top of page

अध्यक्षीय

उत्कर्ष हजरनीस

अध्यक्षीय

ईशान्य ओहायो मराठी मंडळाच्या (NEOMM) कार्यकारिणी कडून आपण सर्वांना नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ! ह्या वर्षाची जोरदार सुरुवात आपल्या मकर संक्रांतीच्या कार्यक्रमाने झाली. हा कार्यक्रम आपल्याला आवडला असेल अशी आम्ही आशा करतो.


२०२४ हे वर्ष अनेक उपक्रम, उत्सव आणि सणांसह, NEOMM साठी एक महत्वाचे वर्ष असणार आहे. या सर्व कार्यक्रमांमध्ये आणि उपक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी तुम्हा सर्वांना मी खास आमंत्रित करू इच्छितो.

१९७५ पासून सुरु झालेल्या आपल्या या संस्थेला आमची कार्यकारिणी एक पाऊल पुढे नेऊ इच्छिते. आपली संस्कृती साजरी करण्यासाठी सर्वांना एकत्र आणणे हे आमचे ह्या वर्षीचे ध्येय आहे. पुढील पिढीला आपला वारसा आणि परंपरांची ओळख मिळावी म्हणून NEOMM हे एक व्यासपीठ आहे. ह्यासाठी आमच्या कार्यकारिणी चे सातत्याने प्रयत्न चालू आहेत. तुम्हाला ही ह्यात काही सूचना असल्यास आमच्या टीम ला जरूर कळवा.


अनेक वर्षांपासून NEOMM आपल्या सक्रिय सदस्यांमुळे आणि स्वयंसेवकांमुळे यशश्वीरित्या कार्यरत आहे, जे कार्यक्रमांचे नियोजन, नेतृत्व आणि अंमलबजावणीसाठी अगणित तास घालवतात. आम्हाला स्वयंसेवकांची गरज सर्व कार्यक्रमांसाठी असते. तेव्हा अधिकाधिक व्यक्तींना आमच्या टीममध्ये सामील होण्यासाठी मी प्रोत्साहित करू इच्छितो.


दरवर्षी मिळणाऱ्या सभासदत्व, देणग्या, प्रायोजकत्व आणि जाहिरातींद्वारे NEOMM आर्थिकदृष्ट्या कार्यरत राहते. आम्हाला पाठिंबा दिल्याबद्दल मी सर्वांचे आभार मानू इच्छितो आणि त्यांच्या सातत्यपूर्ण समर्थनाची अपेक्षा करतो. या वर्षी आमची टीम निधी उभारणीसाठी अतिरिक्त मार्ग शोधत राहील ज्यामध्ये अनुदान आणि व्यावसायिक प्रायोजकत्व यांचा समावेश आहे.


शेवटी, मी NEOMM शाळा, NEOMM गर्जना ह्यांचे स्वयंसेवक, आपले विश्वस्त, आणि कार्यकारी समितीच्या मागील सदस्यांचे आभार मानू इच्छितो.


चला तर मग, धमाकेदार २०२४ ची तयारी करूया !!


-उत्कर्ष हजरनीस

अध्यक्ष, NEOMM २०२४

bottom of page