Feed aggregator


संशयित खेळाडूंना दूरच ठेवा - आफ्रिदी

Sports News - Sun, 2010-09-05 20:40

कार्डिफ -&nbsp एकदिवसीय सामन्यांसाठी पाकिस्तानचा कर्णधार शाहीद आफ्रिदी याने रविवारी "फिक्‍सिंग' प्रकरणाबाबत प्रथमच कडवट प्रतिक्रिया व्यक्त केली. तो म्हणाला, ""मालिका आणि संघाचे हित लक्षात घेता सलमान बट्ट, महंमद आसिफ, महंमद आमीर या तिघा संशयित खेळाडूंना ड्रेसिंगरूमच्या आसपासही फिरकू दिले जाऊ नये.'' या "फिक्‍सिंग' प्रकरणात या तिघा खेळाडूंची स्कॉटलंड यार्ड पोलिसांनी चौकशी केली होती. या प्रकरणात आज आणखी एका खेळाडूचे नाव असल्याचा दावा केला जात असला तरी इंग्लंडविरुद्धची मालिका पूर्वनियोजित वेळेप्रमाणे होणार असून, आम्ही कठिण परिस्थितीमधून जात आहोत. अशा वेळी या परिस्थितीचा सामनाही करत आहोत.आमच्या प्रत्येकासाठी इंग्लंड मालिका खूप महत्त्वाची आहे. सर्व खेळाडूंच्या नजरा त्याकडेच आहेत.'' एकदिवसीय मालिकेसाठी इंग्लंडमध्ये आल्यापासून आफ्रिदीने स्वतःला या प्रकरणापासून दूर ठेवले होते. ट्‌वेंटी-20 मालिकेसाठी पाकिस्तान संघ कार्डिफमध्ये हजर झाला तेव्हा त्याने प्रथमच त्या तीन खेळाडूंच्या वतीने क्रिकेट रसिकांची माफी मागितली. तो म्हणाला,""या खेळाडूंनी काय केले ?, काय केले नाही हे चौकशीत समोर येईल पण सध्या तरी ते दोषी आहेत.

संशयित खेळाडूंना दूरच ठेवा - आफ्रिदी

Latest News - Sun, 2010-09-05 20:40

कार्डिफ -&nbsp एकदिवसीय सामन्यांसाठी पाकिस्तानचा कर्णधार शाहीद आफ्रिदी याने रविवारी "फिक्‍सिंग' प्रकरणाबाबत प्रथमच कडवट प्रतिक्रिया व्यक्त केली. तो म्हणाला, ""मालिका आणि संघाचे हित लक्षात घेता सलमान बट्ट, महंमद आसिफ, महंमद आमीर या तिघा संशयित खेळाडूंना ड्रेसिंगरूमच्या आसपासही फिरकू दिले जाऊ नये.'' या "फिक्‍सिंग' प्रकरणात या तिघा खेळाडूंची स्कॉटलंड यार्ड पोलिसांनी चौकशी केली होती. या प्रकरणात आज आणखी एका खेळाडूचे नाव असल्याचा दावा केला जात असला तरी इंग्लंडविरुद्धची मालिका पूर्वनियोजित वेळेप्रमाणे होणार असून, आम्ही कठिण परिस्थितीमधून जात आहोत. अशा वेळी या परिस्थितीचा सामनाही करत आहोत.आमच्या प्रत्येकासाठी इंग्लंड मालिका खूप महत्त्वाची आहे. सर्व खेळाडूंच्या नजरा त्याकडेच आहेत.'' एकदिवसीय मालिकेसाठी इंग्लंडमध्ये आल्यापासून आफ्रिदीने स्वतःला या प्रकरणापासून दूर ठेवले होते. ट्‌वेंटी-20 मालिकेसाठी पाकिस्तान संघ कार्डिफमध्ये हजर झाला तेव्हा त्याने प्रथमच त्या तीन खेळाडूंच्या वतीने क्रिकेट रसिकांची माफी मागितली. तो म्हणाला,""या खेळाडूंनी काय केले ?, काय केले नाही हे चौकशीत समोर येईल पण सध्या तरी ते दोषी आहेत.

