Feed aggregator
आरोपींसोबत पोलिसांची इफ्तार पार्टी
Latest News - Mon, 2010-09-06 14:06
नगर- जातीय सलोखा कार्यक्रमाचा एक भाग म्हणून नगरच्या झेंडीगेट भागात पोलिसांनी आयोजित केलेली इफ्तार पार्टी पोलिसांसाठी चांगलीच अडचणीची ठरली. पोलिस अधीक्षक कृष्ण प्रकाश यांना आरोपींसमवेत बसण्याची वेळ आल्याने ते संतप्त झाले. या उपक्रमाचे आयोजन करणाऱ्या पोलिस निरीक्षकांना शिस्तभंगाची नोटीस काढण्याचे आदेशही त्यांनी दिले मात्र काही वेळात विचार बदलल्याने केवळ तोंडी समज देण्यावर प्रकरण मिटले. शहर पोलिसांनी रविवारी सायंकाळी झेंडीगेट भागात इफ्तार पार्टीचे आयोजन केले होते. त्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून पोलिस अधीक्षक कृष्ण प्रकाश यांना बोलाविण्यात आले होते. त्या भागातील नागरिक आणि पत्रकारांनाही निमंत्रणे गेली. कार्यक्रम सुरू होण्याच्या काही वेळ आधी पोलिस अधीक्षकांना माहिती मिळाली, की कार्यक्रम आयोजित करणारे गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत. त्यांच्याविरुद्ध खून, खंडणी, अपहरण, मारामाऱ्या, पोलिसांवर हल्ला करणे, असे कित्येक गुन्हे दाखल आहेत. ऐन वेळी कार्यक्रम रद्द करणेही शक्य नव्हते.
श्रीसिद्धिविनायकाची कथा
BALSANSKAR.com - Mon, 2010-09-06 13:57
फार प्राचीन काळी, एकदा ब्रह्मदेवाला वाटले, आपण सृष्टीरचना करावी. यासाठी त्याने गणेशाच्या आज्ञेनुसार तपश्चर्या सुरु केली. गणेशाने त्याला एकाक्षरमंत्राचा जप दिला होता.
माओवादी पोहोचले केरळमध्ये
Latest News - Mon, 2010-09-06 13:20
कोल्लम - केरळमधील वेन्याद जिल्ह्यामध्ये माओवाद्यांनी त्यांच्या कारवाया केंद्रीत केल्या असल्याची माहिती गुप्तचर विभागाला मिळाली असल्याचे केंद्रीय गृहसचिव जी.के. पिल्लई यांनी आज (ता.6) सांगितले. निंदकारा सागरी किनारा पोलिस स्थानकाला भेट दिल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. "वेन्याद जिल्ह्याच्या काही भागात माओवादी कारवाय केंद्रीभूत झाल्याची माहिती गुप्तचर संस्थांना मिळाली असून त्या निपटून काढण्यासाठी पोलिस आवश्यकत्या उपाययोजना करत आहेत. सध्यातरी या भागात माओवादी कारवायांचा धोका नसला सावधानता बाळगणे गरजेचे आहे,'' असे ते म्हणाले. बिहारमध्ये माओवाद्यांविरूद्ध उघडण्यात आलेली मोहिम सुरूच ठेवण्यात येणार असल्याचे पिल्लई यांनी स्पष्ट केले. Follow Us on Twitter  
तिशीच्या हमीदचे मानसिक वय पंधराच - आफ्रिदी
Sports News - Mon, 2010-09-06 13:01
लंडन -  "मॅच फिक्सिंग' प्रकरणात सलामीचा फलंदाज यासीर हमीद याने पाकिस्तानी क्रिकेटपटूंवर आरोप केले असले, तरी एकदिवसीय सामन्यांसाठीचा कर्णधार शाहीद आफ्रिदीने त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नका असे वक्तव्य केले. तो म्हणाला,""यासीर वयाने तिशीचा असला, तरी त्याचे मानसिक वय पंधराच आहे.'' यासीरच्या व्यक्तिमत्वाविषयी आफ्रिदी म्हणाला,""तो कशा पद्धतीचा माणूस आहे, हे सगळ्यांना चांगले ठाऊक आहे. त्याच्याकडून काय अपेक्षा धरायच्या आणि काय नाहीत हे प्रत्येक जण चांगले जाणतो. तो विश्वास ठेवण्यासारखा आहे असे अजिबात वाटत नाही. ज्या व्यक्तीची माहिती नसतानाही, त्याच्याशी तो पाकिस्तानी क्रिकेटबद्दल बोलतो यावरूनच तो किती भरवशाचा आहे स्पष्ट होते.'' ब्रिटिश दैनिकाने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये त्याने पाकिस्तानचा प्रत्येक क्रिकेटपटू फिक्सर असल्याचे वक्तव्य केले आहे. पण, नंतर त्यानेच आपण असे बोललेलोच नाही असे सांगितले. आता तो मला दैनिकाकडून "ब्लॅकमेल' केल्याचे सांगतो. नेमके खरे काय ? हे त्याचे त्यालाच माहीत. अर्थात, तो कुणाबरोबर बसला होता आणि कुठल्या परिस्थितीत त्याने हे वक्तव्य केले हे माहीत नाही, असेही आफ्रिदी म्हणाला.
