Feed aggregator


साध्वी प्रज्ञासिंगला हवेत आयुर्वेदिक उपचार

Latest News - Mon, 2010-09-06 19:55

मुंबई -&nbsp मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यातील प्रमुख आरोपी साध्वी प्रज्ञासिंग ठाकूरला आता पोदार रुग्णालयात आयुर्वेदिक उपचार घ्यायचे आहेत. यासाठी आज विशेष मोक्का न्यायालयात साध्वीने यासंबंधी अर्ज दाखल केला. साध्वी प्रज्ञासिंगला सध्या छातीमध्ये निर्माण झालेल्या गाठींमुळे आजार झाला आहे. मागील कित्येक महिन्यांपासून ती नाशिकमधील आयुर्वेदिक रुग्णालयात उपचार घेत होती मात्र या गाठींबाबत बायोप्सी करण्यासाठी जे. जे. शासकीय रुग्णालयात उपचार घेण्यासाठी साध्वी प्रज्ञासिंगला मुंबईत आणण्यात आले आहे. आता तिचे म्हणणे आहे, की आयुर्वेदिक रुग्णालयामध्ये उपचार घेतले असल्यामुळे त्याच प्रकारचे उपचार पुन्हा सुरू करण्यासाठी वरळीतील पोदार आयुर्वेदिक रुग्णालयात दाखल करावे. न्यायालयाने याबाबत जे. जे. रुग्णालयाचा अहवाल मागितला आहे. साध्वी प्रज्ञासिंग सध्या जे.जे.मध्येच उपचार घेत आहे. यापूर्वी दोन वेळा तिच्यावर बायोप्सी करण्यात आली आहे.

तिशीच्या हमीदचे मानसिक वय पंधराच

Latest News - Mon, 2010-09-06 19:55

लंडन -&nbsp "मॅच फिक्‍सिंग' प्रकरणात सलामीचा फलंदाज यासीर हमीद याने पाकिस्तानी क्रिकेटपटूंवर आरोप केले असले तरी, एकदिवसीय सामन्यांसाठीचा कर्णधार शाहीद आफ्रिदीने त्याच्या बोलण्यावर विश्‍वास ठेवू नका, असे वक्‍तव्य केले. तो म्हणाला, 'यासीर वयाने तिशीचा असला, तरी त्याचे मानसिक वय पंधराच आहे.'' यासीरच्या व्यक्तिमत्त्वाविषयी आफ्रिदी म्हणाला, 'तो कशा पद्धतीचा माणूस आहे, हे सगळ्यांना चांगले ठाऊक आहे. त्याच्याकडून काय अपेक्षा धरायच्या आणि काय नाहीत, हे प्रत्येक जण चांगले जाणतो. तो विश्‍वास ठेवण्यासारखा आहे असे अजिबात वाटत नाही. ज्या व्यक्तीची माहिती नसतानाही, त्याच्याशी तो पाकिस्तानी क्रिकेटबद्दल बोलतो, यावरूनच तो किती भरवशाचा आहे, हे स्पष्ट होते.'' ब्रिटिश दैनिकाने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये त्याने पाकिस्तानचा प्रत्येक क्रिकेटपटू फिक्‍सर असल्याचे वक्तव्य केले आहे पण नंतर त्यानेच "आपण असे बोललोच नाही', असे सांगितले. आता तो मला दैनिकाकडून "ब्लॅकमेल' केल्याचे सांगतो. नेमके खरे काय? हे त्याचे त्यालाच माहीत.

कापसासाठी हवी 3500 रु."एमएसपी' (ऍग्रोवन)

