
दादा!!!
बाबां नंतर दुसरा आवडता शब्दं आणि कर्तव्यात ही दुसरं स्थान.
किती आपलासा वाटतो ना हा शब्द!
आपण प्रत्येक व्यक्तीत हे नातं शोधत असतो, कारण हे एकच असं नातं आहे ज्यात कुठलंही बंधन नाही आणि स्वार्थ तर त्याहून नाही...
मित्र, गुरू, साथ देणारा, आईच्या ओरड्यातला सोबती, आपल्यावर जीवापाड प्रेम करणारा, कधीही आपली कर्तव्यं न विसरणारा....हे सारं काही दडलं आहे फक्त एका शब्दात, तो शब्द म्हणजे दादा!
साता समुद्रापार असूनही आपल्यावर लक्ष ठेवणारा, म्हणजे दादा!
चूक झाली तरी समजावून सांगणारा आणि पुन्हा पुन्हा चूक करून सुधारण्याची संधी देणारा, म्हणजे दादा!
दादा हे नातं असणं आणि ते तयार करणं, दोन्ही ही स्वर्ग सुखचं...
किती ही काळ लोटला तरी ह्यातला गोडवा कमी होत नाही, किंबहुना तो गोडवा जपून ठेवणारा, म्हणजे दादा!
आई-बाबा आपल्याला हे नातं कसं निर्माण करायचं हे शिकवतात, कारण त्यांना माहित असतं, त्यांच्या नंतर हेचं एक नातं असणार आहे जे आपल्या मुलीला तिच्या सुखाच्या जवळ नेईल.
आई-बाबां नंतर जो आपल्यासाठी उभा राहतो आणि गरज पडल्यास जगा शी लढायची ताकद ठेवतो, तो म्हणजे दादा!
खरंच, दादा हा शब्द फक्त दोन अक्षरांचा असला तरी तो म्हणायला नशीबचं लागतं......
- सौ. परिणिता पोतदार - अभ्यंकर 😊


