कर्जबाजारीपणा, नापिकी यामुळे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची मुले, अनाथ तसेच एकल पालक असलेली मुले यांचे शिक्षण आणि संगोपन करणारी स्नेहवन संस्था. महाराष्ट्रातील मराठवाड्यातील परभणी जिल्ह्यातील संवेदनशील मनाचे तरुण आयटी इंजिनिअर अशोक देशमाने यांनी सन २०१५ मध्ये वयाच्या अवघ्या २६ व्या वर्षी हा सामाजिक प्रकल्प सुरू केला. त्यासाठी त्यांनी आयटीतील मोठ्या पगाराची नोकरी सोडली. पैशांअभावी शिक्षण थांबलेल्या मुलांना पुण्यात दर्जेदार
शिक्षण देऊन, समाजाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांचे आणि त्यांच्या कु टुंबाचेजीवनमान उंचावणे, हा संस्थेचा उद्देश आहे.
पुण्याजवळ भोसरी येथे दोन खोल्यांमध्ये १८ मुलांना घेऊन लावलेले हे स्नेहवनचे रोपटे आज आळंदीजवळ कोयाळी येथे दोन एकर जागेत विस्तारले असून ते १८० मुलामुलींना मायेची सावली देत आहे. हा निवासी प्रकल्प असून अशोक देशमाने यांच्याबरोबर त्यांच्या पत्नी अर्चना यांनीही या कामात स्वतःला झोकू न दिले आहे.
स्वामी विवेकानंद, बाबा आमटे यांच्या प्रेरणेने ‘स्नेहवन’ची ही वाटचाल सुरू आहे. संस्थेत एकच स्वयंपाकघर आहे. सर्व जण एक कु टुंब म्हणून एकत्र राहतात. अशोक यांचे आईवडीलही या कार्यात त्यांना मदत करतात. अशोक आणि अर्चना यांच्या दोन छोट्या कन्या आनंदी आणि राधाही या मुलांबरोबरच राहतात, शिकतात.
दोन खोल्यांमध्ये सुरु झालेले स्नेहवन आता दोन एकरांत विस्तारले आहे. सुरुवातीला के वळ पत्र्याच्या छपराची बैठी इमारत असलेल्या संस्थेच्या आवारात आता तीन नवीन इमारती उभारल्या आहेत. शिवाय ग्रंथालय, प्रयोगशाळा, गोशाळा असा विस्तार सुरूच आहे. मुलांबरोबरच आता वंचित मुलींचीही शिक्षण आणि संगोपनाची व्यवस्था संस्थेत के ली आहे. सन २०२४ मध्ये एकू ण १०० मुले आणि १०० मुलींची शिक्षण आणि संगोपनाची व्यवस्था संस्थेत झाली आहे. कामाचा व्याप मोठ्या प्रमाणात वाढला आहे. अनेक अडचणींतून मार्ग काढत, संकटांचा सामना करत हा ज्ञानयज्ञ अखंडपणे सुरू आहे.
वंचित मुलांचे संगोपन करून, त्यांना शिक्षण देणे, एवढाच ‘स्नेहवन’चा उद्देश नाही, तर या मुलांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासासाठी प्रयत्न के ला जातो. त्याग, सेवा, समर्पण आणि सामाजिक बांधिलकीचे संस्कार देत, चारित्र्यसंपन्न, आत्मनिर्भर तरुण घडवत, सक्षम भारत उभारण्यात योगदान देण्याचा ‘स्नेहवन’चा संकल्प आहे.
हवी समाजाची साथ
कोणत्याही सरकारी अनुदानाविना, खडतर परिस्थितीतून हा ज्ञानयज्ञ चालू आहे. वंचित बालगोपाळांचेजीवनमान उंचावण्यासाठी आणि त्यांना समाजामध्येविश्वासाने उभे करण्यासाठी आपले सहकार्य ‘स्नेहवन’साठी अनमोल आहे.
अमेरिकेतील देणगीदारांना प्राप्तिकरात सवलत मिळण्यासाठी IDRF, लोकरे फाउंडेशन, Adopt a Village आणि महाराष्ट्र फाउंडेशन या अमेरिकेतील 50103 नोंदणीकृ त संस्थांमार्फत 'स्नेहवनला' देणगी देता येईल.
ज्या कं पन्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी Benevity पोर्टलवर मॅचिंग डोनेशन उपलब्ध आहे, त्यांना त्याद्वारे मदत करता येईल.
UK Global Giving, CAF America या पोर्टलवरूनही अर्थसाह्य करणे शक्य आहे.
या शिवाय स्नेहवनच्या FCRA बँक अकाउंटमध्येही मदत पाठवू शकता.
मुलांसाठी जेवणाची, नाश्त्याची पंगत देऊ शकता.
मुलांचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारुन सहकार्य करु शकता.
शिकवण्यासाठी किं वा इतर कामात आपला वेळ देऊ शकता.
दैनंदिन लागणाऱ्या वस्तू किं वा त्याचा खर्च देऊ शकता
अधिक माहिती साठी कृपया https://www.snehvan.in येथे भेट द्यावी.