You are hereFeed aggregator / Sources / Latest News

Latest News


Syndicate content visit www.eSakal.com
LatestNewseSakal.com © CopyRight Sakaal Media Group.20092010
Updated: 3 hours 28 min ago

अहमदाबाद विमानतळावर कडक सुरक्षा व्यवस्था

Fri, 2010-06-11 11:48

अहमदाबाद - येथील सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळाला दहशतवाद्यांकडून धोका असल्याची माहिती केंद्रीय गृह मंत्रालयाला मिळाल्यानंतर विमानतळावरील सुरक्षा व्यवस्था आज (शुक्रवार) वाढविण्यात आली आहे. विमानतळाला दहशतवाद्यांकडून धोका असल्याची माहिती केंद्रीय गृह मंत्रालयाकडून मिळाल्यानंतर सुरक्षा व्यवस्था वाढविल्याची माहिती विमानतळावरील अधिकाऱ्यांनी दिली. विमानतळावर येणाऱ्या सर्व प्रवाशांच्या वस्तूंची काटेकोर तपासणी करण्याचा आदेश कर्मचाऱ्यांना देण्यात आला आहे. विमानतळावरील तपासणी नियमित व्हावी यासाठी मंत्रालयाकडून सुरक्षेचे आदेश देण्यात आले असावेत, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. देशातील इतरही विमानतळांवरील सुरक्षा व्यवस्था कडक असल्याचे सांगण्यात आले. &nbsp Follow Us on Twitter

साताऱ्याच्या नगरसेवकाला पुण्यात अटक

Fri, 2010-06-11 11:45

पुणे - साताऱ्याचे नगरसेवक जयवंत भोसले यांना खंडणीप्रकरणी आज (शुक्रवारी) वारजे पोलिसांनी पुण्यात अटक केली. साताऱ्यातील आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या नगर विकास आघाडी या पक्षाचे ते नगरसेवक आहेत. ८ जून रोजी वारजे येथे घडलेल्या एका खंडणीप्रकरणी त्यांना अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.&nbsp

अहमदाबाद विमानतळावरील सुरक्षेत वाढ

Fri, 2010-06-11 11:32

अहमदाबाद - केंद्रीय गृह मंत्रालयाने दहशतवादी हल्ल्याचा इशारा दिल्यानंतर येथील सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सुरक्षाव्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून सुरक्षाव्यवस्थेत वाढ करण्यात आली असल्याचे विमानतळावरील अधिकाऱ्यांनी सांगितले. संशयास्पद हालचाली असलेल्या प्रवाशांची तातडीने माहिती द्यावी, प्रवाशांचे सामान काळजीपूर्वक तपासावे आणि विमानतळाच्या परिसरात अधिक कडक बंदोबस्त ठेवावा, अशा सूचना सुरक्षारक्षकांना करण्यात आल्या आहेत. केंद्रीय गृह मंत्रालयाकडून दहशतवादी हल्ल्याचा इशारा देण्यात आल्यानंतर देशातील सर्वच विमानतळावरील सुरक्षाव्यवस्थेत तातडीने वाढ करण्यात येते. त्यादृष्टीने येथील विमानतळावर सुरक्षेचे विविध उपाय योजले असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. &nbsp

शनिशिंगणापूरला शुक्रवारी शनीजयंती सोहळा

Fri, 2010-06-11 11:25

सोनई - शनिशिंगणापूरला उद्या (ता. १२) शनीजयंती सोहळा व शनिअमावस्येची यात्रा भरणार असून, या सोहळ्यानिमित्त भाविकांची विक्रमी गर्दी होईल, असा अंदाज आहे. यात्रेची तयारी व नियोजन पूर्ण झाले आहे, अशी माहिती विश्‍वस्त समितीचे अध्यक्ष दादासाहेब दरंदले यांनी दिली. शुक्रवारी लागलेली अमावस्या शनिवारी संपणार आहे. देवस्थान ट्रस्टच्या वतीने यात्रेनिमित्त येणाऱ्या भाविकांना पिण्याचे पाणी, वाहनतळ, निवास, भोजन, आरोग्य आदी सुविधांचे नियोजन करण्यात आले आहे. &nbsp Follow Us on Twitter

