गणेश उत्सव
सालाबाद प्रमाणे यंदाही गणेश चतुर्थी निमित्त ईशान्य ओहायो मराठी मंडळाने क्लिवलँड गणेशोत्सव २०२३ चे आयोजन केलेले आहे.
आपल्या लाडक्या गणरायाच्या, या सोहळ्या करीता मंडळाने जोरदार तयारी सुरु केली आहे. यंदाच्या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे आपल्या NEO गर्जना ढोल ताशा पथकाचं वादन, खास मराठी खाद्य पदार्थाने सजलेले मराठमोळे जेवण, मराठी सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल, आणि विशेष म्हणजे विनामूल्य धमाल विनोदी नाटक "नियम व अटी लागू".
कार्यक्रमाची सुरुवात सकाळी १०:३० वाजता आपल्या लाडक्या बाप्पच्या मिरवणुकीने होईल. मिरवणुकीला साथ असेल ती NEOMM च्या आपल्या ढोल ताशा पथकाची. मिरवणुकीनंतर बाप्पाचे पूजन होईल. आणि मग त्यानंतर लगेच आस्वाद घेता येईल खास मराठी जेवणाचा.
जेवणानंतर सांस्कृतिक कार्यक्रम, जेथे आपल्या मंडळातील काही कलाकार आपली संगीत आणि नृत्य कला सादर करतील. सांस्कृतिक कार्यक्रम आटोपला की मग एक छोटासा टी ब्रेक आणि मग रंगमंचावर सादर होईल सध्या अवघ्या महाराष्ट्रात धुमाकुळ घालत असलेले धमाल मराठी विनोदी नाटक. "नियम व अटी लागू"
नाटकासाठी मान्यवरांच्या काही लाइन वगळता फ्री सिटींग असेल.
नाटका दरम्यान आपल्या लहानग्यांची काळजी घेण्यासाठी मंडळातर्फे मोफत बेबी सिटींग ची सुविधा असेल. टिकट बुक करताना बेबी सिटींग चे तिकीट आठवणीने बुक करा. अधिक माहिती तुम्हाला तिकीट विक्रीच्या फॉर्म वर मिळेले.
कार्यक्रमाची सांगता ही पुन्हा ढोला ताशा वादनाने होईल.