नमस्कार,
आपल्या मंडळाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या मी आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो. ५० वर्षांचा हा प्रवास आपल्या मंडळाच्या सभासदांच्या अथक परिश्रम आणि समर्पणाने सुशोभित झाला आहे. या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने आपल्या मंडळाचा आढावा देताना मला अत्यंत अभिमान वाटतो आहे.
या सुवर्ण महोत्सवी वर्षात आपल्यासाठी विशेष कार्यक्रम आणि उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ह्या वर्षातील आपला पहिला कार्यक्रम - म्हणजेच मकर संक्रांत अतिशय यशस्वीरीत्या पार पडला आहे. ह्यात हळदी कुंकू, मुलांसाठी बोर नहाण, व बायकांसाठी विविध खेळ खेळण्यात आले. ह्या वर्षातील पुढील कार्यक्रमात सुद्धा विविध कला, नृत्य आणि संगीत कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. आपल्या संस्कृतीचे संवर्धन आणि नव्या पिढीला याची ओळख करून देणे हे या उपक्रमांचे उद्दिष्ट आहे. या उपक्रमांमध्ये आपल्या सर्वांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे.
ह्या वर्षातील उपक्रमांमधील, एक विशेष उपक्रम म्हणजे आपल्याकडे *जून महिन्यात होणारा BMM चा मैत्री मेळावा.* ह्या वर्षी हा मान आपल्याला मिळणं हा दुग्धशर्करा योगच म्हणायचा. ह्या कार्यक्रमात भारतातून अनेक दिग्गज कलाकार सामील होणार आहेत. ह्याच बरोबर नॉर्थ अमेरिकेतील सर्व मंडळांना आग्रहाचे आमंत्रण पाठवण्यात आले आहे. आपण सगळेच ह्या कार्यक्रमाच्या यजमानपदी आहोत. तरी आपण सर्वांनी एकत्र येऊन हा उपक्रम यशस्वी करावा, ही विनंती आहे.
शेवटी मी आपल्या उदार देणगीदार आणि प्रायोजकांचे मनापासून आभार मानू इच्छितो. तसेच मी आपल्या मंडळाचे स्वयंसेवक, आपले विश्वस्त, शाळेचे शिक्षक, ढोल-ताशा-लेझीम पथक, आणि आताच्या व मागील सर्व कार्यकारी समितीच्या सदस्यांचे आभार मानू इच्छितो. तुमच्या कठोर परिश्रमामुळेच आपले सर्व कार्यक्रम सुरळीतपणे पार पडत आले आहेत.
पुन्हा एकदा आपल्या मंडळाच्या सर्व सदस्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! हे वर्ष आपल्या सर्वांसाठी यशस्वी, आनंददायी आणि समृद्ध असावे ही माझी मनापासून इच्छा आहे. चला, हे वर्ष जोरदार उत्साहाने साजरे करूया!
धन्यवाद!!
उत्कर्ष हजरनीस
अध्यक्ष, NEOMM २०२५

उत्कर्ष हजरनीस - अध्यक्ष
अभिजीत कुलकर्णी - उपाध्यक्ष
राधिका देशपांडे - खजिनदार
विराज मोराणकर - संयुक्त खजिनदार
केतकी अलुरकर - सचिव
यश पोतदार - कम्युनिकेशन्स लीड
मीनल शर्मा - सांस्कृतिक कार्यक्रम समिती अध्यक्ष
स्नेहा दातार - सांस्कृतिक कार्यक्रम समिती
आरती पगारे - सांस्कृतिक कार्यक्रम समिती
पल्लवी चव्हाण - सांस्कृतिक कार्यक्रम समिती
आनंद मोरे - सांस्कृतिक कार्यक्रम समिती
मनीष राय - सांस्कृतिक कार्यक्रम समिती
दिप्ती गणोरे - सांस्कृतिक कार्यक्रम समिती
योगेश शेजळ - सांस्कृतिक कार्यक्रम समिती
पायल मोकळ - सांस्कृतिक कार्यक्रम समिती
अक्षदा ठाकूर - सांस्कृतिक कार्यक्रम समिती
अपूर्वा चिटणीस - अन्न समिती अध्यक्ष
आदित्य घाटपांडे - अन्न समिती
सुयोग बापट - अन्न समिती
किरण सोमवंशी - अन्न समिती
रंजिता किणी - अन्न समिती
हर्षद कुलकर्णी - वेबमास्टर