जगातील सर्वोत्तम 'एसईझेड'मध्ये गुजरातच्या दाहेजचा समावेश

Thu, 2010-06-10 20:10

अहमदाबाद&nbsp - गुजरातमधील दाहेज विशेष आर्थिक क्षेत्राची (एसईझेड) गणना जगातील सर्वोत्तम 25 विशेष क्षेत्रांमध्ये करण्यात आली असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री जयनारायण व्यास आणि उद्योगमंत्री सौरभ पटेल यांनी दिली. फॉरिन डायरेक्‍ट इन्व्हेस्टमेंट या द्वैमासिकाने जगातील सुमारे सातशे मुक्त आर्थिक क्षेत्रांचे सर्वेक्षण करून त्यांची क्रमवारी लावली आहे. दाहेज बंदराजवळ उभारण्यात येणाऱ्या विशेष क्षेत्राचा त्यात तेविसावा क्रमांक आहे. शांघाय येथील वेगाक्वियो मुक्त व्यापार क्षेत्र प्रथम, तर दुबई मुक्त विमानतळ क्षेत्र दुसऱ्या स्थानावर आहे. क्षमता, गुंतवणुकीचा ओघ, व्यवसायाचा विस्तार, आर्थिक परिणामकारकता, सुविधा आदी आठ निकषांचा विचार करून ही क्रमवारी ठरविण्यात आली आहे. दाहेज एसईझेड कॅंबेच्या आखातामध्ये 1700 एकर जागेत पसरलेला असून, आतापर्यंत त्याने 20 हजार कोटींची गुंतवणूक आकर्षित केली आहे. त्यातून उभारल्या जाणाऱ्या उद्योगांमध्ये सुमारे 22 हजार लोकांना रोजगार मिळणार आहे. गुजरात विशेष गुंतवणूक विभाग कायद्यानुसार हे क्षेत्र पेट्रोकेमिकल्स आणि पेट्रोलियम गुंतवणुकीसाठी अधिसूचित करण्यात आले आहे.

आंध्रात केला जातोय दफनभूमींचा विकास

Thu, 2010-06-10 20:10

हैदराबाद -&nbsp शाळा, उद्याने, पुरातन इमारती आदींपाठोपाठ आंध्र प्रदेशात दफनभूमींचा विकास केला जाणार आहे. सरकारने काही सामाजिक संस्था व उद्योजकांना त्यासाठी आमंत्रित केले आहे. प्रामुख्याने महापालिकांमार्फत "बीओटी' तत्त्वावर ही मोहीम राबविली जात आहे. येथील तेवीसशे दफनभूमींपैकी सुमारे बाराशे दफनभूमी बृहन्‌हैदराबाद महापालिकेच्या हद्दीत आहेत. मूलभूत सुविधांची कमतरता आणि योग्य व्यवस्थापनाअभावी त्यापैकी अनेक दफनभूमी सध्या वाईट अवस्थेत आहेत. जुन्या शहरातील चादरघाट दफनभूमीत तर मृतदेहांचे एकावर एक, असे चार स्तर असल्याचे आढळून आले आहे. काही ठिकाणी थडग्यांची दुरवस्थाही झालेली आहे. सध्या स्थानिक विभाग समित्यांमार्फत त्यांचे व्यवस्थापन केले जात आहे. दफनभूमींचा विकास करून शहरांचे सौंदर्य वाढविण्याच्या उद्देशाने ही मोहीम राबविली जात आहे. या प्रकल्पासाठी सामाजिक जबाबदारीचे भान ओळखून उद्योगांसह विविध सामाजिक संस्थांनी पुढे येण्याचे आवाहन हैदराबाद महापालिकेने केले आहे.

