आपल्या मंडळाचा वर्षाचा पहिला सण म्हणजे “संक्रांत” ह्या वर्षी १४ जानेवारीला Highland Heights च्या कम्युनिटी हॉल मध्ये जोरदार साजरा करण्यात आला. मंडळ स्थापन झाल्यापासून पहिल्यांदाच संक्रांतीच्या कार्यक्रमाला सभासद वर्गाने मोठ्या संख्येने हजेरी लावली. महिला वर्गाचा तर उत्साह ओसंडून वाहत होता. काळी साडी परिधान करुन, सुंदर दागिने लेववून, वाणाची अदलाबदल करून हळदी कुंकुवाचा कार्यक्रम हौसेने साजरा करण्यात आला. ५ वर्षापर्यंतच्या बालगोपाळ मंडळींनी बोर-नहाण, औक्षण हसत करुन घेतले. पारंपरिक पद्धतीच्या भोगीच्या सुग्रास जेवणाने समारंभाची लज्जत वाढवली.
जेवणानंतर संक्रात व त्यासंबंधीचे वेगवेगळ्या राज्यांमध्ये वापरले जाणारे शब्द असलेला “Bingo” खेळ खेळण्यात आला. हर्षल बरीदे यांनी सूत्रसंचालन केलेला हा खेळ फारच रंगतदार होता. हा खेळ सुरु असताना दुसऱ्या खोलीमध्ये बालवर्गासाठी पतंग कार्यशाळा सुरू होती. सांस्कृतिक कमिटीने आयोजित केलेल्या खेळांमध्ये महिलांनी प्रचंड उत्साहाने भाग घेतला. ठरवून दिलेल्या वेळात मण्यांचे नेकलेस बनवणे, एका हाताने पतंगावर कलाकुसर करणे अशा आव्हानात्मक फेऱ्या होत्या. अंतिम फेरी ही फारच गंमतशीर होती. त्या फेरीमध्ये पोहचलेल्या स्पर्धकांनी मॉडर्न पद्धतीचे उखाणे घ्यायचे होते.
ह्या वर्षी पहिल्यांदाच जिंकणाऱ्या स्पर्धकांना “Gulabi Gota” “Pehnawa” आणि “Zip-Fruits” ह्या कमर्शियल स्पॉन्सरऱ्स कडून बक्षिसे देण्यात आली.
ह्या वर्षी स ंक्रांतीचा कार्यक्रम सर्व अर्थानेच रेकॉर्ड ब्रेकिंग होता.
-अपूर्वा चिटणीस
______________________
मराठी मंडळाची संक्रांत जानेवारी १४ रोजी Highlands Heights च्या community center ला धूमधडाक्यात साजरी झाली.
मुलांसाठी पतंग बनवायचा workshop ठेवला होता. 30 मुलांनी व त्यांच्या पालकांनी मोठ्ठ्या उत्साहाने भाग घेतला. मराठी मंडळाच्या volunteers नी सगळे पतंग बनवायचे साहित्य आणले होते. काही महाराष्ट्राशी निगडीत motifs उपल्ब्ध करून दिल्या होत्या ज्या मुलांनी पतंग बनवतांना त्यांचा खूप छान वापर केला.
प्रत्येक मुलाची creativity बघून खूप आनंद झाला. अश्याच कार्यशाळा मंडळाने करत रहाव्यात म्हणजे मुलांना मराठी culture शी creativity मधून आोळख होत राहील.
- तन्मयी दीक्षित