top of page
ती...
मनात राहते,
क्षणात रुसते,
क्षणात बहरते,
अशी ती...
प्राजक्ताची कळी ती,
सोन्याची नाजूक वळी ती,
परि केवड्याची कुपी ती,
अशी ती...
भटक्या मज पथिकाला,
बोलविणारी वाट ती,
खिन्न माझ्या आयुष्यातले,
आनंदाचे उधाण ती...
कवीची कल्पना ती,
अजाणतेचे उत्तर ती,
क्रूरतेच्या अमावस्येला,
कैवल्याचे चांदणे ती...
प्रेमळ असा भास ती,
अखेरचा तो श्वास ती,
मजभोवती रेंगाळणाऱ्या,
सावल्यांचा प्रकाश ती...
अशी ती,
हो, अशीच ती...
यश पोतदार
bottom of page