आजपासून रंगणार नव्वद मिनिटांचा पदन्यास

Thu, 2010-06-10 20:10

जोहान्सबर्ग -&nbsp जगाच्या नकाशावर असणाऱ्या सहा खंडांतील 32 देशांतील खेळाडू उद्या शुक्रवारपासून फुटबॉलवरील आपले वर्चस्व दाखविण्यासाठी सज्ज होतील. यजमान दक्षिण आफ्रिका आणि मेक्‍सिको यांच्यातील सलामीच्या लढतीने विश्‍वकरंडक स्पर्धेतील मैदानावरच्या नव्वद मिनिटांच्या पदन्यासाला सुरवात होईल. त्यानंतर रात्री उरुग्वे आणि फ्रान्स यांच्यात दुसरा सामना होईल. आफ्रिकेत प्रथमच होणारी ही विश्‍वकरंडक स्पर्धा अनेक कारणांसाठी लक्षवेधी ठरेल. यात मैदानावरील खेळाडूंचे अद्‌भुत कौशल्य तर आहेच पण बरोबरीने खेळाच्या माध्यमातूनही वर्णभेदाचे उच्चाटन करता येते, हा महत्त्वाचा संदेश जगभर जाईल. आशिया, ओशियाना, दक्षिण अमेरिका, उत्तर अमेरिका, युरोप आणि आफ्रिका अशा सहा खंडांतून पात्रता फेरीत झगडून 32 देशांच्या संघांनी या मुख्य स्पर्धेत प्रवेश मिळविला आहे. या स्पर्धेचे वेगळे वैशिष्ट्य म्हणजे 1934 नंतर प्रथमच यजमान देशालाही पात्रता फेरीत खेळावे लागले. यात युरोपातील तब्बल 13 संघ पात्र ठरले आहेत. त्यामुळे युरोपातील देशांचे वर्चस्व राहिल्यास आश्‍चर्य वाटायला नको. अर्थात, ब्राझील, अर्जेंटिना, उरुग्वे या युरोपबाहेरील संघांना विसरता येणार नाही.

महागाईच्या नव्या निकषाने सरकार पेचात

Thu, 2010-06-10 20:10

नवी दिल्ली&nbsp - महागाईचे भूत सरकारच्या मानेवरून उतरण्याची अजिबात चिन्हे दिसत नाहीत. घाऊक किमतीच्या निर्देशांकासाठी 2004 चा नवीन आधार मानल्यास महागाई कमी होताना दिसत असली, तरी सार्वजनिकरीत्या महागाई कमी होत असल्याचे मान्य केल्यास जनतेच्या असंतोषाला सामोरे जाण्याची भीती असल्याने सरकार पेचात सापडले आहे. नवीन निकषाच्या आधारे घाऊक किंमत निर्देशांक तीन ते चार टक्‍क्‍यांनी वाढणे अपेक्षित असतानाच महागाई जवळपास 0.8 ते तीन टक्‍क्‍यांनी कमी झालेली आहे. वाढत्या महागाईचे सत्य स्वरूप स्पष्ट व्हावे, यासाठी 16 वर्षापूर्वीच्या जुन्या मापदंडाऐवजी नवीन निकषांच्या आधारे घाऊक किमतीचा निर्देशांक काढला जावा, अशी सूचना राष्ट्रीय सल्लागार परिषदेच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केली होती. मात्र, त्या आधारे महागाई कमी होताना दिसत असल्याने त्याचे विपरीत परिणाम दिसण्याची भीती असल्याने तज्ज्ञांकडून या अहवालाच्या मसुद्यावर सल्ला मागण्याची वेळ सरकारवर आली आहे. वाढत्या महागाईने सर्वांच्याच तोंडचे पाणी पळाले असताना नव्या निकषाच्या घाऊक किंमत निर्देशांकानुसार महागाई चक्‍क कमी झालेली आहे.