पाकिस्तानी क्रिकेटपटू नव्हे, हे तर "फिक्‍सर'

Sports News - Sun, 2010-09-05 20:31

लंडन - क्रिकेट विश्‍वात खळबळ उडवून देणारे पाकिस्तानी क्रिकेटपटूंचे "स्पॉट फिक्‍सिंग' प्रकरण रोज वेगळे वळण घेत आहे. पहिल्यांदा संशयाच्या घेऱ्यात आलेल्या तिघा खेळाडूंना सोडून देण्यात आल्यानंतर पोलिसांनी चौथ्या पाकिस्तानी क्रिकेटपटूची चौकशी केली. त्याच वेळी ""पाकिस्तानी क्रिकेटपटू नव्हे, तर "फिक्‍सर' आहेत. ते प्रत्येक सामना "फिक्‍स' करण्यासाठी उत्सुक असायचे,'' असा गौप्यस्फोट सलामीचा फलंदाज यासीर हमीद याने रविवारी केला. "फिक्‍सिंग'चे नवे प्रकरण उघडकीस आणणाऱ्या "न्यूज ऑफ दि वर्ल्ड' दैनिकाने पाकिस्तानी खेळाडूंचा नाकर्तेपणा सांगणारी आणखी काही उदाहरणे दिली आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा पाकिस्तानी क्रिकेट संकटात सापडले. ""एका बुकीने मला एक लाख पौंड देऊन कसोटी सामना "फिक्‍स' करण्यासाठी मदत करण्याचे आवाहन केले होते. मात्र, आपण त्याला हाकलून दिले. या प्रकरणात जे खेळाडू चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहेत, त्यांचा प्रत्येक सामना "फिक्‍स' करण्यासाठी प्रयत्न असायचा. विशेष म्हणजे स्कॉटलंड यार्ड पोलिस कायम त्यांच्या मागे असायचे.

पाकिस्तानी क्रिकेटपटू नव्हे, हे तर "फिक्‍सर'

Latest News - Sun, 2010-09-05 20:31

लंडन - क्रिकेट विश्‍वात खळबळ उडवून देणारे पाकिस्तानी क्रिकेटपटूंचे "स्पॉट फिक्‍सिंग' प्रकरण रोज वेगळे वळण घेत आहे. पहिल्यांदा संशयाच्या घेऱ्यात आलेल्या तिघा खेळाडूंना सोडून देण्यात आल्यानंतर पोलिसांनी चौथ्या पाकिस्तानी क्रिकेटपटूची चौकशी केली. त्याच वेळी ""पाकिस्तानी क्रिकेटपटू नव्हे, तर "फिक्‍सर' आहेत. ते प्रत्येक सामना "फिक्‍स' करण्यासाठी उत्सुक असायचे,'' असा गौप्यस्फोट सलामीचा फलंदाज यासीर हमीद याने रविवारी केला. "फिक्‍सिंग'चे नवे प्रकरण उघडकीस आणणाऱ्या "न्यूज ऑफ दि वर्ल्ड' दैनिकाने पाकिस्तानी खेळाडूंचा नाकर्तेपणा सांगणारी आणखी काही उदाहरणे दिली आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा पाकिस्तानी क्रिकेट संकटात सापडले. ""एका बुकीने मला एक लाख पौंड देऊन कसोटी सामना "फिक्‍स' करण्यासाठी मदत करण्याचे आवाहन केले होते. मात्र, आपण त्याला हाकलून दिले. या प्रकरणात जे खेळाडू चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहेत, त्यांचा प्रत्येक सामना "फिक्‍स' करण्यासाठी प्रयत्न असायचा. विशेष म्हणजे स्कॉटलंड यार्ड पोलिस कायम त्यांच्या मागे असायचे.

