हिवाळ्यातील मिक्स भाज्यांचे लोणचे...
१ किलो लोणच्यासाठी...
भाज्या प्रत्येकी साधारण २०० ग्रॅम, गोड कोवळे गाजर (Baby Carrots preffered), मटार व फ्लॉवर बारीक चिरून घ्यावे. एका भांड्यात या सर्व भाज्या एक कराव्या. मटारचे शक्यतो अगदी कोवळे दाणे घ्यावे, ज्याने गाजरासोबतच या दाण्यांनीही घासात एक सुंदर असा गोड Crunch येतो, जो बाकीच्या लोणच्याला सुंदर प्रकारे compliment करतो.
त्यात २-३ मोठ्या लिंबांचा रस, ७० ग्राम केप्र चा कैरी लोणचे मसाला व ७० ग्राम मीठ घालून एकजीव करून घ्यावे. केप्र चा मसाला नसल्यास कोणताही कैरी लोणचे मसाला नक्कीच चालेल.
लक्षात घ्यावे, मसाला व मीठ थोडे आधी कमीच घालावे व एकजीव करून झाल्यावर चवीनुसार त्यांची मात्रा वाढवावी.
हे मिश्रण झाकण लावून वा Airtight डब्यात एक रात्रभर ठेवून द्यावे.

अंदाजे ३०० ग्राम अथवा भाज्या संपूर्ण भिजून वर एका इंचाचा थर राहील इतके तेल कढईत घ्यावे. तेल अगदी कडकडीत गरम करून घ्यावे. तेल तापले आहे की नाही निश्चित करण्यासाठी एखाद दुसरा मोहरीचा दाणा तेलात टाकावा व पहावे तो दाणा तडकतो की नाही. तेल तापले आहे संपूर्णपणे, हे निश्चित झाल्यावर गॅस बंद करून तेल पूर्णपणे थंड होण्यासाठी ठेवून द्यावे.
हे तेल पूर्णपणे थंड झाल्यावर आपल्या भाज्यांच्या डब्यात घालावे व पूर्णपणे एकजीव करून घ्यावे.

आपले लोणचे तयार आहे...😍
कृपया ही गोष्ट लक्षात ठेवावी की हे लोणचे जरी असले तरी फार फार तर एक ते दोन आठवड्यातच संपवावे. आपण थंड प्रदेशात राहत असल्याने हे थोडे अजुन काळ टिकू शकते, पण लवकर संपवलेलेच बरे...
प्रियदर्शनी गिरीश पोतदार

