top of page

Jyoti Test

Jyoti Editor

Jan 1, 2021

This is a test article headline


This is test article 1


World Cup U19 : नवव्यांदा अंतिम फेरीत पोहोचण्याचे लक्ष्य; भारत-आफ्रिका आज उपांत्य सामना


बेनोनी : भारताचा युवा क्रिकेट संघ उद्या १९ वर्षांखालील विश्‍वकरंडकाच्या उपांत्य फेरीच्या लढतीत दक्षिण आफ्रिकेशी दोन हात करणार आहे. गतविजेता व सर्वाधिक पाच वेळा विजेता ठरलेला भारतीय क्रिकेट संघ नवव्यांदा स्पर्धेची अंतिम फेरी गाठण्यासाठी सज्ज आहे. यंदाच्या मोसमात एकही लढत न गमावलेल्या भारतीय संघाचे पारडे जड आहे.

भारतीय संघाने साखळी फेरीत तीन, तर सुपरसिक्समध्ये दोन लढतींमध्ये विजय मिळवले आहेत. या पाचही लढतींमध्ये प्रतिस्पर्ध्यांवर सहज मात करण्यात त्यांना यश संपादन करता आले आहे. मुशीर खान व उदय सहारन या दोन फलंदाजांनी धावांचा पाऊस पाडला आहे.

मुशीर याने दोन शतके व एक अर्धशतकासह ३३४ धावा फटकावल्या असून उदय याने एक शतक व दोन अर्धशतकांसह ३०८ धावा फटकावल्या आहेत. सचिन धस याने नेपाळविरुद्धच्या सुपर सिक्स लढतीत ११६ धावांची खेळी साकारत आपली चुणूक दाखवली. गोलंदाजी विभागातही भारतीयांनी प्रभावी कामगिरी केली आहे.

bottom of page