गणपती बाप्पा मोरया!!!
नमस्कार मंडळी,
खूप आनंदानी मला हे सांगावसं वाटतय की आपलं NEOMM मराठी मंडळ, संयुक्तरित्या, श्री. स्वामीनारायण वडताल धाम मंदिरासोबत आपल्या सर्वांना आमंत्रित करतंय संपूर्ण १० दिवसांच्या आपल्या क्लिवलंडच्या राजाच्या महोत्सवासाठी.
कृपया जाणून घ्या की हा मोफत असा सोहळा आहे, जिथे तिकिटाची गरजच नाहीये. हवा आहे, तो निव्वळ भक्तीभाव.
तर आता कृपया तारखांची नोंद करून घ्या...
मंगळवार, २६ ऑगस्ट, संध्याकाळी ६ वा. पासून पुढे :
श्रीगणपतीचे मिरवणूक काढत आगमन, श्रीगणपती पूजा, अथर्वशीर्ष पठण, आरती व महाप्रसाद
शनिवार, ३० ऑगस्ट, सकाळी ११ वा. पासून पुढे :
सामूहिक श्रीसत्यनारायण पूजा, आरती व महाप्रसाद
गुरुवार, ४ सप्टेंबर, संध्याकाळी ७ वा. पासून पुढे :
भजन संध्या व प्रसाद
शनिवार, ९ सप्टेंबर, सकाळी ११ वा. पासून पुढे :
महाआरती, महाप्रसाद, आपले सांस्कृतीक कार्यक्रम व मिरवणुकीत ढोल ताश्यांसोबत श्रीगणेशाचे विसर्जन
कृपया नोंद करा : रोज संध्याकाळी ७ वा. मंदिरात आपली आरती असेल.
महाप्रसादाच्या सुयोग्य नियोजनासाठी, कृपया, पुढील लिंक वर आपले RSVP द्यावे, ही एक प्रामाणि क विनंती.
हा असा श्रीगणेशोत्सव आपण आपल्या क्लिवलंड च्या इतिहासात अगदी पहिल्यांदा करत आहोत, श्रीस्वामीनारायण वडताल धाम मंदिराच्या सहयोगाने. तर बाप्पाच्या आशिर्वादासोबत, भेटून विचारांची छान अशी देवाणघेवाणही होईल आपली.
ज्यांना काही योगदान द्यावेसे वाटत असेल, तर त्यांनी, पुढील लिंक वरून द्यावे :
Donation Link - https://www.zeffy.com/en-US/ticketing/cleveland-ganesh-festival
तर लवकरकच भेटूयात, आपापले परिवार एकत्र आणून, अजून एक, अखंड असं एक कुटुंब बनवण्यासाठी.


