Feed aggregator


'आयसीसी' स्वतंत्र चौकशी आयुक्त नेमणार'

Sports News - Sun, 2010-09-05 07:03

न्यूयॉर्क -&nbsp क्रिकेट विश्‍व ढवळून टाकणाऱ्या "फिक्‍सिंग' प्रकरणासंदर्भात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) कडक पावले उचलण्याचे ठरविले असून, या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी स्वतंत्र चौकशी आयुक्त नियुक्त करण्याची घोषणा "आयसीसी'चे अध्यक्ष शरद पवार यांनी आज येथे केली. ते म्हणाले, ""या प्रकरणात अजून कोणावरही कारवाई करण्यात आली नसली तरी "आयसीसी'च्या वतीने होणाऱ्या स्वतंत्र चौकशी समितीसमोर या खेळाडूंना आपली बाजू मांडावीच लागेल. या समितीच्या अहवालानुसार "आयसीसी' कारवाईचा निर्णय घेईल.'' विशेष म्हणजे "आयसीसी'ने यापूर्वीच सलमान बट्ट, महंमद आमीर, महंमद आसिफ यांना तातडीने निलंबित केले आहे. त्यांना या कारवाईविरोधात अपील करण्यासाठी चौदा दिवसांची मुदतही देण्यात आली आहे. "आयसीसी'च्या आचारसंहिता कलम पाचनुसार त्यांना हा अधिकार देण्यात आला आहे. "आयसीसी'ने ही कारवाई केल्यानंतर अध्यक्ष शरद पवार यांनी ही कारवाई जाणूनबुजून केल्याची टीका पाकिस्तानचे ब्रिटनमधील उच्चायुक्त वाजिद हसन यांनी केली होती. या संदर्भात पवार म्हणाले,""आम्ही कोणावरही कारवाई केलेली नाही. आम्ही त्यांना निलंबित करण्याची नोटीस पाठविली आहे.

'त्या' खेळाडूंना आपली बाजू मांडण्याची संधी

Latest News - Sun, 2010-09-05 07:03

न्यूयॉर्क - स्पॉट फिक्सिंगचा आरोपावरून निलंबित करण्यात आलेल्या पाकिस्तानच्या तीन खेळाडूंना या प्रकरणी आपली बाजू स्पष्ट करण्याची संधी देण्यात येईल, असे आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीचे (आयसीसी) अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे. &nbsp पाकिस्तानचे इंग्लंडमधील उच्चायुक्त वाजीद शामसुल हसन यांनी शनिवारी आयसीसीवर पाकिस्तानी खेळाडूंना या प्रकरणात गोवण्यात येत असल्याचा आरोप केला होता. याप्रकरणी आज शरद पवार यांनी स्पष्टीकरण दिले आहे. पवार म्हणाले, ''आयसीसीच्या लाच-लुचपत प्रतिबंधक विभागाकडून या तिन्ही खेळाडूंवर ही कारवाई करण्यात आली असून, या प्रकरणाची चौकशी सुरु आहे. या तिन्ही खेळाडूंना निलंबनाची नोटीस पाठविण्यात आली असून, हा अंतिम निर्णय नाही. या तिन्ही खेळाडूंना आपली बाजू स्पष्ट करण्याची संधी मिळणार आहे.'' राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उत्तर अमेरिकेतील शाखेचे उदघाटन पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ते बोलत होते.

पाकिस्तानी क्रिकेटपटू नव्हे, हे तर 'फिक्‍सर'

