हेमंत जाधव (NEOMM Webmaster)
Jan 16, 2023
ईशान्य ओहायो मराठी मंडळाने मकर संक्रांत २०२३ चा कार्यक्रम, रविवार १५ जनेवारीला मोठ्या उत्साहत साजरा केला. Willoughby हिल्स कम्युनिटी सेंटर येथे पार पडलेल्या या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येत सदस्यांनी उपस्थिती लावली. २०२३ च्या पहिल्याच कार्यक्रमाला सदस्यांचा मिळाललेला प्रतिसाद वाखाण्याजोगा होता. यंदाच्या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण होते “क्लीव्हलँड होम मिनिस्टर" हि स्पर्धा.
प्रवेशद्वारा जवळच नवनिर्वाचित समितीच्या महिला कार्यकर्त्यांनी उपस्थित महिलांचे हळदी कुंकू देऊन स्वागत केले. या वेळी मंडळातर्फे सर्व महिलांना मकर संक्रांतीचे वाणं म्हणून एक छोटीशी भेटवस्तू देण्यात आली.
या कार्यक्रमाची सुरूवात मंडळाचे अध्यक्ष श्री. विवेक विन्हेरकर यांच्या भाषणाने झाली. त्यांनी प्रेक्षकांचे स्वागत केले आणि २०२३ च्या समितीची ओळख करुन दिली. त्यानंतर अतिथींनी जेवणाचा आनंद घेतला.
यावेळी ५ वयोवर्षाखालील मुलांसाठी बोरन्हाण चा कार्यक्रम आयोजित केला गेला होता. पालकांनी आणि मंडळाच्या स्वयंसेवकानी मिळून हा कार्यक्रम उत्तम पार पडला.
त्यानंतर मकर संक्रांतीच्या मुख्य कार्यक्रमाला सुरूवात झाली. क्लिवलँड होम मिनिस्टर २०२३ चा किताब जिंकून पैठणी साडी घेण्यासाठी महिलांमध्ये खूप उत्साह होता. कार्यक्रमचे सूत्रसंचालन श्री. हर्षल बरीदे आणि सौ.केयुरी हजारनीस यांनी केले.
जवळपास ४० स्त्रियांनी या स्पर्धेत भाग घेतला. विविध मनोरंजक आणि कौशल्य पणाला लावणारे खेळ खेळत शेवटी सौ.दीपिका चौधरी यांनी क्लिवलँड होम मिनिस्टर २०२३ चा किताब पटकवला.
या प्रसंगी महाराष्ट्राचे महावस्त्र अशी ख्याति असलेली 'पैठणी साडी' देऊन चौधरी वाहिनींचा गौरव करण्यात आला.
सौ. स्नेहिता बरीदे यांनी या स्पर्धेत दुसरा क्रमांक पटकावला. त्यांना मंडळातर्फे चांदीचे नाणे देउन गौरवण्यात आले.
कार्यक्रमाच्या शेवटी अध्यक्षांनी आपले मनोगत व्यक्त करताना सर्व उपस्थित, स्वयंसेवक आणि समिती सदस्यांचे आभार मानले तसेच पुढील कार्यक्रमासाठी सर्वांना आमंत्रण दिले .