राजभवन-सरकारच्या लढाईत बिहारमध्ये शिक्षणाचा पराभव

Thu, 2010-06-10 20:10

पाटणा -&nbsp राजभवन आणि राज्य सरकार यांच्यातील वाद शिगेला पोचला आहे. राज्यातील या महत्त्वाच्या संस्थांमधील लढाईत विद्यापीठांच्या शिक्षणाची मात्र हार झाली आहे. या प्रकरणाकडे मुख्यमंत्री नीतिशकुमारांनी सोईस्कररीत्या डोळेझाक केलेली आहे. त्यांना यापेक्षा राज्यात काही दिवसांत होत असलेल्या विधानसभा निवडणुकीत अधिक रस आहे. राजभवन आणि राज्य सरकार यांच्यात अनेक दिवसांपासून विद्यापीठ कुलगुरू निवडीवरून वाद पेटला आहे. त्यांच्या या वादात विद्यापीठांमधील शिक्षणाची स्थिती अधिकच बिघडत चालली आहे. काही दिवसांपूर्वी राजभवनाने राज्यातील वीर कुंवरसिंह विद्यापीठाचे कुलगुरू एस. के. सिंह यांना बडतर्फ केले होते. सिंह हे कुलपती यांच्या कामात विनाकारण हस्तक्षेप करीत नियम आणि कायद्याचा भंग करतात, असा त्यांच्यावर आरोप होता. तसेच त्यांनी गुंड हाताशी धरून ठेवलेले असून, त्यांच्यामार्फत इतरांवर दबाव टाकतात, असाही त्यांच्यावर आरोप करण्यात आला. या प्रकरणी राजभवनाने त्यांच्याविरोधात चौकशीसत्र सुरू केले. यात ते दोषी आढळले. याबाबत मागविलेल्या अहवालाच्या आधारे त्यांना पदावरून हटविण्यात आले. आता मात्र या प्रकरणाने नवीनच वळण घेतले आहे.

राजीव गांधी यांनीच अँडरसनना वाचविले

Thu, 2010-06-10 20:10

नवी दिल्ली -&nbsp आगामी संसद अधिवेशनाचा प्रारंभ भोपाळ वायुगळती दुर्घटनेच्या निकालावरून गोंधळाने होण्याचे निश्‍चित झाले असतानाच, भाजपने आज तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी व मुख्यमंत्री अर्जुनसिंह यांनीच अँडरसन याला पळून जाण्यास मदत केल्याचा गंभीर आरोप केला. हजारो जणांचे रक्त हाताला लागलेला अँडरसन सरकारी विमानाने परदेशात पळून जातो, हे लज्जास्पद असल्याची टीकाही पक्षाने केली आहे. भोपाळ दुर्घटनेवरून विरोधी पक्ष संसदेत सरकारला धारेवर धरतील, असे स्पष्ट करतानाच आगामी आण्विक दायित्व विधेयकात वेळीच सुधारणा करून त्यात नुकसानभरपाईच्या तरतुदी आणखी कडक करा, अशी सूचनाही भाजपने केंद्राला केली आहे. केंद्र व मध्य प्रदेशातील तत्कालीन कॉंग्रेस सरकारांनी दुर्घटनाग्रस्तांऐवजी आरोपींनाच मदत केली, असा आरोप भाजप प्रवक्ते प्रकाश जावडेकर यांनी केला. पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, की कॉंग्रेसच्या लोकविरोधी धोरणांचे पितळ भोपाळ दुर्घटनेच्या निकालाने पूर्णपणे उघडे पडले आहे. जगातील या सर्वांत भीषण दुर्घटनेत किमान 20 हजार निष्पाप भारतीय नागरिकांना प्राण गमवावे लागले. सुमारे सहा लाख लोकांना कायमचे अपंगत्व आले.

