top of page

९ ची गंमत

संकलित

९ ची गंमत

९ ची गंमत


आपल्या जगात ९ ह्या आकड्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे, अगदी जन्मा आधी आईच्या गर्भात निर्माण होणाऱ्या जीवापासून प्रत्येक गोष्ट नऊ या आकड्याभोवती फिरते.

प्रत्येक युगामधल्या आकड्यांची बेरीज ही नऊ आहे. मानवी वर्षां नुसार गणना केल्यास सत्ययुग १४,४०,००० वर्ष, त्रेतायुग १०,८०,००० वर्ष, द्वापारयुग ७,२०,००० वर्ष आणि कलियुग ३,६०,००० मानवी वर्षांचं आहे. प्रत्येक युगातल्या आकड्यांची बेरीज नऊ आहे. हिंदूंची पुराणे आहेत १८, उपनिषद आहेत १०८, महाभारताची प्रकरणे आहेत १८, ते युद्ध चालले १८दिवस, गीतेचे अध्याय आहेत १८ आणि भागवत पुराणात १८००० श्लोक आहेत. या सगळ्या आकड्यांची बेरीज पुन्हा नऊच येते. कलियुगाची सुरुवात ५१२१ वर्षांपूर्वी झाली, या आकड्यांची बेरीज ही नऊ होते. हिंदू तत्वज्ञानाच्या वैशेषिक शाखेनुसार सृष्टीची नऊ तत्त्वं आहेत : पृथ्वी, पाणी, वायू, अग्नी, आकाश, समय, अवकाश, आत्मा आणि मन. आपण नवग्रहांच्या पूजा करतो. आपण नवरात्र साजरे करतो. म्हणजे दुर्गेच्या नऊ रूपांना, नवदुर्गांना, हा नऊ दिवसांचा उत्सव समर्पित आहे. हिंदू ज्योतिष शास्त्रात नवग्रहांच्या नऊ रत्नांची माहिती आहे. त्यातलं प्रत्येक रत्न नऊ ग्रहांपैकी प्रत्येक ग्रहावर प्रभाव टाकतं. जसे, सूर्यासाठी माणिक, चंद्रा साठी मोती, मंगळासाठी पोवळे, बुधसाठी पाचू, गुरुसाठी पुष्कराज, शुक्रसाठी हिरा, शनिसाठी नीलम, राहूसाठी गोमेद आणि केतूसाठी लसण्यl. आपल्या साहित्यात ही नवरस सांगितले आहेत: शृंगार, हास्य, करुणा, रौद्र, वीर, भयानक, बीभत्स, अद्भुत आणि शांत.


कदाचित गणितज्ञांसाठी पण नऊ हा आकडा रहस्यमय असावा. या आकड्यांच्या जादुई गुणधर्मांमुळे त्यांना नऊ बद्दल फार आकर्षण आहे. प्रथमतः नऊ ही पहिली शुभ संयुक्त संख्या आहे, पहिली संयुक्त विषम संख्या आहे आणि एकमेव एक आकडी संयुक्त विषम संख्या आहे. मिहायलेस्कुच्या प्रमेयानुसार ही दुसऱ्या पॉझिटिव्ह परफेक्ट पॉवर पेक्षा एकाने जास्त असलेली एकमेव पॉझिटिव्ह परफेक्ट पॉवर आहे. त्याशिवाय, तुम्ही जर नऊला शून्याशिवाय इतर कोणत्याही संपूर्ण संख्येने गुणले आणि उत्तरात आलेल्या आकड्यांची शेवटी एकच आकडा उरेपर्यंत सतत बेरीज केली तर शेवटी उत्तर नऊच येते. उदाहरणार्थ नऊचा पाढा घ्या. जर एखाद्या संख्येला त्यातल्या आकड्यांच्या संख्ये एव्हढ्या नवा नी भागले तर येणाऱ्या अपूर्णांक रूपातल्या उत्तरात त्या संख्येची पुनरावृत्ती होत राहते. उदाहरणार्थ, २७४ या संख्येला ९९९ नी भागले तर उत्तर येतं ०.२७४२७४२७४२७४.


एखाद्या बहुभुजाकृतीच्या अंतर्गत कोनांची बेरीज ठरवण्याचे सूत्र आहे (n - 2)(180), ज्या मध्ये 'n' म्हणजे भुजांची संख्या. कोणत्याही बहुभुज आकृतीच्या सगळ्या कोनांची बेरीज नेहमीच नऊच्या बरोबरीची असते. उदा. नऊ बाजू असलेल्या बहुभुज आकृतीला हे सूत्र लागू केलं तर : (९ - २)(१८०) म्हणजे ७(१८०) = १२६०. म्हणजे १+२+६+० = ९. कितीही भुजा असलेल्या बहुभुज आकृतीच्या बाबतीत हे खरं ठरतं. हाच नियम वर्तुळ, त्रिकोण, आयत, चौकोन, पंचकोनी, षटकोनी, सप्तकोनाना लागू पडतो.


याचप्रमाणे, चंद्राचा व्यास २१६० मैल आहे, पृथ्वीचा व्यास ७९२० मैल आहे, सूर्याचा व्यास ८,६४,००० मैल आहे, या प्रत्येकाची बेरीज पुन्हा नऊच. फक्त हेच नाही तर प्रकाशाचा वेग १,८६,२८२ मीटर्स दर सेकंद असतो, ह्याची बेरीज ही नऊच.


असं मानलं जातं की नऊ हा आकडा अंतरीक्ष आणि वेळ यांच्यावरही हुकमत गाजवतो. पृथ्वीच्या आसामध्ये ही तो महत्त्वाची भूमिका बजावतो. उदाहरणार्थ, वेगवेगळ्या स्तरांवर मिनिटांची मोजणी केली तर शेवटी उत्तर नऊच येते.


  • एका वर्षातली मिनिटं ५,२५,६००

  • एका महिन्यातली मिनिटं ४३,२००

  • एका आठवड्यातील मिनिट १०,०८०

  • एका दिवसात १४४० मिनिटं


नऊ या आकड्यात इतकी गंमत आहे बघून गंमत वाटली.


संकलक : यश पोतदार

©2023 by North East Ohio Marathi Mandal. Proudly created with Wix.com

bottom of page