'अभाविप'च्या विजयाने भाजपमध्ये आनंद

Latest News - Sun, 2010-09-05 20:25

नवी दिल्ली -&nbsp दिल्लीच्या राजकारणाची रंगीत तालीम मानल्या जाणाऱ्या दिल्ली विश्‍वविद्यालयाच्या निवडणुकांमध्ये भाजपप्रणित "अखिल भारतीय विद्यार्थी परिषदे'ने जोरदार पुनरागमन करीत कॉंग्रेसच्या "एनएसयूआय'कडून चारपैकी तीन जागा हिसकावून घेतल्या आहेत. यामुळे भाजपमध्ये आनंदाचे वातावरण आहे. कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी जातीने लक्ष घातल्याने यंदाच्या निवडणुका प्रतिष्ठेच्या बनल्या होत्या. ""हे निकाल म्हणजे कॉंग्रेसच्या "खानदानी प्रिन्स'ला मिळालेला धडा आहे. असे नेतृत्व देशावर लादू पाहणाऱ्या कॉंग्रेसने त्यापासून बोध घ्यावा, ही अपेक्षा आहे,'' अशा शब्दांत भाजपने आपली प्रतिक्रिया दिली आहे. दिल्लीत गेल्या दोन विधानसभा निवडणुकांमध्ये पराभूत झालेल्या भाजपने "अभाविप'च्या माध्यमातून यंदाच्या निवडणुकीत जोर लावला होता. राष्ट्रकुल स्पर्धांतील महाघोटाळ्यासारख्या मुद्यांवर त्यांच्या प्रचाराचा रोख होता. स्वतः राहुल यांनी लक्ष घातल्याने "एनएसयूआय'नेही प्रचारात सर्वस्व ओतले होते. राहुल व प्रियंका गांधी हे दोघेही याच विश्‍वविद्यापीठाचे (सेंट स्टीफन्स महाविद्यालय) माजी विद्यार्थी आहेत.

एसटी महामंडळात भत्ता मिळतो पाच रुपये

Latest News - Sun, 2010-09-05 20:17

झपाट्याने बदलणाऱ्या काळात तग धरून राहण्यासाठी "कार्पोरेट कल्चर' आत्मसात करण्यास सुरवात केलेल्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात मोठे बदल होत आहेत. मात्र, या महामंडळाचा महत्त्वाचा कणा असलेल्या बसचालक आणि वाहकांना आजही एखाद्या गावी मुक्कामाकरिता केवळ पाच रुपये निवास भत्ता देण्यात येतोय. कधी बदलणार ही परिस्थिती ? संपूर्ण महाराष्ट्राची आणि त्यामध्ये राहणाऱ्या लोकांची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या एसटी बसच्या चालक आणि वाहकांना आजही मुक्कामी असलेल्या गावात एसटी बसच्या टपावर झोपून रात्र काढावी लागते. एवढेच नव्हे तर आजच्या परिस्थितीत जिथे पाच रुपयाला एक कप चहाही मिळत नाही, तिथे त्यांना पाच रुपये एका दिवसाचा मुक्काम खर्च देण्यात येतो. त्यामुळे संपूर्ण राज्यातील 50 हजार चालक, वाहक या भत्त्यामध्ये वाढ होण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून वाट पाहत आहेत परंतु महामंडळ तोट्यात असल्याचे कारण पुढे करीत त्यांच्या मागण्यांना नेहमीच केराची टोपली दाखविण्यात येते. असा मिळतो मुक्कामाचा भत्ता एसटीची बस म्हटलं की प्रत्येक खेड्यापाड्यातून अगदी पहाटेपासून तिची सेवा उपलब्ध असते.

"साम'ची बातमीपत्रे आजपासून नव्या रूपात

Latest News - Sun, 2010-09-05 20:10

मुंबई&nbsp &nbsp -&nbsp छोट्या पडद्यावरील करमणूक क्षेत्रात जोमाने वाटचाल करीत असलेल्या साम मराठी वाहिनीची नव्या रूपातील बातमीपत्रे सोमवारपासून (ता. 6 सप्टेंबर) सुरू होत आहेत. माहिती, ज्ञान आणि मनोरंजन यांचा खजिना या नव्या ढंगातील बातमीपत्रांतून उलगडणार आहे. सकाळी सातपासून सुरू होणारी ही सफर थेट रात्रीपर्यंत आपल्याला आवडीच्या विषयांची माहिती अपडेट करण्यासाठी मदत करणार आहे. &nbsp केवळ बातमी नव्हे तर त्या पलीकडच्या घडामोडी मराठी प्रेक्षकांसमोर आणण्याचा साम मराठी वाहिनीने सातत्याने प्रयत्न केला आहे. या बातमीपत्रांची आखणी करीत असताना समाजाच्या सर्व घटकांचा विचार करण्यात आला आहे. आम्हाला काय द्यायला आवडते, यापेक्षा लोकांना काय आवडते याचा विचार करून ही बातमीपत्रे आखण्यात आली आहेत. महिला, युवक वर्ग, राजकारणाची आवड असणारे लोक, संगीत-कला नाट्याची आवड जपणारे, बॉलिवूडचा विषय जवळिकीने पाहणारे, लाइफस्टाइलचा वेध घेत स्वतःची लाइफस्टाइल ठरविणारे अशा सर्वांनाच या बातमीपत्रांमधून आपल्याला हवे ते मिळेल. माणसाची उत्सवप्रियता लक्षात घेऊन विविध सण-उत्सवांच्या काळात साम मराठी वाहिनीतर्फे विशेष बातमीपत्रे सादर केली जातील.

