Feed aggregator


तरुणाने १० हजार गमावले मात्र डॉक्‍टर महिला बचावली

Latest News - Sun, 2010-09-05 19:40

औरंगाबाद - लॉटरीचे तिकीट न घेताच एका महिला डॉक्‍टरला 5 लाख पॉण्डची लॉटरी लागल्याचे प्रमाणपत्र घरपोच मिळाले तर दुसऱ्या एका तरुणाला मोबाईलवर "एसएमएस'द्वारे 15 लाख रुपयांची लॉटरी लागली असून, बॅंकेच्या खात्यावर रक्‍कम जमा करण्यास सांगण्यात आले. महिला डॉक्‍टरला शंका आल्याने तातडीने पोलिसात धाव घेतली मात्र तरुणाने दहा हजार रुपये गमावल्यानतंर पोलिस ठाण्यात धाव घेतली! यामुळे त्याची आणखी होणारी लुबाडणूक थांबली. ही घटना उस्मानपुरा पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. गुन्हे शाखेच्या सायबर सेलमधून या दोघांना प्राप्त झालेल्या मोबाईल क्रमांकाचे लोकेशन घेतले असता, तो क्रमांक पाकिस्तानमधील असल्याचे समोर आले आहे.&nbsp याबाबत अधिक माहिती अशी की, महूनगर येथील रहिवासी राजेश वानखेडे यांच्या मोबाईल क्रमांकावर पंधरा वीस दिवसांपूर्वी एक "एसएमएस' आला की, "तुम्हाला 15 लाखांची लॉटरी लागली आहे, पुढील बाबींची पूर्तता करावी' हा संदेश वाचल्यानंतर राजेश वानखेडे आनंदित झाला.

वाटचाल एका शैक्षणिक चळवळीची(व्हिडिओ)

Latest News - Sun, 2010-09-05 18:07

देशातील प्रमुख विद्यापीठांच्या कुलगुरुंसमवेत विद्यापीठांमधील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्यासाठी आयोजित केलेल्या सभेचे हे सहावे वर्ष, म्हणजे अर्धे तप झाले. यानिमित्ताने "सकाळ'तर्फे आयोजित केलेल्या 'एज्युकॉन' उपक्रमाचे अवलोकन करणे सार्थ होईल, असे वाटते. दर वर्षी आपण वेगवेगळ्या ठिकाणी, वेगळ्या देशांत ही सभा घेतो. त्यानिमित्ताने नवीन देशांचाही काही प्रमाणात परिचय होतो. साहजिकच आपण आपल्या देशांत काय करायला हवे, काय नको, आंतरराष्ट्रीय स्पर्धेचा दृष्टीकोन याचे आपोआपच विवेचन होते. श्रीलंकेत नुकत्याच झालेल्या एज्युकॉन 2010 चर्चासत्राच्या सुरवातीलाच असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीजचे उपाध्यक्ष डॉ. पंकज चांदे यांनी विद्यापीठांची संकल्पना भारतात हजारो वर्षांपासून असल्याचे सांगत आपल्याला आंतरराष्ट्रीय दर्जा पुन्हा गाठायचा आहे याची जाणीव करून दिली. आपल्या देशात नालंदा विद्यापीठाच्याही अगोदर कौंडिण्यपूर हे योगाचा अभ्यास करणारे विद्यापीठ तर गुणशीला हे फक्त महिलांसाठीचे विद्यापीठाही होते अशी माहिती दिली.

वाटचाल एका शैक्षणिक चळवळीची(व्हिडिओ)