Latest News - Mon, 2010-09-06 19:55

जळगाव - राज्यात यंदा साधारण 38 लाख हेक्‍टरपर्यंत कपाशीची लागवड झाली आहे. यंदा मजुरी, खत व इतर निविष्ठांच्या खर्चात भरमसाट वाढ झाली आहे. याचा विचार करून केंद्र सरकारने किमान आधारभूत किंमत गेल्या वर्षीपेक्षा प्रति क्‍विंटलला 500 रुपयांनी वाढवून 3500 रुपये करावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक पणन महासंघाचे अध्यक्ष डॉ. एन. पी. हिराणी यांनी "ऍग्रोवन'शी बोलताना केली. राज्यात केंद्राच्या मदतीने किमान आधारभूत किमतीद्वारे कापूस खरेदी केली जाते. केंद्रातर्फे "नाफेड'ची नोडल एजन्सी म्हणून राज्यात पणन महासंघ व भारतीय कापूस महामंडळ (सीसीआय) काम करते. पणन महासंघाने गेल्या वर्षी कपाशीसाठी किमान आधारभूत किंमत म्हणून तीन हजारांचा दर दिला होता मात्र जागतिक स्तरावर कपाशीचे घटलेले उत्पादन व वाढलेल्या मागणीमुळे दरात तेजी होती. परिणामी, व्यापाऱ्यांनी अधिकचा दर देऊन कपाशीची खेडा पद्धतीने खरेदी केली, त्यामुळे पणनला फक्त 13000 क्‍विंटल खरेदी करता आली होती. राज्यात गेल्या वर्षी 34 लाख हेक्‍टर क्षेत्रावर लागवड असताना इष्टापत्ती ठरलेल्या अवकाळी पावसामुळे 325 लाख क्‍विंटल उत्पादन झाले होते.

'एसटी' बसमध्ये बायो डिझेलचा वापर

Latest News - Mon, 2010-09-06 19:55

मुंबई -&nbsp महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने बस गाड्यांमध्ये बायो डिझेलचा वापर करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. बायो डिझेलच्या वापरामुळे प्रदूषणात 50 ते 60 टक्के घट होईल. तसेच महामंडळाची वार्षिक 15 कोटी रुपयांची बचत होईल, असा दावा महामंडळाच्या वतीने करण्यात आला आहे. कर्नाटक परिवहन सेवेच्या गाड्यांमध्ये बायो डिझेलचा वापर करण्यात येतो, त्याच धरतीवर एसटी महामंडळानेही बायो डिझेलच्या वापराचा निर्णय घेतला आहे. पुणे विभागातील दौंड एसटी आगारातील गाड्यांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर डिझेलमध्ये 20 टक्के बायो डिझेल मिसळण्यात आले. यामुळे इंधनावरील खर्चात प्रतिकिलोमीटर अंतरामागे 15 ते 20 पैशांची बचत होत असल्याचे आढळून आले. बसच्या इंजिनवरही कोणत्याही प्रकारचा परिणाम होत नसल्याचे दिसून आले. त्यामुळे एसटी बसमध्ये बायो डिझेलचा वापर करण्याचा निर्णय महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर यांनी घेतला आहे. सुरवातीला ठाणे विभागातील वाडा आगारातील सर्व गाड्यांमध्ये बायो डिझेलचा वापर करण्यात येणार आहे. त्यानंतर राज्यभरातील अन्य आगारात त्यांचा वापर सुरू होईल, असे सांगण्यात आले.

तीन अपहृत पोलिसांची अखेर बिनशर्त सुटका

Latest News - Mon, 2010-09-06 19:40

पाटणा -&nbsp बिहारमधील लखिसराय जिल्ह्यात आठवडाभरापूर्वी अपहरण करण्यात आलेल्या तीन पोलिसांची आज सकाळी माओवाद्यांनी बिनशर्त सुटका केली. या पोलिसांच्या बदल्यात माओवाद्यांनी त्यांच्या आठ साथीदारांच्या सुटकेची अट घातली होती. पोलिस फौजदार अभय यादव, रूपेश सिन्हा आणि हवालदार एहसान खान अशी सुटका झालेल्या तिघा पोलिसांची नावे आहेत. लखिसरायपासून सुमारे 20 किलोमीटरवर असलेल्या शृंगीऋषी धामजवळील सिमरातरी डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या घनदाट जंगलात नातेवाइकांच्या ताब्यात अपहृत पोलिसांना देण्यात आले. त्यांना या भागात माओवाद्यांनी आधीच बोलावले होते. पोलिसांच्या सुटकेनंतर माओवाद्यांचा प्रवक्ता अविनाश याने सांगितले, की अपहृत पोलिस जंगलात आतमध्ये होते. त्यांना डोंगराच्या पायथ्याशी आणण्यासाठी वेळ लागला. आठ दिवसांपूर्वी लखिसराय जिल्ह्यात माओवादीविरोधी कारवाई करण्यासाठी पोलिस गेले होते. या वेळी झालेल्या चकमकीत सात पोलिस ठार झाले होते तर चार पोलिसांचे माओवाद्यांनी अपहरण केले होते. यापैकी एक पोलिस हवालदार लुकास टेटे यांची माओवाद्यांनी नंतर हत्या केली. यानंतर राज्य सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलावली.