शारापोवा-वॉझ्नियाकी लढत रंगतदार ठरणार

Sports News - Sun, 2010-09-05 20:10

न्यूयॉर्क -&nbsp अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत उद्या होणाऱ्या प्रथम मानांकित कॅरोलिन वाझ्नियाकी आणि मारिया शारापोवा यांच्यातील चौथ्या फेरीच्या लढतीकडे सर्वांचे लक्ष असेल. काल या दोघींनी सहजपणे विजय नोंदवीत चौथ्या फेरीत प्रवेश केला. पुरुष एकेरीत रॉजर फेडरर आणि रॉबिन सॉडर्लिंग यांनी आगेकूच केली. या दोघांची वाटचालही उपांत्यपूर्व फेरीत एकमेकांसमोर उभे ठाकण्याच्या दिशेने झाली आहे. शारापोवा आणि वॉझ्नियाकी यांच्यातील सामन्याकडे "ड्रीम' लढत म्हणून बाघितले जात आहे. काल या दोघींनी तिसऱ्या फेरीतील सामना अवघ्या 73 मिनिटांत जिंकला. शारापोवाने अमेरिकेच्या ब्यूट्रिका कोप्रा हिला 6-0, 6-0 असे हरविले, तर डेन्मार्कच्या वॉझ्नियाकीने तैवानच्या चान यंग यान हिला 6-1, 6-0 असे पराभूत केले. गेल्या चार वर्षांत शारापोवाने प्रथमच या स्पर्धेच्या शेवटच्या सोळा खेळाडूंत स्थान मिळविले आहे. तिने प्रतिस्पर्धी खेळाडूला साफ निष्प्रभ केले. रशियाच्या या खेळाडूने 2006 मध्ये ही स्पर्धा जिंकली होती. काल जोरदार वारे वाहत असताना शारापोवा आणि वॉझ्नियाकी यांनी केलेला खेळ तितकाच जोरदार होता.

शिक्षकांनी मुलांचे आकाश व्यापक करावे - राष्ट्रपती

Latest News - Sun, 2010-09-05 20:10

नवी दिल्ली -&nbsp लहान मुलांना चांगले व संस्कारित शिक्षण देणे, ही राष्ट्राची दीर्घकाळाची गुंतवणूक असते. त्यामुळे शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या मनावर "हे विश्‍वचि माझे घर' ही शिकवण लहान वयातच बिंबवावी व त्यांचे आकाश व्यापक करावे, असे आवाहन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी आज केले. शिक्षक दिनानिमित्त देशातील 374 आदर्श शिक्षकांना येथील विज्ञान भवनात राष्ट्रपतींच्या हस्ते गौरविण्यात आले. पुरस्कारप्राप्त शिक्षकांमध्ये महाराष्ट्राने आघाडी घेतली असून, या वर्षी राज्यातील 28 शिक्षकांना राष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. त्यात 16 शिक्षिकांचाही समावेश आहे. राष्ट्रपतींनी या वेळी बोलताना शिक्षणाच्या प्रसाराबरोबरच वैश्‍विक जाणिवा समृद्ध करण्याच्या कालसुसंगत शिक्षण पद्धतीचा अवलंब करण्यावर भर दिला. मनुष्यबळ विकासमंत्री कपिल सिब्बल, राज्यमंत्री पुरंदरेश्‍वरी, देवीसिंह शेखावत आदी उपस्थित होते. दरम्यान, या शिक्षकांनी काल (ता. 4) पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांची भेट घेतली. पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांना क्रूरपणे शिक्षा करण्याबाबत नापसंती व्यक्त केली.