तिशीच्या हमीदचे मानसिक वय पंधराच - आफ्रिदी
Latest News - Mon, 2010-09-06 13:01
लंडन -  "मॅच फिक्सिंग' प्रकरणात सलामीचा फलंदाज यासीर हमीद याने पाकिस्तानी क्रिकेटपटूंवर आरोप केले असले, तरी एकदिवसीय सामन्यांसाठीचा कर्णधार शाहीद आफ्रिदीने त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नका असे वक्तव्य केले. तो म्हणाला,""यासीर वयाने तिशीचा असला, तरी त्याचे मानसिक वय पंधराच आहे.'' यासीरच्या व्यक्तिमत्वाविषयी आफ्रिदी म्हणाला,""तो कशा पद्धतीचा माणूस आहे, हे सगळ्यांना चांगले ठाऊक आहे. त्याच्याकडून काय अपेक्षा धरायच्या आणि काय नाहीत हे प्रत्येक जण चांगले जाणतो. तो विश्वास ठेवण्यासारखा आहे असे अजिबात वाटत नाही. ज्या व्यक्तीची माहिती नसतानाही, त्याच्याशी तो पाकिस्तानी क्रिकेटबद्दल बोलतो यावरूनच तो किती भरवशाचा आहे स्पष्ट होते.'' ब्रिटिश दैनिकाने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये त्याने पाकिस्तानचा प्रत्येक क्रिकेटपटू फिक्सर असल्याचे वक्तव्य केले आहे. पण, नंतर त्यानेच आपण असे बोललेलोच नाही असे सांगितले. आता तो मला दैनिकाकडून "ब्लॅकमेल' केल्याचे सांगतो. नेमके खरे काय ? हे त्याचे त्यालाच माहीत. अर्थात, तो कुणाबरोबर बसला होता आणि कुठल्या परिस्थितीत त्याने हे वक्तव्य केले हे माहीत नाही, असेही आफ्रिदी म्हणाला.
ब्रिटनच्या संसद सदस्याची पत्नी वेश्याव्यवसायात
Latest News - Mon, 2010-09-06 12:49
लंडन - ब्रिटनमधील संसदेचे सदस्य माईक वेदर्ले यांची पत्नी वेश्याव्यवसाय करीत असल्याचे वृत्त येथील "संडे मिरर' या वृत्तपत्राने दिल्यामुळे खळबळ उडाली. या गौप्यस्फोटामुळे आपल्याला मोठा धक्का बसल्याची प्रतिक्रिया वेदर्ले यांनी व्यक्त केली. वेदर्ले यांची ३९ वर्षीय पत्नी कार्ला ही मूळची ब्राझीलमधील आहे. दहा वर्षांपूर्वी रिओ दी जानेरोच्या दौऱ्यावर असताना वेदर्ले यांची कार्लाशी ओळख झाली. त्यावेळी कार्ला तिथे वेश्या व्यवसाय करीत होती, अशी माहिती सूत्रांनी दिल्याचे या वृत्तपत्राने म्हटले आहे. त्यावेळी वेदर्ले यांना याची माहिती होती का, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. सन २००३ मध्ये विवाह केल्यानंतर वेदर्ले यांनी कार्लाला ब्रिटनमध्ये आणले. या दोघांच्या विवाहाच्या प्रमाणपत्रावर कार्ला गृहिणी असल्याचे नमूद केलेले आहे. गेल्या फेब्रुवारीमध्ये वेदर्ले निवडणुकीच्या प्रचारामध्ये गुंतल्यानंतर कार्लाने परत वेश्याव्यवसाय करण्यास सुरवात केल्याची माहिती वृत्तपत्राने दिली आहे. दरम्यान, निवडणुकीत वेदर्ले यांच्यासाठी प्रचार करणारे ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून हे या गौप्यस्फोटामुळे अडचणीत येण्याची शक्यता आहे.