जहाजविरोधी क्षेपणास्त्र चीनकडून लवकरच तैनात

Latest News - Mon, 2010-09-06 19:40

बीजिंग -&nbsp चीनने बनविलेले महत्त्वाकांक्षी जहाजविरोधी क्षेपणास्त्र लवकरच तैनात केले जाण्याची शक्‍यता आहे. प्रशांत महासागरातील अमेरिकी नौदलाच्या प्रभावास रोखण्याचा हेतू यामागे आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या क्षेपणास्त्रांचा पल्ला तब्बल वीस हजार किलोमीटरचा आहे. मागील आठवड्यातच अमेरिकेचे प्रशांत क्षेत्राचे नौदल कमांडर ऍडमिरल रॉबर्ट विल्लार्ड यांनी जहाजविरोधी क्षेपणास्त्र लवकरच चीन तैनात करेल, असे सूचित केले होते. त्यापाठोपाठ चिनी सरकारचे मुखपत्र असलेले "ग्लोबल टाइम्स'ने तैनातीचे वृत्त दिले आहे. ""चीनच्या क्षमतेवर अविश्‍वास दाखविणाऱ्यांना ताकद दाखविणे गरजेचेच आहे,'' अशी टिप्पणीही या वृत्तात आहे. अमेरिकी संरक्षण तज्ज्ञांच्या मते, हे क्षेपणास्त्र "डोंगफेंग 21' या चिनी क्षेपणास्त्राची नवी आवृत्ती आहे. अमेरिकी लढाऊ जहाजांचे संरक्षण भेदण्याची क्षमता या क्षेपणास्त्रात असेल. वीस हजार किलोमीटरच्या पल्ल्यामुळे चिनी सागरी हद्दीच्या पलीकडीलही लक्ष्यभेद करता येणार आहे. एवढेच नव्हे तर वादग्रस्त ठरलेला संपूर्ण दक्षिण चीन समुद्र टप्प्यात येणार आहे.

बिहारमध्ये विधानसभा निवडणुका सहा टप्प्यांत

Latest News - Mon, 2010-09-06 19:40

नवी दिल्ली -&nbsp बिहारमध्ये 21 ऑक्‍टोबर ते 20 नोव्हेंबर या काळात सहा टप्प्यांत विधानसभा निवडणुका होणार असल्याची घोषणा निवडणूक आयोगाकडून आज करण्यात आली. मतमोजणी 24 नोव्हेंबरला होऊन निकाल जाहीर केले जातील. याबरोबरच बांका लोकसभा जागेसाठी पोटनिवडणूकही होणार आहे. निवडणूक खर्च आणि पैसे घेऊन छापलेल्या बातम्या (पेड न्यूज) यांसारखे गैरप्रकार रोखण्यासाठीही निवडणूक आयोगाने कंबर कसल्याचे मुख्य निवडणूक आयुक्त एस. वाय. कुरेशी यांनी स्पष्ट केले. निवडणूक आचारसंहिता त्वरित लागू झाली आहे. बिहार विधानसभेच्या 243 जागांसाठी व बांका लोकसभा पोटनिवडणूक यांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले. दिग्विजयसिंह यांच्या निधनामुळे बांका लोकसभेची जागा रिक्त झाली आहे. विधानसभेची निवडणूक सहा टप्प्यांत होणार आहे. त्याच्या तारखा (कंसात मतदारसंघांची संख्या) पुढीलप्रमाणे : 1) 21 ऑक्‍टोबर (47), 2) 24 ऑक्‍टोबर (45), 3) 28 ऑक्‍टोबर (48), 4) 1 नोव्हेंबर (42), 5) 9 नोव्हेंबर (35) आणि 6) 20 नोव्हेंबर (26).

