top of page
फुकफुकफुकफुक अगीन काडी
धुरांच्या रिंगा हवेत काढी
झुरके मारून पाहूया
यमाच्या गावाला जाऊया
जाऊया...
यमाच्या गावाला जाऊया ll
आणावा आव खोटा
लावावी आग ओठा
आणावा आव खोटा
लावावी आग ओठा
हिरोंच्या स्टाईली मारुया
यमाच्या गावाला जाऊया
जाऊया...
यमाच्या गावाला जाऊया ll
आगाऊ शाळकरी पोरटी
सिगरेट फुकती चोरटी
आगाऊ शाळकरी पोरटी
सिगरेट फुकती चोरटी
नाकातून धूर काढुया
यमाच्या गावाला जाऊया
जाऊया...
यमाच्या गावाला जाऊया ll
कॅन्सर बीपी गँगरीन
ओढत राहू तरी पण
कॅन्सर बीपी गँगरीन
ओढत राहू तरी पण
जीवाशी जुगार खेळूया
यमाच्या गावाला जाऊया
जाऊया..
यमाच्या गावाला जाऊया ll
सिगारेटचे झुरके चार
मिळते परी किक फार
सिगारेटचे झुरके चार
मिळते परी किक फार
क्षणाचा आनंद घेऊया
यमाच्या गावाला जाऊया
जाऊया...
यमाच्या गावाला जाऊया ll
डॉ. भालचंद्र कुलकर्णी
bottom of page

