top of page

मकर संक्रांत २०२६

सौ. मीनल सुर्वे शर्मा

मकर संक्रांत २०२६

२०२६ या वर्षाची सुरुवात आपल्या पहिल्या कार्यक्रमाने झाली—मकर संक्रांतीचा एक अतिशय शुभ सोहळा. 'तिळगूळ घ्या, गोड गोड बोला' या महाराष्ट्रीयन परंपरेचे जतन करत, आपण सर्वांनी एकत्र येऊन साजरा केला. चविष्ठ खाद्यपदार्थ, पारंपारिक रुखवत आणि मनापासून झालेल्या गप्पांनी हा सोहळा अधिक रंगला.


एकीकडे पारंपारिक मेजवानीचा आनंद लुटला जात असताना, दुसरीकडे महिलांसाठी आयोजित केलेल्या खेळांनी वातावरणात चैतन्य आणले. या खेळांमधील विजेत्यांना पैठणी आणि इतर सुंदर साड्या अशा मजेदार बक्षिसांनी उत्सवाचा आनंद द्विगुणीत केला.



लहान मुलांसाठी आयोजित केलेल्या पतंग बनवण्याच्या कार्यशाळेने अधिकच रंगत आणली. मुलांनी स्वतःच्या हाताने रंगीबेरंगी पतंग तयार करून या सणाचा आनंद लुटला.

साड्यांचा रेशमी थाट आणि आकाशात झेप घेणारे पतंग, अशा या आनंदी वातावरणाने पुढील वर्षासाठी एक सकारात्मक आणि उत्साही सुरुवात करून दिली आहे. एकत्र येण्याचा हा आनंद आणि उत्साह असाच बहरत राहो, हीच सदिच्छा!


सौ. मीनल सुर्वे शर्मा

उपाध्यक्षा - २०२६, ईशान्य ओहायो मराठी मंडळ

©2023 by North East Ohio Marathi Mandal. Proudly created with Wix.com

bottom of page