top of page

मुळ्याचा चटका - पाककृती

तन्मयी दीक्षित

मुळ्याचा चटका - पाककृती

साहित्य

पांढरा मुळा - ६ इंच लांबी x १ inch diameter

फोडणीचे साहित्य

दही

मीठ, साखर

चण्याची डाळ - १/२ वाटी

कोथिंबीर


कृती

आदल्या रात्री चणा डाळ भिजवावी. दुसऱ्या दिवशी भिजवलेली चणा डाळ mixer मधून भरड वाटून काढावी.


फोडणी करतांना थोडे मेथीचे दाणे टाकावे. हिरवी मिरची व भरलेली मिरची पण टाकावी.


पांढऱ्या मुळ्याचे साल सोलून किसावा. जास्तीचे पाणी काढून टाकावे. भरड वाटलेली डाळ किसलेल्या मुळ्याबरोबर मिसळावी. दही घालावे एवढे की छान सरबरीत होई पर्यंत. फोडणी केलेली मिसळावी. चवी पुरते मीठ व साखर घालावी. कोथिंबीर पेरून सगळे एकत्र कालवावे.


मुळ्याचा चटका तयार.
bottom of page