Latest News - Sun, 2010-09-05 14:44

देशातील प्रमुख विद्यापीठांच्या कुलगुरुंसमवेत विद्यापीठांमधील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्यासाठी आयोजित केलेल्या सभेचे हे सहावे वर्ष, म्हणजे अर्धे तप झाले. यानिमित्ताने "सकाळ'तर्फे आयोजित केलेल्या 'एज्युकॉन' उपक्रमाचे अवलोकन करणे सार्थ होईल, असे वाटते. दर वर्षी आपण वेगवेगळ्या ठिकाणी, वेगळ्या देशांत ही सभा घेतो. त्यानिमित्ताने नवीन देशांचाही काही प्रमाणात परिचय होतो. साहजिकच आपण आपल्या देशांत काय करायला हवे, काय नको, आंतरराष्ट्रीय स्पर्धेचा दृष्टीकोन याचे आपोआपच विवेचन होते. श्रीलंकेत नुकत्याच झालेल्या एज्युकॉन 2010 चर्चासत्राच्या सुरवातीलाच असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीजचे उपाध्यक्ष डॉ. पंकज चांदे यांनी विद्यापीठांची संकल्पना भारतात हजारो वर्षांपासून असल्याचे सांगत आपल्याला आंतरराष्ट्रीय दर्जा पुन्हा गाठायचा आहे याची जाणीव करून दिली. आपल्या देशात नालंदा विद्यापीठाच्याही अगोदर कौंडिण्यपूर हे योगाचा अभ्यास करणारे विद्यापीठ तर गुणशीला हे फक्त महिलांसाठीचे विद्यापीठाही होते अशी माहिती दिली.

हिंगोलीत सराफ दूकान फोडले

Latest News - Sun, 2010-09-05 14:09

हिंगोली&nbsp -&nbsp येथील सराफा बाजारातील ज्वेलर्सच्या दुकानाचे शटर उचकटून चोरट्यांनी रोख रकमेसह 4 लाख 82 हजार रुपयांचा ऐवज पळविल्याची घटना शनिवारी (ता. 04) घडली. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात रविवारी (ता.5) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, येथील सराफा बाजारात संत नरहरी महाराज ज्वेलर्स हे सोने, चांदी विक्रीचे दुकान आहे. दुकान मालक सराफा व्यावसायिक तुळशीराम डहाळे हे नेहमीप्रमाणे शनिवारी रात्री दुकानबंद करून घरी गेले. मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या दुकानाच्या चॅनल गेटचे कुलुप तोडले त्यानंतर दुकानाचे शटर उचकटून आत प्रवेश केला. यावेळी चोरट्यांनी दुकानातील साहित्याची नासधूस केली. त्यानंतर चोरट्यांनी दुकानात ठेवलेली नऊ किलो चांदी, सात किलो चांदीचे दागिने, सात किलो चांदीचे फॅन्सी दागिने, पन्नास ग्राम सोन्याचे डोरले व रोख पंधरा हजार रुपये, असा एकूण 4 लाख 82 हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी पळविला. दुकानात चोरी झाल्याचे समजताच श्री. डहाळे यांनी शहर पोलिस ठाण्यात माहिती दिली. घटनास्थळी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक एम.ए.

मुख्यमंत्र्यांसमोरच शिक्षकाने अंगावर रॉकेल ओतून घेतले

Latest News - Sun, 2010-09-05 14:07

नांदेड - ""संस्थाचालक, शिक्षणाधिकारी यांच्या हुकूमशाहीमुळे जगण्याची इच्छा नाही,'' असे म्हणत अशोक माणिक गिते या शिक्षकाने शिक्षकदिनी (ता. 5) मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री आणि शेकडो शिक्षकांपुढे अंगावर रॉकेल ओतून घेतले. ही घटना राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण समारंभातच घडल्याने काही काळ खळबळ उडाली. पोलिसांनी तातडीने संबंधित शिक्षकाला तेथून बाहेर नेऊन गप्प बसविण्याचा प्रयत्न केला.&nbsp रविवारी आदर्श शिक्षक पुरस्कारांचे वितरण झाल्यानंतर शिक्षणमंत्र्यांचे भाषण सुरू असताना हातातील कागदपत्रे उंचावत गिते यांनी व्यासपीठासमोर येण्याचा प्रयत्न केला. नेमका काय प्रकार आहे, हे लक्षात येण्याअगोदरच गिते यांनी अंगावर रॉकेल ओतून घेतले. मात्र, पोलिसांनी तातडीने त्यांना ताब्यात घेतले. पोलिस बाहेर नेत असताना "हा माझा सत्कार आहे काय?' असे ते ओरडत होते. मुख्यमंत्री व शिक्षणमंत्री हा सर्व प्रकार पाहत होते. श्री. गिते यांच्या हातातील कागदपत्रे पोलिसांच्या कारवाईत खाली पडली. ती मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी मागवून घेतली. त्यांच्याकडून ती मुख्यमंत्र्यांपर्यंत पोचल्याचे सांगितले जाते.