"वर्षा'वर धमकी देणाऱ्याकडे "व्हीआयपीं'चे नंबर्स

Latest News - Sun, 2010-09-05 20:10

मुंबई&nbsp -&nbsp मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी धमकीचा फोन केल्याप्रकरणी अटक केलेल्या अब्दुल गनी शहाकडे अनेक वरिष्ठ अधिकारी व मंत्र्यांचे दूरध्वनी क्रमांक आढळले आहेत. याबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती दहशतवादी विरोधी पथकाचे प्रमुख राकेश मारिया यांनी आज दिली. धमकी देण्यासाठी वापरलेल्या मोबाईलचे सीमकार्ड शाहने यादव या नावाच्या बनावट कागदपत्रांद्वारे खरेदी केल्याचेही उघड झाले आहे. मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या "वर्षा' या निवासस्थानी फोन करून आपण अल्‌ कायदाचा सदस्य असल्याची बतावणी करणाऱ्या शाह याला कालच (ता. 4) "एटीएस'च्या मुंबई व नाशिक येथील तुकड्यांनी मालेगाव येथून अटक केली. तपासणीत त्याच्याकडील फोन डायरीमध्ये अनेक राज्यांतील अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचे व मंत्र्यांचे दूरध्वनी क्रमांक आढळले आहेत. त्याने याआधीही काही उच्चपदस्थांना फोन करून धमकावल्याचे पुढे येत आहे. याबाबत सध्या तपास सुरू आहे. अधिक चौकशीसाठी त्याची पोलिस कोठडी मागण्यात आली आहे. दरम्यान, त्याच्याकडे एकूण आठ सीमकार्ड सापडले आहेत. ते बनावट कागदपत्रांद्वारे मिळविण्यात आल्याची माहिती मारिया यांनी दिली.

दुहेरीत सानिया पेसची सहकारी

Sports News - Sun, 2010-09-05 19:55

नवी दिल्ली -&nbsp भारताचा दुहेरीतील अव्वल खेळाडू लिअँडर पेस राजधानी नवी दिल्लीत होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत मिश्र दुहेरीत सानिया मिर्झाच्या साथीत खेळेल. मिश्र दुहेरीत सानिया आंतरराष्ट्रीय स्पर्धेत महेश भूपतीच्या साथीत खेळते. मात्र, राष्ट्रकुलसाठी संघ रचना पाठविण्यासाठी तीन सप्टेंबरची मर्यादा ठेवण्यात आल्याने भारतीय टेनिस महासंघाने एटीपी मानांकनानुसार निर्णय घेतल्याचा दावा केला. पेस आणि त्याचा एकवेळचा साथीदार महेश भूपती यांच्या एटीपी मानांकनात अगदी थोडासा फरक आहे. त्यामुळे हा निर्णय घेणे खूप कठीण असल्याचेही महासंघाने स्पष्ट केले. भूपतीने सानियाच्या साथीत 2009मध्ये ऑस्ट्रेलियन स्पर्धा जिंकली होती. पेसने सानियाच्या साथीत 2006 दोहा आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते. नव्या क्रमवारीत दुहेरीत पेस सहाव्या, तर भूपती सातव्या स्थानावर आहेत. या एकाच अंतराच्या फरकाने सानियाच्या साथीदाराचा निर्णय घेण्यात आला.

औषधांची नशा, करी जीवनाची दुर्दशा

Latest News - Sun, 2010-09-05 19:55

नितीन चव्हाण&nbsp - सकाळ वृत्तसेवा मुंबई - कुणाला दारूचा पेग रिचविल्याशिवाय "झोप' येत नाही, तर कुणाला सिगारटेचा एक झुरका तर कुणाला तंबाखू दाढेत ठेवल्याबिगर "किक' बसत नाही. गांजा, चरस, अफू, मॉर्फिन, फ्रेंच पॉलिश... नादखुळेपणाची अशी अनेक व्यसने आहेत. ही यादी अजून लांबविता येईल. औषधांमार्फत केले जाणारे "नशापाणी' हा या व्यसनांतील आणखी एक प्रकार आहे. नशेच्या झोकात "हर फिक्र को मैं धुए मे उडाता चला गया...' असे म्हटले तरी आयुष्यच संपवून टाकणारे हे व्यसन आहे. गेल्या काही वर्षांत हे व्यसन समाजात मोठ्या प्रमाणात वाढत असून वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनीही याला दुजोरा दिला आहे. ज्यांना बारमध्ये जाऊन महागडी इंग्लिश दारू ढोसणे परवडत नाही ते "गावठी' किंवा "देशी'च्या वाटेला लागतात, असे म्हणतात. या दोन्ही वर्गांतील दारू पिणारे अथवा कोणत्याही नशेचे एकदा पक्के "नशाबाज' झाले, की या पारंपरिक नशा कमी वाटायला लागतात. मग शोध सुरू होतो अधिक कडक आणि दमदार नशेतून "धुंदी' मिळविण्याचा. गेल्या काही वर्षांमध्ये खोकल्याच्या, झोपेच्या आणि वेदनाशामक औषधांतून नशा मिळविण्याचे प्रमाण वाढत असल्याचे आढळून आले आहे.

