top of page
साहित्य:
१ कप दही
१ लहान उकडलेले बीट रूट
१/४ चमचा चाट मसाला
१/४ चमचा भाजलेले जीरे पावडर
चिमूटभर काळी मिरी आणि तिखट
चवीनुसार मीठ
सजावटीसाठी कोथिंबीर
पद्धत:
१. एका भांड्यात दही फेटून घ्या.
२. दह्यात मीठ, काळी मिरी, जीरे पावडर, चाटमसाला घाला आणि चांगले मिसळा. जर दही खूप घट्ट असेल तर थोडे पाणी घाला.
३. बीट किसून घ्या आणि चांगले मिसळा. मी बीटचे थोडे छोटे छोटे तुकडे सुद्धा घालते, पण ते पर्यायी आहे.
४. कोथिंबीरने सजवा.
टीप: तुम्हाला आवडत असल्यास फोडणीचा सुद्धा पर्याय आहे. (फोडणीत जिरे, मोहरी, कढीपत्ता आणि हिरव्या मिरच्यांचा समावेश असू शकतो.)
तुम्ही यात भिजवलेले सब्जा किंवा पुदिना घालून किंवा थोडा शेंगदाणा कूट वगैरे घालून बरीच विविधता आणू शकता.
- सीमा मोटवानी
bottom of page