नांदेड- समोर शिक्षकाचा आत्मदहनाचा प्रयत्न

Latest News - Sun, 2010-09-05 14:07

नांदेड -&nbsp ""संस्थाचालक, शिक्षणाधिकारी यांच्या हुकूमशाहीमुळे जगण्याची इच्छा नाही,'' असे म्हणत एका शिक्षकाने शिक्षकदिनी (ता. पाच) मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री आणि शेकडो शिक्षकांपुढे आत्मदहनाचा प्रयत्न केला. ही घटना राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण समारंभातच घडल्याने काही काळ खळबळ उडाली. पोलिसांनी तातडीने संबंधित शिक्षकाला तेथून बाहेर नेऊन त्याचा गप्प बसविण्याचा प्रयत्न केला. अशोक माणिक गिते असे या शिक्षकाचे नाव आहे. रविवारी आदर्श शिक्षक पुरस्कारांचे वितरण झाल्यानंतर शिक्षणमंत्र्यांचे भाषण सुरू होते. त्याच वेळी हातातील कागदपत्रे उंचावत गिते यांनी व्यासपीठासमोर येण्याचा प्रयत्न केला. नेमका काय प्रकार आहे हे लक्षात यायच्या आतच कार्यक्रमात हजारो लोकांच्या साक्षीने गिते यांनी अंगावर रॉकेल ओतून घेतले. मात्र, पोलिसांनी तातडीने त्यांना ताब्यात घेतले आणि बाहेर नेले. पोलिस बाहेर नेत असताना "हा माझा सत्कार आहे काय?' असे ते ओरडत होते. मुख्यमंत्री व शिक्षणमंत्री हा सर्व प्रकार पाहत होते. श्री. गिते यांच्या हातातील कागदपत्रे पोलिसांच्या कारवाईत खाली पडली, ती मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी मागवून घेतली.

तरुणाच्या मृत्यूनंतर धुळ्यात तणाव

Latest News - Sun, 2010-09-05 11:49

धुळे -&nbsp येथील&nbsp ८० फुटी रोड परिसरातील नटराज चित्रपटगृहालगत व्यापारी संकुलात वसीम शेख मुश्‍ताक (वय २१, रा. रमजानबाबा नगर) याचा विजेच्या धक्‍क्‍याने की खून झाल्याच्या संशयावरून या भागात तणाव निर्माण झाला. त्याचे तीव्र पडसाद उमटले. &nbsp संतप्त जमावाने एसटी बस आणि पोलिसांवर दगडफेक केली. यात बसचे नुकसान झाले, तर पोलिस अधिकाऱ्यासह दोन हवालदार जखमी झाले आहेत. पोलिसांनी लाठीमार करून स्थिती नियंत्रणात आणली. जिल्हा पोलिस अधीक्षक शशिकांत शिंदे यांनी घटनास्थळी धाव घेत प्रक्षुब्ध जमावाला शांत केले. वसीम शेख याच्या मृतदेहाचा पंचनामा सुरू असून त्याचा खून नव्हे, तर विजेच्या धक्‍क्‍याने मृत्यू झाल्याचे श्री. शिंदे यांनी सांगितले. अप्पर पोलिस अधीक्षक प्रमोद शेवाळे, उपविभागीय पोलिस अधिकारी मोनिका राऊत आदी घटनास्थळी ठाण मांडून आहेत. या भागात तणावपूर्ण शांतता आहे. वसीम शेख याचा मृतदेह व्यापारी संकुलातील तळमजल्यात सकाळी आढळून आला. यानंतर दीडला नागरिकांमधील संतापाचा उद्रेक झाला.