अणुशास्त्रज्ञ होमी एन. सेठना यांचे निधन
Latest News - Mon, 2010-09-06 12:33
मुंबई - देशाने केलेल्या पहिल्या अणुचाचणीचे मार्गदर्शक आणि अणुउर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष होमी नसरवानजी सेठना यांचे काल रात्री सव्वा अकरा वाजण्याच्या सुमारास मलबार हिल येथील निवासस्थानी दीर्घ आजाराने निधन झाले. ते 86 वर्षांचे होते. सेठना यांच्या मागे एक मुलगा आणि कन्या आहे. डुंगरवाडी येथील अग्यारीत उद्या त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. रसायनशास्त्रातील अभियंता आणि अणुशास्त्रज्ञ असलेल्या सेठना यांच्यावर 1959साली ट्रॉंबे येथे प्लुटोनिअम आधारित पहिली अणुभट्टी उभारण्याची जबाबदारी सोपविण्यात आली होती. तातडीने निर्णय घेणारे आणि अत्यंत कार्यक्षम अभियंता अशी त्यांची ओळख होती. राजस्थानातील पोखरण येथे 18 मे 1974 रोजी देशाने केलेल्या पहिल्या शांततापूर्ण अणुस्फोटासाठी त्यांनीच मार्गदर्शन केले होते. "स्माईलिंग बुद्धा' या नावाने ही मोहिम राबवण्यात आली होती. त्यानंतर 1967मध्ये सेठना यांच्या मार्गदर्शनाखालीच बिहारमधील जदूगुडा येथे युरेनियम आधारित अणुभट्टी उभारण्यात आली. याशिवाय 1956ते 58 या कालावधीत कॅनडाच्या सहकार्याने उभारण्यात आलेल्या 40 मेगावॉट क्षमतेच्या अणुभट्टीचे (सीरस) ते प्रकल्प व्यवस्थापक होते.
शासकीय कर्मचारी उद्या संपावर
Latest News - Mon, 2010-09-06 12:17
मुंबई - वाढती महागाई आणि शासनाच्या कामगारविरोधी धोरणाविरुद्ध शासकीय कर्मचारी संघटनांनी उद्या (मंगळवारी) देशव्यापी संप पुकारला आहे. संपामध्ये सर्व सरकारी कर्मचारी सहभागी होणार आहेत.  वाढती महागाई कमी करावी, २४ महिन्यांच्या महागाई भत्त्याची थकबाकी मिळावी, रिक्त पदे त्वरित भरावीत, निवृत्तीचे वय ६० करावे, पाच दिवसांचा आठवडा करावा, बोनस द्यावा अशा एकूण २७ मागण्यांसाठी कर्मचारी संघटनांनी हा संप पुकारला आहे.  संप यशस्वितेसाठी पाटबंधारे सार्वजनिक बांधकाम कर्मचारी संघटना, महसूल कर्मचारी संघटना, विक्रीकर कर्मचारी संघटना, आयटीआय निर्देशक संघटना, वनविभाग कर्मचारी, आरोग्य विभाग वर्ग तीन व चार, पशुसंवर्धन, आरटीओ कर्मचारी, सहकारी विभाग, शासकीय तंत्रनिकेतन, वाहनचालक, भूमिअभिलेख, शिक्षण विभाग, यांत्रिक कर्मचारी, धर्मादाय आयुक्त कार्यालय, राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना यांनी कंबर कसली आहे. अखिल भारतीय माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियननेही या संपात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे.  मुंबई, ठाणे, पुणे, रायगड या जिल्ह्यात संपाचा मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.
