top of page

श्री. सुदर्शन साठे यांच्याकडून 'गीतासार' विषयावर व्याख्यानं

केतकी अलुरकर (ज्योती संपादक)

Aug 12, 2023

कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन। मा कर्मफलहेतुर्भूर्मा ते सङ्गोऽस्त्वकर्मणि|  


म्हणजे साध्या भाषेत सांगायचे झाले तर कोणतेही काम निरपेक्ष भावनेने करावे. आपल्या कर्माचे फळ आपल्याला कधी, कुठे, कोणत्या स्वरूपात मिळेल ह्यावर कुणाचा ताबा नाही पण फळाच्या अपेक्षेने काम केल्यावर मात्र आपण कर्मबंधनात बांधले जातो.


दिनांक 12 ऑगस्ट रोजी आपल्याला श्री. सुदर्शन साठे यांच्याकडून 'गीतासार' रूपात श्रीमद्भग्वद्गीतेतील काही श्लोकांचे असेच अतिशय साध्या, सोप्या रूपात निरूपण ऐकायला मिळाले. अर्थात त्यांना समजलेली गीता त्यांच्या ओघवत्या वाणीत ऐकणे ही एक पर्वणीच होती. तत् त्वम असि| ह्या तीन शब्दांचा सुंदर अर्थ त्या दिवशी त्यांच्याकडून समजला.


3 तास झालेल्या ह्या कार्यक्रमात मंडळाचे अध्यक्ष श्री विवेक विन्हेरकरांनी सुदर्शन दादांची ओळख करून दिली आणि कार्यक्रमाला सुरुवात झाली. दादांच्या भाषणानंतर सामोसे आणि चहा चा नाश्ता करून सर्व श्रोत्यांना त्यांना गीतेसंबंधी प्रश्न विचारायची संधी मिळाली.


त्यानंतर आनंद मोरेंनी सुदर्शन दादांना त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल आणि व्यवसायाबद्दल काही प्रश्न विचारले आणि मग श्रोत्यांबरोबर एक प्रश्नोत्तराचा खेळ पण खेळण्यात आला. त्यांच्या व्यस्त दिवसामध्ये ते चांगले वाचन आणि आपल्या आवडीनिवडी जपण्यासाठी कसा वेळ काढतात हेही समजले.


एकूण मला खात्री आहे की ह्या कार्यक्रमामुळे सर्व श्रोत्यांची शनिवार दुपार अत्यंत सत्कारणी लागली असणार तसेच हिंदू धर्मातील प्राचीन वाङ्मयाबद्दल उत्सुकता ही वाढली असणार. भविष्यात सुदर्शन दादांचे अश्याच विविध विषयांवरील विचार ऐकायची संधी आम्हा क्लीव्हलँडकरांना मिळेल ह्याची मला खात्री आहे. 

 

bottom of page