धुळे जिल्ह्यात नगावला महिलांचे दारूबंदी अभियान

Latest News - Sun, 2010-09-05 11:46

धुळे -&nbsp नगाव (ता. धुळे) येथील बचत गटातील महिलांनी पुढाकार घेत गावासह परिसरात बेकायदेशीररीत्या दारू विक्रीचा प्रकार रोखण्यासाठी आंदोलन हाती घेतले आहे. आज दुपारी रस्त्यालगत टपऱ्यांमधील दारूचा अनधिकृतसाठा पोलिसांना पकडून दिला. टपऱ्यांसह काही घरांमध्ये देशी व विदेशी मद्याचा साठा केला जात आहे. यामुळे मोठ्या प्रमाणावर लहान मुलांसह तरुण, प्रौढ दारूच्या आहारी जात आहेत. परिणामी, अनेक कुटुंबात रोज भांडणे, महिलांशी वाद, हाणामारीचे प्रकार वाढत असल्याने अखेर संतप्त महिलांनी स्वतः दारूबंदी अभियान हाती घेतले आहे. &nbsp आठवड्यापूर्वीच नगाव येथे रास्ता रोको करत आंदोलक महिलांनी धैर्याने अनेक टपऱ्या, घरांमधील अनधिकृत दारूचा साठा शोधून दिला होता. यानंतर पोलिस व उत्पादन शुल्क विभाग दखल घेऊन हा गैरप्रकार व गुन्हेगारी रोखतील, अशी आशा होती. परंतु, याकडे अक्षम्य दुर्लक्ष झाल्याने आज पुन्हा संघटित होत महिलांनी शासकीय यंत्रणेच्या निषेधार्थ आंदोलन करत दारूचा साठा पकडून दिला. पोलिसांनी धाव घेत पंचनामा सुरू केला आहे.

संमेलनाचा निधी 'मसाप'च्या महाकोशात जमा

Latest News - Sun, 2010-09-05 11:35

पुणे - पुण्यात झालेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या आयोजनातून शिल्लक राहिलेला ८२ लाख रुपयांच्या निधी आज (रविवार) महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या महाकोशात जमा करुन घेण्यात आला. आज झालेल्या मसापच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. &nbsp साहित्य संमेलनाच्या हिशेबामध्ये गैरव्यवहार झाल्याचा संशय व्यक्त करीत पुण्यभूषण फाउंडेशनने हा हिशेब लवकर सादर करण्याची मागणी करण्यात आली होती. तसेच माजी महापौर शांतिलाल सुरतवाला, आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी या संदर्भात चौकशीची मागणी केली होती, तसेच पालकमंत्री अजित पवार यांनी शिल्लक निधी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या महाकोश प्रकल्पाला द्यावा, अशी सूचना केली होती. यानंतर संमेलनाचे स्वागताध्यक्ष डॉ. सतीश देसाई यांनी ८२ लाख रुपयांचा निधी 'मसाप'कडे जमा केला आणि आज तो निधी महाकोशात जमा करण्यात आला.

भूस्खलनामुळे नागरिकांचे आंदोलन

Latest News - Sun, 2010-09-05 10:42

वणी (जि. यवतमाळ) -&nbsp घुग्गुस-उकणी-वणी मार्गावर वणी नॉर्थ क्षेत्रातील उकणी खुल्या खाणीच्या मुख्य रत्यावर असलेल्या मातीच्या ढिगाऱ्याचे गेल्या आठवड्यापासून भूस्खलन सुरू झाले आहे. भूस्खलनाकडे वेकोलीने लक्ष पुरविले नसल्याने आज (रविवार) या परिसरातील नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. दरम्यान, भूस्खलन वाढल्यास पश्‍चिम महाराष्ट्राकडे होणारा वीजपुरवठा पुन्हा ठप्प होण्याची शक्‍यता आहे. येथील जमिनीतील माती व ढिगाऱ्याची माती गेल्या आठवड्यात दुसऱ्यांदा शनिवारी (ता. तीन) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास माती रस्त्यावर येऊन पडल्याने मार्ग पूर्णतः बंद पडला होता. यामुळे 150 कोळसा ट्रक़, टिप्पर व स्कूल बसचे विद्यार्थी रस्त्यावर अडकले होते. घटनेची माहिती मिळताच वेकोलीकडून ग्रेडर यंत्राद्वारे रस्त्यावरील सर्व माती हटविण्याचे काम युद्ध पातळीवर चालू होते. भरपावसात दीड तासानंतर वाहतूक मोकळी करण्यात आली. हे भूस्खलन पिंपळगाव कोळसा खाणीच्या दोनशे मीटरच्या आत असल्याने नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.