'मनसे'ला आमचे कुठलेही आश्‍वासन नाही

Thu, 2010-06-10 20:10

मुंबई -&nbsp 'मनसे'च्या चार आमदारांच्या निलंबनाचा विषय हा सभागृहाचा निर्णय आहे त्यामुळे त्याचा निर्णय सभागृहावर अवलंबून आहे, असे स्पष्ट करतानाच निलंबनाच्या विषयावर 'मनसे' व आमच्यामध्ये कुठल्याही प्रकारची चर्चा झाली नाही. तसेच त्यांचे निलंबन मागे घेण्याचे कुठलेही आश्‍वासन आम्ही दिले नसल्याचा दावा उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी प्रसिद्धिमाध्यमांशी बोलताना केला. ते म्हणाले, की मनसेचे एकही मत शिवसेना व भाजपच्या उमेदवाराला मिळाले नाही तर त्यांची मते कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवाराला मिळाली असण्याची शक्‍यता आकडेवारीवरून दिसत आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसबरोबरच्या अपक्षांनी आम्हाला मतदान केले. तसेच समाजवादी पार्टी व जनसुराज्य पक्षानेही आम्हाला मते दिली. विधान परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी व कॉंग्रेस एकत्रपणे लढली, त्यामुळे आमचा विजय सुकर झाला. आमची स्टॅटीजी योग्य पद्धतीने चालली. &nbsp Follow Us on Twitter

गोव्याचे मुख्यमंत्री आज सोनिया गांधींना भेटणार

Thu, 2010-06-10 20:10

नवी दिल्ली -&nbsp गोव्यासारख्या राजकीयदृष्ट्या कायम अस्थिर राहणाऱ्या राज्यात सत्तेची सलग तीन वर्षे पूर्ण केल्यानंतर मुख्यमंत्री दिगंबर कामत उद्या (ता. 11) कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेणार असून, सरकारच्या कामगिरीचा अहवाल देणार असल्याचे कॉंग्रेसच्या गोटातून सांगण्यात आले. राज्याचे माजी पर्यटनमंत्री पाशेको यांच्यामुळे उद्‌भवलेल्या परिस्थितीबाबतही ते पक्षाध्यक्षांना माहिती देतील, असे समजते. राष्ट्रवादी कॉंग्रेसशी झालेला पेच, सहकारी पक्षाचे मंत्री, अपक्षांसोबतच स्वपक्षीयांच्या कर्तृत्वामुळे ओढवलेल्या संकटामुळे मुख्यमंत्र्यांचे आसन डळमळीत झाले होते. त्यातून कामत सहीसलामत बाहेर पडले. गोव्याचा राजकीय अस्थिरतेचा इतिहास पाहता कामत यांची तीन वर्षे टिकून राहण्याची कामगिरी मोठी आहे, असे मत कॉंग्रेसच्या एका नेत्याने व्यक्त केले. अर्थात, सरकारची सूत्रे सांभाळताना गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांची प्रशंसा केल्याने आणि महिलांच्या आरक्षणाविरोधात बोलल्यामुळे कामत चांगलेच अडचणीत आले होते. मात्र, त्यातून ते बचावले. आता पाशेको यांचे नवे प्रकरण सुरू झाले आहे.

