Surya%20Namaskar%20(Sun%20Salutation)_ed

सूर्यनमस्कार उपक्रम

Feb 9, 2021

ह्या वर्षी आपण एक नवीन उपक्रम चालू करणार आहोत. सूर्यनमस्कारांचे आरोग्यासाठी असणारे लाभ आपणा सर्वांना माहीत असतीलच. शारीरिक बल आणि तेज वाढविणारे सूर्यनमस्कार आपल्या महाराष्ट्रात जास्त प्रचलित केले ते श्री समर्थ रामदास स्वामींनी .

आपल्या पुढच्या पिढी साठी हा उत्तम व्यायाम प्रकार आणि जोडीला उत्तम मराठी शब्दोच्चार असे दुहेरी लाभ देणारा उपक्रम समोर ठेवीत आहोत.

१८ वर्षा खालील मुलांनी बारा सूर्यनमस्कार बारा सूर्यमंत्रां सहित पूर्ण करून दाखविले तर मंडळा कडून certificate देण्यात येईल.

स्पष्ट शब्दोच्चाराकडे विशेष लक्ष द्यावे. या उपक्रमाने लहान मुलांची मराठी शिकण्याची आणि वाचनाची / अक्षरओळखीची जिज्ञासा जागृत होईल अशी आशा करूया.

सूर्याची बारा नावे असलेले मंत्र खालील प्रमाणे आहेत.


 1. ऊॅं मित्राय नम:

 2. ऊॅं र व ये नम:

 3. ऊॅं सूर्याय नम:

 4. ऊॅं भानवे नम:

 5. ऊॅं खगाय नम:

 6. ऊॅं पूष्णे नम:

 7. ऊॅं हिरण्यगर्भाय नम:

 8. ऊॅं मरीचये नम:

 9. ऊॅं आदित्याय नम:

 10. ऊॅं सवित्रे नम:

 11. ऊॅं अर्काय नम:

 12. ऊॅं भास्कराय नम:


ह्या उपक्रमात कोणीही सहभागी होऊ शकेल. पालकांनी समंत्र सूर्यनमस्कार घालून मुलां समोर आदर्श ठेवावा.


 आपणा सर्वांना विनंती की सर्व लहान मुलांना प्रोत्साहन देऊन ह्या उपक्रमाला उत्तम प्रतिसाद द्यावा.