Feed aggregator


बांगलादेशमध्ये 'उल्फा' नेत्याला अटक

Latest News - Mon, 2010-06-07 11:57

ढाका - युनायटेड लिबरेशन फ्रंट ऑफ आसाम (उल्फा) या बंडखोर संघटनेचा नेता रंजू चौधरी याला आज (सोमवार) बांगलादेशमध्ये उत्तरेकडील मायमेनसिंग जिल्ह्यात अटक करण्यात आली. या संघटनेचा म्होरक्‍या अरविंद राजखोवा याला महिन्यापूर्वी भारताच्या ताब्यात दिल्यानंतर आज याला अटक करण्यात आली. उल्फा संघटनेचा नेता रंजू चौधरीबरोबर रतन सरकार यालाही अटक करण्यात आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. गुन्हे विरोधी जलद कृती दलाच्या जवानांनी रंजू चौधरी मायमेनसिंग येथे आला असता अटक केली. आसाममधील सिलचेर येथील असणाऱ्या चौधरीने या संघटनेत सहभागी होत उत्तर बांगलादेशमधील शेरपूर जिल्ह्यात कारवाया सुरु केल्या. गुन्हे विरोधी जलद दलाचे प्रमुख हसन मेहमुद खोंडकेर यांनी चौधरीच्या अटकेबद्दल माहिती मिळाल्याचे सांगितले. मात्र, याच्या अटकेबद्दल मी आता जास्त बोलू शकत नाही असे त्यांनी सांगितले.

जयराम रमेश यांची राज्यसभेवर बिनविरोध निवड

Latest News - Mon, 2010-06-07 11:50

हैदराबाद - केंद्रीय पर्यावरण मंत्री जयराम रमेश यांच्यासह सहा जणांची सोमवारी आंध्र प्रदेशमधून राज्यसभेवर बिनविरोध निवड झाली. निवड झालेल्या अन्य नेत्यांमध्ये नेदूरूमल्ली जनार्दन रेड्डी, व्ही. हनुमंता राव, जे. डी. सीलम, गुंडू सुधा राणी आणि वाय. सत्यनारायण चौधरी यांचा समावेश आहे. &nbsp राज्यसभेसाठी अर्ज माघारी घेण्याचा आज अखेरचा दिवस होता. आंध्र प्रदेशमधून राज्यसभेसाठी सहा सदस्य निवडण्यात येणार होते. या सहाही नेत्यांपैकी कोणीही अर्ज माघारी न घेतल्याने सर्वांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी आणि राज्य विधानसभेचे सचिव एस. राजा सदाराम यांनी जाहीर केले. जयराम रमेश यांची दुसऱ्यांदा आंध्र प्रदेशमधून राज्यसभेवर निवड झाली आहे.&nbsp

सिंधुदुर्ग जिल्ह्यात दमदार पाऊस

Latest News - Mon, 2010-06-07 11:47

सावंतवाडी&nbsp : सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुर्वमोसमी पावसाने आज दमदार हजेरी लावली. वातावरणात कमालीचा गारवा निर्माण झाला आहे. जिल्ह्यात यंदा पुर्वमोसमी पावसाला उशिर झाला. मान्सुन वेळेत येणार होता. मात्र समुद्रातील फेत वादळाने त्यालाही थोडा विलंब झाला. आज जिल्ह्यात सकाळीच वातावरणात कमालिचा बदल झाला. दाट काळ्या ढगांनी आकाश व्यापून गेले. सकाळ दहाच्या दरम्यान जिल्ह्यातील अनेक भागात पावसाला सुरवात झाली. यात सावंतवाडी, कुडाळसह वैभववाडी तालुक्‍यातील सह्याद्रीच्या रांगामध्ये येणाऱ्या परिसराचा समावेश होता. सुमारे अर्धातास पाऊस झाला. यानंतर दुपारी पुन्हा वातावरणात बदल झाला. यावेळीही दमदार पाऊस झाला. यामुळे शेतीच्या पुर्वमशागतीच्या कामांना वेग आला आहे.