"महानिर्मिती'ची यंत्रणा पोखरली जातेय

Latest News - Sun, 2010-09-05 19:55

मुंबई&nbsp -&nbsp वीजनिर्मिती संचांत वारंवार होणारा बिघाड व त्यामुळे क्षमतेपेक्षा खूपच कमी होणारी वीजनिर्मिती यावर उपाययोजना करण्याबाबत अनेकदा चर्चा व निर्णय होऊनही "महानिर्मिती'च्या प्रकल्पांच्या कामगिरीत सुधारणा होत नसल्याने खुद्द कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आणि ऊर्जा सचिव सुब्रत रथो यांनी "महानिर्मिती'च्या कामगिरीवर तीव्र नाराजी व्यक्‍त करत ढिसाळ कारभाराची कठोर शब्दांत झाडाझडती घेतली आहे. आपली यंत्रणा आणि यंत्रसामग्री "पोखरली' जात असल्याचा इशाराही रथो यांनी दिला आहे. "महानिर्मिती'च्या सृजन या गृहपत्रिकेच्या जुलै-ऑगस्ट या कालावधीसाठी नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या अंकाच्या "मनोगत'मध्ये श्री. रथो यांनी कंपनीच्या कामगिरीचा आणि त्यातील ढिसाळ कारभाराचा चांगलाच समाचार घेतला आहे. "महानिर्मिती'ची कार्यसंस्कृती व कार्यक्षमता सुधारावी, या हेतूने रथो यांनी या मनोगतामध्ये वारंवार होणारे "बॉयलर ट्यूब लिकेज', कोळसाचोरी, संच पूर्ण क्षमतेच्या आसपासही न चालणे अशा मुद्द्यांवर भाष्य करत "महानिर्मिती'ला "घरचा आहेर' दिला आहे. आजघडीला "महानिर्मिती'चा एकही संच क्षमतेच्या आसपासही वीजनिर्मिती करत नाही.

रिझर्व्ह बॅंक गव्हर्नरांचा पगार सव्वा लाख

Latest News - Sun, 2010-09-05 19:55

मुंबई&nbsp -&nbsp दोनच महिन्यांपूर्वी खासगी बॅंकप्रमुखांच्या गलेलठ्ठ पगारावर आक्षेप घेणाऱ्या भारतीय रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर डी. सुब्बराव यांना यंदाच्या जूनमध्ये सव्वा लाख रुपये वेतन मिळाले असून, राष्ट्रीयीकृत बॅंकप्रमुखांनीही यापेक्षा अधिक वेतन या कालावधीत उचलले आहे. भारतीय रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर डी. सुब्बराव यांनी जुलैमध्ये खासगी बॅंकांचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच संचालक यांच्या वेतनावर आक्षेप घेत बिकट वित्तीय स्थितीत 10 ते 15 टक्के कमी वेतन घ्यावे, असेही सुचवले होते. माहितीच्या अधिकार कायद्यानुसार रिझर्व्ह बॅंकेकडूनच मिळालेल्या आकडेवारीनुसार, यंदाच्या जूनमध्ये त्यांनी 1 लाख 28 हजार 500 रुपये पगार घेतला होता. म्हणजेच सुब्बराव यांचे एका वर्षातील वेतन 15 लाख रुपयांपेक्षा अधिक आहे. त्यांच्या वेतनाच्या तुलनेत मध्यवर्ती बॅंकेच्या चार डेप्युटी गव्हर्नरांना प्रत्येकी एक लाख 15 हजार 500 रुपये महिना वेतन आहे, तर सात कार्यकारी संचालकांना जूनमध्ये प्रत्येकी 90 हजार 271 रुपये वेतन अदा करण्यात आले आहेत.

गोविंदाच्या मृत्यूमुळे ठाणे हादरले!

