अमेरिकेची वारी अमेरिकेची वारी
परिचितांमध्ये करता येते रोट भारी
दुर्मिळ व्हिसा, मूल्यवान करन्सी
दुर्मिळ स्वातंत्र्य, पडते दुर्धर प्रवासावरती भारी
विस्तीर्ण बागा, भव्य विद्यालये
फोटोजेनीक परिसर स्वच्छतेने बहरे
बांधीव आखलेले स्वच्छ रस्ते
स्पष्ट खुण ा करतात नि:संदिग्ध इशारे
मोठे मोठे मॉल मंदावतात तुमची चाल
व्हरायटीची बहार मात्र खरेदीसाठी कमाल
सुंदर स्वच्छ स्वच्छतागृहे, सोडवतात इन्फेक्शनचे प्रश्न सारे
पण गरज पडते यांची जेव्हा, काटायला लागतात मैल न् मैल अंतरे
सुंदर नीट नेटके स्वच्छ पिकनिक स्पॉट
सौंदर्यदृष्टी आणि व्यवस्थापनाचे उत्कृष्ट वास्तूपाठ
घरांपुढे सुंदर हिरवळ, दारामध्ये गाडी
गरजच बनून जाते समृध्द्धी सारी
दुकानांपासून घरे असतात मैलांवरती
कामाच्या नियोजन शिवाय नाही दोवार प्रगती
व्हेज नॉनव्हेजचा नेहमीचाच झगडा
पश्चिमेवरती बसत नाही अजून पूर्वेचा पगडा
सुंदर बेकरी प्रॉडक्टस, देखणी आईसक्रीम पारलर्स
मोहवतात मन आणि पाझरू लागतात स्वादुरस
कधीकधी एकाच दिवसांत भेटतात सारे ऋतु
पण नेत्र सुखाचा अनुभव मिळे हर ेक ऋतु
हिरव्यागार हिरवळीवर हिरवेगार क्लीवलँड
थंडीमध्ये बनून जाते पांढरेशुभ्र आईसलँड
निसर्गाच्या प्रत्येक सवालाला मानवाचे उत्तर
पण कधीकधी उत्तरच बनून प्रश्न दुर्धर
प्रश्न उत्तराचा हा खेळ ना बाधा आणतो आनंदात
आनंदाचा हा धबधबा असाच कोसळत राहो आयुष्यात
अमेरिकेत रमलेली आमची ही भारतीय पिढी
अमेरिकन ड्रीमचे हे योग्य मानकरी
पार्टी मध्ये रंगते बॉलीवुडची चर्चा
भारतीय राजकारणाचा गप्पांमध्ये नंबर सर्वात वरचा
स्वदेशापासून दूर आहेत आणि स्वप्नांच्या जवळ
पण स्वदेशातल्या आठवणींची यांना कायम येते उबळ
किती जरी उणीवा आहेत जरी भारत देशात
तरी देखील यांचे मन घुटमळत असते स्वदेशात
सोडून आलेत जरी स्वकीयांचा सहवास
भारतीय संस्कृतीची त्यांच्यात जाणवते आहे आस