Latest News - Sun, 2010-09-05 05:01

लंडन -&nbsp क्रिकेट विश्‍वात खळबळ उडवून देणारे पाकिस्तानी क्रिकेटपटूंचे "स्पॉट फिक्‍सिंग' प्रकरण रोज वेगळे वळण घेत आहे. पहिल्यांदा संशयाच्या घेऱ्यात आलेल्या तिघा खेळाडूंना सोडून देण्यात आल्यानंतर पोलिसांनी चौथ्या पाकिस्तानी क्रिकेटपटूची चौकशी केली. त्याच वेळी ""पाकिस्तानी क्रिकेटपटू नव्हे, तर "फिक्‍सर' आहेत. ते प्रत्येक सामना "फिक्‍स' करण्यासाठी उत्सुक असायचे,'' असा गौप्यस्फोट सलामीचा फलंदाज यासीर हमीद याने रविवारी केला. "फिक्‍सिंग'चे नवे प्रकरण उघडकीस आणणाऱ्या "न्यूज ऑफ दि वर्ल्ड' दैनिकाने पाकिस्तानी खेळाडूंचा नाकर्तेपणा सांगणारी आणखी काही उदाहरणे दिली आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा पाकिस्तानी क्रिकेट संकटात सापडले. ""एका बुकीने मला एक लाख पौंड देऊन कसोटी सामना "फिक्‍स' करण्यासाठी मदत करण्याचे आवाहन केले होते. मात्र, आपण त्याला हाकलून दिले. या प्रकरणात जे खेळाडू चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहेत, त्यांचा प्रत्येक सामना "फिक्‍स' करण्यासाठी प्रयत्न असायचा. विशेष म्हणजे स्कॉटलंड यार्ड पोलिस कायम त्यांच्या मागे असायचे.

पाकिस्तानी क्रिकेटपटू नव्हे, हे तर 'फिक्‍सर'

Sports News - Sun, 2010-09-05 05:01

लंडन -&nbsp क्रिकेट विश्‍वात खळबळ उडवून देणारे पाकिस्तानी क्रिकेटपटूंचे "स्पॉट फिक्‍सिंग' प्रकरण रोज वेगळे वळण घेत आहे. पहिल्यांदा संशयाच्या घेऱ्यात आलेल्या तिघा खेळाडूंना सोडून देण्यात आल्यानंतर पोलिसांनी चौथ्या पाकिस्तानी क्रिकेटपटूची चौकशी केली. त्याच वेळी ""पाकिस्तानी क्रिकेटपटू नव्हे, तर "फिक्‍सर' आहेत. ते प्रत्येक सामना "फिक्‍स' करण्यासाठी उत्सुक असायचे,'' असा गौप्यस्फोट सलामीचा फलंदाज यासीर हमीद याने रविवारी केला. "फिक्‍सिंग'चे नवे प्रकरण उघडकीस आणणाऱ्या "न्यूज ऑफ दि वर्ल्ड' दैनिकाने पाकिस्तानी खेळाडूंचा नाकर्तेपणा सांगणारी आणखी काही उदाहरणे दिली आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा पाकिस्तानी क्रिकेट संकटात सापडले. ""एका बुकीने मला एक लाख पौंड देऊन कसोटी सामना "फिक्‍स' करण्यासाठी मदत करण्याचे आवाहन केले होते. मात्र, आपण त्याला हाकलून दिले. या प्रकरणात जे खेळाडू चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहेत, त्यांचा प्रत्येक सामना "फिक्‍स' करण्यासाठी प्रयत्न असायचा. विशेष म्हणजे स्कॉटलंड यार्ड पोलिस कायम त्यांच्या मागे असायचे.

पाकने खेळलेला प्रत्येक सामना फिक्स - हमीद

Latest News - Sun, 2010-09-05 05:01

लंडन - पाकिस्तानी खेळाडूंविरुद्ध स्पॉट फिक्सिंगचा फास आवळत असतानाच आज (रविवार) 'न्यूज ऑफ दी वर्ल्ड' या वृत्तपत्राने प्रसिद्ध केलेल्या वृत्तात पाकिस्तानचा खेळाडू यासिर हमीद याने पाकने खेळलेला प्रत्येक सामना फिक्स असल्याची कबुली दिल्याचे म्हटले आहे. या वृत्ताने क्रिकेट विश्वात खळबळ उडाली असून, यासिर हमीदने मात्र आपण असे बोललोच नसल्याचे म्हटले आहे. &nbsp या वृत्तपत्राने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये पाकिस्तानचा सलामीचा फलंदाज यासिर हमीद याने म्हटले आहे की, ''पाकिस्तानी खेळाडू सट्टेबाजांशी हातमिळवणी करून प्रत्येक सामना फिक्स करीत आहेत. स्कॉटलंड यार्डकडून तपासणी होत असल्याने आता काय होणार हे देवालाच माहित. मी माझी सर्वोत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न करतो. मात्र, इतर खेळाडू सामना फिक्स करतात.'' &nbsp यासिर हमीद याला इंग्लंडविरुद्ध लॉर्डस येथे झालेल्या कसोटीत पाकिस्तान संघात स्थान देण्यात आले होते. याच कसोटीत स्पॉट फिक्सिंग केल्याचा आरोप महंमद आमिर आणि महंमद आसिफ यांच्यावर करण्यात आला आहे. वृत्तपत्रात दिलेल्या माहितीनुसार सामन्यात फिक्सिंग करण्यासाठी यासिर हमीद सटोडियाकडून दीड लाख पौंडची ऑफर मिळाली होती.

