top of page

घेतली भरारी

मीना दीक्षित

घेतली भरारी

बीएमएम कनव्हेंन्शनच्या दारी-


आम्ही क्लिव्हलंडवासिय तर उत्साह, आनंदाचा जल्लोषच करत होतो - कारण २०२२ ते २०२४ बृहन्महाराष्ट्र मंडळाचा ( बीएमएम ) अध्यक्ष” संदीप “क्लिव्हलंडचा, म्हणजे आमच्यातलाच तर होता ! २७ /२८ /२९/ ३० जून ला आपापल्या अडचणी दूर सारत ,अडथळे ओलांडत आमच्या क्लिव्हलंडच्या दिंडीने तर —-

गाठलकी थेऽऽ ट

गोल्डन गेट


आम्ही ही ( साडेसहा /सातहजारांच्या ) वारीत मस्त पैकी सामिल झालो . आणि विठ्ठल नामाचा गजर करत संतोषान आणि समाधानाने आता परतलो सुध्दा ! त्यातली मी एक वारकरी ( आत्ता पर्यंत ४/५ अधिवेशनांना गेले होते बर)

काय म्हणता ? “दर दोन वर्षांनी होणार-या ह्या अधिवेशनात वेगळ आणि “विषेश “काय होत ? “

सांगतेच ,आत्ता आठवतंय तेवढ तरी !

मुख्य म्हणजे एवढ्या दूरवरचा प्रवास करून सहभागी झालेले आपले क्लिव्हलंडकर ,आणि मनात असूनही येता न येऊ शकणा-यांच्या सदिच्छा आणि पाठबळ हे अध्यक्षांसाठी मोलाच आणि “विषेशच “होत .


अनेक नवीन कल्पना घेउन समाजासाठी काहीतरी करण्याची धडपड ,तळमळ असणारे विविध क्षेत्रातील वेगवेगळ्या वयोगटाचे २५० कार्यकर्ते ,यांच्यामुळे तर “बृहन्महाराष्ट्र मंडळाचे “परिवर्तनाचे काम योग्य दिशेने सुरु झाल्याचे प्रत्ययास आले .दोन वर्षे सातत्याने काम करण्या-या ह्या सर्व कार्यकर्त्याचा बीएमएम अधिवेशनात यथोचित सत्कार करण्यात आला हे मनाला खुपच भावले .


भारतीय तत्वज्ञानाची दोनवर्षे सातत्याने चालणारी सत्रे , प.पू.गोविंद देवगिरी महाराज व पू. श्री .मंगेशदादा फडके यांचा परिसंवाद , किर्तन ,पू. गौरगोपालदास यांचा थेट संवाद तरुणांनाही आवडला हे उपस्थिती वरून लक्षात आले.


बीएमएम कन्व्हेंशन मध्ये प्रथमच आयोजिण्यात आलेल्या शास्त्रीय संगीताचा ( संजीव अभ्यंकर ,अश्विनीताई भिडे )यांच्या गायनाच्या वेळी तर उभे रहायलाही जागा नव्हती .एव्हढा हॅाल तुडुंब भरलेला होता !


बीएमएम व महाराष्ट्र शासन यांच्यात नव्याने झालेला करार आठवला ,बीएमएमला शैक्षणिक संस्था म्हणून महाराष्ट्र शासना कडून दर्जा मिळणे हे मोठेच यश म्हणावे लागेल. कन्व्हेंनशनला शाळेतील मुलांची प्रत्यक्ष उपस्थिती ,त्यांनी केलेल्या कार्यक्रमा ची घेतली गेलेली दखल मान्यवर श्री . शरद पोंक्षे यांनी केलेल्या कौतुकाने आनंदलेली मुले आणि कार्यकर्ते पाहून झालेल्या कराराची पावतीच मिळाली म्हणाना !




ह्यातही बाजी मारली ती आकर्षक आणि लीलया कसरती करणाऱ्या मल्लखांबपटूंनी

युवा उपक्रमांत युवाकांनी नवनवीनउपक्रम आयोजित

करून ताकदवान नेटवर्क निर्माण करणे सुरु झालेले आहे.

पॅाडकास्ट सुरु होउन अनेक अजरामर कथा सादर होत आहेत.

“उत्तररंग “घरबसल्या सहभागी होता येणारे ,विविध माहितीपूर्ण दर्जेदार कार्यक्रम देतच आहे .