ठाणे झाले खड्डेमय (फोटो फिचर)
Latest News - Mon, 2010-09-06 12:13
जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर खड्डे --------------------------------------------------------------- बी केबीन कडील खड्डा --------------------------------------------------------------- कॅसर मिल कडील खड्डे --------------------------------------------------------------- जांभळी नाका येथील चिंतामणी चौकाकडील खड्डे --------------------------------------------------------------- महापालिकेजवळील प्रशांत कॉनर्र समोरील खड्डे --------------------------------------------------------------- नौपाडा रस्त्यांवर खड्डे --------------------------------------------------------------- टेंभी नाक्यावरील खड्डे --------------------------------------------------------------- चरई परिसरातील खड्डे ---------------------------------------------------------------   Follow Us on Twitter
ईद, गणेशोत्सवादरम्यान घातपाताची शक्यता
Latest News - Mon, 2010-09-06 11:39
मुंबई - ऐन सणासुदीच्या म्हणजेच गणेशोत्सव आणि ईदच्या काळात महाराष्ट्रात घातपात घडविण्याचा कट लष्कर- ए- तोयबा या दहशतवादी संघटनेने यांनी रचला आहे. पुण्या- मुंबईसारखी शहरे या संघटनेची लक्ष्ये असल्याची माहिती गुप्तचर संघटनेने महाराष्ट्र पोलिसांना दिली आहे. त्याबाबतचा अहवालही गुप्तचर संघटनेने दिला आहे. या अहवालामुळे राज्य शासनाचे धाबे दणाणले असून, महाराष्ट्र पोलिसांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिस खात्याकडून योग्य ती खबरदारी घेतली जात असल्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी सांगितले. दहशतवादी कारवायांसाठी कार बॉंब, बाईक बॉंबचा वापर होऊ शकतो, असे अहवालात सूचित करण्यात आले आहे. रिमोट कंट्रोलच्या साह्याने हे बॉम्बस्फोट घडवून आणले जाऊ शकतात, असेही त्यात म्हटले आहे.
दीड लाख रूपये प्रति चौ.फूट @ बोरिवली
Latest News - Mon, 2010-09-06 11:30
मुंबई - बोरिवलीच्या पश्चिम भागातील एका व्यापारी इमारतीतील जागेची विक्री दीड लाख रूपये प्रति चौरस फूट दराने झाली आहे. मात्र, या परिसरातील जागेच्या व्यवहारांसाठी हा भाव आधारभूत ठरणार नाही असे तज्ञांचे मत आहे. विशेष म्हणजे एका मटकाकिंगने हा व्यवहार केला आहे. बोरिवलीतील मंगलकुंज या पाच इमारतींच्या संकुलात सुमारे शंभर दुकाने आहेत. या संकुलातील एक लाख चौरस फूट जागा एका मटकाकिंगला विकण्यात आली आहे. "चढ्या भावाने झालेल्या अशा एखाद्या मोठ्या व्यवहाराची अंतिम किंमत जर त्या भागातील सर्वसाधारण दरापेक्षा फारच जास्त असेल तर त्याचा परिणाम साधारणपणे त्या परिसरातील जागेच्या किंमतीवर होत नाही,'' असे जोन्स लॅंग लॅसेल मेघराज (जेएलएलएम) चे अध्यक्ष आणि भारतातील व्यवसायाचे प्रमुख अनुज पुरी यांनी सांगितले. "बोरिवलीतील जागांचे दर मध्यम गटातील उत्पन्नानुसार ठरतात. तेथील कोणताही बांधकाम व्यावसायिक अशा चढ्या भावाने झालेल्या व्यवहारापेक्षा सध्याचे प्रचलित दर विचारात घेतो. असे असले तरी सध्या बोरिवलीतील जागांचे भाव वाढत आहेत,'' असेही पुरी यांनी सांगितले.   Follow Us on Twitter
सर्व गरिबांना मोफत धान्य देणे अशक्य - पंतप्रधान
Latest News - Mon, 2010-09-06 11:29
नवी दिल्ली - सर्वोच्च न्यायालयाने धोरण ठरविण्याच्या क्षेत्रात हस्तक्षेप करू नये, असे मत पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी सोमवारी व्यक्त केले. सडणारे धान्य गरिबांना मोफत देण्याचे आदेश नुकतेच सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. देशात दारिद्रयरेषेखाली राहणाऱ्या नागरिकांची संख्या ३७ टक्के आहे. एवढ्या सगळ्यांना मोफत धान्य देणे कसे शक्य आहे, असा प्रश्न डॉ. सिंग यांनी उपस्थित केला. आपल्या निवासस्थानी काही निवडक संपादकांशी संवाद साधताना त्यांनी हा प्रश्न उपस्थित केला. दारिद्रयरेषेखालील सगळ्याच नागरिकांना मोफत धान्य देणे शक्य नाही. आपण अजूनही न्यायालयाचा यासंदर्भातील अंतिम निर्णय वाचलेला नाही. या निर्णयामागील न्यायालयाची भावना आपण समजू शकतो. दारिद्ररेषेखालील नागरिकांना सवलतीच्या दरात अन्नधान्य उपलब्ध झाले पाहिजे, हे आपण समजू शकतो. त्यासाठीच गेल्या २००४ पासून दारिद्रयरेषेखालील नागरिकांना मिळणाऱ्या अन्नधान्याच्या दरात आम्ही कोणतीही वाढ केलेली नाही, असे डॉ. सिंग यांनी स्पष्ट केले. गरिबांना सवलतीच्या दरात अन्नधान्य उपलब्ध व्हावे, यासाठी न्यायालयाच्या निर्णयाचा आदर राखून केंद्र सरकारने अधिक उपाय योजले आहेत.
