अचानक पावसाळी वातावरण होतं,
अन् मन माहेरची ओढ घेतं!
आभाळ भरून येतं,
अन् ते थेट सिंहगडावर पोहोचतं!
मग काय?
करावी साधी पिठलं पोळी, वाटीतच दही,
अन् गप्पांमध्ये बालपणीच्या आठवणी काही!
सोबतीस कांदाभजी मसाला चहाचा बेत,
अन् मग इथेच बसून म्हणावं,
दुधाची तहान ताकावरच थेट!