ईशान्य ओहायो मराठी मंडळ 2025 वार्षिक सभासद बैठक अहवाल
दरवर्षी प्रमाणे ईशान्य ओहायो मराठी मंडळाची वार्षिक सभासद बैठक 14 डिसेंबर 2025 रोजी लोटस बँक्वेट हॉल येथे आयोजित केली होती. ह्या बैठकीचे महत्त्वाचे मुद्दे होते -
1. 2025 मध्ये आयोजिलेल्या कार्यक्रमांचा आढावा
2. बृहन्महाराष्ट्र मैत्री मेळावा कार्यक्रम अभिप्राय आणि आर्थिक आढावा
3. संविधानात दुरुस्ती आणि बदलांचा प्रस्ताव आणि मंजूरी
4. 2026 समितीची निवड आणि vice-president साठी मतदान
5. जेवण
6. Fancy dress स्पर्धा
7. ओपन डांस फ्लोर
1. BMM तर्फे 19 डिसेम्बर रोजी दाखवण्यात येणाऱ्या अभंग तुकाराम ह्या चित्रपटाची माहिती थोडक्यात देण्यात आली. उत्कर्ष हजरनीस यांनी 2025 मध्ये मराठी मंडळाने आयोजित केलेल्या सर्व कार्यक्रमांचा थोडक्यात आढावा घेऊन कार्यक्रमाची सुरुवात केली. संक्रांत, गुढीपाडवा आणि रामनवमी, BMM मैत्री मेळावा, क्लीव्हलंडचा राजा 10 दिवसांचा गणपतीउत्सव, "शिकायला गेलो एक" नाटक इत्यादी कार्यक्रम ह्या वर्षी झाले. 10 दिवसांच्या गणेशोत्सवात सार्वजनिक सत्यनारायण पूजा सांगितल्याबद्दल संदीप दीक्षित यांना giftcard देऊन सन्मान करण्यात आला.
2. BMM मैत्री मेळावा निमंत्रक तन्मयी दीक्षित तसेच कार्यवाही समितीचे आभार मानण्यात आले. एक छोटासा पण खूपच सुंदर video दाखवून अध्यक्ष उत्कर्ष हजरनीस यांनी BMM मेळाव्यात झालेल्या कार्यक्रमांची झलक दाखवली. तन्मयी, गीता, निलेश ह्यांनी देखील आपल्या भावना व्यक्त केल्या. राधिका देशपांडेंनी BMM चा आर्थिक आढावा मांडला. थोडाफार झालेला तोटा भरून काढण्यासाठी trustee मेधा गोडबोलेंनी एक प्रस्ताव मांडला ज्याचा मुख्य उद्देश trustee account आणि operating account ह्यांनी साधारण 8,000 डॉलर्स चा तोटा निम्मा निम्मा हिस्सा घेऊन भरून काढायचा असा होता. उत्कर्षनी ऐनवेळी विचार करून असा प्रस्ताव मांडला की trustee account मधल्या पैशांना हात नं लावता ऑपरेटिंग अकाउंट मधूनच हा तोट्याचा पूर्ण हिस्सा उचलला जाईल. ह्या निर्णयाचे सर्वांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत केले. संदीप दीक्षित ह्यांनी ह्या निर्णयाला सहमती दिलीच त्याशिवाय मंडळाला 1,500 डॉलर्स ची भेट देऊ केली. थोड्याच वेळात इतरही अनेक सभासदांनी आपापल्या परीने आर्थिक मदत करायचे कबुल केले अन बघता बघता 8,000 डॉलर्स चा तोटा कोणत्याही अकाउंट च्या बॅलन्स ला धक्का नं लावता भरून निघाला.
3. त्यापाठोपाठ neomm 2025 चा आर्थिक आढावा राधिकाने सादर केला. त्यानंतर शक्य तेव्हा local कार्यक्रम आणून मंडळाचे पैसे बाहेरच्या (भारतातले नाटक, सिनेमे, गाण्याचे कार्यक्रम इ.) कार्यक्रमांमध्ये फार खर्च नं करण्याचा प्रस्ताव श्रीकांत लिमयेंनी मांडला. त्याला अनेक सभासदांनी दुजोरा दिला.