बीएमएम ने मराठी उद्योजक , व्यावसायिक ,लघुउद्योग सुरु करायचा असेल तर जॅाब सपोर्ट मार्गदर्शन पर “बीकनेक्ट “असा उपक्रम सुरु केलेला आहे.

“ आधार “ उपक्रमांत मराठी लोकांना कोणालाही कोणत्याही समस्येसाठी योग्य मार्गदर्शन दिले जात आहे .

((( "वारसा “, “मेडिटेशन अँड सेल्फ केअर “, “वृत्त “, “तंत्रज्ञान“, मैत्रेयी “, “कराआोके “, "रेशीमगाठी “, “आर्टिस्ट “, “ क्रिकेट “, “ संस्कृत देववाणी “, “पौराहित्य “))) असे अनेक उपक्रम गेली दोन वर्षे नियमित पणे राबविले गेले आहेत. त्याचा खुप लाभ झालेला आहे. खरच ,”विषेश” वाटण्याची ही कारणं आहेत.

आणि ———

म्हणूनच दर दोन वर्षांनी भरणारे हे संमेलन “विषेशच ठरले ह्यात संशय नाही. आपल्या साठी तर ठरला हा उत्सवाचा सणच !!

रुचकर नाश्ता , भरपेट मस्त भोजन ,मनसोक्त खरेदी आणि भरगच्च कार्यक्रम ,तेही अत्यंत दर्जेदार !!!

राहुल देशपांडे ,प्रियांका च गाण, सर्वांना अत्यंत आवडलेल “ययाती देवयानी" हे संगीत नाटक, सारेगमप, शास्त्रोक्त संगीत,लावणी, नृत्य, किर्तन, अजय अतुलच खणखणीत गाण. महेश काळे यांची, भक्तीरसात चिंब भिजवणारी विठ्ठल वारी, हिन्दू धर्म ( धनश्री लेले ), मराठी योध्दे ( श्री शरद पोंक्षे ) सात सुरांची सफर ,ज्योतिष्यातील गमती जमती, "प्रिय भाई “(नाटक ) भाडिपा, माकडाच्या हाती शॅम्पेनने मुद्रा अभिवाचन, मा. श्री राजसाहेब ठाकरे यांची मुलाखत, काय अन् काय —-कन्व्हेंशन सेंटरच्या प्रत्येक हॅाल मधे कुठलाना कुठला कार्यक्रम सुरूच! अनेक लोक अनेक आवडी निवडी, त्या साठी प्रत्येकाची धावपळ. सुंदर साड्या, मस्त मस्त ड्रेसेस, त्याला शोभेसे दागिने, त्या बद्दलचर्चा. महिलाच काय पुरुषवर्ग ही कुठेच कमी नव्हता! त्यातच नव्या जुन्या ओळखीतील भेटणारे मित्र, मैत्रिणी! खरतर वेळच कमी पडत होता हा आनंद लुटायला.

मी तर आठवतां आठवतां दमलेच आहे .


सांगतेना ! अतीव सुंदर अशा “अनलिमिटेड ड्रीम्स“ ने सुरु झालेली “आोपनिंग सेरेमोनी“ आणि अत्यंत लाजवाब अशी क्रिकेट विक्रमवीर सुनील गावसकर यांची दिलखुलास मुलाखत, संमेलनाच्या ह्या सांगता समारंभाच्या विठ्ठल वारीत खचितच दुमदुमली. असे हे संपन्नतेने नटलेले संमेलन मस्त अनुभवले. आणि परत दोन वर्षांनी होणा-या संमेलनाला नक्की जायच आहे. असे मनोमनी पक्के ठरवले. (हो ! तत्पुर्वी आपल्या इथे होउ घातलेल्या “बीएमएम मैत्री“ मेळाव्याची धुरा क्लिव्हलंडकरांना सांभाळायची आहे. हे विसरून चालणार नाही)


साता समुद्रा पलिकडची सुखावणारी समृद्धि बघत अनेक रितीभाती असलेल्या पिढ्या भारतातून अमेरिकेत आल्या. इथे रुळताना रेलचेल असलेले आपले सण उत्सवगायन वादन नृत्य नाटक आणि मुख्य म्हणजे आपली भारतीय संकृती ,साहित्य इतिहास कला यांचे संवर्धन करणाऱ्या बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या “ह्या“ नवी दिशा प्रस्थापित करणाऱ्या दोन वर्षाच्या आगळ्या वेगळ्या अधिवेशनाचा भाग होता आले. ह्याचा निश्चित अभिमान वाटणार आहे.




bottom of page