'मनसे'चे आमदार सर्वाधिक चर्चेत

Thu, 2010-06-10 20:10

मुंबई -&nbsp विधान परिषद निवडणुकीत मनसेच्या 13 मतांनी अखेर निर्णायक भूमिका पार पाडली. तरीही या मौल्यवान मतांसाठी संबंधित उमेदवारांना मतदानाच्या अखेरच्या क्षणापर्यंत वाट पाहावी लागली. मनसेच्या आमदारांसाठी सकाळपासून विधानभवन परिसरात क्‍लायमॅक्‍स तयार करून ठेवण्यात आला होता. प्रत्यक्ष त्यांनी दुपारी साडेतीनच्या सुमारास मतदानाचा हक्क बजावल्यामुळे मनसेचे आमदार आज पुन्हा एकदा चर्चेत आले. 'मनसे'च्या तेरा मतांसाठी सर्व पक्षांनी फिल्डिंग लावली होती. मनसेची मते कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीच्या पारड्यात पडली. प्रसिद्धिमाध्यमांनाही मनसेच्या आमदारांची सकाळपासून प्रतीक्षा होती. दुपारी एकच्या सुमारास मनसे आमदार काही वेळातच मतदानाला पोहोचतील असा निरोप आला, पण अर्धा तास उलटून गेल्यानंतरही ते न आल्यामुळे सर्वांची प्रतीक्षा वाढली. तेवढ्यात राज्यसभेचे अपक्ष उमेदवार कन्हय्यालाल गिडवानी यांनी अर्ज मागे घेतल्याचे जाहीर करण्यात आले, त्यामुळे गिडवानींच्या माघारीची मनसेचे आमदार वाट पाहत होते, अशी चर्चा विधानभवनात सुरू झाली. काही उमेदवारसुद्धा पत्रकारांनाही मनसेचे आमदार कधी येत आहेत, याची मोबाईलवरून विचारणा करीत होते.

कसाबच्या सुटकेसाठी विमान अपहरणाची शक्‍यता

Thu, 2010-06-10 20:10

मुंबई -&nbsp मुंबई हल्ल्यातील एकमेव जिवंत दहशतवादी मोहम्मद अजमल कसाबच्या सुटकेच्या मागणीसाठी दहशतवादी संघटनेकडून विमान अपहरणाचा प्रयत्न होण्याची शक्‍यता असल्याने 'ब्युरो ऑफ सिव्हिल एव्हिएशन' आणि 'सीआयएसएफ'कडून विमानतळावरील सुरक्षाव्यवस्थेत वाढ केली आहे. मुंबईचे पोलिस आयुक्त संजीव दयाळ यांनी या वृत्ताला दुजोरा देत प्रसारमाध्यमांतून आलेल्या एका वृत्ताला गांभीर्याने घेऊन "सीआयएसएफ'ने सुरक्षिततेच्या दृष्टीने ही पावले उचलल्याचे सांगितले. मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या खटल्याचा निकाल गेल्या महिन्यात लागला. दहशतवादी मोहम्मद अजमल कसाबला न्यायालयाने फाशीची शिक्षा ठोठावली आहे. कसाबच्या शिक्षेवर उच्च न्यायालयात शिक्कामोर्तब केले जाणार आहे. आजवर जगभरात झालेल्या दहशतवादी हल्ल्यांपैकी मुंबई हल्ल्याच्या वेळी पकडलेला कसाब एकमेव जिवंत फिदायीन समजला जातो. भारतीय तपासयंत्रणांनी कसाबकडून या हल्ल्यात पाकिस्तानचा सहभाग असल्यापर्यंतची माहिती मिळविली आहे. कसाब भारतीय तुरुंगात राहणे "आयएसआय' व 'लष्कर ए तैय्यबा'च्या म्होरक्‍यांकरिता चिंतेचे ठरू शकते. त्यामुळेच त्याची सुटका करण्यासाठी दहशतवाद्यांचा प्रयत्न राहणार आहे.