'अक्षरधाम' हल्लेखारांच्या शिक्षेला स्थगिती

Latest News - Mon, 2010-09-06 19:40

नवी दिल्ली -&nbsp गुजरातमधील अक्षरधाम मंदिरावर 2002मध्ये हल्ला केल्याप्रकरणी दोघा दहशतवाद्यांना उच्च न्यायालयाने सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेला सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली. आदनभाई सुलेमान आणि अब्दुल कय्यूम मुफ्ती या दोघा दहशतवाद्यांना अक्षरधाम मंदिरावरील हल्ल्याप्रकरणी विशेष "पोटा' न्यायालयाने 2006मध्ये दोषी ठरविले होते आणि त्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. उच्च न्यायालयानेही या वर्षी जूनमध्ये ही शिक्षा कायम ठेवली होती. दोघा दहशतवाद्यांनी फाशीच्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. सुलेमान व मुफ्ती यांच्या अर्जावर सुनावणीच्या वेळी न्या. बी. सुदर्शन रेड्डी यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने या प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभाग आणि गुजरात सरकारला नोटिसा बजावल्या असून, उच्च न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती दिली आहे. अहमदाबादमधील अक्षरधाम मंदिरावर 24 सप्टेंबर 2002 रोजी लष्करे तैयबाच्या दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. त्यात 37 जणांचे प्राण गेले होते.

नेहरूंच्या मंत्रिमंडळाशी तुलना हास्यास्पद

Latest News - Mon, 2010-09-06 19:40

नवी दिल्ली -&nbsp पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी आपल्या मंत्रिमंडळाची तुलना पंडित नेहरूंच्या मंत्रिमंडळाशी करणे हास्यास्पद आहे. पंतप्रधानांचे त्यांच्या सहकारी नेत्यांनी व मंत्र्यांनी ऐकले तरी झाले, अशा शब्दांत भाजपने आज टीका केली. त्यानंतर काही तासांत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी पंतप्रधानांना दिलेल्या निवेदनात "विलक्षण अशांत व स्फोटक काश्‍मिरात सुरक्षा दलांचे अधिकार कमी करू नयेत,' असे बजावले. दरम्यान, सर्व गरिबांना मोफत धान्य देणे शक्‍य नाही, असे पंतप्रधानांचे वक्तव्य म्हणजे न्यायसंस्थेचा अवमान करणारे आहे. गोदामांमध्ये गहू सडला तरी चालेल. पण तो गरिबांना वाटणार नाही, हीच या सरकारची कार्यपद्धती आहे, अशी टीका भाजपने केली आहे. पक्षाचे मुख्य प्रवक्ते रविशंकर प्रसाद म्हणाले, की डॉ. सिंग यांनी आपल्या मंत्रिमंडळाची तुलना जगातील कोणाशी करावी, हा त्यांचा प्रश्‍न आहे. त्यांना पंतप्रधानपदी किती काळ ठेवायचे, याचा निर्णय कॉंग्रेस नेतृत्वाचा आहे. मंत्रिमंडळातील चिदंबरम किंवा कपिल सिब्बल आदी मंत्र्यांवर दिग्विजयसिंह व केशव राव यांच्यासारखे कॉंग्रेसचेच नेते टीका करतात, याचे विस्मरण डॉ. सिंग यांना झालेले दिसते. डॉ.