ऍसिड फेकल्याने विवाहसमारंभात २७ जखमी

Latest News - Mon, 2010-06-07 11:05

बुलंदशहर - विवाहसमारंभात पाण्याऐवजी ऍसिड फेकल्याने २७ जण भाजल्याची घटना आज (सोमवार) उत्तर प्रदेशातील बुलंदशहर जिल्ह्यात घडली. भाजलेल्यांमध्ये तरुणींचे प्रमाण अधिक आहे. त्यातील काही जणींची प्रकृती गंभीर आहे. विवाहात एक विधी सुरू असताना ही घटना घडली. भाजलेले बहुतेक सर्वजण वधूपक्षातील आहेत. ते विवाहासाठी राजस्थानमधून आले होते. पोलिसांनी याप्रकरणी कैलास कुमार (वय ४०) याला अटक केली आहे. पाण्याऐवजी आपण चुकून ऍसिड फेकल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. मात्र, त्याने हे जाणीवपूर्वक केल्याचा पोलिसांचा संशय आहे. जिल्ह्याचे पोलिस उपायुक्त कल्याण सिंह यांनी सांगितले, की सखोल तपासणीनंतर नेमकी माहिती हाती येईल. सध्या त्याची सखोल चौकशी सुरू आहे. कैलासचे संबंधीत तरुणींबरोबर वाद झाल्याने त्याने ऍरिस फेकले असावे, असा आमचा अंदाज आहे.

ऍसिड फेकल्याने विवाहसमारंभात २७ जखमी

Latest News - Mon, 2010-06-07 11:05

बुलंदशहर - विवाहसमारंभात पाण्याऐवजी ऍसिड फेकल्याने २७ जण भाजल्याची घटना आज (सोमवार) उत्तर प्रदेशातील बुलंदशहर जिल्ह्यात घडली. भाजलेल्यांमध्ये तरुणींचे प्रमाण अधिक आहे. त्यातील काही जणींची प्रकृती गंभीर आहे. विवाहात एक विधी सुरू असताना ही घटना घडली. भाजलेले बहुतेक सर्वजण वधूपक्षातील आहेत. ते विवाहासाठी राजस्थानमधून आले होते. पोलिसांनी याप्रकरणी कैलास कुमार (वय ४०) याला अटक केली आहे. पाण्याऐवजी आपण चुकून पाणी फेकल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. मात्र, त्याने हे जाणीवपूर्वक केल्याचा पोलिसांचा संशय आहे. जिल्ह्याचे पोलिस उपायुक्त कल्याण सिंह यांनी सांगितले, की सखोल तपासणीनंतर नेमकी माहिती हाती येईल. सध्या त्याची सखोल चौकशी सुरू आहे. कैलासचे संबंधीत तरुणींबरोबर वाद झाल्याने त्याने ऍरिस फेकले असावे, असा आमचा अंदाज आहे.

भोपाळ वायू दुर्घटना : काय घडले आतापर्यंत

Latest News - Mon, 2010-06-07 10:57

आजही ज्याबद्दल ऐकल्यावर अंगावर काटा येतो, त्या भोपाळ वायू दुर्घटना प्रकरणी सोमवारी न्यायालयाने आठ आरोपींना दोषी म्हणून जाहीर केले. स्वतःची कोणतीही चूक नसताना, केवळ एका घटनेमुळे ज्यांचे संपूर्ण आयुष्य उद्‌धवस्त झाले, त्या भोपाळमधील वायू दुर्घटना प्रकरणाने आजपर्यंत कोणकोणती वळणे घेतली, त्याचा आढावा... ३ डिसेंबर १९८४ - युनियन कार्बाईड कंपनीतून विषारी वायूचे उत्सर्जन. वायुमळे शहरातील १५ हजार नागरिकांचा बळी. सुमारे पाच लाख नागरिकांना विषारी वायुची बाधा. ४ डिसेंबर १९८४ - युनियन कार्बाईडचे अध्यक्ष वॉरन अँडरसन यांच्यासह नऊ जणांना अटक. अँडरसन यांची दोन हजार डॉलरच्या जामीनावर मुक्तता. फेब्रुवारी १९८५ - युनियन कार्बाईडने नुकसान भरपाईसाठी ३.३ अब्ज डॉलर द्यावेत, अशी मागणी भारत सरकारने अमेरिकेच्या न्यायालयात केली. १९८६ - भोपाळ वायू दुर्घटना प्रकरण अमेरिकेतील जिल्हा न्यायालयाने भारताकडे वर्ग करण्याचा निर्णय घेतला. डिसेंबर १९८७ - केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) अँडरसन आणि अन्य आरोपींवर आरोपपत्र दाखल केले.