अपहृत पोलिसांबाबत बिहारमध्ये संभ्रम कायम

Latest News - Sun, 2010-09-05 04:18

पाटणा -&nbsp बिहारच्या लखिसराय जिल्ह्यातील तीन अपहृत पोलिसांची सुटका केल्याचा दावा माओवाद्यांनी केला. मात्र, त्याबाबत सरकारने दुजोरा दिलेला नाही. पोलिसांच्या सुटकेबाबत आपल्याकडे माहिती नसल्याचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी म्हटले आहे. त्यामुळे अपहृत पोलिसांचे कुटुंबीय त्यांच्या परतीकडे नजर लावून आहेत. या प्रकरणात माओवादी पोलिसांबरोबर खेळ खेळत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. बुद्धिजीवी, साहित्यिका महाश्‍वेतादेवी, सामाजिक कार्यकर्ते स्वामी अग्निवेश यांच्या आवाहनानंतर अपहृत पोलिसांची सुटका केल्याचा दावा माओवादी प्रवक्ता अविनाश याने केला. काही प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी त्याने दूरध्वनीवरून संपर्क साधला. राज्य सरकारने शनिवारी (ता. 5) बोलावलेली सर्वपक्षीय बैठक किंवा मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या आवाहनाचे या पोलिसांच्या सुटकेत कोणतेही योगदान नसल्याचेही त्याने म्हटले आहे. पिंटू आणि बहादूर यादव या दोन माओवाद्यांना अटक केल्याचा पोलिसांचा दावा खोटा असल्याचा दावाही अविनाशने केला.

बिहारमधील तीन पोलिसांच्या सुटकेबाबत साशंकता

Latest News - Sun, 2010-09-05 04:18

पटना - बिहारमधील लखीसराई येथून अपहरण करण्यात आलेल्या तीन पोलिसांच्या सुटकेबाबत अद्याप साशंकता आहे. माओवाद्यांनी या तिघांना जंगलात सोडले असल्याचे वृत्त आहे, पण हे तिघे सुखरुप असल्याची पाहणी केल्याशिवाय&nbsp आम्ही काही सांगू शकत नाही, &nbsp असे पोलिस महासंचालक नीलमणी यांनी सांगितले.&nbsp &nbsp &nbsp &nbsp गेल्या रविवारी माओवाद्यांनी लखीसराई येथून चार पोलिसांचे अपहरण केले होते. त्यातील एक पोलिसाचा शुक्रवारी माओवाद्यांकडून खून करण्यात आला होता. यामुळे या तिन्ही पोलिसांच्या सुटकेसाठी सरकारने प्रयत्न सुरु केले आहेत. आज काही वृत्तवाहिन्यांनी या तिन्ही अपहृत पोलिसांना सोडण्यात आल्याचे वृत्त दिले आहे. मात्र, अधिकृतरित्या या तिघांची सुटका झाल्याचे स्पष्ट करण्यात आलेले नाही.&nbsp अपहृत झालेल्या तीन&nbsp पोलिसांची अभय यादव, एहतशाम खान, रुपेश ही नावे आहेत. माओवाद्यांच्या शोधासाठी पोलिसांकडून शनिवारी जंगल प्रभावित क्षेत्रात कोंबिंग ऑपरेशनही राबविण्यात आले होते.

