळगाव) हे दोघे आकाश शशिंकात जाधव (रा. पाडळकर मार्केट) या केळी व्यापाऱ्याकडे कामाला होते. ते

जळगावमध्ये बस पेटविण्याचा प्रयत्न

8 hours 19 min ago

जळगाव&nbsp -&nbsp मराठा आरक्षणाच्या मुद्‌द्‌यावरून आज पाचोरा येथे राज्य परिवहन महामंडळाच्या बसवर दगडफेक तर चिंचोली (ता.जळगाव) येथे सायंकाळी चारला बस पेटविण्याचा प्रयत्न झाला. या प्रकरणात जळगाव एमआयडीसी पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे. पाचोरा येथे आज सकाळी सव्वानऊला पाचोरा आगाराची पाचोरा येथून सातगाव डोंगरी येथे निघालेले बस (क्रमांक : एमएच 20 डी 5961) छावा असे लिहिलेल्या एका वाहनाने आलेल्या कार्यकर्त्यांनी जारगाव चौफुली नजीक अडवली. या बसमधील 22प्रवासी उतरवून बसवर दगडफेक करून काचा फोडल्या. बस

..तर पुरुषांनाही आरक्षण देऊ

8 hours 22 min ago

नवी दिल्ली - लोकसभा आणि विधानसभेमध्ये महिलांना ३३ टक्के आरक्षण मिळाल्यानंतर पुरुषांची संख्या कमी होईल, अशी साशंकता तृणमूल कॉंग्रेसच्या एका नेत्याने व्यक्त केली असता, ते पुरुषांना आरक्षण दिले जाईल, अशा चेष्टेच्या सुरात कॉंग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी उत्तर दिले. लोकसभेमध्ये बुधवारी समाजवादी पक्ष, राष्ट्रीय जनता दलाच्या सदस्यांनी गोंधळ घातला. त्यामुळे सभागृह तहकूब करण्यात आले. त्यावेळी तेथेच उपस्थित असलेल्या गांधी यांना तृणमूलचे कल्याण बॅनर्जी यांनी महिला सभेमध्ये ३३ टक्के आरक्षणाव्यति

गोंधळामुळे लोकसभा दिवसभरासाठी तहकूब

9 hours 15 min ago

नवी दिल्ली - महिला आरक्षण विधेयकावरून बुधवारी&nbsp समाजवादी पक्ष, राष्ट्रीय जनता दल आणि संयुक्त जनता दलाच्या&nbsp खासदारांनी&nbsp लोकसभेत गोंधळ घातल्यामुळे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.&nbsp &nbsp लोकसभेचे कामकाज सकाळी अकरा वाजता सुरू झाल्यानंतर विधेयकाच्या विरोधात असलेल्या लालू प्रसाद यादव, मुलायमसिंह यादव&nbsp यांच्या नेतृत्त्वाखाली&nbsp राष्ट्रीय जनता दल, समाजवादी पक्ष आणि संयुक्त जनता दलाच्या खासदारांनी अध्यक्षांसमोरील मोकळ्या जागेत जमून घोषणाबाजी करण्यास सुरवात केली. विधेयक मागे

सचिनला 'भारतरत्न' देण्याची राज्यसभेत मागणी

9 hours 54 min ago

नवी दिल्ली - एकदिवसीय सामन्यात द्विशतक झळकावून विश्‍वविक्रम करणाऱ्या सचिन तेंडुलकरला देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार "भारतरत्न' मिळावा यासाठी आज (बुधवार) राज्यसभेत जोरदार मागणी करण्यात आली. राज्यसभेतील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खासदार रणजितसिंह मोहिते पाटील म्हणाले, "सचिनला भारतरत्न मिळावा या मताशी आम्ही सर्व सहमत आहोत. सचिन अनेक वर्षांपासून सातत्यपूर्ण कामगिरी करीत आहे. सचिन देशातील युवकांचा आदर्श असून, त्याला सरकारने हा पुरस्कार दिला पाहिजे. वयाच्या सोळाव्या वर्षी क्रिकेट कारकिर्दीस सुरवात करण

सज्जनकुमार यांना जामीन मंजूर

11 hours 39 sec ago

नवी दिल्ली - शिखांविरोधी दंगलीमध्ये तथकथित भूमिका मांडल्याचा आरोप असलेले कॉंग्रेसचे नेते सज्जन कुमार यांना जामीन मंजूर झाला आहे. बुधवारी ते दिल्ली न्यायालयासमोर हजर झाले होते. अतिरिक्त महानगर न्यादंडाधिकारी लोकेश कुमार शर्मा यांनी सज्जन कुमार यांची ५० हजार रुपयांच्या जात मुचलक्‍यावर सुटका केली. कुमार यांच्यासह शीख आंदोलनाप्रकरणातील सात आरोपी न्यायालयात हजर झाले होते. त्यांनाही जामीन मंजूर करण्यात आला.

औरंगाबादेत निवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून मुलाखती

12 hours 8 min ago

औरंगाबाद - येथील महानगरपालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी पक्षातील इच्छुक उमेदवारांच्या उद्यापासून (ता. ११) सुरू होणाऱ्या मुलाखती दोन दिवस चालणार आहेत. या मुलाखती राष्ट्रपती भवनात गुरुवार व शुक्रवार या दोन दिवसात होणार आहेत. मुलाखत घेण्यासाठी अजित पवार, जयदीप क्षीरसागर, प्रकाश साळुंके, राजेश टोपे, फौजिया खान व मधुकरअण्णा मुळीक उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती पक्षाचे शहराध्यक्ष मनमोहनसिंग ओबेरॉय यांनी आज (बुधवार) पत्रकार परिषदेत दिली.

Contact Us

Vikram Bedekar
president@neomm.org
614-352-1787