धरणग्रस्तांचा नागपूर महामार्गावर रास्ता रोको
Latest News - Mon, 2010-09-06 09:02
अमरावती - डेंबळा धरणग्रस्तांचे पुनर्वसन करा, या मागणीसाठी काँग्रेसचे आमदार वीरेंद्र जगताप यांच्या नेतृत्त्वाखाली धरणग्रस्तांनी औरंगाबाद-नागपूर एक्स्प्रेस महामार्गावरील गुईखेड येथे रास्ता रोको आंदोलन सुरू केले आहे.   हे धरण पूर्ण झाले, तरीही अद्याप धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील अनेक गावांचे पुनर्वसन करण्यात आलेले नाही, अशी धरणग्रस्त गावक-यांची तक्रार आहे. आजच्या आंदोलनात सुमारे २,५०० धरणग्रस्त सहभागी झाले आहेत. आंदोलनामुळे रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या आहेत.   विदर्भात यंदा जोरदार पाऊस झाल्यामुळे, बहुतेक धरणे भरली आहेत किंवा भरण्याच्या मार्गावर आहेत. डेंबळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही पाण्याचा मोठा साठा झाल्यामुळे, या क्षेत्रातील गावांमध्ये पाणी शिरते. पावसाळ्याचे चार महिने या गावक-यांना पाण्यातच राहावे लागते. पुनर्वसन लवकरात लवकर करण्यात यावे, या मागणीसाठी आजचे आंदोलन पुकारण्यात आले होते.
'पोलिसांची सुटका; सरकारने श्रेय लाटू नये'
Latest News - Mon, 2010-09-06 08:35
पाटणा - अपहृत पोलिसांच्या सुटकेचे श्रेय नितिशकुमार सरकारने घेऊ नये, असे उपहासात्मक आवाहन राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव आणि लोक जनशक्ती पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष रामविलास यांनी आज (सोमवार) येथे केले. माणुसकीच्या दृष्टीकोनातून माओवाद्यांनी पोलिसांना सोडले आहे. त्यात पोलिस आणि राज्यसरकारने कोणती भूमिका बजावली?, असा प्रश्न लालू यांनी विचारला. माओवाद्यांना हिंसा सोडण्याचे आवाहन करताना ते म्हणाले, हिंसा हे सर्व प्रश्नांवरील उत्तर होऊ शकत नाही. प्रश्न सोडविण्याचे अन्य अनेक मार्ग आहेत. त्यांनी यावे आणि समाजाच्या मुख्य प्रवाहात सहभागी व्हावे. पासवान म्हणाले, की अपहृत पोलिसांच्या सुटकेसाठी तपास मोहीम राबविण्यात सरकार आणि पोलिस पूर्णत: अपयशी ठरले आहे. केवळ माओवाद्यांनी दाखविलेल्या माणुसकीमुळे ते सुखरूप परत आले आहेत. त्यामुळे सरकार किंवा पोलिसांनी त्याचे श्रेय घेऊ नये. सरकारने पहिल्या दिवशी पाऊल उचलले असते, तर लुकास टेटे मारले गेले नसते. पोलिसांच्या सुटकेमागे काहीतरी संकेत असावे, असा संशय लालू यांनी व्यक्त केला. तर, मी लवकरच संबंधित पोलिसांची भेट घेईल, असे पासवान म्हणाले.