तीन पोलिसांची माओवाद्यांकडून सुटका

Latest News - Sun, 2010-09-05 04:18

पटना - बिहारमधील लखीसराय येथून अपहरण करण्यात आलेल्या तीन पोलिसांची आज (रविवार) सकाळी माओवाद्यांकडून सुटका करण्यात आली. &nbsp चार पोलिसांचे गेल्या रविवारी माओवाद्यांनी येथून अपहरण केले होते. त्यातील एक पोलिसाचा शुक्रवारी माओवाद्यांकडून खून करण्यात आला होता. यामुळे या तिन्ही पोलिसांच्या सुटकेसाठी सरकारने प्रयत्न सुरु केले होते. आज अखेर या तिन्ही अपहृत पोलिसांना सोडण्यात आले आहे. सुटका करण्यात आलेल्या पोलिसांची अभय यादव, एहतशाम खान, रुपेश ही नावे आहेत. माओवाद्यांच्या शोधासाठी पोलिसांकडून शनिवारी जंगल प्रभावित क्षेत्रात कोंबिंग ऑपरेशनही राबविण्यात आले होते. सुटका करण्यात आलेल्या अभय यादव यांच्या पत्नीने माओवादी नेता स्वतः घरी येऊन तुमच्या पतीची सुटका केल्याचे सांगून गेल्याचे म्हटले आहे.

घाटकोपरमध्ये जुनी इमारत कोसळली; एक ठार

Latest News - Sun, 2010-09-05 04:17

मुंबई - घाटकोपर परिसरातील जुनी एक मजली शकुंतला इमारत आज (रविवार) सकाळी कोसळली. या दुर्घटनेत एक जण ठार झाला असून, पाच जणांना वाचविण्यात यश आले आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबई व उपनगरांत संततधार पाऊस पडत असून, जुन्या इमारती कोसळण्याच्या घटना घडत आहेत. आज सकाळी घाटकोपर परिसरात असणारी ही एक मजली जुनी इमारत कोसळली. घटनेची माहिती मिळताच अग्निशामन दलाच्या १२ गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या असून, बचावकार्य सुरु आहे.

मुख्यमंत्र्यांना धमकी देणाऱ्यास अटक

Latest News - Sat, 2010-09-04 21:00

मुंबई&nbsp &nbsp - स्वतःला अल्‌ कायदाचा सदस्य असल्याची बतावणी करणाऱ्या एका व्यक्तीने शुक्रवारी "वर्षा' बंगल्यावर फोन करून मुख्यमंत्र्यांबाबत विचारणा केल्याने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकारानंतर तपासयंत्रणांचे धाबे दणाणले आहेत. या प्रकरणी शनिवारी रात्री उशिरा राज्य दहशतवादविरोधी पथकाने गनी शहा (वय 32) याला नाशिक येथून अटक केली आहे. मूळचा मालेगावचा राहणारा गनी शहा याच्याविरुद्ध गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. एटीएसच्या मुंबई आणि नाशिक येथील तुकड्यांनी ही कारवाई केली. त्याच्याकडून आठ सिमकार्ड हस्तगत केल्याची माहिती एटीएसचे प्रमुख राकेश मारिया यांनी दिली. "घरात आहेत का?' मलबार हिल येथे असलेल्या मुख्यमंत्र्यांच्या सरकारी निवासस्थानात काल (ता. 3) सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास हा दूरध्वनी आला होता. या वेळी दूरध्वनी करणाऱ्या व्यक्तीने, "मुख्यमंत्री घरात आहेत का?' अशी विचारणा केली. बंगल्यावर नेमणूक असलेल्या कर्मचाऱ्याने दूरध्वनी करणाऱ्याला त्याची ओळख विचारली. तेव्हा, आपण "अल कायदा' या अतिरेकी संघटनेचे सदस्य असल्याचे त्याने सांगितले.

माणिकराव ठाकरे यांचे पारडे जड?