तेरेसा यांच्या सन्मानार्थ अमेरिकेत टपाल तिकीट

Latest News - Mon, 2010-09-06 19:40

वॉशिंग्टन -&nbsp मानवतेचा वसा घेऊन पाच दशके समाजसेवा करणाऱ्या मदर तेरेसा यांच्या सन्मानार्थ अमेरिकेने त्यांच्यावर टपाल तिकीट काढले आहे. बासिलका येथे रविवारी या तिकिटाचे प्रकाशन करण्यात आले. मदर तेरेसा यांच्या जन्मशताब्दीनिमित्त भारताने त्यांच्यावर नुकतेच पाच रुपयांचे नाणे काढले आहे. अमेरिकेनेही मदर तेरेसा यांच्या समाजसेवेच्या गौरवार्थ टपाल तिकीट काढले असून त्याची किंमत 44 सेंट आहे. यूएस पोस्टल सर्व्हिसच्या वतीने काढण्यात आलेल्या टपाल तिकिटावर प्रसिद्ध चित्रकार थॉमस ब्लॅकशेयर, दुसरे यांनी रेखाटलेले तेरेसा यांचे चित्र आहे. प्रकाशन सोहळ्यास ब्लॅकशेयरही उपस्थित होते. या प्रसंगी पोस्टमास्तर जनरल जॉन पॉटर म्हणाले की, साधारणतः तिकिटांना देशाचे "कॉलिंग कार्ड' मानले जाते. कारण ते स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय लोकांपर्यंत पोचत असते. 1996 साली तेरेसा यांना अमेरिकेचे सन्माननीय नागरिकत्व बहाल केल्यानंतर आज त्यांच्यावर टपाल तिकीट काढणे ही आपल्यासाठी अभिमानास्पद बाब होय.

शिक्षण हक्क कायदा घटनात्मक वादात

Latest News - Mon, 2010-09-06 19:40

नवी दिल्ली -&nbsp सहा ते 14 वयोगटातील मुलांना शिक्षणाचा मूलभूत हक्क पुरविणाऱ्या नव्या कायद्याची घटनात्मक वैधता तपासण्यासाठी पाच न्यायाधीशांचे पीठ नेमण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने आज घेतला. शिक्षण हक्क कायद्याच्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणाऱ्या काही याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाल्या आहेत. घटनेच्या कमल 19 (1) (जी) नुसार खासगी संस्थांना सरकारी हस्तक्षेपाविना संस्था चालविण्याचे स्वातंत्र्य देण्यात आले आहे. नव्या कायद्यामुळे या स्वातंत्र्यावर गदा येत असल्याचा आक्षेप या याचिकांमध्ये घेण्यात आला होता. त्यांवरील सुनावणीदरम्यान न्यायालयाने आज हा निर्णय घेतला. राज्यघटनेत बदल करून हा कायदा अमलात आणण्यात आल्यामुळे, त्याची कायदेशीर वैधता ठरविण्यासाठी हा विषय अधिक सदस्यांच्या पीठाकडे सोपविण्यात येईल, असे सरन्यायाधीश एस. एच. कापडिया, न्या. के. एस. राधाकृष्णन आणि स्वतंत्रकुमार यांनी स्पष्ट केले. नव्या शिक्षण हक्क कायद्यानुसार, 6 ते 15 वयोगटातील मुलांना शिक्षणाचा मूलभूत हक्क देण्यात आला आहे. खासगी शिक्षण संस्थांनीही गरीब कुटुंबांतील मुलांसाठी 25 टक्के जागा राखीव ठेवाव्यात, अशी तरतूद या कायद्यात आहे.

गैरव्यवहार प्रकरणी लालूप्रसाद न्यायालयात हजर

Latest News - Mon, 2010-09-06 19:40

पाटणा -&nbsp कोट्यवधी रुपयांच्या पशुखाद्य गैरव्यवहारप्रकरणी राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री जगन्नाथ मिश्र सोमवारी विशेष "सीबीआय' न्यायालयात हजर राहिले. बांका आणि भागलपूर येथील कोषागारातून 1990 ते 1997 या कालावधीत सुमारे 46 लाख रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा ठपका या दोघांसह आणखी काही अधिकाऱ्यांवर ठेवण्यात आला आहे. त्याची सुनावणी न्या. विमलकुमार जैन यांच्यापुढे सुरू आहे. गेल्या महिन्यात 18 ऑगस्ट रोजी झालेल्या सुनावणीच्या वेळी सर्व आरोपींनी पुढील सुनावणीच्या वेळी न्यायालयात उपस्थित राहण्याचे आदेश न्या. जैन यांनी दिले होते. त्यानुसार या दोघा नेत्यांसह संयुक्त जनता दलाचे खासदार जगदीश शर्मा, राष्ट्रीय जनता दलाचे माजी खासदार आर. के. राणा, माजी मंत्री विद्यासागर निषाद आणि काही निवृत्त "आयएएस' अधिकारी आज न्यायालयात उपस्थित होते. आपल्यावरील आरोप रद्द करण्यासाठी या सर्वांनी न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. आता त्यांच्या अर्जावर सुनावणी होणार आहे.