मॉन्सूनची कर्नाटक, गोवा, कोकणकडे आगेकूच

Thu, 2010-06-10 14:14

नवी दिल्ली - नैऋत्य मोसमी मॉन्सून दक्षिण भारतात दाखल झाला. कर्नाटक, गोवा व दक्षिण कोकणमध्ये पावसाने आज (गुरुवार) जोरदार हजेरी लावली. दक्षिणेकडील भागात पावसाचे वातावरण निर्माण झाले असून वारे वाहत आहे. कर्नाटक, गोवा व दक्षिण कोकणामध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. पुढील दोन दिवसात या भागांमध्ये जोरदार पाऊस पडण्याची शक्‍यता आहे, असे वेधशाळेने म्हटले आहे. पावसासाठी वातावरण पोषक असून महाराष्ट्र, कर्नाटक व आंध्रप्रदेशातील काही भागात पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. &nbsp यंदा अंदमानात वेळेआधी दाखल झालेल्या मोसमी पावसाने केरळ किनारपट्टीवरही एक दिवस आधी हजेरी लावली होती. त्यानंतर अरबी समुद्रावर निर्माण झालेल्या "फेत' चक्रीवादळामुळे पावसाच्या प्रगतीत खंड पडला. चक्रीवादळाची तीव्रता कमी झाल्यानंतर आता पुन्हा पावसाच्या प्रगतीसाठी अनुकूल स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे, गेले काही दिवस केरळ आणि कर्नाटकच्या दक्षिण भागात मुक्काम ठोकलेल्या पावसाने आज कर्नाटकाच्या अंतर्गत भागात मुसंडी मारली. त्याचबरोबर ईशान्य भारतातील अनेक भागांतही पावसाचे आगमन झाले आहे.

घटस्फोट घेणे होणार आता सोपे

Thu, 2010-06-10 14:13

नवी दिल्ली - जोडीदाराशी जमत नसेल तर घटस्फोट घेणे आता सोपे होणार आहे. पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्या अध्यक्षतेखाली आज (ता.10) झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत विवाह कायदा (दुरूस्ती) विधेयक 2010 ला मंजूरी देण्यात आली. त्यामुळे आता कोणालाही घटस्फोट मिळवताना, विवाह कोणत्याही परिस्थितीत टिकू शकत नसल्याचे सिद्ध करून घटस्फोटाच्या प्रक्रियेतील विलंब आणि एक बाजूच्या न्यायालयात गैरहजर राहण्यातून होणाऱ्या मानसिक जाचातून सुटका करून घेणे शक्‍य होणार आहे. या विधेयकाद्वारे हिंदू विवाह कायदा 1955 आणि विशेष विवाह कायदा 1954 मध्ये दुरूस्ती करण्याची तरतूद असल्याची माहिती केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अंबिका सोनी यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

विधान परिषद निवडणुकीत अधिकृतांची बाजी

Thu, 2010-06-10 13:57

मुंबई - अपेक्षेप्रमाणे विधान परिषदेच्या निवडणुकीत कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसला आपले सर्व उमेदवार निवडून आणण्यात यश मिळाले आहे. गुरुवारी संध्याकाळी जाहीर झालेल्या सहा जागांपैकी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीचे प्रत्येकी तीन अधिकृत उमेदवार विजयी झाले आहेत. कॉंग्रेसचे संजय दत्त, दीप्ती चवधरी, हुसेन दलवाई आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे रामराजे निंबाळकर, विनायक मेटे प्रकाश बिनसाळे हे उमेदवार निवडणुकीत विजयी झाले. पहिल्या पसंतीच्या मतांनुसार, कॉंग्रेसच्या हुसेन दलवाई यांना ३०, दीप्ती चवधरी आणि संजय दत्त यांना प्रत्येकी २९ मते मिळाली. राष्ट्रवादीच्या रामराजे निंबाळकर यांना ३२, विनायक मेटे आणि प्रकाश बिनसाळे यांना प्रत्येकी २९ मते मिळाली.&nbsp