यवतमाळमध्ये भर दिवसा गुंडाचा खून

Latest News - Sun, 2010-09-05 10:37

यवतमाळ -&nbsp शहरातील संघटित टोळी युद्धाने पुन्हा एकदा भडका घेऊन त्यात अनेक गंभीर गुन्ह्याची नोंद शिरावर असलेल्या एका गुंडाचा भर दिवसा शस्त्राने भोसकून खून करण्यात आला. ही घटना आज (ता. 7) सकाळी सात वाजता शहरातील भाजीमंडईत भरलेल्या आठवडी बाजारात घडली. याप्रकरणी पोलिसांनी नगरसेवकासह दोन संशयितांना चौकशीकरिता ताब्यात घेतले आहे. बाल्या ऊर्फ योगेश पलकंडवार ( वय 28, रा. पवारपुरा) असे मृताचे नाव आहे. शहरातील गुन्हेगारी वर्तुळात सक्रीय असलेल्या दिवटे टोळीचा तो समर्थक होता. गेल्या काही दिवसांपूर्वी बाल्याने त्याच्या दोन साथीदारासह शहरातील पांढरकवडा मार्गावर असलेल्या ढाब्यावर ढाबाचालकांशी वाद करून त्यांच्यावर पिस्तूल रोखली होती. त्याच प्रकरणातून हे कृत्य घडले असावे, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी लता फड, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अनिरूद्ध अढाव, वडगाव रोड पोलिस ठाण्याचे ठाणेदार वैजनाथ लटपटे आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता रवाना केला.

'भगव्याखाली मराठी माणसाने एकत्र यावे'

Latest News - Sun, 2010-09-05 10:31

मुंबई - शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठी माणसाच्या हितासाठी एकत्र येण्यासाठी आज (रविवार) मुकमोर्चा काढण्यात आला होता. यावेळी उद्धव ठाकरे यांनी मोर्चात सहभागी नागरिकांना मराठी माणसाच्या विकासासाठी भगव्या झेंडाखाली एकत्र येण्याचे आवाहन केले. महाराष्ट्र चळवळतर्फे आज सकाळी शिवाजी पार्कपासून या मुकमोर्चाला सुरवात झाली. चळवळीचे प्रमुख सतीश वळंजू यांनी मोर्चाचे नेतृत्व केले. सुरवातीला मोर्चा राज ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या 'कृष्णकुंज' याठिकाणी गेला. राज ठाकरे बाहेर गेले असल्याने त्यांची राज ठाकरे यांची भेट होऊ शकली नाही. यानंतर मोर्चा 'मातोश्री'कडे रवाना झाला. तिथे त्यांची भेट उद्धव ठाकरे यांच्याशी झाली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी मोर्चात सहभागी नागरिकांना मोर्चा काढून प्रयत्न वाया घालविता मराठी माणसाच्या कल्याणासाठी भगव्याखाली एकत्र येण्याचे सांगितले.&nbsp तसेच त्यांनी शिवसेनेला कोणाची गरज नसल्याचे सांगितले.

आयपीएलमध्ये यंदा फक्त ७४ सामने

Sports News - Sun, 2010-09-05 09:18

मुंबई - जगभरात लोकप्रिय झालेल्या इंडियन प्रिमियर लीगमध्ये (आयपीएल) पुढील वर्षी होणाऱ्या चौथ्या मोसमात ९४ एेवजी ७४ सामने खेळविले जाणार असल्याचा निर्णय, आज (रविवार) झालेल्या गव्हर्निंग कौन्सिलच्या बैठकीत घेण्यात आला. &nbsp आज झालेल्या बैठकीत आयपीएलच्या आगामी चौथ्या मोसमाबाबत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. गेल्या तीन मोसमात एकाच संघातून खेळणाऱ्या कोणत्याही चार खेळाडूंना संघात कायम ठेवण्याची परवानगी संघ मालकांना असणार आहे. हा महत्त्वाचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.&nbsp तसेच यंदा सर्व खेळाडूंचा लिलाव नव्याने नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात होणार आहे. खेळाडूंना खरेदी करण्यासाठी रकमेतही वाढ करण्यात आली आहे.