4. उपाध्यक्ष अभिजीत कुलकर्णी यांनी संविधानात बदल आणि दुरुस्ती साथीचा प्रस्ताव मांडला त्याला गीता लिमयेंनी दुजोरा दिला. संविधानात बदलांचे executive कमिटी ने मान्य केलेले बदल सर्वाना सादर करण्यात आले. ह्यावेळी काही सभासदांनी आपले मुद्दे सादर करण्यासाठी वेगळ्या वेळेची मागणी केली आणि थोडे तणावाचे वातावरण निर्माण झाले पण ह्यातून मार्ग काढण्यासाठी हे बदल परत एकदा सभासदांसमोर मांडण्याची एक संधी देण्याच्या उत्कर्ष आणि अभिजीतच्या आश्वासनावर हा विषय संपवण्यात आला.
5. जेवणाची वेळ झाल्याने सुंदर जेवणाचा सर्वानी आस्वाद घेतला. जेवण चालू असतानाच वेळेचा मान ठेऊन अभिजीतनी समितीने मीटिंग मध्ये विचारविनिमय करून मान्य केलेले बदल वाचून सर्वांचे मत घेतले - आणि बहुमतांनी त्याला संमती मिळाली. संदीप दीक्षित नि मुद्दा नं 8 मध्ये थोडे शब्द बदलून परत एकदा लिहिण्याच्या समितीच्या मान्यतेनंतर संविधान बदलांना संमती दिली. जे सभासद अनुपस्थित होते त्यांना आधीच ई-मेल द्वारे हे बदल कळवण्यात आले होते आणि त्यांची मतं पण मोजण्यात आली (42 votes - 38 संविधानाला सहमती, 4 अनुपस्थित)
6. ह्यानंतर 2026 च्या 9 जागांसाठी बिनविरोध निवड झाली
- प्रेसिडेंट - अभिजीत कुलकर्णी
- सेक्रेटरी - आदित्य घाटपांडे
- ट्रेजरर - तुषार वाच्छाराजानी
- कल्चरल - अतुल शिंदे
- फूड - नम्रता जयस्वाल
- ज्योती आणि कम्म्युनिकेशन -यश पोतदार
- ट्रस्टी- शेखर गणोरे
- BMM प्रतिनिधी - मेधा गोडबोले
- वाइस प्रेसिडेंट साठी 2 अर्ज आले होते - मीनल सुर्वे आणि विवेक विन्हेरकर - यामध्ये भाषणासाठी दोन्ही उ मेदवारांना संधी दिली असता मीनल यांनी आपले विचार मांडले आणि विवेक नी मीनल ला पाठिंबा देत आपले नाव निवडणुकीतून मागे घेतले. आणि मीनल सुर्वे ची बिनविरोध निवड झाली.
6. निवडून आलेल्या नवीन समितीचे सर्वानी टाळ्यांच्या गजरात अभिनंदन केले. समितीने पुढील वर्षी कामासाठी उत्सुक असल्याचे मनोगत व्यक्त केले.
7. तन्मयी दीक्षित यांनी आठवण करून दिल्याप्रमाणे उत्कर्षनी state farm इन्शुरन्स कंपनीला पुढील 5 वर्षं NEOMM च्या इन्सुरन्सचे कॉन्ट्रॅक्ट देत असल्याचा प्रस्ताव मांडून सर्वानुमते मान्य झाला.
8. ह्यानंतर धमाल हॉलिडे पार् टी ची सुरुवात झाली. मीनल नि आयोजित केलेला फॅशन शो फारच मस्त झाला. लहान मुलं आणि मोठ्यांनी एकाच उत्साहाने भाग घेऊन सर्वांचे मनोरंजन केले.
9. त्यानंतर open floor मध्ये संगीताच्या तालावर उत्साही सभासदांनी डान्स केला आणि कार्यक्रमाची सांगता झाली.
सौ. केतकी अलुरकर
NEOMM 2025 Secretary