पेरूचे राजदूत करणार शंकराचार्यांवर संशोधन

Latest News - Mon, 2010-06-07 09:59

कांचीपुरम- व्यष्टी आणि समष्टी असा द्वैतभाव नाकारणारे आणि अद्वैताचा पुरस्कार करणारे आदी शंकराचार्य विद्यारण्य स्वामी यांच्या तत्त्वज्ञानाने जगभरातील विद्वानांना भुरळ पाडली आहे. त्यातच आता मुत्सद्देगीरीच्या कोरड्या जगात वावरणाऱ्या मुत्सद्‌द्‌याचीही भर पडली आहे. दक्षिण अमेरिकेतील पेरू या देशाचे भारतातील उपराजदूत कार्लोस ए. इरिगोयन फोर्नो यांनीही आता आदी शंकराचार्यांवर संशोधन करायचे ठरविले आहे. त्यासाठी त्यांनी कांची कामकोटी न्यासातर्फे चालविण्यात येणाऱ्या श्री चंद्रशेखरेंद्र सरस्वती विश्‍व महाविद्यालयात अर्ज केला आहे. प्राचीन काळी अत्यंत प्रगत समजल्या जाणाऱ्या इंका या आदिवासी जमातीशी संबंधित असलेल्या फोर्नो याबाबत म्हणाले,""४२ वर्षांपूर्वी मला शंकराचार्यांच्या तत्त्वज्ञानाची गोडी लागली. फ्रान्समधील माझ्या कार्यकाळात मी फ्रेंच भाषेतील महाभारताचा अभ्यास केला होता. त्यावरून त्यांना भारतीय तत्त्वज्ञान आणि शंकराचार्यांनी मांडलेले सिद्धांत याचा अभ्यास करण्याची प्रेरणा मिळाली. तेव्हापासून मी शंकराचार्यांच्या तत्त्वज्ञानाचा अभ्यास करत आहे. इंका आणि हिंदू धर्मात बरीच साम्यस्थळे आहेत.

पंतप्रधानांचे श्रीनगर येथे आगमन

Latest News - Mon, 2010-06-07 09:41

श्रीनगर - दोन दिवसांच्या जम्मू-काश्‍मिर दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे आज (सोमवार) सकाळी श्रीनगर येथे आगमन आले. पंतप्रधानांच्या या दौऱ्यात काश्‍मिर खोऱ्यातील फुटीरतावादी नेत्यांविरुद्ध नव्याने चर्चा करण्याची आणि केशर उत्पादकांसाठी आर्थिक पॅकेजची घोषणा करण्याची शक्‍यता आहे. श्रीनगर येथे पंतप्रधानांचे आगमन होताच राज्यपाल एन. एन. व्होरा आणि मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी त्यांचे स्वागत केले. या दौऱ्यात ते सत्ताधारी नॅशनल कॉन्फरन्स पक्षासह विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांशी आणि विरोधक पीडीपी आणि सीपीआय (एम) यांच्याशीही चर्चा करणार आहेत. या चर्चेदरम्यान पंतप्रधान फुटरतावादी हुरिर्यत कॉन्फरन्सच्या नेत्यांनाही चर्चेचे आमंत्रण देण्याची शक्‍यता आहे. तसेच काश्‍मिर खोऱ्यातील केशर उत्पादकांसाठी २०० कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा करण्याची शक्‍यता आहे. दौऱ्यात ते शेर-ए-काश्‍मिर विद्यापीठाच्या पदवी प्रदान समारंभात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.