गरिबांना मोफत धान्य देणे अशक्‍य - पंतप्रधान

Latest News - Mon, 2010-09-06 19:03

नवी दिल्ली -&nbsp 'सर्वोच्च न्यायालयाने धोरणात्मक बाबींमध्ये लक्ष घालू नये. सरकार आणि संसद सदस्य त्याबाबत निर्णय घेतील,' असे स्पष्ट मत पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी आज व्यक्त केले. "धान्य सडण्यापेक्षा ते गरिबांना मोफत वाटा,' असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला होता, त्यावर पंतप्रधानांनी आज ही प्रतिक्रिया दिली. पंतप्रधानांनी आज त्यांच्या निवासस्थानी वरिष्ठ संपादकांशी संवाद साधला. त्या वेळी ते म्हणाले, 'सर्व गरिबांना धान्य मोफत पुरवणे सरकारला शक्‍य नाही. देशातील 37 टक्के जनता दारिद्य्ररेषेखाली आहे. त्या सर्वांना मोफत धान्य पुरविणे कसे काय शक्‍य होईल?'' 'दारिद्य्ररेषेखालील लोकांना सवलतीच्या दरात धान्य पुरविले गेले पाहिजे, याची मला जाणीव आहे. सन 2004 पासून आम्ही या लोकांसाठी धान्याच्या किमान आधारभूत किमतीत कोणतीही वाढ होऊ दिलेली नाही,'' असेही पंतप्रधानांनी स्पष्ट केले. "सर्वोच्च न्यायालयाचा अंतिम आदेश आपण वाचलेला नाही. मात्र देशात धान्य सडत असताना लोकांच्या गरजांकडे लक्ष दिले पाहिजे, ही न्यायालयाची भावना आपण जाणतो,' असेही डॉ. मनमोहनसिंग म्हणाले.

नगरजवळ जातीय दंगलीत ११ जण जखमी

Latest News - Mon, 2010-09-06 16:29

राशीन (नगर) -&nbsp सरपंच निवडीस विरोध केल्याच्या कारणावरून जातिवाचक शिवीगाळ करीत, बाभूळगाव दुमाला येथील दलित समाजाच्या&nbsp १० ते ११ जणांवर बाजार समितीचे संचालक बिभीषण गायकवाड व इतर साठ जणांच्या टोळक्‍याने शस्त्रांसह प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात जखमी झालेले अक्षरशः रक्तबंबाळ झाले. यामध्ये काही जणांचे हात-पाय मोडले. डोक्‍यात घाव बसल्याने तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. दहा जणांना उपचारासाठी नगरला हलविण्यात आले आहे. या घटनेमध्ये जखमी झालेल्यांची नावे अशी ः बाळासाहेब चव्हाण, प्रशांत चव्हाण, अनिल चव्हाण, दीपक कांबळे, रमेश चव्हाण, शरद खराडे, आबासाहेब खराडे, वाळू चव्हाण. राशीन पोलिसांत बिभीषण गायकवाड यांच्यासह साठ जणांवर अनुसूचित जाती-जमाती प्रतिबंधक कायद्यांन्वये, तसेच विनयभंग, खुनाचा प्रयत्न, बेकायदेशीर जमाव जमवून दंगल घडविणे, घरात घुसून प्राणघातक शस्त्रांसह हल्ला करणे, असे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याबाबतच्या फिर्यादीत म्हटले आहे, की बिभीषण गायकवाड व इतर साठ जणांनी, "आमचा सरपंच झाला नाही, यांना गावात राहू द्यायचे नाही. यांना मारा, आपल्याला आमदार प्रा.