Latest News - Sun, 2010-09-05 19:55

ठाणे -&nbsp दहीहंडीच्या मानवी मनोऱ्यात चौथ्या थरावर राहून वरील थरांचा भार पेलणाऱ्या आणि त्यात दुखापत झालेल्या एका गोविंदाचे आकस्मिक निधन झाल्याने दहीहंडीची नगरी म्हणून नावारूपाला आलेले ठाणे हादरले आहे. ज्ञानेश्‍वरनगर येथील ओमसाई मित्रमंडळाचा किशोर कांबळे (वय 25) याचा थरावरून पडून झालेल्या दुखापतीने मृत्यू झाल्याने सर्व थरातून हळहळ व्यक्त होत आहे. अल्प उत्पन्न असलेल्या कुटुंबातील कर्तासवरता युवक अशा प्रकारे अचानक गेल्याने कांबळे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. दहीहंडीच्या मानवी मनोऱ्यात चौथ्या थरावरील आधार होताना किशोर दोन वेळा कोसळला होता. यादरम्यान त्याला दुखापत होऊन छातीत रक्त साकाळल्याची शक्‍यता व्यक्त होत आहे पण ही दुखापत त्याने सर्वांपासून लपविल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची शक्‍यता व्यक्त होत आहे. किशोर कांबळे हा ज्ञानेश्‍वरनगर येथील संत रोहिदास चाळीत आईवडील आणि तीन भावंडांसह राहत होता. सर्वांबरोबर मिळून मिसळून वागणारा किशोर गोविंदा पथकामध्येही पुढे होता. परिसरातील सर्व तरुणांनी एकत्र येऊन अजय सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली "ओम साई गोविंदा पथका'ची स्थापना केली होती.

मनोमीलन चळवळीकडे राजची पाठ

Latest News - Sun, 2010-09-05 19:55

मुंबई&nbsp -&nbsp महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या मनोमीलनासाठी सुरू झालेल्या प्रयत्नांत आज दोन्ही बंधूंनी कोलदांडा घातला. त्यामुळे मनोमीलनाचा संदेश घेऊन आज "कृष्णकुंज' व "मातोश्री'वर गेलेल्या कार्यकर्त्यांची मने काहीशी खट्टू झाली. लेखी पूर्वकल्पना देऊनही राज यांनी घरी न राहणेच पसंत केले. दुसरीकडे उद्धव यांनी मात्र कार्यकर्त्यांची भेट घेतली मात्र त्यांचे निवेदन स्वीकारण्यास नकार दिला. शिवसेना-"मनसे'तील दुहीमुळे हतबल झालेल्यांनी "माझी चळवळ, मी महाराष्ट्राचा' याअंतर्गत आज सकाळी शिवाजी पार्क येथील स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याला हार घालून मूकमोर्चा काढला. राज व उद्धव यांनी महाराष्ट्राच्या हितासाठी पुन्हा एकत्र यावे, यासाठी शिवाजी पार्क येथे स्वाक्षरी मोहीमही राबविण्यात आली. त्यास शेकडोच्या संख्येने उपस्थित राहून नागरिकांनी चांगला प्रतिसादही दिली. विशेष म्हणजे मोर्चाला ज्येष्ठ शिवसैनिकांची उपस्थितीही लक्षणीय होती.

इंग्लंड, अर्जेंटिना उपांत्य फेरीत दाखल

Sports News - Sun, 2010-09-05 19:40

रोझारियो (अर्जेंटिना (रॉयटर्स)&nbsp - अर्जेंटिना आणि इंग्लंडने महिलांच्या विश्‍वकरंडक हॉकी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. "ब' गटात या संघांनी पहिले दोन क्रमांक मिळविले असून त्यांच्यातील लढतीनंतर गटातील विजेता संघ ठरेल. अर्जेंटिनाने काल चीनचा 2-0 असा पराभव केला. त्यांचे बारा गुण झाले आहेत. इंग्लंडने दक्षिण आफ्रिकेवर 2-1 असा विजय नोंदविला. चीनविरुद्धच्या सामन्यात अर्जेंटिनाकडून नोएल बॅर्रिओन्यूव्हो आणि कर्णधार ल्युसिना आयमार यांनी गोल केले. हेलेन रिचर्डसन हिने केलेल्या दोन गोलमुळे इंग्लंडला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध विजय मिळविता आला. दक्षिण आफ्रिकेचा एकमेव गोल पेटी कोएत्झी हिने नोंदविला.