फुटीरतावाद्यांना आश्‍वासन देऊ नका - भाजप

Latest News - Mon, 2010-06-07 08:28

जम्मू- &nbsp जम्मू काश्‍मीरमधील दहशतवाद रोखण्यासाठी लष्कराकडून परिणामकारक प्रयत्न केले जात आहेत. गेल्या काही वर्षांत लष्कराने या भागात चांगले काम केले आहे. त्यामुळे राज्यातून लष्कर मागे घेण्याबाबत आणि "आर्मर्ड फोर्सेस स्पेशल पॉवर्स ऍक्‍ट'मधील (आस्पा) तरतुदी शिथिल करण्याबाबत फुटीरतावाद्यांना कोणतेही आश्‍वासन देऊ नका, असे आवाहन भारतीय जनता पक्षाने पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांना केले आहे. पंतप्रधान आजपासून (सोमवार) दोन दिवसाच्या काश्‍मीर दौऱ्यावर जात आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर भाजपने हे आवाहन केले आहे. ""पंतप्रधानांच्या काश्‍मीर दौऱ्याच्या पार्श्‍वभूमीवर फुटीरतावाद्यांनी आपल्या मागण्या रेटण्यासाठी कंबर कसली आहे. त्यामुळे आम्हाला या दौऱ्याबद्दल काळजी वाटते. पंतप्रधानांनी तेथील फुटीरतावादी अथवा मुख्य धारेतील राजकीय पक्षांनाही "आस्पा' हटविणे अथवा राज्यातून लष्कर मागे घेण्याबाबत कोणतेही आश्‍वासन देऊ नये. असे केल्यास देशहिताचा बळी दिल्यासारखे होईल,''असे भाजपचे माजी प्रदेश अध्यक्ष आणि विद्यमान पक्ष प्रवक्ते निर्मलसिंह यांनी म्हटले आहे.

हिंगोलीत पोलिस बंदोबस्तात खतवाटप

Latest News - Mon, 2010-06-07 08:07

हिंगोली - शहरातील पोलिस ठाण्याच्या आवारात आज (सोमवार) पोलिस बंदोबस्तात १५:१५:१५ या खताचे वाटप करण्यात आले. कृषी अधिकारी संजय नाब्दे यांनी दुपारपर्यंत तीन दुकानांमधील ५० मेट्रिक टन खताचे वाटप केले. यापुढेही पोलिस बंदोबस्तातच खताचे वाटप करण्यात येईल, असे कृषी विभागाकडून सांगण्यात आले. कृषी विभागाच्या या उपक्रमामुळे या वर्षी शेतकऱ्यांना खतासाठी रांगा लावाव्या लागणार नाही, हे स्पष्ट झाले आहे.

'सीमाप्रश्‍नी राज्य सरकार दिल्लीपुढे नमले'

Latest News - Sun, 2010-06-06 20:59

सांगली&nbsp - सीमावर्ती भागातील मराठी बांधव तडफडत असताना त्यांना महाराष्ट्रात सामील करून घेण्यासाठी दिल्लीशी टक्कर देण्यात राज्य सरकार नेहमीच कमी पडले. सीमाप्रश्‍नी आम्ही दिल्लीपुढे नमलो, अशी स्पष्ट कबुली गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी आज येथे दिली. येथील शांतिनिकेतन लोकविद्यापीठात सुवर्णमहोत्सवी महाराष्ट्राच्या दुसऱ्या सिंहावलोकन परिषदेच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते. आमदार विलासकाका पाटील-उंडाळकर अध्यक्षस्थानी होते. श्री. पाटील म्हणाले, ""सीमावासीयांच्या वेदना, त्यांच्या व्यथा, त्यांच्या वाट्याला आलेले भोग आम्ही उघड्या डोळ्यांनी पाहत आहोत. तिथले लोक महाराष्ट्रात सामील होण्यासाठी तडफडत आहेत. त्यांच्यासाठी दिल्लीशी टक्कर घ्यायला हवी होती. त्या-त्या वेळी राज्य सरकारने नमती भूमिका घेतली. प्रश्‍न लगेच सोडवायचा नसेल, तर समिती नेमली जाते. तो लांबवायचा असेल, तर आयोग नेमला जातो आणि ताणायचा असेल, तर न्यायालयात धाव घेतली जाते. सीमाप्रश्‍नी तसेच झाले. केंद्र सरकार वेळकाढूपणा करत आहे. नेमकी भूमिका काय, हेही स्पष्ट करत नाही.'' ते म्हणाले, ""महाराष्ट्र एकसंध होण्यासाठी 105 लोकांनी हौतात्म्य पत्करले.