आयपीएलमध्ये यंदा फक्त ७४ सामने

Latest News - Sun, 2010-09-05 09:18

मुंबई - जगभरात लोकप्रिय झालेल्या इंडियन प्रिमियर लीगमध्ये (आयपीएल) पुढील वर्षी होणाऱ्या चौथ्या मोसमात ९४ एेवजी ७४ सामने खेळविले जाणार असल्याचा निर्णय, आज (रविवार) झालेल्या गव्हर्निंग कौन्सिलच्या बैठकीत घेण्यात आला. &nbsp आज झालेल्या बैठकीत आयपीएलच्या आगामी चौथ्या मोसमाबाबत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. गेल्या तीन मोसमात एकाच संघातून खेळणाऱ्या कोणत्याही चार खेळाडूंना संघात कायम ठेवण्याची परवानगी संघ मालकांना असणार आहे. हा महत्त्वाचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.&nbsp तसेच यंदा सर्व खेळाडूंचा लिलाव नव्याने नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात होणार आहे. खेळाडूंना खरेदी करण्यासाठी रकमेतही वाढ करण्यात आली आहे.

ब्राह्मोस क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

Latest News - Sun, 2010-09-05 09:11

बालासोर -&nbsp भारताने 290 किलोमीटर पल्ल्याच्या ब्राह्मोस "क्रूज' क्षेपणास्त्राची आज यशस्वी चाचणी केली. ओरिसाच्या चंडीपूर येथील "आयटीआर' (इंटिग्रेटेड टेस्ट रेंज) तळावर सकाळी साडेअकराच्या सुमारास "मोबाईल लॉंचर'वरून ही चाचणी घेण्यात आली. याद्वारे "ब्राह्मोस'ची क्षमता तपासण्यात आल्याचे संरक्षण संशोधन व विकास संस्थेकडून (डीआरडीओ) सांगण्यात आले. दहशतवादी केंद्र जमीनदोस्त करण्यासह थेट हल्ल्यांसाठी "ब्राह्मोस-2' उपयोगात आणता येते. संबंधित परिसराची जास्त हानी न करता याद्वारे लक्ष्यभेद करता येतो. ध्वनीच्या वेगापेक्षा 2.8 वेगाने 300 किलोपर्यंतची पारंपरिक शस्त्रे वाहून नेण्याची त्याची क्षमता आहे. समुद्रसपाटीपासून सर्वांत कमी दहा मीटर उंचीवरून हे क्षेपणास्त्र जमिनीवरील लक्ष्य उद्‌ध्वस्त करू शकते. रशियाबरोबर संयुक्तपणे विकसित केले जात असलेले "ब्राह्मोस' जमीन, विमान, पाणबुडी अशा बहुस्तरीय तळांवरून प्रक्षेपित करता येते. मात्र, प्रामुख्याने त्याच्या जमीन व पाणबुड्यांवरील चाचण्यांवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. "ब्राह्मोस-1' प्रकारातील 67 क्षेपणास्त्रे यापूर्वीच लष्करात कार्यान्वित करण्यात आली आहेत.

ओरिसात 'ब्राह्मोस' क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

Latest News - Sun, 2010-09-05 09:11

बालासोर - जहाजातून २९० किमी अंतरापर्यंत मारा करता येणाऱ्या ब्राह्मोस या क्षेपणास्त्राची आज (रविवार) ओरिसात चंडीपूर येथे यशस्वी चाचणी घेण्यात आली. या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणीमुळे भारतीय संरक्षण दलाच्या क्षमतेत आणखी वाढ झाली आहे. &nbsp आज सकाळी साडे अकराच्या सुमारास 'मोबाईल' प्रक्षेपकाद्वारे ही चाचणी घेण्यात आली. ही चाचणी घेऊन आम्ही ब्राह्मोस क्षेपणास्त्राची क्षमता तपासल्याचे संरक्षण संशोधन व विकास संस्थेच्या (डीआरडीओ) अधिकाऱ्यांनी सांगितले.

कोयनेचे दरवाजे अडीच फुटांनी उघडले

Latest News - Sun, 2010-09-05 07:59

सातारा - कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार कायम असल्याने आज (रविवार) धरणाचे सर्व दरवाजे अडीच फुटांनी उघडण्यात आले आहेत. &nbsp या पावसाळ्यात प्रथमच शनिवारी एक फुटाने उघडण्यात आलेले दरवाजे आज&nbsp अडीच फुटांपर्यंत उघडले. दरवाजे&nbsp अडीच फुटाने उघडल्याने धरणातून प्रति सेकंद&nbsp २४,८४१ क्युसेक्स पाणी नदीपात्रात सोडण्यात येत आहे. नदी पात्रात पाणी सोडल्याने पाटण तालुक्यातील संगमनगर येथील पुल पाण्याखाली गेला आहे.