Latest News - Sat, 2010-09-04 20:29

मधु कांबळे&nbsp - सकाळ वृत्तसेवा मुंबई&nbsp -&nbsp केंद्रीय अवजड उद्योगमंत्री विलासराव देशमुख यांच्याशी जवळिक साधणाऱ्या महसूल मंत्री नारायण राणे व वनमंत्री पतंगराव कदम यांच्याशी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी जुळवून घेण्याचा प्रयत्न चालविला असून तो महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस अध्यक्षपदासाठी माणिकराव ठाकरे यांच्यासाठी शुभसंकेत असल्याचे मानले जात आहे. कॉंग्रेसमधील या बदलत्या समीकरणांमुळे ठाकरे यांच्याकडेच पुन्हा अध्यक्षपद येण्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे. अखिल भारतीय कॉंग्रेस समितीच्या अध्यक्षपदी काल सोनिया गांधी यांची अधिकृतपणे बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले. या निवडणूक प्रक्रियेच्या निमित्ताने मुख्यमंत्री अशोक चव्हाण दोन दिवस दिल्लीत मुक्काम ठोकून होते. त्यानंतर माणिकराव ठाकरे व मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्ष कृपाशंकर सिंह हेही दिल्लीत दाखल झाले. या तीनही नेत्यांनी ज्येष्ठ नेत्यांपासून कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्यापर्यंत अनेकांच्या भेटीगाठी घेऊन राज्यात पक्षांतर्गत बदल होणार की नाही, याची चाचपणी केल्याचे सांगितले जाते.

नदाल, क्‍लायस्टर्स, व्हीनसची आगेकूच

Sports News - Sat, 2010-09-04 20:25

न्यूयॉर्क - रॅफेल नदाल, किम क्‍लायस्टर्स आणि व्हीनस विल्यम्स या प्रमुख खेळाडूंनी अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत आगेकूच केली आहे. नदालने उझबेकिस्तानच्या डेनिस इस्तोमिनवर तीन सेटमध्ये मात केली. दुसऱ्या सेटच्या टायब्रेकमध्ये नदालने दर्जा सिद्ध केला. त्याने सलग सहा गुण जिंकत बाजी मारली. 5-1 अशी आघाडी गेली तेथेच इस्तोमिनचा आत्मविश्‍वास खचला. पहिला सेट नदालने आरामात जिंकला होता. तिसऱ्या सेटमध्ये त्याने शेवटी ब्रेक मिळवीत विजय साकार केला. टायब्रेकमध्ये नशिबाची साथ लाभल्याचे नदालने सांगितले. यापूर्वी क्वीन्स क्‍लबमधील स्पर्धेत इस्तोमिनने नदालला कडवी झुंज दिली होती. नदालची आता बिगरमानांकित फ्रान्सच्या गिल्लेस सायमनशी लढत होईल. सायमनने घोडदौड कायम ठेवली. त्याने 29व्या मानांकित जर्मनीच्या फिलिप कोलश्‍क्रायबर याच्यावर पाच सेटमध्ये मात केली. आता त्याची नदालशी लढत आहे. ब्रिटनच्या अँडी मरे याने जमैकाच्या डस्टिन ब्राऊनवर मात केली. ब्राऊनची सर्व्हिस भक्कम आहे. त्याने ड्रॉप शॉटच्या जोरावर मरेला जेरीस आणले होते. अर्जेंटिनाच्या डेव्हिड नॅल्बॅंडीयननने फ्रान्सच्या फ्लोरेंट सेर्रावर तीन सेटमध्ये मात केली.