आई- वडिलांची प्रार्थना आणि देवाचे आशीर्वाद...
Latest News - Mon, 2010-09-06 08:07
लखीसराय - आई- वडिलांची प्रार्थना आणि देवाचे आशीर्वाद, यामुळेच मी आज जिवंत आहे, आणि याचा मला आनंद आहे, असे भावनाप्रधान उद्गार बिहार पोलिसांचे अधिकारी रुपेशकुमार सिन्हा यांनी आज येथे काढले. मागील रविवारी पोलिसांबरोबर झालेल्या चकमकीदरम्यान माओवाद्यांनी चार पोलिसांचे अपहरण केले होते. त्यात रुपेशकुमार यांचाही समावेश होता. आज सकाळी माओवाद्यांनी तिघांना सोडले. त्यानंतर ते बोलत होते. माध्यमांशी बोलताना त्यांच्या भावना अनावर झाल्या होत्या. तर, अभय प्रसाद यादव यांच्या पत्नी रजनीदेवी यांनी माध्यमांसमोर प्रतिक्रिया व्यक्त केली. त्या म्हणाल्या, देवाने माझी प्रार्थना ऐकली, त्याबद्दल मी देवाची आभारी आहे. त्याचबरोबर माझ्या पतीला सुखरूप सोडणाऱ्या माओवादी बांधवांचेदेखील धन्यवाद मानते. मी माझ्या पतीची अतुरतेने वाढ पाहात होते. बिहार प्रशासनाने शर्थीचे प्रयत्न करून त्यांना लवकरात लवकर परत आणले. यादव, सिन्हा आणि एहसान खान यांचे माओवाद्यांनी 29 ऑगस्ट रोजी अपहरण केले होते. त्यांना आज सकाळी कजरा-छानन जंगलात सोडण्यात आले.
झारखंडमध्ये नक्षलवाद्यांकडून पिता-पुत्राची हत्या
Latest News - Mon, 2010-09-06 07:31
रांची - झारखंडमधील गुमला जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी आज (सोमवार) पिता-पुत्राची हत्या केली. जमिनीच्या वादातून ही हत्या केली गेल्याचे पोलिसांनी सांगितले. पीपल्स लिबरेशन फ्रंट ऑफ इंडिया (पीएलएफआय)च्या सुमारे 20 सदस्यांनी रांचीपासून सुमारे 130 किलोमीटरवर असलेल्या अगरा गावात ही हत्या केली. बुधुवा आरांव आणि त्यांचा मुलगा अनिल आरांव यांना घरातून बाहेर खेचून ठार मारले, असे पोलिसांनी सांगितले. जमिनीच्या वादातून ही हत्या झाल्याचे ते म्हणाले.
बलात्कारप्रकरणी पिंपरी भाजप उपाध्यक्षाला अटक
Latest News - Mon, 2010-09-06 06:50
पिंपरी -  एका आठ वर्षाच्या मुलीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पिंपरी-चिंचवड शहर भारतीय जनता पक्षाच्या विद्यमान उपाध्यक्षाला निगडी पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना रविवारी (ता. 5) सायंकाळी आठच्या सुमारास यमुनानगर, निगडी येथे घडली. सूरज रणपिसे (वय 45, रा. त्रिमूर्ती गृहरचना संस्था, योजना क्रमांक 6, इमारत क्रमांक 27) असे त्याचे नाव आहे. याप्रकरणी अल्पवयीन मुलीच्या आईने निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. निगडी पोलिस ठाण्याच्या सहाय्यक पोलिस निरीक्षक अनघा देशपांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार रणपिसे याने चॉकलेट देण्याच्या बहाण्याने आठ वर्षाच्या मुलीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे संतप्त झालेल्या जमावाने त्याला चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिले. त्याच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रणपिसे याने यापूर्वी एकदा महापालिकेची निवडणूक लढविली होती.
