About the Event
गणपती उत्सव - २०२४
गणपती बाप्पा मोरया..
बाप्पांच्या आगमनाची चाहूल सर्वांनाच लागली आहे. त्यांच्या स्वागताची तयारी उत्साहात चालू आहे. दरवर्षी प्रमाणे आपला ईशान्य ओहायो मंडळाचा गणपती कार्यक्रम आयोजिला आहे. पूजा, अथर्वशीर्ष पठण, आरती, ढोल-ताशांचा जल्लोष, मराठमोळे सुग्रास जेवण, विसर्जनाची मिरवणूक आणि श्री. श्रीधर फडके यांची संगीताची सुरेल मैफिल, असा भरगच्च कार्यक्रम आहे.
कै. सुधीर फडके हे नाव मराठी माणसाला संगीत युगात नेऊन ठेवते. महाराष्ट्राचे लाडके गायक बाबूजी यांनी स्वरबद्ध केलेली सुमधुर गाणी अजरामर आहेत. त्यांचे सुपुत्र श्री श्रीधर फडके घेऊन येत आहेत “बाबूजी आणि मी” हा लोकप्रिय कार्यक्रम. या मैफिलीत सुधीरजींच्या गाण्यांबरोबरच असतील त्यांच्या काही आठवणी व त्याचबरोबर, श्री श्रीधर फडके यांनी स्वरबद्ध केलेली काही निवडक गाणी.
चला तर मग गणपती बाप्पाचे स्वागत जल्लोषात करायला भेटूया १५ सप्टेंबरला Independence Middle School येथे.