वाटचाल एका शैक्षणिक चळवळीची

Latest News - Sat, 2010-09-04 20:25

देशातील प्रमुख विद्यापीठांच्या कुलगुरुंसमवेत विद्यापीठांमधील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्यासाठी आयोजित केलेल्या सभेचे हे सहावे वर्ष, म्हणजे अर्धे तप झाले. यानिमित्ताने "सकाळ'तर्फे आयोजित केलेल्या 'एज्युकॉन' उपक्रमाचे अवलोकन करणे सार्थ होईल, असे वाटते. दर वर्षी आपण वेगवेगळ्या ठिकाणी, वेगळ्या देशांत ही सभा घेतो. त्यानिमित्ताने नवीन देशांचाही काही प्रमाणात परिचय होतो. साहजिकच आपण आपल्या देशांत काय करायला हवे, काय नको, आंतरराष्ट्रीय स्पर्धेचा दृष्टीकोन याचे आपोआपच विवेचन होते. श्रीलंकेत नुकत्याच झालेल्या एज्युकॉन 2010 चर्चासत्राच्या सुरवातीलाच असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीजचे उपाध्यक्ष डॉ. पंकज चांदे यांनी विद्यापीठांची संकल्पना भारतात हजारो वर्षांपासून असल्याचे सांगत आपल्याला आंतरराष्ट्रीय दर्जा पुन्हा गाठायचा आहे याची जाणीव करून दिली. आपल्या देशात नालंदा विद्यापीठाच्याही अगोदर कौंडिण्यपूर हे योगाचा अभ्यास करणारे विद्यापीठ तर गुणशीला हे फक्त महिलांसाठीचे विद्यापीठाही होते अशी माहिती दिली.

...तर "आयसीसी'वर कायदेशीर कारवाई

Sports News - Sat, 2010-09-04 20:10

लंडन/कराची - "स्पॉट फिक्‍सिंग'प्रकरणी संशयित पाकिस्तानी खेळाडूंवर चौकशीपूर्वीच थेट निलंबनाची कारवाई करण्याचा निर्णय घेणाऱ्या शिखर संघटना आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा (आयसीसी) निषेध व्यक्त करत, या प्रकरणी खेळाडू निर्दोष आढळल्यास "आयसीसी'वर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा पाकिस्तान क्रिकेट मंडळाने (पीसीबी) शनिवारी दिला. ""फिक्‍सिंग प्रकरणातील चौकशी अजूनही संपलेली नाही. स्कॉटलंड यार्ड पोलिसांनी पाकिस्तानी खेळाडूंना केवळ संशयित जाहीर केले आहे. त्यांच्याविरुद्ध कुठलेही आरोप ठेवलेले नाहीत. त्यामुळे या प्रकरणात जर हे खेळाडू दोषी आढळले नाहीत, तर "पीसीबी'ने "आयसीसी'वर कायदेशीर कारवाई करण्याची तयारी ठेवली आहे,'' असे"पीसीबी'चे कायदेशीर सल्लागार तौफिक रिझवी यांनी सांगितले. "आयसीसी'ने आपले अधिकार वापरून चौकशीपूर्वीच कारवाई केली आहे. खेळाडूंवर गुन्हेगारी स्वरुपाचे आरोपही ठेवण्यात आलेले नाहीत. चौकशीत पाकिस्तानी खेळाडूंनी पूर्ण सहकार्य केले आहे. त्यांनी सर्व माहिती पोलिसांना दिली आहे, त्यामुळेच त्यांना काल रात्री सोडून देण्यात आल्याचेही रिझवी यांनी स्पष्ट केले.

आयसीसी पुरस्कार यादीतून आसिफ, आमीरला वगळले

Sports News - Sat, 2010-09-04 20:10

इस्लामाबाद - "स्पॉट फिक्‍सिंग'मध्ये संशय असलेल्या आणि चौकशी सुरू असलेल्या पाकिस्तानी खेळाडूंना आता विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे. आयसीसीने तर चौकशी पूर्ण होईपर्यंत त्यांच्यावर बंदी घातली आहे. आता आयसीसीच्या पुरस्कार यादीतून महंमद आसिफ आणि महंमद आमीर यांना वगळण्याचा निर्णय घेतला.&nbsp पाकिस्तानच्या या दोन्ही वेगवान गोलंदाजांना नामांकन देण्यात आले होते परंतु आता त्या दोघांनाही वगळण्यात आले असल्याचे आयसीसीच्या प्रवक्‍त्याने सांगितले. महंमद आमीरला सर्वोत्तम उदयोन्मुख खेळाडूसाठी, तर महंमद आसिफला सर्वोत्तम कसोटीपटूच्या विभागात नामांकन मिळाले होते. आमीर, आसिफसह सलमान बट्टची स्पॉट फिक्‍सिंगप्रकरणी स्कॉटलंड यार्ड पोलिसांकडून चौकशी सुरू असून त्यांना इंग्लंडविरुद्धच्या झटपट क्रिकेट मालिकेसाठी वगळण्यात आले आहे.