दहावीच्या निकालाला स्थगितीचा इशारा

Latest News - Sun, 2010-06-06 20:35

पुणे -&nbsp राष्ट्रीय स्तरावरील शालेय खेळाडूंच्या क्रीडा नैपुण्याची माहिती क्रीडा व युवक संचालनालयाकडून राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडे अद्याप पोचलेली नसल्यामुळे हवालदिल झालेल्या पालकांनी न्यायालयात धाव घेतली असून, दहावीचा निकाल पुढे ढकलण्याची मागणी केली आहे. निकालाला स्थगिती घेण्याचाही इशारा त्यांनी दिला आहे. याबाबतची नोटीस काही पालकांनी माध्यमिक शिक्षण मंडळाला शुक्रवारी बजावली आहे. क्रीडा विभागाच्या दिरंगाईमुळे राज्यातील सुमारे 650 राष्ट्रीय खेळाडूंचे भवितव्य टांगणीला लागले आहे. राष्ट्रीय स्तरावर चमक दाखविणाऱ्या खेळाडूंना दहावीच्या परीक्षेत 25 गुण दिले जातात. क्रीडा विभागाकडे संबंधित शाळांनी त्याची माहिती 31 मार्चपूर्वी पाठविणे गरजेचे असते. त्यानंतर क्रीडा विभाग दहावीच्या परीक्षेच्या निकालापूर्वी 21 दिवस ती माहिती मंडळाकडे पाठविते. त्यानुसार अंतिम गुणांमध्ये क्रीडा नैपुण्याचे गुण मिळवून निकाल तयार होतो. पुण्यातील अनेक शाळांनी ही माहिती क्रीडा विभागाकडे वेळेवर पाठविली असली, तरी ती मंडळाकडे अद्याप पोचलेली नाही.

भोपाळ वायू दुर्घटनेच्या खटल्याचा आज निकाल

Latest News - Sun, 2010-06-06 20:30

भोपाळ - सव्वीस वर्षांपासून रेंगाळलेल्या भोपाळ वायू दुर्घटनेच्या खटल्याचा निकाल मुख्य न्यायदंडाधिकारी मोहन पी. तिवारी उद्या (सोमवार) सुनावणार आहेत. वायूपीडित, स्वयंसेवी संस्था यांच्याकडून तीव्र प्रतिक्रिया उमटू शकते, हे गृहीत धरून पोलिसांनी शहरात प्रतिबंधात्मक आदेश लागू केला आहे. दोन व तीन डिसेंबर 1984 रोजी येथील युनियन कॉर्बाइड कार्पोरेशन लिमिटेडच्या रासायनिक प्रकल्पातून मिथेल आयसोसायनाइट (एमआयसी) या विषारी वायूची गळती झाली होती. त्यात हजारो जणांचे बळी गेले होते. तसेच, असंख्य नागरिकांवर दुष्परिणाम झाले होते. या प्रकरणी सीबीआयने 1987 मध्ये युनियन कॉर्बाइडचे तत्कालीन अध्यक्ष वॉरेन अँडरसन, केशूब महिंद्रा आणि बारा जणांविरुद्ध तीन हजार पानांचे आरोपपत्र दाखल केले होते. त्यात संचालक विजय गोखले, किशोर कामदार, जे. मुकुंद, एस. पी. चौधरी, के. बी. शेट्टी आणि प्रकल्पाचे निरीक्षक एस. आय. कुरेशी यांचा समावेश आहे. दुसरे संचालक आर. बी. रॉय चौधरी यांचे निधन झाले आहे. या सर्वांविरुद्ध भारतीय दंडविधानातील 304 कलमान्वये (हलगर्जीपणाने मृत्यूस कारणीभूत) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात कमाल शिक्षा दहा वर्षांची आहे.