परदेशी हातातून साकारली गणेशमूर्ती (फोटो फिचर)

Latest News - Mon, 2010-09-06 16:12

पुणे - शाडूच्या गोळे पाहता पाहता आकार घेत होते. आधी बैठक. त्यानंतर "तुंदील तनू' आणि मग "वक्रतुंड'. मूर्ती आकार घेत असतानाच "त्या' चेहऱ्यांवरही हसू उमटत होते. अवघ्या दोन तासांत छान, सुबकशी बैठी गणेशमूर्ती साकारली गेली आणि एकेक "ग्रुप' आनंदाने खिदळायला लागला. आज (सोमवार) हा सारा माहौल होता गोखले नगरातील एका लहानशा सभागृहात आणि "मूर्तीकार' होते सॅम...मेगन...मॅथी...जस्टीन...आणि असे एकूण २६ अमेरिकन विद्यार्थी-विद्यार्थीनी ! वैज्ञानिक विचारसरणी व कौशल्यवृद्धीसाठी स्थापन झालेल्या "शास्त्रवाहिनी' संस्थेतर्फे हा उपक्रम घेण्यात आला. असोसिएटेड कॉलेजेस्‌ ऑफ मीडवेस्टच्या कल्चर, ट्रॅडिशन्स्‌ अँड ग्लोबलायजेशन्‌च्या उपक्रमांतून पुण्यात सहा महिन्यांसाठी आलेल्या विद्यार्थी-विद्यार्थिनींनी हौसेने यामध्ये भाग घेतला. इंडॉलॉजीचा अभ्यास आणि "यूथ एक्‍स्चेंज'च्या मार्फत हे विद्यार्थी-विद्यार्थिनी पुण्यात शिकत आहेत. मूर्ती बनविण्यापूर्वी या विद्यार्थी गटाला श्री गणेशाचे महत्व आणि त्याचे भारतीय संस्कृतीतील स्थान समजावून सांगण्यात आले. त्यानंतर प्रत्यक्ष मूर्ती बनवून दाखविण्यात आली.

काश्‍मीरमधील गोळीबाराच्या चौकशीचे आदेश

Latest News - Mon, 2010-09-06 15:48

श्रीनगर - उत्तर काश्‍मीरमधील पलहालन येथे आज (ता.6) दुपारी करण्यात आलेल्या पोलिस गोळीबाराच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. या गोळीबारात एक जण ठार तर तीन जण जखमी झाले आहेत. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली असून त्याच्या चौकशीला सुरवात केली असल्याचे पोलिस खात्याच्या प्रवक्‍त्याने सांगितले. पोलिस गोळीबाराची जबाबदारी निश्‍चित करण्यासाठी पोलिस कर्मचाऱ्यांकडील दारूगोळ्याची तपासणी करण्यात येणार आहे. त्यात जे दोषी आढळतील त्यांच्याविरोधात कठोर कारवाई करण्यात येणार आहे. आंदोलकांनी आज दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास पलहालन, पट्टण आणि सिंगपोरा येथे श्रीनगर - बारामुल्ला राष्ट्रीय महामार्ग बंद केला आणि वाहनांवर दगडफेक केली. या वेळी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात काही आंदोलक जखमी झाले. त्यापैकी फिरोज अहमद मलिक हा पलहालन येथील रहिवासी मरण पावला तर अन्य तीन जण जखमी झाले. काश्‍मीर खोऱ्यात पांपोर, भोरी कडाल आणि बटामालू येथे दगडफेकीच्या घटना घडल्याचे पोलिस प्रवक्‍त्याने सांगितले. &nbsp Follow Us on Twitter &nbsp &nbsp

सामाजिक कार्यकर्त्या सुनीती सु.र यांना मारहाण

Latest News - Mon, 2010-09-06 15:39

पुणे - लवासा प्रकल्पाच्या विरोधात निदर्शने करताना सामाजिक कार्यकर्त्या सुनीती सु.र. यांना आज (ता.6) मारहाण करण्यात आल्याची तक्रार पौड पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. लवासा प्रकल्पाच्या समर्थकांनी संध्याकाळी आपल्याला मारहाण आणि शिवीगाळ केल्याची तक्रार सुनीती सु.र. यांनी केली असून या प्रकरणी गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