आणखी काही प्रकरणांवर प्रकाश पडणार

Sports News - Sat, 2010-09-04 20:10

कराची - क्रिकेट विश्‍वात खळबळ उडवून देणाऱ्या "स्पॉट फिक्‍सिंग'च्या प्रकरणातील संशयित सलमान बट्ट, महंमद आसिफ आणि महंमद आमीर या तिघांना शनिवारी स्कॉटलंड यार्ड पोलिसांनी कुठलाही आरोप न ठेवताच सोडून दिले. मात्र, यानंतरही या पाकिस्तानी खेळाडूंवरील संकट संपत नाही. येत्या काही दिवसांत त्यांना आणखी काही प्रकरणांवर खुलासा करावा लागेल, अशी शक्‍यता वर्तविण्यात येत आहे.&nbsp पाकिस्तानी क्रिकेटपटू आणि बुकी महंमद माजीद यांच्या कथित संबंधाचा पर्दाफाश करणाऱ्या "दी न्यूज ऑफ दी वर्ल्ड' दैनिकाकडे असेही अजून काही पुरावे आहेत की, ज्यामुळे पाकिस्तानी क्रिकेटपटू आणि मंडळाला लाजेने मान खाली घालायला लावेल, अशी माहिती एका सूत्राने दिली.&nbsp या दैनिकाने आता पोलिसांकडे पाकिस्तानी क्रिकेटपटू आणि माजीद यांच्यातील प्रदीर्घ संभाषणाची "ऑडियो' टेप सादर केली असून, यात दोघांमध्ये विश्‍वकरंडक ट्‌वेंटी-20 आणि श्रीलंकेतील झालेल्या आशिया करंडक स्पर्धेदरम्यान झालेल्या संभाषणाचा समावेश आहे. यात एक पाकिस्तानी खेळाडू आशिया करंडक स्पर्धेत लवकर बाद होण्याविषयी चर्चा करत असल्याचे ऐकू येते.

भारतीय महिलांचा तिसरा पराभव

Sports News - Sat, 2010-09-04 20:10

रोझारियो (अर्जेंटिना) - भारतीय महिला हॉकी संघाला विश्‍वकरंडक हॉकी स्पर्धेत सलग तिसऱ्या दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. "अ' गटात शुक्रवारी झालेल्या सामन्यात जर्मनीने भारताचा 4-1 असा पराभव केला. या पराभवाच्या मालिकेमुळे भारताचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आल्यासारखेच आहे. याच गटातील अन्य एका सामन्यात हॉलंडने ऑस्ट्रेलियाला तेवढ्याच फरकाने पराभूत केले. जपान आणि न्यूझीलंड यांच्यातील सामना 2-2, तर "ब' गटातील इंग्लंड आणि दक्षिण कोरिया यांच्यातील सामना 1-1 असा बरोबरीत सुटला.&nbsp भारतीय महिलांच्या बचावातील गाफिलपणाचा पुरेपूर फायदा उठवत जर्मनीने सुरेख विजयाची नोंद करताना उपांत्य फेरी प्रवेशाच्या आपल्या आशा भक्कम केल्या. त्यांच्याकडून एलिन हॉफमॅन्न, माईके स्टोएकेल, नाताश्‍चा केल्लेर आणि लिडिया हॅसे यांनी गोल नोंदवले. भारताकडून पुन्हा एकदा केवळ राणी रामपाल हिलाच गोल करण्यात यश आले. भारताची गाठ आता जपानशी पडेल. "अ' गटातून आता हॉलंड आणि जर्मनी प्रत्येकी 9 गुणांसह आघाडीवर आहेत. भारतीय माहिलांचा खेळ बघता पहिल्या दोन पराभवातून त्यांनी काही शिकल्याचे अजिबात दिसून आले नाही.

शालाबाह्य या लेकरांपुढे व्यवस्था आणखी कितीदा हरणार आहे?