दिल्लीकरांनी रिचविल्या पावणेदोन कोटी बिअर

Latest News - Sun, 2010-06-06 20:10

नवी दिल्ली - अंगाची लाही-लाही करणाऱ्या उन्हाळ्यात थंडाव्यासाठी "एसी', "कूलर' याबरोबरच थंडगार आइस्क्रीम, लस्सीवर अवलंबून राहणाऱ्या दिल्लीकरांनी फेसाळत्या बिअरचा आधार घेतला. उन्हाच्या तलखीने त्रस्त दिल्लीकरांनी केवळ मे महिन्यात बिअरचे तब्बल 15 लाख खोके म्हणजे पावणे दोन कोटी बाटल्या रिचवल्याचे अबकारी शुल्क विभागाच्या माहितीतून स्पष्ट झाले आहे. राजस्थानातील वाळवंटी भागाला लागून असलेल्या दिल्लीतील तापमान यंदाच्या उन्हाळ्यात किमान 35 अंशांपर्यंत गेले, तर कमाल ते अर्धशतकी अंशांपर्यंत पोचायचेच बाकी राहिले. या तापलेल्या वातावरणात सुरू असलेल्या वाऱ्यामुळे येणाऱ्या झळा अक्षरशः घायाळ करणाऱ्या आहेत. या झळांना "लू' असे म्हटले जाते. त्यामुळे शरीरातील पाणी तसेच थंडावा टिकवून ठेवण्यासाठी लिंबूपाणी, आइस्क्रीम, लस्सी यांसारख्या पदार्थांची मागणी येथे उन्हाळ्यात चांगलीच वाढते. शिवाय, "कूलर' आणि "एसी'ही येथील जीवनावश्‍यक वस्तूंपैकी एक झाल्याची दिल्लीकरांमध्ये भावना आहे. असे असले तरी आणखी थंडावा मिळविण्यासाठी दिल्लीकरांनी बिअरकडे मोर्चा वळवला आहे.

"आयपीएल' बोलीचा वाद विनाकारण - शरद पवार

Latest News - Sun, 2010-06-06 20:10

पुणे&nbsp -&nbsp "पुणे आयपीएल संघासाठी सिटी कॉर्पोरेशन लि.'तर्फे लावण्यात आलेली बोली ही आपण कंपनीच्या आदेशानुसार, व्यक्तिगत पातळीवर लावली होती, याचा कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक अनिरुद्ध देशपांडे यांनी आज "सकाळ'शी बोलताना पुनरुच्चार केला. तसेच, हा विनाकारण निर्माण केलेला वाद आहे, असे केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी आज "सकाळ'शी बोलताना सांगितले. सिटी कॉर्पोरेशनचा संबंधित बोलीतील सहभाग हा अनिरुद्ध देशपांडे यांचा व्यक्तिगत नव्हे, तर सिटी कॉर्पोरेशनचा होता, असे बीसीसीआयचे अध्यक्ष शशांक मनोहर यांनी काल म्हटले होते. त्यामुळे निर्माण झालेल्या वादाच्या संदर्भात श्री. पवार आणि श्री. देशपांडे यांनी आज पुन्हा हे स्पष्ट केले. बारामती येथे "सकाळ'च्या बातमीदाराशी बोलताना शरद पवार यांनी आयपीएलच्या पुणे टीमच्या खरेदीच्या कोणत्याही व्यवहाराशी आपला दुरान्वयानेही संबंध नसल्याचा पुनरुच्चार करून, या संदर्भातील सर्व टीका निरर्थक आहे, असे प्रतिपादन केले आहे.