गोव्याच्या पाशेकोंचा अटकपूर्व जामीन फेटाळला

Thu, 2010-06-10 13:21

मडगाव - माजी पर्यटनमंत्री मिकी पाशेको यांचा अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायालयाने आज (गुरुवार) फेटाळला आहे. नादिया दोरादो मृत्यूप्रकरणी मिकी मुख्य संशयित आहेत. याप्रकरणी महत्त्वाचे पुरावे हाती लागल्याचा दावा पोलिसांनी याप्रकरणी संबंधित सुनावणीवेळी न्यायालयात केला. दरम्यान, याप्रकरणी आवाज उठविणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या बायलांचो एकवटच्या अध्यक्ष आवडा व्हिएगश यांना अज्ञाताने धमकावल्याने त्यांनी पोलिसांत धाव घेतली आहे, तर नादियाची आई सोनिया यांनीही अटकपूर्व जामिनासाठी उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात धाव घेतली आहे. नादिया ज्योएला तोरादो हिच्या मृत्यूप्रकरणी गुन्हा अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी प्रमुख संशयित म्हणून ठपका ठेवलेले माजी पर्यटनमंत्री मिकी पाशेको यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर त्यांचे दिल्लीतील वकील मोहित माथूर यांनी अतिरिक्त सत्र न्यायाधीश बी. पी. देशपांडे यांच्यासमोर बुधवारी (ता. ९) दीड तास युक्तिवाद केला, तर सरकारी पक्षातर्फे श्रीमती सरोजिनी सार्दिन यांनी तपासयंत्रणेकडे उपलब्ध असलेल्या परिस्थितीजन्य व इतर सक्षम पुराव्यांच्या आधारे त्यांच्या युक्तिवादाला प्रत्युत्तर दिले.

मुंबईत पोलिसाची आत्महत्या

Thu, 2010-06-10 13:21

मुंबई - दींडोशी पोलिस ठाण्यात नेमणूकीवर असलेल्या पोलिस शिपायाने पत्नीसोबत क्षुल्लक कारणावरून झालेल्या शाब्दीक वादानंतर राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना अंधेरी पूर्वेला एमआयडीसी येथे गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास उघडकीस आली. या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी आजारपणाला कंटाळून त्यांनी हे कृत्य केले असल्याची शक्‍यता पोलिसांनी वर्तविली आहे. युवराज शिरसाट (35) असे या आत्महत्या करणाऱ्या पोलिस शिपायाचे नाव आहे. एमआयडीसीतील म्हाडाच्या पोलिस वसाहतीत राहणारे शिरसाट गेल्या काही दिवसांपासून मलेरीयाच्या आजाराने त्रस्त होते. मूळचे धुळ्याचे असलेले शिरसाट दींडोशी पोलिस ठाण्यात चार वर्षांपासून कार्यरत होते. काल रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास पत्नीसोबत त्यांचा घरगुती कारणावरून किरकोळ वाद झाला. या वादाच्या काही मिनिटांनी पत्नी व दोन लहान मुली गाढ झोपेत असल्याचे पाहून शिरसाट यांनी घरातच पंख्याला लुंगीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. काही वेळाने जागे झालेल्या त्यांच्या पत्नीला लक्षात हा प्रकार येताच त्यांनी जोरात किंकाळ्या फोडायला सुरवात केली.

अफगाणिस्तानमध्ये बॉंबस्फोटात ४० ठार

Thu, 2010-06-10 13:06

कंधार - लग्नाचा स्वागत समारंभ सुरू असताना आत्मघातकी हल्लेखोराने केलेल्या बॉंबस्फोटात ४० जण ठार झाले असून तब्बल ७४ जखमी झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी आज (गुरुवार) दिली आहे. अरघान्दब जिल्ह्यातील कंधार भागात बुधवारी रात्री ही घटना घडली. बॉंबस्फोटात १२ पेक्षा जास्त जणांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती या प्रांताचे प्रवक्ते झलमी अयुब यांनी दिली. याबबात माहिती देताना अंतर्गत मंत्री म्हणाले, की लग्न समारंभ सुरू असताना बॉंबस्फोट घडवून आणला आहे. या स्फोटात ४० जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये लहान मुलांचा मोठा समावेश आहे. एकंदर ७४ जण जखमी झाले असून, त्यापैकी अनेकांची प्रकृती गंभीर आहे. त्यामुळे मृतांचा अकडा वाढण्याची शक्‍यता आहे. अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेने या बॉम्बस्फोटाची जबाबदारी स्वीकारलेली नाही.