top of page

संपादकीय

यश पोतदार

संपादकीय

नमस्कार मित्रांनो,


कसे आहात सगळे? मला तरी ही हमखास खात्री आहे की, आपल्या लाडक्या ईशान्य ओहायो मराठी मंडळाचा सुवर्णमहोत्सव एकदम दणक्यात सुरु आहे, आणि आपल्यातला प्रत्येक जण प्रत्येक येत्या निमित्ताने मन भरून त्याचा आस्वाद घेत आहे.


हे वर्षच इतकं सुंदर सुरु झालंय की प्रत्येक सण आणि कार्यक्रम मोठ्या धूमधडाक्यातच साजरा होतोय. आणि हा आनंद आणि अनुभव खरोखर अवर्णनिय आहे.


आपली सुवर्णसंक्रांत जशी गोड साजरी झाली तसाच आपल्या गुढीपाडव्याचाही सण मोठ्या दिमाखात पार पडला, तोही श्रीरामचंद्रांच्या वाढदिवशी पंगतीत पंचपकवान्नांचा आस्वाद घेऊन.


याच कार्यक्रमासाठी आपण लहानग्यांसाठी एक गुढी बनविण्याची कार्यशाळाही ठेवली होती, आणि लहान मुलांची कार्यकृती सोहळ्याच्या दिवशी प्रस्तुतही केली होती.



हा आनंदसण साजरा होत असताना, आपण सगळे येणाऱ्या BMM 2025 मैत्रीमेळाव्याची वाट पाहतच होतो, आणि आपल्यातलेच बरेच सदस्य त्या कामात पूर्णपणे बुडून कामं करत होते, अहोरात्र शब्दश:, खरेच, विनोद नाही.


सुवर्णमहोत्सवानिमित्त आपण एक सुंदर अशी स्मरणिकाही काढली, ज्यात गेल्या ५० वर्षांत आपलं मराठी मंडळ कसं प्रगल्भ होत गेलं, माणसं, प्रेम आणि मैत्री कशी वाढत गेली, याचं एक प्रतिबिंब दाखवत.



इतक्या मेहनतीने, प्रेमाने आणि जिद्दीने साकार झालेल्या आपल्या BMM 2025 मैत्रीमेळाव्याचे सुंदर शब्दांकरण येत्या काही लेखात आहेच. नक्की वाचा!!!


आपल्या मराठी मंडळाकडे Pause बटण किंवा ती concept पण नाहीये, त्यामुळे, इतके धमाकेदार प्रोग्रॅम्स होऊनही, जे ठरलंय आणि जे मुळात हवय सगळ्यांना, ते तर व्हायलाच हवं.


तर, नुकताच आपला NEOMM'S ANNUAL KID'S SUMMER CAMP खूपच मजेत साजरा झाला. बाकी खेळ आणि दंगामस्तीसोबत मुलांना जास्त मजा आली ती, PlayDoh वापरून आपला गणपती बाप्पा बनवायची. इतकी मजा आणि धमाल आली मी तुम्हाला सांगतो, प्रत्येक मुलाच्या concepts, काहीतरी नवीन शिकण्याची इच्छा आणि जमत नसेल तर शांत आणि प्रामाणिकपणे मला जमत नाहीये, मला मार्गदर्शन द्या, हे होतं, पण, "माझं काम पूर्ण करा", असं नाही. कारण त्यांना शिकायचं होतं, आणि बाप्पा कसा का असेना, तो बाप्पा आपलाच आहे ही भावना त्यांच्या मनात होती. "तू नको करुस, मला करायचंय... Just tell me how to do it..." इतकं गोड वाटलं ते ऐकून आणि पाहून, की पुढची पिढी तयार होतीये. ते तर घडतच आहेत आणि आपणही त्यांना आपापल्या परीने घडवत आहोत.




आता आपण लवकरच आपल्या क्लिवलंडच्या राजाचं स्वागत करूयात, जो विराजमान होणार आहे अश्या ठिकाणी, जिथे, फक्त मराठी मंडळ नाही, पण जगभरातल्या प्रत्येक गणेशभक्ताला १० पूर्ण दिवसांसाठी दर्शन प्राप्त असेल. तर भेटूयात दर्शनाला.


🙏🙏🙏"गणपती बाप्पा मोरया"🙏🙏


यश पोतदार

JYOTI Editor and Communications Lead

NEOMM 2025

©2023 by North East Ohio Marathi Mandal. Proudly created with Wix.com

bottom of page