'गोसीखुर्द'चा केंद्र सरकार घेणार आढावा

Latest News - Sun, 2010-06-06 20:10

नवी दिल्ली - &nbsp शेतकऱ्यांच्या आत्महत्यांनी ग्रासलेल्या पूर्व विदर्भाची जीवनदायिनी असलेला परंतु 21 वर्षांपासून रखडलेला गोसीखुर्द प्रकल्प आगामी तीन वर्षांत पूर्ण होण्याची चिन्हे आहेत. नियोजनानुसार प्रकल्पाच्या कामाची गती कायम राखण्यासाठी केंद्रीय जलस्रोतमंत्र्यांच्या पातळीवर प्रकल्पाचा दैनंदिन आढावा घेतला जाणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. गोसीखुर्द प्रकल्पाला राष्ट्रीय प्रकल्प म्हणून जाहीर करूनही आणि पंतप्रधानांच्या "विदर्भ पॅकेज'द्वारे मदत देऊनही प्रकल्पाचे काम पुढे सरकण्याची चिन्हे दिसत नसल्याने आता कोणत्याही परिस्थितीत प्रकल्पाशी संबंधित सर्व कामे पुढील तीन वर्षांत पूर्ण व्हायलाच हवीत, अशी तंबी केंद्र सरकारने दिल्याचे समजते. विदर्भाच्या सिंचनासाठी महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या या प्रकल्पाचे भूमिपूजन 1988 मध्ये तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हस्ते होऊन कामाला सुरवात झाली होती. या प्रकल्पाचे "इंदिरासागर डॅम' असे नामकरणही करण्यात आले. मात्र, पुरेशा निधीअभावी या प्रकल्पाच्या कामाला ग्रहण लागले.

राम जेठमलानींना राजस्थानातून उमेदवारी

Latest News - Sun, 2010-06-06 20:10

नवी दिल्ली - &nbsp प्रख्यात विधिज्ञ आणि वाजपेयी सरकारमध्ये कायदामंत्री असलेल्या राम जेठमलानी यांनी भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते लालकृष्ण अडवानी आणि पक्षाध्यक्ष नितीन गडकरी यांची काही दिवसांपूर्वी घेतलेली भेट फळाला आली आहे. भाजपने जेठमलानींना राज्यसभेसाठी राजस्थानातून उमेदवारी दिली आहे. तर झारखंडमधील एका जागेसाठी अजय मारू यांचे नाव जाहीर करण्यात आले आहे. देशातील मोजक्‍या नामवंत विधीज्ञांपैकी एक असलेले जेठमलानी अनेकदा वादाच्या केंद्रस्थानी राहिले आहेत. इंदिरा गांधींच्या मारेकऱ्यांचे वकीलपत्र असो किंवा "बिग बुल' हर्षद मेहताचा तत्कालीन पंतप्रधान नरसिंहराव यांच्यावरील आरोप, जेठमलानी यांनी चांगलीच खळबळ उडवून दिली होती. वाजपेयी सरकारमध्ये कायदामंत्रिपद भूषविलेल्या जेठमलानी यांनी मात्र वाजपेयी सरकार कोसळल्यानंतर थेट वाजपेयी यांच्या विरोधात लखनौमधून उमेदवारी अर्ज दाखल करून आव्हान दिले होते. त्यासाठी त्यांनी कॉंग्रेसमध्ये रीतसर प्रवेशही केला होता. एवढेच नव्हे, तर अलीकडच्या काळात भाजपचा कट्टर विरोध असतानाही अणुकराराला जाहीर पाठिंबा दर्शविला होता.

राज्यसभा निवडणुकीत ओरिसा भाजप तटस्थ

Latest News - Sun, 2010-06-06 20:10

भुवनेश्‍वर - &nbsp ओरिसामध्ये होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीत तटस्थ राहण्याचा निर्णय भारतीय जनता पक्षाने घेतला आहे. विधानसभेत असलेले मोजकेच आमदार आणि निवडून येण्याचा विश्‍वास नसल्याने पक्षाने या निवडणुकीत त्यांचे उमेदवारसुद्धा उभे केलेले नाहीत. कॉंग्रेसने अद्याप आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. ओरिसा भाजप प्रदेशाध्यक्ष जुएल ओराम यांनी पक्षाची भूमिका आज स्पष्ट केली. राज्यात राज्यसभेच्या तीन जागांसाठी येत्या 17 जूनला मतदान होणार आहे. सध्या राज्यसभेच्या तीनपैकी बिजू जनता दल, भाजप व कॉंग्रेस यांच्याकडे प्रत्येकी एक-एक जागा आहे. परंतु यंदा या निवडणुकीत न उतरण्याबरोबरच सत्ताधारी "बीजेडी' आणि कॉंग्रेस या दोन्ही पक्षांपासून चार हात दूर राहण्याचा निर्णय भाजपने घेतला असल्याचे ओराम यांनी स्पष्ट केले आहे. या निवडणुकीत "बीजेडी'ने आपले तीन उमेदवार जाहीर केले आहे. राज्य विधानसभेतील एकूण 147 पैकी "बीजेडी'चे सर्वाधिक 103 आमदार आहेत. त्याखालोखाल कॉंग्रेसचे 27, भाजपचे सहा आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे चार आमदार आहेत. याशिवाय, मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचा एक आणि अपक्ष सहा आमदार आहेत.