श्रीकांतने सुरू केली "करियर' वेबसाईट

Latest News - Mon, 2010-09-06 14:20

चेन्नई - एकेकाळी क्रिकेटचे मैदान गाजवणारा कृष्णम्माचारी श्रीकांत आता "ई-लर्निंग'च्या क्षेत्रात उतरला आहे. तरूणांचे जीवन यशस्वी व्हावे यासाठी त्यांना मार्गदर्शन करण्याचा त्याचा हेतू आहे. "करियरस्ट्रोक्‍स डॉट कॉम' ही&nbsp इंटरऍक्‍टिव्ह वेबसाईट आज लॉंच करण्यात आली असून त्याद्वारे आता 18 ते 27 वयोगटातील तरूणांना मार्गदर्शन करणार असून त्यासाठी साधन म्हणून त्याने क्रिकेटचाच आधार घेतला आहे. "पदवीचे तसेच पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या तसेच तरूण व्यावसायिकांना त्यांच्या करियरमध्ये यशस्वी होण्यासाठी प्रेरणा देण्याबरोबरच त्याबाबत जागरूकता वाढवण्यासाठी आणि कौशल्य शिकवण्यासाठी हे ई-लर्निंग पोर्टल सुरू करण्यात आले आहे,'' असे तो म्हणाला. यशस्वी होण्यासाठी आवश्‍यक असलेली कौशल्ये शिकवण्यासाठी 12 मोड्यूल्सचा 90 दिवसांचा प्रशिक्षण कार्यक्रम तयार करण्यात आला असून त्यासाठी 990 रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे.

गोदावरीच्या पाणी पातळीत वाढ (फोटो फिचर)

Latest News - Mon, 2010-09-06 14:14

नाशिक - श्रावणमासातील चवथ्या श्रावण सोमवारी गोदावरी नदीपात्रात गंगापुर धरणातील पाणी सोडल्याने रामकुंड परिसरात भाविकांनी स्नानासाठी भाऊ गर्दी केली होती. गेल्या दोन वर्षामध्ये पहिल्यांदा गोदावरीच्या पाणी पात्रात वाढ झाली आहे. या वर्षी महाराष्ट्रातील बहुतेक भागात पुराने थैमान घातले आहे. परंतु गेल्या काही दिवसापासुन सरू असलेल्या संततधार पावसामुळे गंगापूर धरणाच्या पात्रात वाढ होत हे धरण 97 टक्के भरले होते. त्यामुळे धरणातील 500 क्‍युसेक पाणी गोदापात्रात सोडण्यात आले. श्रावण मासाच्या चवथ्या सोमवारी गोदावरीत पाणी सोडल्याने रामकुंड परिसरात भाविकांनी स्नानासाठी एकच गर्दी केली होती. त्याचबरोबर सोमेश्‍वर मंदिर, नवश्‍या गणपती, धबधबा आदी ठिकाणी भाविकांनी तसेच पर्यटकांनी देखील यावेळी गर्दी केली होती. यावेळी मनपा कर्मचाऱ्यांनी सावधगिरी बाळगत नागरिकांना सावधानतेचा इशारा दिला. यशवंतराव महाराज पटांगणाचा जलमय परिसर (छायाचित्रे - सोमनाथ कोकरे) -------------------------------------------------------------------------- जलमय झालेला रामकुंड व गांधी तलाव परिसर.

बिहारमध्ये विधानसभेसाठी सहा टप्प्यांत मतदान

Latest News - Mon, 2010-09-06 14:09

नवी दिल्ली - बिहार विधानसभेच्या २४३ जागांसाठी सहा टप्प्यांत मतदान घेण्यात येणार असल्याची माहिती मुख्य निवडणूक आयुक्त एस. वाय. कुरेशी यांनी सोमवारी येथे पत्रकार परिषदेत दिली. २१, २४, २८ ऑक्‍टोबर आणि १, ९, २० नोव्हेंबरमध्ये मतदान होणार आहे. मतमोजणी २४ नोव्हेंबरला होणार आहे. बिहारमधील साडे पाच कोटी मतदार या निवडणुकीसाठी मतदानाचा हक्क बजावणार आहेत. राज्यातील एकूण ५६ हजार ९४३ मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. लोकसभेच्या बांका मतदारसंघाची पोटनिवडणूक एक नोव्हेंबरला होणार आहे.