top of page

संपादकीय

श्री. यश पोतदार

संपादकीय

आपल्या NEOMM च्या ५१व्या वर्षाच्या पहिल्या ज्योती अंकाला जेव्हा मी सुरुवात केली, तेव्हा परत एकदा एक संपादक म्हणून आपल्या समोर येण्याचा आनंद आणि अभिमान तर होताच, पण हलकसं असं थोडं दडपणही होतं. मी माझी भुमिका परत तशीच निभाऊ शकेन की नाही? लोकांना माझं काम परत आवडेल की नाही? असे बरेच प्रश्न मनात होते.



पण मग मला एके काळी कुठेतरी ऐकल्यावाचल्याचा एक संदर्भ आला. Google ने याची शाश्वती दिली नाहीये, पण मी याचा, शैक्षणिक गुणधर्म मात्र स्वीकारला. म्हणतात, श्री. अमिताभ बच्चन म्हणाले होते, की मी कितीही मोठा STAR झालो, तरीही मी प्रत्येक Scene, माझा पहिलाच आहे असं मनात धरून करतो. तर माझाही प्रयत्न परत एकदा तोच आहे, की आपण आपले काम चोख करावे.


आणि आनंदाची बाब ही आहे की आपल्या मंडळात खूप कलाकार भरलेले आहेत, ज्यांना उत्तेजनाची आणि Platform ची गरज आहे, जो NEOMM देऊ शकतो.

त्याच मुद्यावर बोलायचे झाल्यास, आपल्याच परिवारातले आदित्य व अश्विन घाटपांडे यांनी एक सुंदर प्रकल्प सुरु केला आहे, 'चित्रदर्पण', जो प्रत्येक अंकात असेल. Typical Reviews तर सगळेच देतात. चांगलं काही शोधून, पाहून, आणि मुळत: प्रामाणिकपणे काय पाहावे, कुठे पाहावे, आणि मुळात का पाहावे, यावर केंद्रित अंकातला हा भाग असेल...


हे वर्ष मुळातच, सुंदर अश्या संक्रांत सोहळा आणि श्री. शिवरायांच्या आनंदघोषात सुरु झालं आहे.


तुमचा अजून वेळ न घेता, या अंकाच्या सर्व लेखकांचं कौतुक करत, मी अभिवादन करतो आपण सर्वांना, की वेळ घेऊन वाचा आणि या आपल्या ज्योतीला आपल्याला जमेल त्या प्रकारे तेवत ठेवा 😊🙏🙏🙏


खरंच विश्वास नाही बसत आहे, पण आपण सगळ्यांनी या क्लिवलंडच्या थंडीत आपल्या मराठीची ज्योती प्रज्वलीत ठेवली आहे... 😊🙏🙏🙏


श्री. यश पोतदार

©2023 by North East Ohio Marathi Mandal. Proudly created with Wix.com

bottom of page