थॉमस यांची नियुक्ती घटनाविरोधी - भाजप

Latest News - Sun, 2010-09-05 19:40

नवी दिल्ली -&nbsp स्पेक्‍ट्रम गैरव्यवहार लपविण्यासाठी सरकारने केंद्रीय दक्षता आयोगाच्या (सीव्हीसी) प्रमुखपदी थॉमस यांची नियुक्ती केल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाने केला आहे. थॉमस यांची नियुक्ती हे घटनात्मक तरतुदींचे उल्लंघन आहे. या महत्त्वाच्या पदावरील व्यक्तीच्या निवडीसंदर्भात संसदेच्या विरोधी पक्षनेत्यांचे मत नोंदवून घेतले जात नसेल, तर त्यांना बैठकीला बोलावण्यात काय अर्थ आहे, असा संतप्त प्रश्‍नही भाजपने केला आहे. "सीव्हीसी' प्रमुख पदावरील व्यक्तीची नियुक्ती करण्यासाठी पंतप्रधान, गृहमंत्री व विरोधी पक्षनेते यांची बैठक घेण्याचा संकेत आहे. यासाठी शनिवारी (ता. 4) झालेल्या बैठकीत थॉमस यांचे नाव येताच स्वराज यांनी त्यास आक्षेप घेतला. दूरसंचार विभागाच्या सचिवपदी असलेल्या अधिकाऱ्याची नियुक्ती केल्याने स्पेक्‍ट्रम गैरप्रकाराच्या चौकशीवर त्याचा थेट परिणाम होईल, असा भाजपचा दावा आहे. सरकारने सुचविलेल्या तीन नावांपैकी थॉमस वगळता विजय चटर्जी व कृष्णन या दोन ज्येष्ठ अधिकाऱ्यांची नेमणूक करा, असे स्वराज यांनी सुचविले.

ग्रामपंचायत निवडणुकांची राज्यभरात आज मतमोजणी

Latest News - Sun, 2010-09-05 19:40

मुंबई&nbsp -&nbsp राज्यात 1,920 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी आज मतदान झाले. काही ठिकाणी पावसाच्या हजेरीत मतदारांनी आपला हक्क बजावला. मतमोजणी उद्या (ता. 6) होणार आहे. दरम्यान, 256 ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत. पाच ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी कोणीच उमेदवारी अर्ज दाखल केले नाहीत. 12 सप्टेंबर ते 31 ऑक्‍टोबर या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींसाठी या निवडणुका झाल्या. &nbsp

आदिवासी झाला जमीनदार!

Latest News - Sun, 2010-09-05 19:40

पनवेल - स्वातंत्र्योत्तर काळात कंदमुळे खाऊन दिवस ढकलण्याची वेळ आदिवासींवर आली. मोहाची दारू पिऊन भूक मारून आदिवासी जगत आहेत. एकेकाळी जंगलचा राजा असलेला वनवासी दीनदुबळा झाला आहे. पण आता त्याच्या पायाखालची जमीन त्याची होत आहे. सामाजिक संघटनांनी सरकारदरबारी हा विषय लावून धरून, जनजागृती करून अखेर या वनवासींना पुन्हा जमीन मिळवून देण्याचा मार्ग मोकळा केला आहे. पनवेल प्रांत कार्यालयाच्या कक्षेत असलेल्या पनवेल, खालापूर, कर्जत व उरण येथील 700 आदिवासींना अखेर आपली हक्काची जमीन मिळाली आहे. येथील एकूण चार हजार 47 वनहक्क दावे जिल्हा वनहक्क समितीने निकाली काढले आहेत. त्यापैकी 700 दाव्यांना मंजुरी मिळाली आहे त्यामुळे हे जंगलचे राजे आनंदित झाले आहेत. या खातेदारांना तारा येथील युसूफ मेहेर अली सेंटरमध्ये झालेल्या समारंभात आमदार हुसेन दलवाई व प्रांताधिकारी पांडुरंग मगदूम यांच्या हस्ते जमिनीच्या प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी "आयटीडीपी'चे प्रकल्प अधिकारी भालेकर, उपप्रकल्प अधिकारी जैन, युसूफ मेहेर अली सेंटरचे सचिव गौरांग पुतळी, संचालक मधू मोहिते, आदिवासींसाठी झटणारे सामाजिक कार्यकर्ते मधू पाटील उपस्थित होते.