पुणे फुटबॉल क्‍लबचा सात गोलने विजय

Sports News - Sun, 2010-06-06 19:40

पुणे - &nbsp पुणे जिल्हा फुटबॉल संघटना आयोजित "पेनिन्सुला पुणे करंडक 2010' साखळी फुटबॉल स्पर्धेत अव्वल श्रेणी गटात पुणे फुटबॉल क्‍लब "अ' संघाने चेतक क्‍लब "अ' संघाचा सात गोलने पराभव केला, त्यात महत्त्वाचा वाटा विघ्नेश वरनने (9, 41, 53 व 62 वे मिनीट) केलेल्या चार गोलचा होता. त्याला झुबेर देसाईने (68 व 70 वे मिनीट) दोन, तर आकाश कांबळेने एक गोल करून सुरेख साथ दिली. रेंजहिल्स येथील ऍम्युनिशन फॅक्‍टरी व स. प. महाविद्यालयाच्या मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत प्रथम श्रेणी गटातील अव्वल साखळी लढतीत शिवाजीयन्स क्‍लब "अ'ने रेंजहिल्स यंग बॉईज "अ' संघाला तीन गोलने हरविले. यावेळी ऋत्विक राजने (24 व 38 वे मिनीट) दोन, तर अनिकेत भालेने एक गोल केला. यावेळी सेड्रिक फर्नांडिस, विदीत तिवारी व केनेथ फर्नांडिसने पासिंगचा सुरेख खेळ केला. या सामन्यात दोन्ही संघांतील खेळाडूंनी आक्रमक खेळाबरोबरच दांडगाईचा खेळ केल्याने 42 व्या मिनिटास पंच सुशील जोसेफ यांनी शिवाजीयन्सच्या रूबेन ऍन्थनी, तर रेंजहिल्सच्या इलियस नायडू व विकी पिल्लेला लाल कार्ड दाखवून बाहेर काढले. जाएन्ट्‌स क्‍लबने के.पी.

पुणे मॅरेथॉन यंदा २५ हजार झाडे लावणार

Sports News - Sun, 2010-06-06 19:40

पुणे - यंदाच्या वर्षी रौप्यमहोत्सवी वर्ष साजरे करणाऱ्या पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन ट्रस्टच्या वतीने यंदा 25 हजार झाडे लावण्याचा संकल्प सोडला आहे. सामाजिक बांधिलकीच्या नात्यातून हा निर्णय घेण्यात आला असून, केवळ शहरातच नाही तर महाराष्ट्रभर ते हा उपक्रम राबवणार आहेत. या संकल्पनास पुणे मॅरेथॉनच्या वतीने नुकतीच पर्यावरण दिनी सुरवातदेखील केली. या उपक्रमात पुणे महानगरपालिका संपूर्ण सहाय्य करणार असल्याचे पालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष अरविंद शिंदे यांनी सांगितले. ऑलिंपियन धावपटू बाळकृष्ण अकोटकर आणि विविध आंतरराष्ट्रीय खेळाडूंच्या हस्ते हा वृक्षारोपणाचा कार्यक्रम नुकताच पार पडला. या वेळी शिक्षण मंडळ अध्यक्षा संगीता तिवारी, उपायुक्त भानुदास माने आणि ट्रस्टचे विश्‍वस्त अभय छाजेड आदि मान्यवर उपस्थित होते.