पाकमध्ये आत्मघाती बॉंबहल्ला; आठ ठार
Latest News - Mon, 2010-09-06 06:11
इस्लामाबाद - वायव्य पाकिस्तानच्या लक्की मुरव्वत या शहरातील पोलिस ठाण्याजवळ झालेल्या आत्मघाती बॉंबहल्ल्यात आठ जण ठार झाले. तर, 50 जण जखमी झाले. आज (सोमवार) सकाळी ही घटना घडली. बॉंबस्पोटाच्या वेळी पोलिस ठाण्यात 45 पोलिस होते. शहराचा मध्यवर्ती परिसर असल्याने येथे नेहमीच गजबज असते. आजही गर्दीच्या वेळी बॉंबहल्ला झाल्याने नागरिक मोठ्या संख्येने जखमी झाले आहेत. पोलिस ठाण्याजवळ असलेल्या शाळा आणि सरकारी इमारतीचे नुकसान झाले आहे. सध्या मृतांचा आकडा आठ असला तरी तो वाढण्याची शक्यता आहे. घटनास्थळाची पाहणी करण्यात येत असून, त्यानंतरच घटनेचे चित्र स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले. संरक्षण कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी नाकाबंदी केली आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पाकिस्तानमध्ये अतिरेकी कारवाया जोरदारपणे सुरू असून, गेल्या काही दिवसांत झालेल्या विविध बॉंबस्फोटामध्ये 110 हून अधिक नागरिक मारले गेले आहेत. मागील आठवड्यात अतिरेक्यांनी लाहोर आणि क्वेटाला लक्ष्य केले होते.
मुंबईत विद्यार्थिनीवर माथेफिरूचा हल्ला
Latest News - Mon, 2010-09-06 05:00
मुंबई - मिठीबाई महाविद्यालयाच्या आवारात एका माथेफिरूने विद्यार्थिनीवर हल्ला केल्याची घटना रविवारी संध्याकाळी घडली. मिळालेली माहिती अशी - की संबंधित विद्यार्थिनी एका कामानिमित्त महाविद्यालयात आली होती. कामे संपल्यानंतर ती महाविद्यालयाबाहेरील पदपथावर मित्रमैत्रिणींशी गप्पा मारत उभी होती. त्याचवेळी एक अज्ञात माथेफिरू तेथे आला. त्याने रस्त्यावरील गाड्यांच्या काचा फोडण्यास सुरवात केली. त्यानंतर अचानक त्याने आपला मोर्चा विद्यार्थ्यांच्या दिशेने वळवला. त्याने सदर विद्यार्थिनीच्या डोक्यावर आणि हातावर वार केले. हा प्रकार पाहून इतर विद्यार्थ्यांनी आरडाओरडा केला. त्यानंतर तो पळून गेला. हल्ल्यात विद्यार्थिनी जखमी झाली आहे.
अपहृत तीन पोलिसांची अखेर सुटका
Latest News - Mon, 2010-09-06 04:29
पाटणा - लखीसराय जिल्ह्यात माओवाद्यांबरोबरच्या चकमकीदरम्यान अपहरण केलेल्या तीन पोलिसांनी अखेर सुटका झाली. आज (सोमवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास पोलिसांची सुटका झाल्याच्या वृत्ताला बिहार पोलिसांनीदेखील दुजोरा दिला. सुटका झालेले तीनही पोलिस सुखरूप असल्याचे त्यांनी सांगितले. अभय यादव, एहसान खान, रुपेश कुमार या तीन पोलिसांची सुटका करण्यात आली आहे. हे तिघेही लखीसराय शहरात पोचले आहेत. त्यांच्या प्राथमिक उपचार सुरू असून, त्यानंतर ते पाटणा येथे रवाना होतील. मुख्यमंत्री नितीशकुमार यांची ते भेट घेणार आहेत. सरकार आणि नक्षलवादी यांच्यामध्ये चर्चा झाल्यानंतर अपहृत पोलिसांना सोडण्यात आल्याची चर्चा आहे. लखीसराय जिल्ह्यात मोहिमेवर असलेल्या सात पोलिसांची माओवाद्यांनी मागील रविवारी हत्या केली होती आणि दोन अधिकाऱ्यांसह चार पोलिसांचे अपहरण केले होते. त्यात बिहार मिलिटरी पोलिसचे अधिकारी अभय यादव, एहसान खान, रुपेश कुमार, लुकास टेटे यांचा समावेश होता. अपहृत पोलिसांच्या बदल्यात राज्यात विविध कारागृहांमध्ये असलेल्या आठ माओवाद्यांची एक सप्टेंबरपर्यंत सुटका करण्याची मागणी माओवाद्यांचा म्होरक्या अविनाशने केली होती.

