नमस्कार रसिक वाचकांनो,
मी अपूर्वा चिटणीस, २०२४ ची ज्योती अंकाची संपादिका. ह्या वर्षीचा पहिला डिजिटल अंक आपल्यासमोर सादर करीत आहे.
संपादक म्हणून हा माझा पहिलाच प्रयत्न आहे. त्यातून जेव्हा ह्या वर्षी तीन प्रकाशने काढायचे ठरले तेव्हा एक भीतियुक्त दडपण आले. सुरुवात एका छोट्याश्या news-letter ने करावी असे ठरवले. पण क्लीवलंड मधील हौशी लेखक मंडळींनी भरघोस प्रतिसाद दिल्याने आता जवळ-जवळ मिनी अंकच तयार झाला आहे. वाचन अधिक सुखदायक व सोयीस्कर करण्याचा आमचा हा प्रयत्न आहे. हा नवीन अंक मोबाइल friendly आहे. तुम्ही अगदी सहज येता-जाता अंक चाळू शकाल.
हा अंक डिझाईन करण्यात आणि वेब प्रस्तुतिकरणात मला आमच्या "ह्यांची" (उमेश चिटणीस) खूप मदत झाली. त्याकरिता मला त्याला रव्याच्या लाडवांची लाच द्यावी लागली, ही गोष्ट विरळा. तसेच वेब साईट तांत्रिकी गोष्टीत हर्षद कुळकर्णी (मंडळाचे वेब मास्टर) ह्यांची ही खूप मदत झाली. त्याकरिता त्यांचे विशेष आभार.
तुम्हाला हा अंक कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा. काही सूचना किंवा समीक्षा असल्यास मला अवश्य कळवा.
अपूर्वा चिटणीस