Latest News - Sat, 2010-09-04 20:10

शिक्षणाचा कायदा झाला असला तरी राष्ट्राची संपत्ती असणारी लाखो मुले आज शिक्षणाच्या परिघाबाहेर आहेत. त्यांना प्रवाहात आणण्याचे आव्हान आपणासमोर आहे. आज शिक्षक दिनानिमित्त प्रत्येक मूल शाळेत दाखल करण्याचा संकल्प केला जावा. दिसतोस मला तू लेकरा, उसाच्या फडात, ऊस तोडत कोयत्याचे वार स्वतःच्या भवितव्यावर करताना धगधगत्या बॉयलरमध्ये स्वप्नांची राख करत बालपणीच आयुष्याची मळी होताना त्याच दीन चेहऱ्याने भेटतोस मला वीटभट्टीवर भट्टी रचता रचता जगण्याचेच सरण रचताना जिथं भाजणाऱ्या विटांसोबत शिक्षण सती जातं दगडखाणीत बापासोबत दगड फोडताना तुझे रक्ताळलेले कोवळे हात नकोच दाखवू मला तुझे निबर होत चाललेले हात- आमच्या निबर संवेदनांचे जणू काव्यात्म प्रतीक तुझ्या झोपडीबाहेर राहिलो उभा तेव्हा लहान भावंड कडेवर घेऊन तू आलीस अकाली प्रौढ झालेली .... चुलीच्या धुरात तू भाकरी थापताना तुझ्या डोळ्यांतली शिक्षणाची स्वप्नं बरे झाले मला दिसली नाहीत....

भारतातील विद्यापीठांचे पुढचे पाऊल...

Latest News - Sat, 2010-09-04 20:10

शिक्षण, तंत्रज्ञान आणि उद्योग क्षेत्रांमधल्या तज्ज्ञांना एकाच व्यासपीठावर आणून त्यांच्यात संवाद घडवणाऱ्या एज्युकॉन या राष्ट्रीय स्तरावरील कुलगुरूंच्या परिषदेने यंदा आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. गोव्यात झालेल्या पहिल्या एज्युकॉनमध्ये आधुनिक तंत्रज्ञान प्रभावीपणे अंगीकारण्याची आणि उच्च शिक्षणाची गुणवत्ता वाढवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याची गरज अधोरेखित झाली होती. शिक्षकांची गुणवत्ता वाढवण्यासाठी उद्योगांची मदत घेण्याबाबतही 2004च्या पहिल्या एज्युकॉनमध्ये चर्चा झाली होती. गेल्या महिन्यात कोलंबोत झालेल्या सहाव्या एज्युकॉनमध्ये सहभागी कुलगुरूंनी एकमताने केलेल्या ठरावात पहिल्या एज्युकॉनमध्ये झालेल्या चर्चेचे प्रतिबिंब पाहायला मिळते. उच्च शिक्षणच्या क्षेत्रातील दर्जेदार शिक्षकांची उणीव भरून काढण्यासाठी विद्यापीठांनी उद्योग क्षेत्रातल्या धुरीणांची मदत घ्यावी, अशी सूचना सर्व कुलगुरूंनी एकमताने केली. "सकाळ' माध्यम समूहाच्या पुढाकाराने होणाऱ्या गेल्या सहा एज्युकॉन परिषदांच्या प्रवासातला हा एक महत्त्वाचा टप्पा मानायला हवा. उद्योग क्षेत्राच्या सहभागामुळे विद्यापीठांमधील संशोधन कार्याला भरीव मदत होईल.

तनिष्काचा वर्धापन दिन उत्साहात (व्हिडिओ)

Latest News - Sat, 2010-09-04 20:10

स्त्रीचं जगणं मांडत सुसंवाद घडवणा-या सकाळ माध्यम समूहाच्या तनिष्का मासिकाचा वर्धापन दिन नाशिकमध्ये उत्साहात साजरा झाला. या मासिकानं पाचव्या वर्षात पदार्पण केलंय. या निमित्तानं विविध क्षेत्रात आपल्या कर्तृत्वानं स्वतःची ओळख निर्माण करणाऱ्या पाच उद्योजिकांचा सत्कार करण्यात आला. &nbsp व्हिडीओ पाहण्यासाठी क्‍लिक करा.