top of page

ABOUT US

Founded in 1975

मराठी संस्कृती, कला, साहित्य, आणि भाषेचा प्रसार ग्रेटर क्लिवलँड  व जवळच्या परिसरात करण्याच्या उद्देशाने ईशान्य ओहायो  मराठी मंडळाची स्थापना १९७५ साली करण्यात आली. गेली चाळीस वर्ष हे मंडळ यशस्वी रित्या मराठी भाषेची कलोपासना आणि संवर्धन जोपासत आहे. 

ग्रेटर क्लिवलँड  व जवळच्या परिसरात राहणार्‍या मराठी बांधवांना मराठी मंडळाद्वारे नियमितपणे आयोजित केले जाणारे कार्यक्रम ही एक पर्वणीच वाटते. ह्या कार्यक्रमांच्या निमित्ताने त्यांना एकत्र येता येतं, स्नेहबंध सुरू करता व वाढवता येतात आणि महत्वाचं म्हणजे अभिरुचिपूर्ण कलाविष्काराचा आणि मराठमोळ्या खाद्यपदार्थांचा आस्वाद घेता येतो. 

मकरसंक्रांत, होळी, महाराष्ट्र दिन, गणेशोत्सव आणि दीपावली - हे सण परिसरातील सार्वजनिक सभागृहांचा वापर करून साजरे केले जातात. स्थानिक तसेच बाहेरील कलाकारांनी सादर केलेले, मराठी मनाला भावणारे नाटक, शास्त्रीय व उपशास्त्रीय संगीत, नृत्य, चित्रकला व शिल्पकला प्रदर्शन असे अनेक कार्यक्रम मंडळातर्फे आयोजित केले जातात. कार्यक्रमांचं यशस्वी नियोजन म्हणजे अवघड काम. ते सुरळीत पार पडावं ह्यासाठी दरवर्षी नव्याने नियुक्त होणारी कार्यकारिणी वर्षभर झटत असते. 

मराठी शाळा, उत्तरंग तसेच बृहन्महाराष्ट्र मंडळ प्रणित कार्यक्रमांनाही मंडळातर्फे सक्रिय हातभार लावला जातो.

आमच्या समितीची अधिक माहिती www.neomm.org वर उपलब्ध आहे किंव्हा  संपर्क करा  president@neomm.org

Shivaji.jpg
bottom of page