top of page

अध्यक्षीय

उत्कर्ष हजरनीस

अध्यक्षीय

नमस्कार,


सर्वप्रथम, ईशान्य ओहायो मराठी मंडळ द्वारा आयोजित बृहन्महाराष्ट्र मंडळ २०२५ मैत्री मेळाव्याच्या प्रचंड यशाबद्दल आपणा सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन! इतक्या मोठ्या प्रमाणावर झालेला हा कार्यक्रम खूपच स्मरणीय ठरला. विविध सांस्कृतिक कार्यक्रम, आणि मनोरंजनाच्या माध्यमातून आपण सर्वांनी एकत्र येऊन मराठी संस्कृतीचा सुंदर उत्सव साजरा केला. या यशा मागच्या प्रत्येक कार्यकर्त्याचे, स्वयंसेवकांचे आणि प्रेक्षकांचे मनापासून आभार. तसेच, कार्यक्रमाची संयोजीका तन्मयी दिक्षीत आणि सह संयोजक गीता लिमये व निलेश कुलकर्णी यांचे विशेष कौतुक.


आता पुढे, आपल्या मंडळाच्या वार्षिक परंपरेतील अत्यंत जिव्हाळ्याचा कार्यक्रम म्हणजे गणेशोत्सव. या वर्षी आपला उत्सव आणखी खास ठरणार आहे कारण तो १० दिवसांचा भव्य सार्वजनिक गणेशोत्सव असणार आहे. श्री स्वामीनारायण मंदिर वडताळ धाम यांच्या सहकार्याने आपण हा सोहळा आयोजित करत आहोत. क्लीव्लॅंड च्या राजाचे आगमन आणि विसर्जन वाजत गाजत आणि मिरवणूक काढून करणार आहोत. त्याच बरोबर दररोज सकाळ-संध्याकाळ आरती, भजन, सांस्कृतिक कार्यक्रम, अशा उपक्रमांमधून सर्वांना गणरायाच्या सान्निध्यात आध्यात्मिक आनंद लाभणार आहे. खास आकर्षण म्हणून भजन संध्या, सामूहिक सत्यनारायण पूजा, तसेच लहान मुलांसाठी उपक्रम, यांचेही आयोजन करण्यात आले आहे.


“वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ ।

निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा ॥”


या मंगलप्रार्थनेसोबत आपण सारे मिळून बाप्पाचे स्वागत करूया आणि आपल्या कुटुंबीयांसह या सोहळ्यात सहभागी होऊया. श्रद्धा, भक्ती आणि संस्कृती यांचा संगम असलेला हा उत्सव आपल्याला एकत्र आणेल आणि प्रत्येक दिवस वेगळी अनुभूती देईल.

मेळाव्याचे यश आपल्या सामूहिक बळाचे प्रतीक होते, तसेच आगामी गणेशोत्सवही आपल्या एकतेचा आणि संस्कृतीप्रेमाचा साक्षीदार ठरणार आहे.


धन्यवाद!!


-उत्कर्ष हजरनीस

अध्यक्ष, NEOMM २०२५

©2023 by North East Ohio Marathi Mandal. Proudly created with Wix.com

bottom of page