सीमेवर गोळीबारात 'लष्कर'चा दहशतवादी ठार

Latest News - Sun, 2010-09-05 07:56

जम्मू - पुँच जिल्ह्यात सीमेवर आज (रविवार) सकाळी झालेल्या गोळीबारात लष्कर-ए-तैयबाचा संशयित दहशतवाद्याला ठार मारण्यात सुरक्षा दलाच्या जवानांना यश मिळाले. या गोळीबारात एक जवान जखमी झाल्याचे, पोलिसांनी सांगितले. सीमाभागात लष्कर-ए-तैयबाचे तीन ते चार दहशतवादी वावरत असल्याची माहिती पोलिसांना मिळताच राष्ट्रीय राफयल दलाचे जवान आणि पोलिसांनी पुँच जिल्ह्यात मेंधर तालुक्यातील भट्टीजदर या परिसरात शोधमोहिम सुरु केली. या मोहिमेदरम्यान दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबारास सुरवात केली. प्रत्युत्तरादाखल जवानांनी केलेल्या गोळीबारात एक दहशतवाद्याला ठार मारण्यात आले आहे. गोळीबारात एक जवान जखमी झाला असून, त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. &nbsp या घटनेनंतर जवानांकडून राजौरी जिल्ह्यातही शोधमोहिम करण्यात येत आहे.

ठाण्यात जखमी गोविंदाचा मृत्यू

Latest News - Sun, 2010-09-05 07:17

ठाणे - गुरुवारी झालेल्या दहिहंडीमध्ये चौथ्या थरावरून पडलेल्या किशोर कांबळे या जखमी गोविंदाचा आज (रविवार) उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू झाला. ठाणे येथे दरवर्षी दहिहंडी सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो आणि सर्वाधिक उंचीवर दहिहंडी बांधून लाखोंची बक्षिसे लावण्यात येतात. या दहिहंड्या फोडण्यासाठी मंडळाचे कार्यकर्ते सराव करीत असतात. दहिहंडी फोडण्यासाठी गेलेल्या ठाण्यातील ओम साई मित्र मंडळाचा कार्यकर्ता असलेला किशोर कांबळे हा चौथ्या थरावरुन पडून जखमी झाला होता. याचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला.

'आयसीसी' स्वतंत्र चौकशी आयुक्त नेमणार'

Latest News - Sun, 2010-09-05 07:03

न्यूयॉर्क -&nbsp क्रिकेट विश्‍व ढवळून टाकणाऱ्या "फिक्‍सिंग' प्रकरणासंदर्भात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) कडक पावले उचलण्याचे ठरविले असून, या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी स्वतंत्र चौकशी आयुक्त नियुक्त करण्याची घोषणा "आयसीसी'चे अध्यक्ष शरद पवार यांनी आज येथे केली. ते म्हणाले, ""या प्रकरणात अजून कोणावरही कारवाई करण्यात आली नसली तरी "आयसीसी'च्या वतीने होणाऱ्या स्वतंत्र चौकशी समितीसमोर या खेळाडूंना आपली बाजू मांडावीच लागेल. या समितीच्या अहवालानुसार "आयसीसी' कारवाईचा निर्णय घेईल.'' विशेष म्हणजे "आयसीसी'ने यापूर्वीच सलमान बट्ट, महंमद आमीर, महंमद आसिफ यांना तातडीने निलंबित केले आहे. त्यांना या कारवाईविरोधात अपील करण्यासाठी चौदा दिवसांची मुदतही देण्यात आली आहे. "आयसीसी'च्या आचारसंहिता कलम पाचनुसार त्यांना हा अधिकार देण्यात आला आहे. "आयसीसी'ने ही कारवाई केल्यानंतर अध्यक्ष शरद पवार यांनी ही कारवाई जाणूनबुजून केल्याची टीका पाकिस्तानचे ब्रिटनमधील उच्चायुक्त वाजिद हसन यांनी केली होती. या संदर्भात पवार म्हणाले,""आम्ही कोणावरही कारवाई केलेली नाही. आम्ही त्यांना निलंबित करण्याची नोटीस पाठविली आहे.